मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

शिव विनर झाला नसता तर वीणाने त्याला इतका भाव दिला असता का?..मला तर राहून राहून वाटतं आहे की त्याच्या प्रसिद्धीचा वीणा वापर करुन घेत आहे..कुठे ही जा..इवन शिव च्या घरी सुध्हा पहिल्यांदा गेला trophy घेउन शिव..तिथे ही सोबत.. त्या trophy आणि विनर असल्याचा काहिच फील नाही घेतला त्याने..अस वाटत की एकत्र विभागून दिलिये trophy ..bdw यावेळी विनर ला रक्कम कमी आणि बाकी काहिच sponser कडून नाही मिळाल..गेल्या वेळी मेघा ला weekend home मिळाल होत

शिव विनर झाला नसता तर वीणाने त्याला इतका भाव दिला असता का?..मला तर राहून राहून वाटतं आहे की त्याच्या प्रसिद्धीचा वीणा वापर करुन घेत आहे. >>> वीणा अजिबात त्याच्या प्रसिद्धीचा वापर करुन घेत नाही. बिग बॉसमधे तोच तिच्या आधी पाठीमागे लागला, मग मैत्री झाली, तीही प्रेमात पडली. वीणाला गरज नाही अशा प्रसिद्धीची, ती कलर्सची अभिनेत्री होती, कलर्स तिच्यासाठी काहीना काही करणारच. तिथे शिवला सगळे नावं ठेवायचे पण वीणा रडायची त्याला कोणी काही बोललं तरीही. त्यालाही राग यायचा तिला कोणी बोललं तर.

शिव वीणा या जोडीचा एकट्या वीणाला नाही तर शिवलाही फायदा झालाय, तो चावला तेव्हा वीणा फॅन्सनी पण मतं देऊन त्याला वाचवला कारण बाकी सगळे फॅन्स एकत्र येऊन हीनाला मत द्या ही मोहीम करत होते तेव्हा शिवला त्याच्या स्वतःच्या आणि वीणाच्या फॅन्सनी मदत केली. खरंखुरं प्रेम आहे, तर आहेत एकत्र. शिवने आई, बहीणीचं, म मां कोणाचं ऐकलं का.

कोणीच कोणाचा आतही फायदा घेतला नाही, बाहेरही घेत नाहीयेत. आतमधे तर ताऊन सुलाखुन निघालं त्यांचं प्रेम , बऱ्याच जणांनी छळलं वीणाला जास्त आणि शिवला काही बाही भरवायचा प्रयत्न केला पण बाहेर त्यांचे असंख्य fans होते. बाहेर आल्यावर त्यांचे fans बघून आणि त्यांचे काढलेले व्हिडीओज बघून ते दोघेही सरप्राईजड. शेवटच्या वीकेंडला म मां ना पण म्हणायला लागलं, शिव तू वीणाला दोष देतात हे बाकीचे तर ऐकून का घेतोस, विषय संपवायचा, वीणाबद्दल काही सांगू नका म्हणून. हे का तर बाहेर म मां ना त्यांना बोलतात दोघांना याबद्दल अनेक जणांनी टीका केली. वीणा तर एकदाही कॅप्टन न होता, कुठलीही immunity न मिळवता तिसरी आलीय. शिवसाठी लकी आहे, दोनदा तिच्यामुळेच शिव कॅप्टन झाला. पहिल्यांदा प्रवक्ता होती त्याची, तिने मस्त स्वत:ची भूमिका निभावली आणि नेहाला तोंडघशी पाडले, शिवला कॅप्टन करून अर्थात बिचुकले यांचा पण मोठा वाटा होता. दुसऱ्या वेळी स्वत: उत्तम खेळलेली असताना शीवसाठी त्याग केला. त्याच्या जिंकण्यात तिचाही वाटा आहेच.

बरेच ठिकाणी दोघांना एकत्र बोलावतात. तर ती काय करणार.

मेघाला पैसे जास्त आणि फायदा जास्त झाला पण प्रसिद्धी शिव वीणाला जास्त मिळतेय आणि भावही.

Btw मला सांगा पेशवाईने गश्मीर वीणा जोडी निवडली आहे का त्यांच्या प्रसिद्धीसाठी, तर ते दोघे असूही शकतील मोठा माधव आणि मोठी रमा पण, वीणा अभिनय नीट करेल की नाही मला शंका आहेच. दिसेल छान. ती अशीही बरेचदा ग्रेसफुल दिसते, आता बाहेर आल्यावर तर जास्तच गोड आणि ग्रेसफुल वाटते.

माधवराव म्हणून टिपिकल शुध्द तूपातला प्युअर पुणेरी अ‍ॅक्सेन्ट आणि रविन्द्र मंकणी, आलोक राजवाडे सारखी पर्सनॅलिटीच लागते ! >>>>>>> मग आरोह वेलणकर सुद्दा चालून जाईल की माधवराव म्हणून.

मी विणाचे 'राधा प्रेम' चे काही सिन्स तुनळीवर पाहिले होते, त्यात सोज्वळ अभिनय केला होता. बिबॉमधली विणा हिच का असा प्रश्न पडला होता मला.

सुलू Lol

ते सिरीयल मध्ये आणि प्रत्यक्षात वेगळं. शिवानी सुर्वेने पण भूमिका बऱ्याच positive आणि सोज्वळ केल्यात पण प्रत्यक्षात ती वीणापेक्षापण निगेटिव्ह वाटली.

शिवानी सुर्वेने पण भूमिका बऱ्याच positive आणि सोज्वळ केल्यात पण प्रत्यक्षात ती वीणापेक्षापण निगेटिव्ह वाटली. >>>>>>>> +++++++११११११. उगाच नाही सगळे बिबॉमध्ये आपला खरा चेहरा आय मीन खरा स्वभाव दाखवायला येतात. लोकान्चे गैरसमज तरी दूर होतात त्यान्च्याबद्दल.

शिव आणि वीणा पुण्यात रेडिओ सिटीवर इंटरव्ह्यूसाठी आले असताना एकि फँनने शिवला प्रश्न विचारला की बाहेर वीणाच जेवढ तुझ्यावर प्रेम दिसत आहे तेवढ प्रेम तुझ्याकडून दिसत नाही.....खरतर मलाही असच वाटत आहे.
आणि वीणाच्या अमरावतीला जाण्याबद्दल एका अनसीन मध्ये शिवनेच वीणाला सांगितल होत की तो तिला अमरावतीला नेणार आहे,त्यावेळी वीणाला त्याच्या आईच टेंशनही आल होत,तस तिने शिवला बोलूनही दाखवल होत.

एकि फँनने शिवला प्रश्न विचारला की बाहेर वीणाच जेवढ तुझ्यावर प्रेम दिसत आहे तेवढ प्रेम तुझ्याकडून दिसत नाही >>> त्याने काय उत्तर दिलं. मी तो interview नाही बघितला. ती deeply involved आहे मात्र.

जो त्याने कलर्स tv वर interview दिलेला तो बघितलेला, त्यात त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना, दुसरी वीणा जास्त डिझर्विंग होती नेहापेक्षा त्याच्या मते हे मात्र सांगितलं कारण task ती छान पद्धतीने खेळायची, चांगली लेवल असायची हे पटलं मला त्याचं मात्र कारण नेहा काय किंवा even हीना काय चीप लेवलला बरेचदा गेल्या. वीणाने चीटिंग केली पण चीप लेवलला नाही गेली. त्या interview मधे वीणाबद्दल एकंदरीत फार कौतुक दिसलं. पण बोलण्यात एकंदरीत शिव पेक्षा विणाचे impression जास्त पडते. तिचा जास्त छान झाला interview म्हणजे प्रेक्षकांशी व्हिडीओ chatting होतं ते.

थँक यु. बघितला, ऐकला तो प्रश्न पण त्या दोघांनी दिलं उत्तर. वीणाने पण सांगितलं की तो खूप प्रेम करतो. इथेही वीणा छान बोलतेय. तिला बहुतेक राधा सिरीयलमुळे सवय असेल पब्लिक interviewsची. तो सरावला नाहीये अजून किंवा त्याला तसं व्यक्त होता येत नाही, त्याची उत्तरं ठराविक असतात, उत्स्फुर्त बोलतो, थोडा एक्साईट असतो पण सेम वाटतं बरेचदा अर्थात हा त्याचा निरागसपणा असेल तर तो टिकला तरी चालेल. ती मात्र छान सामोरी जाते, बरेचदा वाटतं की तिचे impression पडते आणि जास्त आत्मविश्वासाने थेट बोलत असते, कधी कधी भिडत असते.

वैदर्भीय माधवराव , मुंबईकर भांडखोर रमाबाई पुणेरी गोपिकाबाई सोबत पंगा घेतात असा स्पूफ जबऱ्या होईल

https://youtu.be/eY0RyugFAjw
शिव आणि वीणा पहिल्यांदाच गोल्ड अँवॉर्ड्सला गेले होते.हा जो इंटर्व्ह्यू आहे ,त्यात शेवटचा प्रश्न शिवला कळला नाही,तो वीणाला विचारत होता,वीणाने त्याला सांगितल,तो प्रश्न इंग्लिशमध्ये विचारला आहे का,मी नीट ऐकूनही मला तो प्रश्न हिंदीत आहे की इंग्लिशमध्ये आहे ते कळल नाही.कारण शिवला काही इंग्लिश शब्द पटकन कळत नाहीत.

काहीही प्रश्न विचारतात दिवाली आरही है तो animal के लिये क्या precautions लेने चाहिये ? इंग्लिश न कळण्यापेक्षा त्याला एकू आले नाही बहुधा.

गोल्ड awards कोणाचं असतं, शिव वीणा ला कसं काय बोलावलं. असो पण त्यांना भाव मिळतोय सगळ्याच मिडियाकडून, फक्त मराठी मिडिया देतेय असं नाही. छान दिसतायेत. ह्या वरच्या व्हिडीओपेक्षा एक वेगळा बघितला, सेम हाच पण जवळून दोघे, त्यात जास्त मस्त दिसतायेत. ह्यात जरा लांबून आणि माईक्स जास्त दिसतायेत.

https://www.youtube.com/watch?v=D4E5Ny1QbAo हा मस्त आहे. दोघे जवळून आहेत, शिव वीणा छान दिसतायेत, विनी जास्तच क्युट दिसतेय.

काहीही प्रश्न विचारतात >>> हे मात्र खरं.

२१, २२ ला चला हवा येऊ दया मध्ये ट्रिपल सीटची टीम येणार आहे. शिवानी आणि बाप्पाला झी मराठीने आमंत्रण देण्याचे टाळले. बाकी सगळे येणार आहेत.

गोल्ड awards कोणाचं असतं,......hindi tv industry sathi.veenacha friend vikas kalantri jo ya awatds cha ptlroducer ahe tyane invite kel hot.
शिवानी आणि बाप्पाला झी मराठीने आमंत्रण देण्याचे टाळले. बाकी सगळे येणार आहेत.......shivani sur nava madhe yeil promotionala ,te colors marathi cha ahe na.pan zm ne asa karu naye.zal na ata bigboss.

नाही, माझी भाची आहेना त्यात. तिने फोटो टाकलेत आमच्या फॅमिली ग्रुपवर आणि बघा सांगितलं आहे. आम्ही तर झी मराठी काढून टाकलं आहे पण आमच्याकडे अ‍ॅमेझॉनचं फायर स्टीक आहे, ते लाऊन बघता येईल नाहीतर नव-याकडे जिओ आहे त्यावर बघू, किंवा झी ५ वर.

shivani sur nava madhe yeil promotionala ,te colors marathi cha ahe na.pan zm ne asa karu naye.zal na ata bigboss. >>> बरोबर, बाप्पाला पण टाळलं. पण फार आहे त्या दोघांत चॅनेल वॉर. मागे एक सायकल का काय पिक्चर आलेला, तेव्हा भाऊ कदम लीड असून कलर्स मराठीने पण त्याला बोलावलं नव्हतं, त्या पिक्चरच्या प्रमोशनच्यावेळी. काय माहीती का एवढी तेढ, झीची मोठी मोठी लोकं टीव्ही १८ ला जॉईन झाली आहेत ना, निखिल साने आणि दिपक राज्याध्यक्ष. त्यामुळे असेल.

मी आत्ताच पेशवाई श्रीमंती, पुणे यांच्या दुकानाचं उद्घाटन बघितलं युट्युबवर, वीणा मेन मॉडेल आहे त्यांची. छान भाव मिळतोय तिला, सेपरेट स्वतःच्या हिमतीवर. इथे शिवचा काहीही संबंध नाही, गश्मीर आहे तिच्याबरोबर.

गोल्ड awards कोणाचं असतं,......hindi tv industry sathi.veenacha friend vikas kalantri jo ya awatds cha ptlroducer ahe tyane invite kel hot. >>> अच्छा म्हणजे इथे वीणामुळे शिवला आमंत्रण मिळाले, चांगलं आहे. दोघांना एकमेकांची पॉझिटीव्ह अर्थाने मदत होतेय.

चिन्मय असावा.
शिवला कुठलीतरी सिरियल मिळाली आहे,डिटेल्स नाही सांगितले त्याने.वीणाला मुव्ही ऑफर झाली आहे.

शिवने बॉम्बे टाईम्स च्या इव्हेंटला विक्रम फडणीससाठी मॉडेलिंग केलं, मेघा धाडेपण होती, तो एकदम natural मस्त वाटला, मेघा नाही तेवढी, कॉन्शस दिसली जास्त.

शिवला सिरीयल ऑफर झाली का, छान. वीणा हवी होती बरोबर. वीणाला मुवि का, छान छान.

https://www.youtube.com/watch?v=7n8B35idXNU

कलर्स मराठी अवॉर्डस, जास्त फोटो बिग बॉस वाल्यांचे आहेत.

यात सु न ध्या न ची स्पृहापण आहे पण समहाऊ ती नाही मला आवडली ह्या अटायरमधे. साडी, हेअरस्टाईल काहीच नाही आवडलं मला.

शिव विणा च्या मिरची मराठी वर कंपॅटिबीलीटी टेस्ट घेतली दोघांची >>> मस्त आहे.

स्प्रुहा मला पण नाही आवडली त्या अटायर मध्ये.
बाकी शिव वीणा कलर्सच्या नवीन टॉक शो मध्ये पण येत असावेत.काल शूटिंग चा एक फोटो टाकला होता शिवने आणि समथिंग एक्सायटिंग अस कँप्शन होत,वीणा पण होती.
पहिल्या भागाची सुरुवात सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या मुलाखतीने होणार आहे.

आजच्या पेपरात शिवानी सुर्वेच्या अंकुश चौधरी सोबतच्या चित्रपटाची जाहिरात आहे. या शुक्रवारी रिलीज होतोय. आज ती च ह ये द्या मध्ये येतेय.

काल लोकसत्तामध्ये अन्कुश चौधरीचा इन्टरव्ह्यु वाचला. त्यात त्याला ' शिवानी बिबॉमध्ये रागीट, आक्रमक वागत होती. प्रत्यक्षात को-स्टार म्हणून तुला कशी वाटली' विचारल. त्याने ' प्रत्यक्षात ती खुप मेहनती, सर्वान्ची काळजी घेणारी आहे. शोचा फॉरमॅटमुळे तिला अस वागाव लागल असेल कदाचित. ' अस सान्गितल.

कलर्सवर सूर नवा संपल्यावर सोहळ्याचे पूर्वरंग कार्यक्रमात कलाकारांच्या मुलाखती नेहा घेत आहे.एक झलक पाहिली.

Pages