सोळा आण्याच्या गोष्टी- ठाकठोक- बिपिन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 4 September, 2019 - 11:40

मी तसा ओके आहे .
फक्त एक गोष्ट सोडता . मला जास्त आवाज आवडत नाही . सहनच होत नाही.
पण वरच्या मजल्यावरची ती जीवघेणी ठाकठोक ! ती बाई हे सारं मुद्दाम करते .
मला त्रास द्यायला. छळायला.
यावर काहीतरी उपाय काढायलाच हवा; नाहीतर मी मरून जाईन असं वाटतं.

आज मला बरं वाटतंय. शांत शांत . वेगळंच .कारण वरचा आवाज बंद झालाय.
पण पोलीस आले आणि त्यांनी मला धरलं .
“का खून केलास तिचा ?” एका पोलिसाने विचारलं.
मला काहीच आठवत नव्हतं. सांगणार तरी काय?
एका कामवालीने मध्येच तोंड घातलं ,” साहेब, ती बाईसुद्धा वेडसर होती. तिला सारखा पालींचा भास व्हायचा . नसलेल्या पालींच्या मागे ती घरभर फिरायची. त्यांना मारत - ठोकत !”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त

छान

तीच कथा पुन्हा सबमिट केली आहे . संपादित करून . आधीचे शब्द कमी होते . आताचे शब्द अचूक १०० आहेत , विरामचिन्हे सोडता . संदर्भ - संयोजकांचे आधीचे दोन प्रतिसाद .

सगळ्या वाचकांचा पुन्हा आभारी आहे
फक्त एक विनंती
कोणाच्याही , कुठल्याही कथेवर अशी प्रतिक्रिया देऊ नका कि ज्याने रहस्य इतर वाचकांना कळेल . काही जण आधी प्रतिक्रिया वाचतात म्हणून .
धन्यवाद .