सोळा आण्याच्या गोष्टी - स्प्लेंडर - BLACKCAT

Submitted by BLACKCAT on 4 September, 2019 - 03:48

माझी स्प्लेंडर होती. कोरी करकरीत होती. बरीच वर्षे गावात वापरली.

मग अखेर एक दिवस मुंबई गाठली. तिथेही छान करियर मिळाले. पण मुंबईची लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी , वेळोवेळी कंपनीने घडवलेल्या विमानयात्रा . आज कल पांव जमी पर नही पडते मेरे !... यात स्प्लेंडर घरीच धूळ खात बसली. चार पावसाळेही पाहिले तिने -- माझ्याशिवाय.

आणि एक दिवस मग ठरवलं.

"आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही. "

होना! लोकल, ट्याक्सी, विमान , आणि मेट्रो अन मोनो येणार .... आता स्प्लेंडर कशाला हवी?

.. स्प्लेंडर विकली.

त्यानंतर चारच दिवसात अपघात झाला. माझा डावा पाय चार ठिकाणी फ्रॅक्चर झाला. कोणतीही दुचाकी चालवायला आता मी असमर्थ आहे.

आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही.!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला गोष्ट खूप आवडली. शतशब्दांमध्ये आरंभ, पार्श्वभूमी, योगायोगाचं धक्कातंत्र आणि आटोपशीर नेमके शब्द सगळं छान जमवलं आहे.

छान

जामोप्या , नर्व्ह डॅमेज झाली का अपघातात? पाय का बरा झाला नाही?
हे स्प्लेंडरचे प्रकरण माहिती होते. सध्या बादशाह आणि बेगमचं बरं चालू आहे ना? Lol
शहजादी कितवीत गेली?

ओह !...

या सत्यकथेवर अचंबित होणार्‍यांसाठी : धनगराच्या औषधाची कथा वाचा. अन फ्रॅक्चर्ड पाया निमित्ताने जामोप्यांना वेगवेगळी पारायणे कशी करावी लागली ; त्यामुळे अध्यात्मिक उंची कशी आपोआप हासिल झाली, अन अल्टिमेटली चार्वाक कसा भेटला ते ही वाचा. आहे मायबोलीवरच.

चार्वाक त्यांना जवळचा वाटण्याची इतर कारणं आहेत. ती मला ठाऊक आहेत.
नवीन Submitted by अमर ९९ on 13 September, 2019 - 21:59
<<
मृतावस्थेत गेलेले अमर ९९ नंतरचा अवतार घेणार काय?