सोळा आण्याच्या गोष्टी - अनन्य - सनव

Submitted by सनव on 5 September, 2019 - 03:52

ब्लीडींग झाल्यामुळे मध्यरात्री नवर्‍याने तिला अ‍ॅडमिट केलं. सोनोग्राफी झाल्यानंतर कोणीच काही तिला सांगत नव्हतं. रक्तस्त्राव सुरुच होता, बाळाची हालचाल जाणवत नव्हती. ती एकटीच खोलीत. रात्रपाळीचा शिकाऊ डॉक्टर आला आणि कसलंतरी इंजेक्शन दिलं. तिच्या चेहर्‍यावरची भिती पाहून थबकला. "डोन्ट वरी. बाळ ठीक आहे. डॉ.बापट घरातून निघाल्यात...येतीलच." तिला झोप लागेपर्यंत तो तिथेच थांबला होता.

काही तासांनी - "शी इज परफेक्ट."..डॉ.बापटांनी गोर्‍यागुलाबी बेबीगर्लला तिच्या हातात ठेवलं. "कशी बघतेय लुकुलुकू डोळ्यांनी." नवरा अभिमानाने म्हणाला. तो सावळा उंच देखणा डॉक्टर दिसत नव्हता. "डॉक्टर यादव कुठायत?". "या नावाचे कोणी डॉक्टर नाहीयेत आपल्याकडे." डॉ.बापट गोंधळून म्हणाल्या. तो रात्री बसला होता त्या खुर्चीत एक मोरपीस फक्त विसावलं होतं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्वांचे धन्यवाद Happy

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।
भगवदगीता ९-२२

आवडली !!!
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।

आता अर्थ सांगा नाहीतर हेज़ेन्बर्ग यांची वाट पाहावी लागेल

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।>>>>>>>

एकदा भगवंताशी जो अनन्य झाला, अनन्यतेने भगवंताचे चिंतन करू लागला, त्याची अनन्यतापूर्वक परमात्म्याची सर्वतोपोटी उपासना सुरू झाली, की तो सर्वार्थाने परमात्म्याशी जोडला जातो. मग त्याचा योगक्षेम परमात्मा वाहतो, जाणतो, चालवतो.

आंतरजाल साभार! Happy

Submitted by मी_मधुरा >>

परफेक्ट लिहिलंय..थँक्स मधुरा!

भारी होती कथा!
अभिनंदन!!!

माझ्या मते ह्या कथेला पहिला क्रमांक मिळायला हवा होता..!

Pages