Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तो नसेल हो.
काय माहिती कोण.
भूषण कडु
भूषण कडु
नाही, वुटवर व्हिडीओ पाहून तिच्या एक्स बी.एफ ची नावं फेमस केली तिच्या हेटर्सनी ! कुक्की, भूषण, उदयन असे तिघे.
उदयन नवीन ऐकलं, कुक्की शिवानी
उदयन नवीन ऐकलं, कुक्की शिवानी म्हणाली होती, काही उपयोग झाला नाही ते वेगळं, शिवने काही आपला विनी बाणा सोडला नाही.
तो पण होताना रिलेशनशिपमध्ये, त्यामुळे तो ok असेल याबाबत, बरं तोच पाठीमागे लागलेला खूप तिच्या.
भूषण कडू वीणाचा तो आधीचा
भूषण कडू
वीणाचा तो आधीचा भूषण पण असाच ड्रीम बॉय होता तिच्या भाषेत. " मला प्रिन्सेस सारखे वागवायचा, मला पँपर करायचा " इ.
आत्ता सध्या बिबॉ विनर म्हणून जे काय अटेन्शन मिळेल आणि ज्या ऑफर्स मिळतील त्या पदरात पाडून घ्याव्या त्याने म्हणजे झालं 
आता शिव च्या बाबतीत पण सिरियस वाटते ती. त्याला दिलेले बड्डे प्रेझेन्ट छान आहे!
बाकी शिव ला खतरोंके खिलाडी, बिबॉ इ. जमेल बर्यापैकी. पण अॅक्टिंग वगैरे जमेल याबद्दल शंकाच वाटते
कदाचित उदयनचच निकनेम कुक्की
कदाचित उदयनचच निकनेम कुक्की असेल
हिंदीत आधीपासून पाठवणार असतील
हिंदीत आधीपासून पाठवणार असतील तर ठीक, मधेच गेल्याने काही भाव मिळत नाही. मेघाला कुठे मिळाला. यावर्षी ख को खि सुरु नाही का झालं अजून. ती अमृता खानविलकर जाणार होती ना.
शिव हिरो मटेरीअल नाहीये, तो आहे तसाच हिरो दाखवायचा असेल म्हणजे निरागस पण aggressive तर लीड रोल मिळेल. आदरवाईज त्याला साईड रोल जास्त मिळतील, म मां नी ऑफर केलेला रोल चांगला आहे बहुतेक, सातपैकी एक मावळा, मेघापण त्या मुवीत असणार आहे बहुदा. वीणापण मुवीत लीड नाही करू शकत. तिच्यासाठी सिरियल्स. शिवानी करू शकते फक्त.
कदाचित उदयनचच निकनेम कुक्की असेल >>> हम्म असेल.
वीणाने tattoo काढलेला cute आहे फक्त मराठीत हवा होता, मराठी bb त भेटले ना आणि त्याने मराठीत काढला म्हणून, मराठी हवा होता. त्रासही कमी झाला असता
शिव आणि Shiv. दोन अक्षरी, चार अक्षरी. खुश आहेत दोघं एकदम. फार गोड दिसतायेत. मिडिया पण कौतुक करतेय की शिव वीणा फेक लवस्टोरी म्हणणाऱ्या हेटर्सनी बघा. इथल्या शिव वीणा fans नी youtube वर जाऊन बघा रे. मी काही लिंक देत नाही इथे. Happy for them and best wishes.
बिग बॉस चा फायदा ह्या दोघांनाच जास्त होतोय. बाकी सगळे पडले मागे, भरभरून ह्यांच्याच news, ह्या दोघांकडेच मिडियाचं लक्ष.
त्या माधव हीनाचे tick tock व्हिडीओज निघालेत. मी एक बघितला. एकदा हीना bb मध्ये पण म्हणाली तिला शिव नाही माधवसाठी आणलेलं. माधव आणि तिची जोडी काही तिथे जमली नाही. ते चांगले फ्रेंड्स आहेत. हीना माधव. हीना शिव वीणा अशा चांगल्या फ्रेंड्स जोड्या झाल्यात बाहेरही.
Madhav is married, don't
Madhav is married, don't think he was interested in becoming another Pushki!
माहितेय. तो पुष्कीसारखा
माहितेय. तो पुष्कीसारखा नाहीये, ते चांगले फ्रेंड्स आहेत फक्त पण bb ला फेक लवस्टोरी हवी होती एक, असं वाटलं. माधव रुपालीला जोडी म्हणून पाठवलं ते workout नाही झालं. हिनाच म्हणालेली एकदा मला शिवसाठी नाही पाठवलं, माधवसाठी असं. पण माधव गुड boy आहे. त्याने फेक पण केली नाही.
माधव रुपालीला जोडी म्हणून
माधव रुपालीला जोडी म्हणून पाठवलं ते workout नाही झालं >>>>>> रुपालीने आधीच फेसबुकवरुन परागशी सेटिन्ग केलेले.
हो ना, ते वीणामुळे बाहेर आलं
हो ना, ते वीणामुळे बाहेर आलं, त्यामुळे रुपाली अजून जेलस तिच्यावर. हे bb ना माहिती नव्हतं का, त्यांनी पराग रुपालीला जोडी म्हणून introduced करायचं होतं मग खरंतर.
माधव थोडा आपला स्वतंत्र गेम खेळला असता तर पुढे गेला असता, शिवानी बाहेर पडल्यावर त्याला चान्स होता, तो आपला नेहा शिवानी ह्यात अडकला. तो काय बोलायचा ते मात्र समजायचं नाही, पण टास्क्स चांगले करायचा. शिवानीने एक murder चा फक्त चांगला केला, बाकी नाही. माधवची personality मात्र चागली होती.
नंतर हीनाने वेगळं सांगितलं पण आल्यावर ती बिचुकलेच्याच मागे पुढे करत होती, फार ugly होतं ते. तो बाहेर पडला म्हणून गेम बघायला मिळाला तिचा पण कधी कधी चीप वागली ती task मध्ये, कधी छान करायची. भांडणे, किरकिर पण केली तरीही आ रो किंवा शिवानीपेक्षा ती हवी होती फायनलला.
(No subject)
हो बघितलं हे.
हो बघितलं हे.
विणाचा कलर्स मराठी वरचे live chatting पण मस्त वाटलं, शिवपेक्षा. अर्थात मी त्या वेळी नाही बघत किंवा प्रश्नपण नाही विचारत. मी उशिरा बघते, तसं बघितलं. छान impressive आणि ग्रेसफुल वाटली. शिवानीला बाहेर भेटणार का, वगैरे तर या वर बोलायचं नाही. या अर्थी शिवानीने तिला प्रचंड त्रास दिला आहे हे दिसून येतं. म मां शेवटी योग्य बोलते शिवानीला की ती सतत वीणा कशी वाईट हेच सांगत होती, बोलत होती. असो bb ने शिवानीचा चांगला अपमान केला कृतीतून.
नेहा डिझर्व करत होती top २ म्हणाली. प्रेक्षकांनी जो कौल दिलाय त्याचा रिस्पेक्ट, मी आणि शिव असतो तरी शिव जिंकावा हेच वाटलं असते कारण तो स्वभावाने पण जास्त चांगला आहे, खेळला पण छान म्हणाली.
VEENA JAGTAP & HEENA PANCHAL
VEENA JAGTAP & HEENA PANCHAL LIVE:
https://www.youtube.com/watch?v=rOBbfuTzHP4&t=12s
Megha Dhade FIRST REACTION On Shiv Thakre Winner Of Bigg Boss Marathi 2:
https://www.youtube.com/watch?v=vCtwSTe4GQk
Shiv Thakre WINNING Rally In Amravati | Bigg Boss Marathi 2 Winner:
https://www.youtube.com/watch?v=wKSuoD3BB_s
Veena Jagtap Ganpati Darshan 2019 | Bigg Boss Marathi 2 Fame:
https://www.youtube.com/watch?v=QCVkhuYXzvk
Kishori Shahane FINALLY REACTS On NOT Winning Bigg Boss Marathi 2:
https://www.youtube.com/watch?v=_U0blD7f3hE
Shivani Surve THANKS Fans For Supporting Her | Bigg Marathi Season 2 |:
https://www.youtube.com/watch?v=0JFpQPWn4Kc
किशोरीने बाहेर येऊन बरेच
किशोरीने बाहेर येऊन बरेच इंटरव्यू दिलेत. अन पुन्हा तेच तेच तेच त्यात पण, मल्टिप्लाइड बाय ३ ( नवरा आणि मुलगा पण!) सिनिऑरिटी, न दिलेला रिस्पेक्ट इ. इ.
किशोरीने बाहेर येऊन बरेच
किशोरीने बाहेर येऊन बरेच इंटरव्यू दिलेत. अन पुन्हा तेच तेच तेच त्यात पण, मल्टिप्लाइड बाय ३ ( नवरा आणि मुलगा पण!) सिनिऑरिटी, न दिलेला रिस्पेक्ट इ. इ. >>> हो ना, मी बघतंच नाही. ती गोड ग्रेसफुल होती पण गेममधे कधी कधी चांगलं खेळली पण ती पहील्या तीनांत येण्याएवढं तिने काही केलं नव्हतं. शिवानीने तिला चढवलं होतं, तुम्ही जिंकायला हव्यात कारण शिवानी शिव नेहा वीणा यांच्यावर जळत होती खरंतर. ताई गृहीत धरुन बसली की आपण असू पुढे, खरंतर इथपर्यंत तिला आणण्यात पराग आणि मेघाचा मोठा वाटा होता. आता शिवानीला परत आणलं म्हणून ताईला राग आलाय पण आत तर शिवानीशी गोड गोड वागत होती.
ताईला सगळे उर्मटपणे बोलायचे त्याचा राग यायचा मात्र मला. रिस्पेक्ट ठेऊनपण चुका दाखवून देऊ शकता तुम्ही, या सर्व मुली मात्र अति उद्धट, उर्मट, आगाऊपणेच बोलायच्या.
शिव वीणाला घेऊन अमरावतीला गेला काल, आज त्याचा बड्डे. सगळे शिवला सतत वीणाबाबत भडकवत होते, तो हरेल, ती त्याचा फायदा घेते, त्याने ऐकलं नाही हे उत्तम केलं, त्याला जिंकवण्यात शिव वीणा कपल आवडायचं त्यांचाही वाटा होताच.
त्याने आईबद्दल सांगितलं की तिला विनी आवडायची, बहीणीलापण आवडते पण स्क्रीनवर एखादा असा सीन आला तर आम्ही चॅनेल बदलतो आणि तिथे कधी कधी आम्ही दोघे असे वागलो, त्यामुळे आई वैतागली होती. हे छान सांगितलं त्याने, हे बहुमत होतं घराघरातलं. मलाही त्यांचा असा थिल्लरपणा आवडायचा नाही आदरवाईज मला ते दोघेही आवडायचे, कपल म्हणून.
हो, किशोरीच्या त्या फॅमिली
हो, किशोरीच्या त्या फॅमिली सोबत किरकिर्या इंटरव्युहची खूप टिंगल होतेय खूप सो.मि वर, किशोरी शहाणेची किशोरी येडे झाली आहे
तिचा नवरा म्हणे तो या इंडस्ट्रीतला असूनही यातल्या कोणाची नावही त्यानी ऐकली नाहीत, कोणी कसे तिच्या तोलामोलाचे नवह्ते इ.
वर म्हणे शिवला मिळालेल्या मुव्ही ब्रेकला काही अर्थ नाही, तो काही सैराटसारखा सिनेमा नाहीये म्हणे, शिवचे फॅन्स युथ क्राउड असल्यामुळे जिंकला म्हणे तो, किती जेलस मि.विज !
मला एक समजत नाही ताईच्या
मला एक समजत नाही ताईच्या नवऱ्याचे सोडा पण मुलाला तर रोडीज वगैरे माहिती असेल ना, शिव त्यामुळे फेमस होता माहिती असेल ना. मग ते fans असणार, तिथे त्याच्याबरोबर काम केलेले असणार प्लस सामान्य प्रेक्षक होते सपोर्ट करायला, वीणा काय खेळली म्हणे. अरे ताई जेव्हा शेवटी nominate व्हायला घाबरत होती, तेव्हा वीणा नाहीतर मला करा nominate असं पहिल्यापासून बोलत होती, शिव ऐवजी मी जाते म्हणत होती फक्त तिने शेवटी एकट्या शिवानीमुळे जायला नकार दिला, तो तिचा stand योग्य होता.
Btw वीणा पोचली अमरावतीला
Btw वीणा पोचली अमरावतीला सासुबाईंना इंप्रेस करायला, फोटो व्हिडीओज आले सोशल मिडीयावर, शिवानी अँड पब्लिक जेलस होऊन खाक झाले असतील
सध्यातरी मिया बीबी राजी तो
सध्यातरी मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी आहे. मेघाला वीणा आवडत नाही पण मेघा शिव एकत्र भेटले तेव्हा सर्व विनी बद्दल विचारत होते शिवला आणि तुझ्या शिवानीला attitude कमी करायला सांग म्हणाले, तेव्हा मेघा शिवानी खूप चांगली आहे असं म्हणाली आणि शिव माझ्या आणि विनीमध्ये आता पाऊस आहे, ती भेटणार आहे, तेव्हा मात्र मेघाला म्हणायला लागलंच, या प्रेमी जीवांमध्ये कोण कोण येतंय. मेघाला कळून चुकलं असेल शिव साठी आणि सर्व प्रश्न विचारणाऱ्या त्याच्या fans साठी विनी महत्वाची आहेच.
विनी सर्वाना भेटून परत आली मुंबईत.
अभिजीत केळकर डोंबिवलीत आलेला,
अभिजीत केळकर डोंबिवलीत आलेला, प्लस शशांक केतकर, मृणाल दुसानीस. मला माहिती नव्हतं, अर्थात मी जात नाही कलाकारांना भेटायला वगैरे पण माझी छोटी भाची टोटली फिल्मी आहे, ती मामाला घेऊन गेलेली, मी आताच फोटो बघितले fb वर. केळकर आणि भावाचा सेल्फी आहे. बाकी श्रीरंग भावे वगैरे आलेले. भावाने चांगली अभिनेत्री मृणाल दुसानीस असं लिहिल्यावर मी shocked
. आता विचारेन त्याला
. अर्थात तिच्याबरोबर फोटो नाहीयेत. केळकर बरोबर आहेत म्हणून इथे लिहिलं.
आता हीच पोस्ट मन बावरे धाग्यावर टाकते.
shiv has been offered mtv's
shiv has been offered mtv's ace of space 2 and one more reality show.
Yeah.
Yeah.
फक्त एम tv बघत नसल्याने मला हे काय ते माहिती नाही. एम tv नवीन होता तेव्हा बघितलेलं ते channel काही दिवस. मग नाहीच.
किशोरीचे इंटरव्ह्यू मलाही
किशोरीचे इंटरव्ह्यू मलाही unnecessary वाटले. नेहा वीणा रूपाली सारख्या नोबडीजना ती नाव घेऊन कशाला मोठं करत आहे? त्यांना प्रेक्षक सोशल मीडियावर व्यवस्थित अंडी टोमॅटो मारतच आहेत. नेहाचा फेसबुक लाईव्ह सगळा विस्कटून टाकला लोकांनी
किशोरीने आता आगामी प्रोजेक्ट्सकडे वळावं.
शिवबद्दल बोलायचं तर मुळात चावण्याचा unmanly प्रकार त्याने केल्यामुळे त्याची इमेज taint झाली आहे. त्यातून हिरो मटेरियलसाठी त्याचा मुलीसारखा गर्ली आवाज सूट होत नाही. त्याचं मराठी भयावह वाईट आहे. त्याने रिएलिटी शोज करत राहावं फारतर. अगदी बिग बॉस वन ची विजेती मेघा धाडे तरी कुठे काही मोठं काम करताना दिसतेय एक वर्षाने?
त्यामुळे किशोरीचा नवरा म्हणाला ते काही चूक नाही.
शिवानी या सगळ्यात क्लास अपार्ट सुंदर आहे. ती हिरोईन बनू शकते. वीणा आणि नेहाचं पण अभिनयाच्या क्षेत्रात उत्तम बस्तान बसू शकतं कारण खलनायिकेच्या भूमिकेसाठी दोघी नॅचरल आहेत. नुसता प्रेझेंन्स पुरेसा आहे निगेटिव्हीटी निर्माण करण्यासाठी!
<तिचा नवरा म्हणे तो या
<तिचा नवरा म्हणे तो या इंडस्ट्रीतला असूनही यातल्या कोणाची नावही त्यानी ऐकली नाहीत, कोणी कसे तिच्या तोलामोलाचे नवह्ते इ.
वर म्हणे शिवला मिळालेल्या मुव्ही ब्रेकला काही अर्थ नाही, तो काही सैराटसारखा सिनेमा नाहीये म्हणे, शिवचे फॅन्स युथ क्राउड असल्यामुळे जिंकला म्हणे तो, किती जेलस मि.विज >
हे बोलायची काय गरज त्याला? किशोरीने जे आत राहून कमावलं ते बाहेर येऊन गमावतेय.
लोक तिच्या तोलामोलाचे नाहीत, हे तर बिचुकलेंचं वाक्य.
बिग बॉसचं कॉम्पोझिशन काय असतं हे हिंदी-मराठीचे इतके सीझन झाल्यावर माहीत असायला हवं.
सो कॉल्ड तोलामोलाचे लोक असते तर किशोरी इथवर पोचलीच नसती.
शिव कशाही मुळे जिंकला असेल, त री ते मान्य करायलाच हवं. प्रेक्षक आणि मतं देणारे कोणत्या वयोगटातले अ सणार हे त्याला माहीत असायलाच हवं. रच्याकने रोडीजमुळे आणि वि दर्भ फॅक्टरमुळेच तो जिंकला असं म्हणणार्यांसाठी - इथे मायबोलीवर त्याला सपोर्ट करणार्यां बहुतेकांना या दोन्हीशी देणंघेणं नव्हतं.
बिग बॉसमध्ये जाऊन फिटनेस, डान्सिंग स्किल्स सिद्ध केल्याने किशोरीलाही काही आता लीड रोल्स मिळणार नाहीएत.
विज दांपत्याने मुलाला लाँच करायला सिनेमा काढलेला. त्याचं नाव ही कोणाला माहीत नसेल . त्यांनी शिवच्या फिल्म करियरब द्बोलण्ण्ण हा ही जोक.
आता पुढे ते काय करतात यात रस असावा इतकं मला कोणीही आवडलेलं नाही.
बिग बॉसमुळे काम मिळालं असा एक राहुल महाजन तेवढा माहीत आहे.
बिग बॉसचं कॉम्पोझिशन काय असतं
बिग बॉसचं कॉम्पोझिशन काय असतं हे हिंदी-मराठीचे इतके सीझन झाल्यावर माहीत असायला हवं.
खरं आहे. इथे जनरली लूझर्सच येतात. त्यामुळे किशोरीने फार अपेक्षा ठेवायला नकोच होत्या. पण मागच्या वेळच्या तुलनेत यावेळी खूपच थर्ड क्लास सीझन झाला- इतक्या लो लेव्हलसाठी किशोरी प्रिपेअर्ड नसावी. प्रचंड प्रमाणात हिंसा, ती नेहा वैशाली किंवा शिवने केली असली तर माफ, परागला वेगळा न्याय, शिवानि बिचुकले बाहेर जाऊन परत येणं, इतर लोक (मुव्हि प्रमोशन वाले, लास्ट सीझन वाले, या सीझनमध्ये बाहेर गेलेले) सतत घरात मुक्कामाला येऊन राहणं, नेहाला सेफ करतानाच फक्त लोकांना इम्युनिटी पॉवर देऊन तिला नॉमिनेशनमध्ये येऊ न देणं, टिकिट टू फिनाले फिक्स करणं आणि ते बाप्पा, हीना वगैरेंनी नंतर उघड करणं, हीनाने नंतर मला अमक्या पुरुषासाठि पाठवलं वगैरे बोलणं- ते सगळे पुरुष विवाहित असणं- हे सर्व किशोरीला अपेक्षित नव्हतं. तिला बहुधा मोठी स्टार म्हणून हरभर्याच्या झाडावर चढवून साईन केलं असावं ( ती सर्वात महाग प्लेयर होती.) थोडक्यात , इव्हन बाय पास्ट बिग बॉस स्टँडर्ड्स, धिस वॉज वे टू चीप / फिक्स्ड.
काल बिचुकलेचा एक व्हिडीयो
काल बिचुकलेचा एक व्हिडीयो फिरत होता फेसबुक वर
साहेब पुण्यात आले होते आणि लक्ष्मी रस्त्यावरच्या एका मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध हॉटेल मधे गेले होते.
तर त्याला बघायला आणी सेल्फी घ्यायला लोकांची बर्यापैकी गर्दी होती. पोराबाळांसकट गणपती बघायला आलेल्या मध्यमवर्गीय लोकांची संख्या त्यात बरीच दिसली.
कोणातरी हुशार माणसाने एफ बी लाईव्ह केलं होतं .
त्या बिचुकले ला बिबॉ मधे बघुन पण कोणी त्याचे फॅन्स कसे काय होउ शकतात असा प्रश्ण पडला.
बर फोटो काढुन घेण्यार्या लोकांमद्धे छोटी छोटी मुलं पण दिसली.
त्यांचे आई बापच त्यांना फोटो काढुन देत होते.
बिचुकले ची खरी बाजु टीव्ही वर पाहुनही कसं काय लोक त्याला एवढा भाव देउ शकतात ?
तो गुन्हेगार तर आहेच पण माणूस म्हणुनही कसा आहे ते आपण पाहिलं, पोरांना आईला बायकोला कसं वागवतो , तरी तो लोकांना फोटो काढुन घेण्याईतका सेलीब्रीटी कसा काय वाटु शकतो ?
किशोरी , अगदी मराठीतली का
मी आधीही लिहिलंय -किशोरी , अगदी मराठीतली का होईना, मोठी स्टार आहे हे मला बिचुकलेंनी सांगितल्यावर कळलं
हे लोक तिच्या बरोबरीचे नाहीत, असं तिचा नवरा म्हणत असेल, तर तो बिचु कलेचं वाक्य रिपीट करतोय. गंमत म्हणजे बिचुकलेला किशोरी आपल्या बरोबरीची वाटत होती.
मनोरंजनाच्या क्षेत्रात जे सध्या चालतं ते चलनी नाणं असतं. सध्या तरी शिव, वीणा, नेहा, शिवानीचा जमाना आहे.
येत्या काळात हेच लोक स्क्रीनवर तिच्यापेक्षा जास्त दिसणार आहेत. किती काळ दिसतील हा भाग वेगळा.
स्मिता श्रीपाद , बिचुकले
स्मिता श्रीपाद , बिचुकले आपल्या मुलांना , बायकोला कसं वागवतो, हे न खटकणार्या लोकांची संख्या कमी नसेल.
किशोरी शहाणेंची आणखी एक
किशोरी शहाणेंची आणखी एक तक्रार-बिबॉसच्या
घरात माझ वजन कमी झाल.
घरात तीन वेळा साप आला होता.
मलि हे इंटर्व्ह्यू म्हणजे हास्य जत्रा वाटत आहे
लहान मुल कशी आईकडे तक्रारी करत असतात,तसा प्रकार चालू आहे.
पण हिचा नवरा जर बॉलिवूड मध्ये आहे,किंवा हे दोघ अभिनय क्षेत्रात आहेत,तर यांना साधी गोष्ट कळत नाही की या क्षेत्रात डेस्टिनी नावाचा फँक्टर अत्यंत महत्वाचा आहे
आज या क्षेत्रित कितीतरी असे कलाकार आहेत की ज्यांच्याकडे एवढ टँलेंट नसतानाही त्यांना यश मिळालेल आहे
कधी कुणाला ब्रेक मिळेल सांगता येत नाही.
मग हिचा नवरा ,शिवानी,वीणा,नेहा यांच काहीही होणार नाही,अस विधान कस काय करतो
किशोरी शहाणेचा तरी अभिनयाची कसोटी लावणारा एखादा सिनेमा ,नाटक,मालिका मला तरी आठवत नाही.
किशोरीताईचे पिक्चर मलाही आठवत
किशोरीताईचे पिक्चर मलाही आठवत नाहीत, काय टीव्हीवर बघितले असतील तेच. मल्टीकास्ट पिक्चरमधेच असायची बहुतेक, रादर मला निवेदीताला बघितलेलं पिक्चरमधे, तिचे काही रोल आठवतायेत, तसे हिचे आठवतही नाहीत. पण bb त मला ती ग्रेसफुल वाटली, पण stand अजिबात घ्यायची नाही, अजिजी फार करायची nominate व्हायला नको म्हणून, तिच्याशी खूपजण फार उर्मटपणे बोलायचे ते नाही आवडायचे. काही वर्ष ती industry त आहे, काम केलंय हे मात्र नक्की, भले मी बघितलं नसेल पण ह्या नवीन मुली एखादा रोल करून सातवे आसमानपर असतात आणि तिला आणि सुरेखाताईना योग्य मान देत नाहीत हे मला वाटायचं.
पूर्ण family चे जाऊन interviews का घेतायेत तिच्या. इतके बोअर आहेत, मी एक interview काही मिनिटं बघू शकले. तिच्या एकटीचे घ्या, नवऱ्याला काय वाटतं, मुलाला काय वाटतं कशाला.
बाकी जरा डोळे उघडून बघा म्हणावं, हिंदी industry ने जरी voting केलं नसतं तरी महाराष्ट्राने उत्तम voting केलेलं आहे शिवसाठी, फक्त तरुणाईनेच केलं असं नाही. ताईला पण पराग fans नी आणि मेघा fansनी मतं दिलीच की मग तुमची हिंदी industry का नाही आली धाऊन, voting करायचे ते करणार, त्यात वयाचा संबंध नसतो. तरीही youngsters म्हणावं तर मग बॉबीच्या फ्रेंड्सनी केलं असेल की voting, परत त्याचा मोठा भाऊ add क्षेत्रात फेमस आहे तिथून पण मिळाले असतील की. जे आहे ते आता ताईने ग्रेसफुली स्वीकारायला हवं.
Pages