सोळा आण्याच्या गोष्टी - अनन्य - सनव

Submitted by सनव on 5 September, 2019 - 03:52

ब्लीडींग झाल्यामुळे मध्यरात्री नवर्‍याने तिला अ‍ॅडमिट केलं. सोनोग्राफी झाल्यानंतर कोणीच काही तिला सांगत नव्हतं. रक्तस्त्राव सुरुच होता, बाळाची हालचाल जाणवत नव्हती. ती एकटीच खोलीत. रात्रपाळीचा शिकाऊ डॉक्टर आला आणि कसलंतरी इंजेक्शन दिलं. तिच्या चेहर्‍यावरची भिती पाहून थबकला. "डोन्ट वरी. बाळ ठीक आहे. डॉ.बापट घरातून निघाल्यात...येतीलच." तिला झोप लागेपर्यंत तो तिथेच थांबला होता.

काही तासांनी - "शी इज परफेक्ट."..डॉ.बापटांनी गोर्‍यागुलाबी बेबीगर्लला तिच्या हातात ठेवलं. "कशी बघतेय लुकुलुकू डोळ्यांनी." नवरा अभिमानाने म्हणाला. तो सावळा उंच देखणा डॉक्टर दिसत नव्हता. "डॉक्टर यादव कुठायत?". "या नावाचे कोणी डॉक्टर नाहीयेत आपल्याकडे." डॉ.बापट गोंधळून म्हणाल्या. तो रात्री बसला होता त्या खुर्चीत एक मोरपीस फक्त विसावलं होतं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच..
ही कृष्णाष्टमीला तर अजूनच छान वाटली असती..

गणपती काम करेल कि नाही सांगता येत नाही पण कृष्ण काम करतो Happy

Submitted by ॲमी on 5 September, 2019 - 14:52">>> हो न, तुमचा प्रतिसाद वाचून, एक माणूस बुडताना गणपतीचा धावा करतो की बाप्पा वाचव मला, पण बाप्पा येऊन त्याला वाचवायच्या ऐवजी किनाऱ्यावर उभा राहून नाचतो अन म्हणतो की दरवर्षी तुम्ही माझे विसर्जन करता अन नाचता तर आज मी तुझे विसर्जन करतो न नाचतो हा जोक आठवला.

सनव, अवांतरा साठी क्षमस्व

गणपती काम करेल कि नाही सांगता येत नाही पण कृष्ण काम करतो Happy >>>> ज्याची भगवंताच्या ज्या रुपावर श्रद्धा त्याला त्याच रुपात भगवंत भेटत राहातो Happy . ओळखता आलं पाहिजे.

व्वाह मस्तच.
काहीतरी ट्रॅजिक एंडिंग असेल असे वाटले होते, पण तसे काही झाले नाही हे बरीक छान झाले.

Pages