सोळा आण्याच्या गोष्टी - "प्रेस टु............." - चौबेजी

Submitted by चौबेजी on 5 September, 2019 - 05:37

"काहीही होत नाही, तू फुकट घाबरतोस."

"हे बघ कुठेतरी लाल बटन आणि त्याच्या शेजारी लाल रंगावर पांढरी कवटी पाहिली तर बटन दाबायच्या आधी कोणीही सेन्सिबल माणूस दहा वेळा विचार करेल."

"न्यूक्लिअर वॉर ऑलरेडी घडलंय. अजून काय वाईट होणारे?"

"इथे लिहिलंय प्रेस टु...... टु व्हॉट?? पुढचं गेलंय. बटन दाबू नकोस."

क्लिक!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह
मस्त!

देवकी,
बटन दाबल्यानंतर टाईम ऊलटा चालायला लागला, म्हणजे सर्वांचा अंत करत कधीतरी तो संपणार. बाँब नाही फुटला पण जग सुरूवातीकडे पर्यायाने अंताकडे जाणे चालू झाले.
अहं ब्रम्हासsssमि Proud

खूपच उत्तम!! Happy
असे संवाद लिहिणे जे उलट्या क्रमाने वाचतानाही सुसंगत वाटतील हे कौशल्याचे काम आहे.