प्रवास माओवाद्यांबरोबर

Submitted by टवणे सर on 14 August, 2019 - 01:08

Nightmarch: Among India’s Revolutionary Guerrillas
by Alpa Shah

माओवादी म्हटले की गडचिरोली ते झारखंड या पट्ट्यात आदिवासी भागात होणारे हिंसक हल्ले बहुतेकांच्या डोळ्यासमोर येतील. उग्रवादी, दहशतवादी ही विशेषणे यांना लावली जातात. आजकाल अर्बन नक्षल ही संज्ञादेखील पॉप्युलर झाली आहे.
मात्र नक्षलींचे कार्य का टिकून आहे, कसे चालते, त्यांचे साधनसामुग्री तसेच मनुष्यबळाच्या रासदीचे मार्ग कोणते आणि मुख्य म्हणजे ही चळवळ का टिकून आहे याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल असेल.

अल्पा शाह या ब्रिटिश समाजशास्त्र विषयातील अभ्यासक आहेत (आफ्रिकेतील गुजराती कुटुंबात जन्म व इंग्लंडमध्ये शिक्षण व पुढील आयुष्य). त्यांनी प्रत्यक्ष झरखंडामधील खेडेगावात 4पेक्षा अधिक वर्षे राहून छोटा नागपूरमधील आदिवासी जमातींवर अभ्यास केला आहे. ज्या खेडेगावात त्या राहिल्या तिथे साहजिकच त्यांचा संबंध नक्षलवादी कार्यकर्ते व नेत्यांबरोबर आला. एका वरिष्ठ नेत्याला भेटण्याची त्यांना संधी मिळाली. त्यासाठी त्या दुसऱ्या राज्यात असलेल्या एका कॅम्पमध्ये भेटीला गेल्या. तिथे त्यांना झारखंडला परतणारी एक प्लॅतून दिसली. त्या प्लॅतूनबरोबर त्यांनी सात रात्रीचा 150मैलाचा जंगल शेतीवाडीतून पायपीटीचा प्रवास केला त्याची ही कहाणी. त्याचबरोबरीने चार पाच वर्षे प्रत्यक्ष या भागात स्थानिक लोकांच्या निवासात त्यांच्या कुटुंबियांप्रमाणे राहून काढली असल्याने त्या भागातील नक्षली प्रभाव, चळवळीला असलेला पाठिंबा , स्थानिकांचा सहभाग असे अनेक पैलू त्या मांडतात.

हा विषयच असा आहे की वैयक्तिक राजकीय सामाजिक मते पूर्णपणे बाजूला सारून लिहिणे अशक्य आहे. तरी लेखिकेने ते बऱ्यापैकी साधले आहे. ग्यानजी हा एक उचवर्गीय उच्चशिक्षित नेता, विकास हा प्लातून कमांडर, कोहली हा ग्यानजी आणि लेखिकेचा अंगरक्षक मुलगा, सोनाबाई जिच्या घरी लेखिका 2 3 वर्षे राहिली, गावातली इतर काही लोकं अश्या प्रातिनिधिक व्यक्तींचे चित्रण पुस्तकात येते. त्यांच्या भूमिका, समस्या, महत्वाकांशा व चळवळी बरोबर असलेली गुंफण दिसते.
नक्षली चळवळ बिहारमधील शेतकरी कामगार अवकाशातून आदिवासी पट्ट्यात कशी आली, आदीवासीचा याला तात्त्विक पाठींबा आहे की चळवळ एक उदरनिर्वाहाचा व टिकून राहण्याचा 'पर्याय' आहे, सकृतदर्शनी हार होताना दिसत असली तरी नेतृत्व कोणत्या प्रेरणेने लढा देत आहे या प्रश्नाची उत्तरे थोडयाफार प्रमाणात मिळतात.

हा विषयाबद्दल समाजात वाचकात टोकाची मते असल्याने मी अधिक लिहीत नाही. शक्य असेल त्यांनी या प्रश्नाबद्दल अधिक वाचन करावे इतकेच सुचवेन. 50वर्षांपेक्षा अधिक काळ एक सशस्त्र सैद्धांतिक चळवळ बलाढ्य राज्याविरोधात सर्वात दुर्बळ समाज घटकाच्या मदतीने मधोमध टिकून आहे हे एकच कारण अधिक वाचन करण्यास पुरेसे आहे असे मी म्हणेन.

या पुस्तकाच्या अंती लेखिकेने एक दीर्घ निबंध लिहिला आहे ज्यात या प्रश्नावरील पुस्तकांची यादी व त्याचे चार भागात वर्गीकरण केले आहे. राजकीय प्रश्नाच्या दृष्टिकोनातून लिहिलेली, पत्रकारांनी भेट देऊन लिहिलेली, चळवळीच्या आतून लिहिलेली व कादंबरी/फिक्शन या फॉर्ममध्ये लिहिलेली असे हे चार वर्ग आहेत. ही यादी इथल्या वाचकांना अजून अधिक वाचण्यास प्रवृत्त करेल अशी आशा आहे. यातली बहुतेक पुस्तके मी वाचलेली नाही पण जमेल तसे वाचण्याचा प्रयत्न करणार आहे.

In Maoist and other armed conflicts, Anuradha Chenoy, Kamal Chenoy
The burning forest, Nandini Sundar
The Maoists in India, Nirmalngshu Mukherjee
War and Politics, Gaurav Navlakha
Days and nights in the heart of the rebellion, Gaurav Navlakha
Jangalnama, Satnam
India Waits, Jan Myrdal (written in 1980 in anticipation of a Maoist movement in tribal areas)
Red star over India, Jan Myrdal
Broken Republic, Arundhati Roy (एक जबरदस्त छोटेखानी पुस्तक. अरुंधती रॉय या सध्याच्या भारतीय विचारवंतांमधील एक अग्रणी विचारवंत आहेत आणि त्यापेक्षाही अधिक ताकदीच्या लेखिका आहेत)
Hello Bastar, Rahul Pandita (translated in Marathi by Chinmay Damle)
The lowlands, Jhumpa lahiri
The lives of others, Neel Mukherjee
Revolution highway, Dileep Simeon
Scripting the change, Anuradha Gandhy
Storming the gates of heaven, Amit Bhattacharya
Footprints of foot soldiers, Abhijit Das
Colors of the cage, Arun Ferreira

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडी अजून पुस्तक ओळख चालली असती. पुस्तक मिळवून वाचायचा प्रयत्न नक्की करेन.

Hello Bastar, Rahul Pandita (translated in Marathi by Chinmay Damle) >>>> हे माहित नव्हतं.

आजकाल अर्बन नक्षल ही संज्ञादेखील पॉप्युलर झाली आहे. >>> काही हिंसक विचाराच्या लोकांकडून आपल्या विरोधकांना हे विशेषण लावायची पद्धत सुरू झाली आहे. याला पॉप्युलर (लोकप्रिय) असा शब्द वापरण्याचे कारण समजले नाही.

पुस्तकाबद्दल आणखी थोडं वाचायला आवडलं असतं.

फारच थोडक्यात आटपलं, अजून लिहायला हवं होतं.

> कोहली हा ग्यानजी आणि लेखिकेचा अंगरक्षक मुलगा > हे वाक्य 'कोहली हा आधी ग्यानजीचा आणि नंतर लेखिकेचा अंगरक्षक' असे बदलेले तर जास्त ठीक वाटेल का? किंवा मुलगा हा शब्दच काढून टाकला तर?

> आजकाल अर्बन नक्षल ही संज्ञादेखील पॉप्युलर झाली आहे. > आजकाल अर्बन नक्षल ही संज्ञादेखील एका विशिष्ठ गटाकडून दुसऱ्या एका विशिष्ठ गटाला हिणवण्यासाठी वापरली जाते.

कोणती पुस्तक कोणत्या साहित्यप्रकारात येतात हेदेखील लिहले तर चालेल.

भारतात कुळ कायदा सारखे कायदे महाराष्ट्रासारखे काही राज्यांत अजिबात राबविले गेले नाही. जमीनदार, काही प्रमाणात उद्योजक हे आदिवासी, सामान्य लोकांच्या शोषणाला जबाबदार आहेत. मोठ्या प्रकल्पांसाठी होणारे जमीनींचे अधिग्रहण, त्यामुळे स्थलांतरित लोकांचे प्रश्न असे अनेक कंगोरे नक्षलवाद, माओवादाला आहेत. सशस्त्र विरोधाची सुरूवात केल्यानंतर ती थांबत नाही कारण बंडाचा प्रतिकार करताना सरकारी यंत्रणा दडपशाही, निरपराध लोकांना गुन्ह्यात अडकवणे असे प्रकार करतात. त्यामुळे दुखावलेले लोक अशा चळवळींना सहाय्य करतात, तर काही महत्त्वाकांक्षी लोक विरोधकांना संपवण्यासाठी अशा संघटनांचा वापर करून घेतात. पुस्तक परिचय त्रोटक वाटला. धन्यवाद.

कोणत्याही चळवळीचा उध्येष सुरवातीला चांगलाच असतो नंतर
त्या चळवळी मध्ये अप्रवृती चा प्रवेश होतो आणि चळवळ भरकटते.
अगदी शिवसेना पासून अण्णा हजारे पर्यंत सर्वांचं हेच झाले आहे .
आणि त्याला मावो वादी चळवळ सुद्धा अपवाद नाही

भारतात राहणार्‍यांनी ही किंवा कम्युनिस्ट विचारसरणीची कोणतीही पुस्तके जवळ बाळगाताना किंवा वाचतानासुद्धा पुढील परिणामांचा विचार करून ठेवावा.

वरच्या यादीतले गौरव गौतम नवलखा आणि अरुण फरेरा कित्येक महिने अटकेत आहेत. नंदिनी सुंदर यांच्यावरही एका आदिवासीच्या हत्येचा आरोप लावला गेला होता.

भारतात राहणार्‍यांनी ही किंवा कम्युनिस्ट विचारसरणीची कोणतीही पुस्तके जवळ बाळगाताना किंवा वाचतानासुद्धा पुढील परिणामांचा विचार करून ठेवावा.
>>>
फीअर माँगरिंग अ‍ॅट इट्स बेस्ट!

अरुण फरेरा, गौतम नवलाखा व इतर अनेक हे माओइस्ट सिम्पथायझर आहेत. माओइस्ट संघटनांच्या ओवर-ग्राउंड संघटना आहेत ज्यांचे हे सदस्य आहेत व हे उघड 'गुपीत' आहे. विविध सरकारांनी कधी अश्या संघटनांना 'सूट' दिली तर कधी 'आवळले'. याचे नैतिक मूल्यमापन हा वेगळ्या लेखाचा विषय होईल. मात्र विविध विचारसरणीच्या सरकारात ओवरग्राउंड माओवादी सिम्पथायझरना जेव्हा जेव्हा अटक केली गेली तेव्हा त्यांच्याकडील साहित्य हा 'देशद्रोहाचा पुरावा' म्हणून मांडण्यात आले आहे. हे काही आत्ताच्या सरकारचेच कर्तुत्व नाही.

बहुतेक परवा हायकोर्टात झालेल्या वॉर अँड पीस चा प्रसंग (ज्यावर न्यायाधीश, वकील व पत्रकार यांकडून विविध वर्जन सांगितली जात आहेत) पकडून 'वरील पुस्तके घरात ठेवणे आता भारतात धोक्याचे झाले आहे' हे विधान करणे आपल्या विरोधी विचारसरणीच्या सरकारची भिती पसरवण्यासाठी केलेले वाटते. ही व बरीच पुस्तके भारतात अनेक दुकानात मिळतात व लोक विकतही घेतात.

ज्या स्टालिन अन माओचा फोटो माओवादी अभिमानाने झळकवतात त्यांच्या राज्यात मात्र राजकीय विचारधारेच्या विरोधातली पुस्तके ठेवणे हे सक्तमजुरी ते देहदंडासारख्या पाशवी शिक्षांना कारण ठरत असे.

थोडीशी अतिशयोक्ती म्हणता येइल पण फियर माँगरिंग नक्कीच नाही. या आधीही बिनायक सेन यांना अटक झाली होती तेव्हा तर चक्क त्यांच्या घरात गांधींचे पुस्तक सापडले हा आरोप झाला होता. आधीच्या सरकारनेही हे केले होते मग आता काय हरकत आहे? असा युक्तिवाद आहे का? गौतम नवलखा तर EPW सारख्या मेनस्ट्रीम नियतकालीकातही लिहितात.

ता क उपेंद्र कौल.

आधीच्या सरकारनेही हे केले होते मग आता काय हरकत आहे? असा युक्तिवाद आहे का? गौतम नवलखा तर EPW सारख्या मेनस्ट्रीम नियतकालीकातही लिहितात.

>>
ह्या गौतमाला नियतकालिकात ज्याने घेतला त्याला आधी ४ जोडे हाणले पाहिजेत.

याच्या काश्मीरमधल्या २०१० सालाच्या काश्मिरी "शांतिदूतांसमोर" केलेल्या एका भाषणाची लिंक youtube वर मिळाली, ती इथं डकवतोय. म्हणजे अर्बन नक्षलवाद आणि त्यात लपलेले दुतोंडी साप गरळ नेमकी कशी ओकतात, याची कल्पना येईल.

१) भाषणाचा भाग १ - https://www.youtube.com/watch?v=duS7b03Ru84
२) भाषणाचा भाग २ - https://www.youtube.com/watch?v=BwNb5eTpCL4

दुसऱ्या भागात तर हे लाल माकड उघडउघड दहशतवादाचं, पाकपुरस्कृत आझादी आणि पथ्थरबाजीचं समर्थन करताना दिसतंय. खाली लिहिलेल्या त्याच्याच भाषणातली वाक्य ऐकली का लगेच कळतं.

- मैने जिंदगी मे हमेशा बंदूक को अहमियत दी है (०:४८, भाग २)
- हमारा आझादी का सपना कोई खतम नही कर सकता (४:२८, भाग २)
- आझादी का मतलब केवल हिंदोस्तान से आझादी नही है, जैसा इन्होने कहा. (७:५४, भाग २)

मला तर हे सगळं बघून आश्चर्य वाटतंय, हा खाल्ल्या ताटात छेद करणारा शकुनीमामा अजूनही उजळ माथ्याने का आणि कुणाच्या मेहरबानीने हिंडत होता ? आधीच्या सरकारकडंही सज्जड पुरावे होते, पण डाव्या पार्टीच्या सत्तासहभागाने त्यांचे हात बांधून ठेवले होते असं वाटतंय.

एकवेळ तृणमूलवाले परवडले, वेळप्रसंगी देशहितासाठी निदान उभे तरी राहतील. पण ही लाल बावट्याची जमात नको. दरवेळी यांना पोसायचं इथल्या माणसांनी, आणि यांच्या सगळ्या निष्ठा चीन आणि रशियाच्या पायी. ही फक्त कम्युनिस्ट राष्ट्रांची धुनी धुवायची चढाओढ कशापायी ?

गमतीची गोष्ट म्हणजे उद्या या सगळ्यानी चीनमध्ये जाऊन लिहायचं ठरवलं, तर दुसऱ्या दिवसाला ह्यांची हाडेसुद्धा जाग्यावर मिळायची नाहीत. दुसऱ्याला आझादीची चिथावणी द्यायला मात्र एका पायावर उभे, तेही भारतातल्या लोकशाहीच्या आणि विचारस्वातंत्र्याच्या आडाने. लोकांनी निवडणुकीत त्यांना त्यांची औकात दाखवलीच आहे, आता बाकीच्यांनी ह्या छुप्या शहरी नक्षल्यांच्या काळ्या कारवायांकडे लक्ष द्यायची गरज आहे.