शशक-करिअरभृण हत्या

Submitted by Cuty on 9 September, 2019 - 08:12

बारावीचा निकाल! 64टक्के. खोलीत ती मलूल होऊन पडली होती.
बाहेर आईच्या डोळ्यात पाणी, 'कसं फसवलं बघा पोरीनं. हुशार आहे, ईंजिनीअरिंग करायचं म्हणून जेवायचं ताटसुध्दा उचलू दिलं नाही. खोलीतून बाहेर येऊ दिलं नाही. सगळं जागेवर. तुम्हीच सांगा.'
'नशिबच फुटकं!', वडिल.
'अहो बीसीएसला नक्की अडमिशन मिळेल', एकजण.
'हो खड्ड्यात गेलं ईंजिनीअरिंग!!' वडिल उद्विग्न.
सर्वजण पांगले!

'जन्मतःच नख लावलं असतं तर दोन्ही पोरांची शिक्षणं सुरळीत झाली असती.आता हिलाच बीसीएसला घालून वर होस्टेलचा खर्च !
तरी वर्षभर मारली, कोंडली,कुणाशी बोलू दिली नाही.'
'मी पण शाळेत सोडायला आणायला जात कडक लक्ष ठेऊन होतो.'

ती सावकाश उठून बसली. 'सुटले! जीव वाचला, खड्ड्यात गेलं ईंजिनीअरिंग!'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

मला नाही पटली. तर्कसुसंगत नाही वाटली. ज्या पालकांच्या डोक्यात जन्मतःच नख लावलं असतं तर बरं झालं असतं असा विचार येतो त्यांचं मुलांवर खरंच कितपत प्रेम असणार? आणि मग असे आई-वडील मुलगी शिकावी म्हणून एवढे प्रयत्न करतीलच कशाला? ती शिकली किंवा नाही शिकली तरी काय फरक पडणार आहे? इंजिनीअरिंग लांबच राहिलं, बीसीएस पण खूप मोठी गोष्ट झाली.

नाही आवडली. ईंजिनीअरिंग म्हणजेच सर्वस्व असे मानणारे लोक असूच कसे शकतात? आणि तिला फर्स्ट क्लास आहे एवढा criteria enough असतो ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ चांगला जॉब मिळायला मग डिग्री काही का असेना. असो.

आवडली

मुलगी शाळेत खूप हुशार असून तिला ईंजिनीअर व्हायचे आहे.आई वडिलांनी ती शिकू नये म्हणूनच प्रयत्न केले आहेत.मात्र ती एक हुशार मुलगी म्हणूनच ओळखली जात असल्याने ते लोकांसमोर आपण मुलीला शिकण्यासाठी किती प्रोत्साहन दिले,मदत केली हे दर्शवतात.ते सर्वांसमोर खोटेच बोलत आणि वागत आहेत.

> Submitted by Cuty on 9 September, 2019 - 21:48 > हो आलं लक्षात. चांगला प्रयत्न.

विनिताजी, मुलींनी लहानपणापासून जोपासलेलं आवडीचं करिअरचं स्वप्न वेळ आली की निष्ठूरपणे फुलण्याआधीच मारलं जातं, बिनबोभाट! आपल्या सोयीने.
मुले आणि मुली यांची करिअरची स्वप्ने,आवडीनिवडी ,अपेक्षा याबाबतीत केला जाणारा भेदभाव,त्यापायी मुलींना होणारा त्रास,शेवटी असहाय्यतेने त्यांनी केलेली परिस्थितीशी तडजोड
दाखविण्याचा प्रयत्न केला आहे फक्त.
अर्थात, समाजात सर्वत्र अशी परिस्थिती मुळीच नाही,ही समाधानाची बाब! जशी वाईट तशी चांगली बाजूही असतेच
प्रतिसाद दिल्याबद्दल आभार!

मुले आणि मुली यांची करिअरची स्वप्ने,आवडीनिवडी ,अपेक्षा याबाबतीत केला जाणारा भेदभाव,त्यापायी मुलींना होणारा त्रास,शेवटी असहाय्यतेने त्यांनी केलेली परिस्थितीशी तडजोड
दाखविण्याचा प्रयत्न केला आहे फक्त. >>

हेतू चांगला आहे cuty, पण अशा वेळी पालकांनी मुलीला साध्या शाळेत घातलं असतं, कॉलेजमध्ये बारावीला आर्ट्सला घातलं असतं जेणेकरून इंजिनीअरिंगचा प्रश्नच उद्भवला नसता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला तुझं उच्च शिक्षण परवडणार नाही, असं रोखठोक सांगितलं असतं.

अगदी "वर्षभर मारली, कोंडली,कुणाशी बोलू दिली नाही.'
'मी पण शाळेत सोडायला आणायला जात कडक लक्ष ठेऊन होतो." एवढे करायची गरजच नव्हती.

क्रुपया राग मानू नका ☺️

धन्यवाद नौटंकी. कथा समजून घेतल्यास लक्षात येईल ,की पालक समाजासमोर आपण केलेला भेदभाव लक्षात येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करीत आहेत कारण मुलीची हुशारी सर्वांच्या डोळ्यात भरली आहे आणि लोकांच्याही तिच्याकडून,पालकांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. असो,आपल्या प्रतिसादाचे स्वागतच आहे.

शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च इंजिनिअरिंगला ही येईलच. किंबहुना जास्तच येईल. मग तो खर्च उचलायची तयारी आहे, आणि बरोबर इतर दोन मुलग्यांचा खर्च ही उचलायची तयारी आहे.
पण बीएसईचा खर्च नाही हे काही पचत नाहिये. इंजिनिअरिंगला नाही मिळाला प्रवेश आणि परिचितांत मान शरमेने खाली गेली इ. असतं तर पटण्यासारखं होतं. इंजिनिअर होण्यापर्यंत सगळं करून शिकवलं आणि मग नख लावलं असतं तर बरं झालं असतं!!!! १८ इयर्स टू लेट!!!
राग मानू नका... बघा पटतंय का.
बाकी तिला ही कसलं करिअर करायचं आहे ते कुठेच न आल्याने करिअरची हत्या कशी झाली ते ही समजत नाहिये. त्यावर एखाद वाक्य घातलंत तर ते क्लिअर होईल.

> शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च इंजिनिअरिंगला ही येईलच. किंबहुना जास्तच येईल. मग तो खर्च उचलायची तयारी आहे, > इंजिनीअरिंगचा खर्च उचलायची तयारी नाहीय.
BSc चा खर्च करावा लागेल म्हणूनदेखील वैतागलेत त्याऐवजी 'जन्मताच नख लावलं असतं तर दोन्ही पोरांची शिक्षणं सुरळीत झाली असती.' म्हणताहेत

आईने वर्षभर मारली, कोंडली,कुणाशी बोलू दिली नाही.
वडीलपण शाळेत सोडायला आणायला जात कडक लक्ष ठेऊन होते.

पण आई बाप इतका आटापिटा का करत होते? चांगले मार्क मिळून इंजि. जाता यावं म्हणून ना? फार तर फ्री सिट धरू. पण फ्री सिटची इंजि. फी विरुद्ध बीएसईची फी मध्ये काय जास्त असतं?
आणि नख लावायचं होतं तर १८ वर्षे का माशा मारल्या? जर नख लावायचा विचार आज आलाय, तर तो पैशापेक्षा आपल्या स्टेटसला साजेसं शिक्षण न घेता डाऊनमार्केट ठिकाणी जावं लागेल म्हणून आलेला दाखवायला हवा असं वाटलं.

> पण आई बाप इतका आटापिटा का करत होते? चांगले मार्क मिळून इंजि. जाता यावं म्हणून ना? > नाही. आईबाप पोरीला बंधनात ठेवायचं म्हणून आटापिटा करत होते.

> बाहेर आईच्या डोळ्यात पाणी, 'कसं फसवलं बघा पोरीनं.हुशार आहे, ईंजिनीअरिंग करायचं म्हणून जेवायचं ताटसुध्दा उचलू दिलं नाही.खोलीतून बाहेर येऊ दिलं नाही.सगळं जागेवर.तुम्हीच सांगा.'
'नशिबच फुटकं', वडिल.
'अहो बीसीएसला नक्की अडमिशन मिळेल', एकजण.
'हो खड्ड्यात गेलं ईंजिनीअरिंग!' वडिल उद्विग्न.
सर्वजण पांगले! > हे सगळे केवळ लोकांना दाखवायचे दात आहेत. जन्मताच नकुशी मुलगी आयुष्यभर नकुशीच राहिली आहे. आई तिला मारते, खोलीत कोंडून ठेवते, कोणाशी बोलू देत नाह. बाप शाळेत सोडाआणायला जाऊन मुलीवर लक्ष ठेवतोय.

आता लोकांना दाखवायला म्हणून मुलीला BSc ला घालावे लागणार, खर्च होणार म्हणून दोघे वैतागले आहेत.

> आणि नख लावायचं होतं तर १८ वर्षे का माशा मारल्या? जर नख लावायचा विचार आज आलाय, > नख लावायचा विचार जन्मल्यापासूनच आहे, तो मुलीला परत्परत ऐकवला जातोय. छळ मारहाण चालू आहेच. मुलगी चिवट आहे म्हणून मेली नाही आतापर्यंत.

ती परवा एक गोष्ट आली होती ना ज्यात लग्नमुल झाल्यावर ती खेळात प्रवीण असलेली बाई आत्महत्या करते, तसली केस आहे ही.... कमॉन एवढी अवघड नाहीय ही गोष्ट समजायला!

बंधनात ठेवायचं म्हणून भरपूर अभ्यास करायला प्रोत्साहन? कुठलीही काम तिला करू न देता सगळा वेळ अभ्यासात द्यावा हा ध्यास? तिने विचलित होऊ नये म्हणून असे प्रयत्न?
नाही झेपलं. असो.

दिल धडकने दो या चित्रपटात प्रियांका चोप्रा राहुल बोसला सांगते की मला डिव्होर्स हवाय. नंतर सगळे चर्चा करायला बसतात. राहुल बोसची आई बोलता बोलता म्हणते की 'हमने इतने साल इस लडकी में इन्व्हेस्ट किये' यातला इन्व्हेस्ट हा शब्द प्रियांका चोप्राला खटकतो.
मला वाटतं वरच्या कथेतही आईवडिलांना याचंच दुःख झालंय, इतके दिवस मुलीमध्ये 'इन्व्हेस्ट' केले आणि ते आता फुकट गेलं.

> बंधनात ठेवायचं म्हणून भरपूर अभ्यास करायला प्रोत्साहन? > प्रोत्साहन दिलेलं नाहीय

> कुठलीही काम तिला करू न देता सगळा वेळ अभ्यासात द्यावा हा ध्यास? > कसला ध्यास?

> तिने विचलित होऊ नये म्हणून असे प्रयत्न? > कसले प्रयत्न?

खोलीत कोंडून ठेवताहेत आणि मारहाण होतेय आणि बाहेर लोकांना सांगतानामात्र "जेवायचं ताटसुध्दा उचलू दिलं नाही.खोलीतून बाहेर येऊ दिलं नाही.सगळं जागेवर." असं सांगताहेत. that all is just pretence.

> मला वाटतं वरच्या कथेतही आईवडिलांना याचंच दुःख झालंय, इतके दिवस मुलीमध्ये 'इन्व्हेस्ट' केले आणि ते आता फुकट गेलं. > नाही.

नलूची गोष्ट ही कथा वाचा आणि मग परत वरची शशक वाचा.

> बाहेर आईच्या डोळ्यात पाणी, 'कसं फसवलं बघा पोरीनं.हुशार आहे, ईंजिनीअरिंग करायचं म्हणून जेवायचं ताटसुध्दा उचलू दिलं नाही.खोलीतून बाहेर येऊ दिलं नाही.सगळं जागेवर.तुम्हीच सांगा.'
'नशिबच फुटकं', वडिल.
'अहो बीसीएसला नक्की अडमिशन मिळेल', एकजण.
'हो खड्ड्यात गेलं ईंजिनीअरिंग!' वडिल उद्विग्न.
सर्वजण पांगले! > हा सगळा केवळ देखावा आहे लोकांना दाखवायला.

> 'जन्मताच नख लावलं असतं तर दोन्ही पोरांची शिक्षणं सुरळीत झाली असती.आता हिलाच बीसीएसला घालून वर होस्टेलचा खर्च !
तरी वर्षभर मारली, कोंडली,कुणाशी बोलू दिली नाही.'
'मी पण शाळेत सोडायला आणायला जात कडक लक्ष ठेऊन होतो.' > ही खरी गोष्ट आहे.

अॅमी ,मला कथेचा जो अर्थ अभिप्रेत आहे, अगदी तोच तंतोतंत तुम्ही सांगितलात. अमितजी आणि वावे ,अॅमींनी सांगितल्याप्रमाणे पालकांचे खायचे दात वेगळे आहेत. ना त्यांनी मुलीला प्रोत्साहन ,ना वेळ दिला , मुलीत इन्व्हेस्ट करायची ईच्छा तर त्यांना कधीच नव्हती! मात्र लोकांसमोर फक्त नाटक आहे.खरेतर त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आणि बीसीएसला अॅडमिशन मिळण्याइतके मार्क्स मुलीला मिळाल्याने त्यांचा तिळपापड झाला आहे.कारण त्यांना मुळी मुलीचे शिक्षण, होस्टेल यावर खर्च करायची ईच्छाच नव्हती,मात्र समाजासमोर आपले खायचे दात दाखविता येत नाहीत.त्यामुळे मुलीवरही ईच्छा नसताना खर्च करावा लागणार आहे.कारण पूर्वीपासून त्यांनी चांगुलपणाचे ढोंग केले आहे आणि आता तेच त्यांना नडले आहे.आता तिला पुरेसे मार्क्स असताना तिला दुय्यम शिक्षण दिले किंवा शिक्षण थांबविले तर आपल्याच मुलांमध्ये आणि मुलीमध्ये केलेला भेदभाव समाजाच्या नजरेस येईल.

अमितजी मुलीला इंजिनीअरिंगला अॅडमिशन मिळू नये म्हणून छळ, मारहाण करून तिच्या स्वप्नाची हत्याच केली आहे पालकांनी. तरीही तिला निदान बीसीएससाठी पुरेसे मार्क्स मिळतात व ती पर्याय नसल्याने तडजोड स्वीकारते.

'आरामात' उठून बसली वाचून मला तरी वाटलं की मुलीलाच नको आहे इंजिनीयरिंग त्यामुळे तिने मुद्दामच कमी मार्क पाडले
आणि त्यामुळे तिच्या आई वडीलांची चिडचिड होते आहे.

तसं नाहीये हे कळलंय, चांगला प्रयत्न

होय हर्पेनजी, इतक्या छळानंतर मुलीच्या मनाचीही तयारी झाली आहे तडजोड करण्याची. जेमतेम सतरा अठरा वर्षाच्या मुलीची मनाची अवस्था पालकांमुळे 'भीक नको पण कुत्रं आवर' अशी आहे. इंजिनिअरिंग नाही तर बीसीएस करू पण छळापासून सुटका झाली असा विचार करून ती निश्चिंत झाली . प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

हम्म. आरामात म्हणजे सावकाश या अर्थाने वापरलंय. पण शब्द बदलायला हरकत नाही. सावकाश किंवा दुसरा कुठला समर्पक शब्द सुचतोय का relived साठी? 'सुटले' पुढे उद्गार म्हणून आलाय.