सेक्रेड गेम्स दुसरा सीझन : चर्चा

Submitted by अश्विनीमामी on 15 August, 2019 - 03:18

सेक्रेड गेम्स बहुचर्चित मालिकेचा दुसरा सीझन काल पासून नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. त्याची चर्चा करण्या साठी धागा काढला आहे. आत्ताशी पहिला भाग अर्ध्यापेक्षा जास्त बघून झाला आहे. पण लगेच ग्रिप घेते कथा. गणेश गायतोंडे अ‍ॅक्षन मध्ये बघून खूप बरे वाटले कसमसे. कथेची व्याप्ती खूप वाढून मुंबई सोडून परदेशी गेली आहे. पहिल्या भागात मोंबासा मधील कथा आहे.

सैफ पक्षी सरताज एकदम टोन्ड व फिट दिसतो आहे सीरीअलचा हिरो तोच आहे त्यामुळे आब राखून आहे. नवाजुद्दीन आला की स्क्रीन खाउन टाकतो. बंटी, कांताबाई सर्वांना बघून खरे तर पुनःप्रत्ययाचा आनंद फेज मध्ये आहे. आत्ता तरी. ट्विटर, इन्स्टा ग्राम वर मीम्स चालू झाले आहेत.
इथे लिहू शकता येतील असे फारसे नाहीत. पण मकर संक्राति के दिन पैदा हुई थी..... बेस्ट.

झॉया पण दिसली. मराठी कलाकार खूप आहेत. ती यादव बाई पण मराठी नटी. खतर नाक असल्याची अ‍ॅक्ट्रिंग करते पण शोभत नाही.
रात्रीस खेळचाले भाग दोन मधील दत्ता भाउ पण कांबळे आहे का ? अमेय वाघ पण आहे म्हणे. बघू कधी येतो ते. ह्या सीझन चे बजेट १०० कोटी आहे असे वाचले. आजचा दिवस तर सेट आहे. तुम्ही कुठपरेन्त आलात? मी हा सीझ न बघेन मग सलग दोन सीझन परत बघेन वीकांताला.
जास्तीची हिंसा, हिंसक भाषा ह्याची आता सवय झाल्याने इतके विचित्र वाटत नाही.

सरताज मेघाशी बोलायला गच्चीवर येतो तो आमच्या येथिल रुणवाल ग्रीन्स वाला भाग आहे. पहिला सीझन पहिला भाग मध्ये पण मुलुंड मधील भकास पडलेला निर्मल मॉल इथे एका मारामारी कम पाठलागाचे शुटिन्ग आहे.

आता दुसरा भाग सुरू झाला आहे. बिंज वॉचिन्ग इज ऑन. अपुन तो फुलॉन देखेला है.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोची न घेताच ही अवस्था >> Lol मूव्ही बघून पत्ता नाही समजत पण क्लू लागतो आणि मग यादव ताई कडे जाऊन विचारतो.

माइंड हंटर चा पण दुसरा सीझन आला आहे . ह्याचा पहिला सीझन पण उच्च आहे. नॉट फॉर द फेंट हार्टेड. अशक्त हृदयाच्या व्यक्तिंनी कृपया बघू नये. गुन्हेगार व खुनी मानसिकतेच्या व्यक्ति मत्वांवर आधारित मालिका आहे. पण उत्पादन मुल्ये उच्च सुरेख. एफ बी आय च्या कामाची पद्धत चांगली दाखवली आहे. पुढच्या वीकांताची सोय झाली. फार डार्क सीरीअ ल आहे बरं. उगीच इथे रिक्षा.

गायतोंडेच्या खर्‍या बापाचे नाव त्रिवेदी निघाले ? >>> मला वाटतं पिक्चरमधे त्या हिरोच्या बापाचं आडनाव त्रिवेदी ठेवलेलं असतं त्यावरून सैफ 'पुस्तक त्याच्या खर्‍या बापाकडे असेल कदाचित' असा क्लू घेत असावा.

Sartaj gets address of Gaitonde's farher from Yadav's diary. I think.. > मलाही असेच आठवते आहे... पण तो अ‍ॅड्रेस नांदेडचा असतो ना? सरताज एवढ्यात कसा जाऊन येतो नांदेडला?

गायतोंडे त्याचे तीन बाप आहेत म्हणतो आणि प्रत्येकाला तो स्वतः डायरेक्टली किंवा ईनडायरेक्टली मारतो. हे र्हेटॉरेक वापरून बघितले तर 'बाप' हे फक्त 'दि गणेश गायतोंडे' ह्या माणसाच्या अस्तित्वाला वळण देण्यास वेळोवेळी कारणीभूत झालेल्या माणसाबद्दल बोलतोय. जन्म दिलेल्या बापाबद्दल नाही. त्यामुळे अमितचे आधीचे अर्ग्यूमेंट की तो एक अनौरस मुलगा होता हे बरोबर वाटते. त्याच्या "पंडित" वडिलांनी त्याला फक्त नाव दिले पण जर मला बरोबर आठवत असेल तर ते त्याला जन्म देण्यास समर्थ नव्हते.

सरताज एवढ्यात कसा जाऊन येतो नांदेडला? >> परत तेच! अरे पुण्यापर्यंत एक्स्प्रेस वे ने. पुढे नांदेड काय आणि विदर्भ काय! सगळं सारखंच. पुण्यामुंबईच्या माणसांना काही फरक पडत (समजत) नाही. Wink Biggrin

>>गायतोंडेच्या खर्‍या बापाचे नाव त्रिवेदी निघाले ?<<
हा शॉक जॉन स्नो टारगॅरियन आहे हे गूढ उकलल्याच्याहि पुढच्या लेवलचा आहे. पण मग ते आश्रमात बाप-लेकातलं; आरारा लिहवंत सुद्धा नाहि. डिसगस्टिंग...

बरेच प्रश्न पडले आहेत ... काही वर विचारलेल्यातीलच असल्याने परत विचारणे टा़ळत आहे.. पण ....
१. ईतर सगळे त्याच वयाचे राहुन फक्त अमृता सुभाषच का म्हातारी होते? केनिया मधे असताना तिचा नवरा ई. दाखवले आहेत, पण मुलगी नाही बहुधा.. मग अचानक सुभाष बाईंचेच वय का वाढते....
२. जर त्याला अक्खी मुंबई बेचिराखच करायची आहे अन कोणालाही पासकोड वगैरे माहीत नाही तर निर्मनुष्य जागी जाउन बंब का लावायचा?
जर तो बाँब फुटल्यावर सगळे शहरच बेचिराख होणार आहे तर स्वतः शाहीद थोड्या दूर लांब बिल्डिंगमधे जाउन का बसतो? अन त्या पोलिसाला मारायला गोळ्या का वाया घालवतो ( व्हॅन ड्रायव्हर... तसही पूर्ण शहरच बरबाद होणार आहे)
३. पूर्ण मुंबई रिकामी करत असताना सैफ काकांना मात्र कुठेच वाहतुक मुरंब्यामधे अडकावं लागत नाही... आम्हाला रोज ऑफिसहुन घरी जाताना रोज २-३ तास का लागतात मग Sad
४. त्या मॉब लिंचिंग मधे सैफ काका पिस्तुल काढायचं विसरतात का? नक्की आठवत नाही. ... एक दोन गोळ्या हवेत झाडायचे पुर्विच्या पिक्चरमधले पोलिस, मग मार खायचे किंवा द्यायचे...
५. त्या केनियामधल्या ड्रग लॉर्डला त्या गुज्जू कडुन मारुन घेण्यात नक्की काय उद्देश असतो.. त्याला किंगपिन का करायचे? . जर तो फक्त फ्रंट असेल तर तो गायतोंडे लपुन पडद्याआड वगैरे न राहता सग्ळे उघडपणेच करत असतो.... मग फक्त बायकोला आणायला त्या गुज्जुला आणले आहे का?
मी अत्यंत कंटाळुन गेलो हे पाहताना त्यामुळेही काही चुका झाल्या असतील माझ्या समजुन घेताना.....
अजुन बाकी पण अनेक प्रश्न पडले आहेत... Sad

मुंबई पोलिसाला क्रोएशिया ला जाऊन ध्यान धारणा करण्याऐवढं वेळ आणि पैसा कसा मिळाला हे मलाही न उलगडलेलं कोडं आहे
हाच तो पोलीस जो इमानदार आहे आणि गायतोंडे कडून मुलाला मिळालेली बॅट सुद्धा नको म्हणत असतो

बाकी बॅट वरून आठवलं, क्रिकेट बॅट हे काही मॅटोफॉर आहे का
बरेच ठिकाणी त्याचे संदर्भ आलेत, बट्यात्या अमेय वाघ च्या बाबतीत, गायतोंडे, परुळेकर, सरताज

मला त्रिवेदी ची भानगड च कळली नाह. कुणी सांगेल कस plz. तो संदेश कुलकर्णी जो त्याच खरा बाप दाखवलाय त्याचं नाव त्रिवेदी असतं का? पण तो तर अतिशुद्ध मराठी बोलताना दाखवलाय. आणि तो नेहमी सफारीत दाखवला आहे तो पण त्रिवेदी असतो न? त्याचा पण काही रेफरन्स आहे का?

तेच ना. सो लुक्स लाइक तो सफारीतला त्रिवेदी वेगळा. आणि खरा बाप शेवटी पुस्तक ज्याच्याकडे असते तो कोण म्हातारा दाखवला आहे तो बहुतेक तोच सारखा स्वप्नात दिसणारा त्याचा भिक्षुक बाप. त्याचे नाव त्रिवेदी का/ कसे हे कळले नाही.

त्याचे नाव त्रिवेदी का/ कसे हे कळले नाही.>> no his name was not Trivedi, Trivedi is the name of Gaitonde's father in that movie. Sartaj take reference from movies and find out Gaitonde's original father's address from Amruta Shubhash's diary. I think it is like this. may be I have to see one more time.

सो गायतोंडेला तीन बाप होते त्यातला एक (म्हणजे दुसरा :फिदी:) पिक्चर मधला????
जस्ट बिकॉज ही प्रोड्युस्ड अ मूव्ही दुसरा बाप मिळाला??? नो!!!!!
त्रिवेदी मरणार नाही... आणि ब्ला ब्ला ला काय अर्थ मग? डझन्ट मेक्स सेन्स. माणूस मेला तरी मूव्ही मरत नाही म्हणून त्रिवेदी मरणार नाही असला काही क्लिशे अर्थ आहे असं मला प्लीज सांगू नका.... गंडली आहे पण मी एन्जॉय केलेय बघताना. हे बिट्रे केलं होईल. Lol

In Sacred Games, Gaitonde has grown up hating his three fathers. First is his biological father, and the other two were his godfathers in crime at various points in life. Second father was Salim Kaka (Nawab Shah) and he considered Guruji (Pankaj Tripathi) to be his third father.
गुगल कडुन साभार

त्रिवेदी मरणार नाही -> कारण तो कालग्रन्थ वडिलाना पाठवतो आणि तो कल्कि ला देउन बन्कर मधे जागा घ्या सान्गतो. पण त्याचे वडील ती चिठ्ठि वाचत नाहीत किन्वा त्याची मदत घेत नाहीत. मला अजुन अस वाटतय की RAW करता काम करायच्या बदल्यात त्याने वडीलाना सोडवुन ..नाव बदलुन त्रिवेदी ठेवले.

नेटफ्लिक्स वर मेंबरशिप घेता आली नाहि. मोबाईल नं अपडेट करा म्हणतोय जे खर नाही. ते कार्ड नं व सीव्हीव्ही मागतात तो दिला होता ऑन लाईन

It will come on prime some day or you can check on YouTube major scenes

It will come on prime some day or you can check on YouTube major scenes >> ??? Uhoh
एक-दोन सिनेमा तिकिटांच्या मोबदल्यात तुम्हाला १८ तासांची ही एक आणि अशा असंख्य वेबसिरिज आणि सिनेमे महिनाभर पहायला मिळतील पण तरीही यू टुयूब वर पायरेटेड पहायचे ? असे करण्यामागे पैसे वाचवण्या पलिकडे दुसरे काही कारण आहे का?

नेटफ्लिक्स ओरिजिनल प्राईमवर समडे येती! हे 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' मधील एक नविन व्हेरिएशन म्हणून धकुन जाईल. Proud

>>हे 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' मधील एक नविन व्हेरिएशन....<<
नोप, चूकिची तुलना; इट ऑल डिपेंड्स ऑन हौ लायसंस अग्रीमेंट इज रिटन. नेटफ्लिक्स ओरिजिनल म्हणजे सर्वप्रथम त्यांनी स्ट्रिमिंग राइट्स घेतलेले आहेत, बट दॅट कॅनॉट स्टॉप प्रोडुसर्स (अगेन डिपेंड्स ऑन काँट्रॅक्ट) टु सेल डिस्ट्रिब्युशन राइट्स टु अनदर चॅनल/प्रोव्हायडर ऑर रिजन. उदा: हाऑका इज नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरिज, बट यु कॅन वॉच इट ऑन आयट्युन्स अ‍ॅज पेपव्यु...

ह्म्म... प्राईम वि. अ‍ॅपल तुलना आत्तापर्यंत चुकीची होती कारण अ‍ॅपल हा न्यूट्र्ल प्लेअर होता. आता तो ही कंटेंट प्रोव्हायडर प्रोड्यूसर झाल्यावर कदाचित समिकरणं बदलतील. लायसंस अ‍ॅग्रिमेंट मध्ये काय आहे त्यावर सगळं अवलंबुन हे टेक्निकली बरोबरच आहे हो!
आता अ‍ॅमेझॉन आपल्याच मार्केट प्लेसवर स्वत:चे प्रॉडक्ट ठेवते ते एथिकली (आणि लीगलीही) किती बरोबर हा आणखी एक वेगळा मुद्दा.
तो वरचा जोक होता. Happy उद्या चितळे काका हलवाईची बाकरवडी आपल्या दुकानात ठेवू लागले तर? त्या स्टाईलचा. Lol

नोप, चू (विथ चुकीचा चू) किची माहिती; Proud

  • Netflix produced - True Netflix Original e.g. House of Cards
  • Netflix has exclusive rights - Netflix Original e.g. Sacred games
  • Netflix co-produced

ह्यातला कुठलाही शो जेव्हा नेटफ्लिक्स सोडून ईतर स्ट्रीमींग चॅनेल्स ऊपलब्ध करून देतात तेव्हा त्याचा सरळ साधा अर्थ होतो की त्या चॅनेलकडे तेवढ्या क्वालिटीचे कंटेंट ऊपल्ब्ध नाही आणि स्पर्धेत ते मागे पडत आहेत. अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स कडून विकत घेऊन आपल्या चॅनेलवर ऊपलब्ध करण्यासाठी नेफ्लिला पैसे मोजण्यापेक्षा दुसरा चांगला शो प्रोड्यूसर्स कडून विकत घेतील किंवा बनवतील.
उद्या चितळे काका हलवाईची बाकरवडी आपल्या दुकानात ठेवू लागले तर >> असेच आहे खरंतर हे. अ‍ॅपल-मायक्रोसॉफ्ट सारखे.
रोकू /अ‍ॅपलटीवी आणि नेटफ्लिक्स/अ‍ॅमेझॉन/हुलू/डिझनी तुलना नाही होऊ शकत. पहिले मोस्टली (ढोबळा रित्या) सर्विस प्रोवायडर आहेत तर दुसरे कंटेट प्रोड्यूसर.

बट दॅट कॅनॉट स्टॉप प्रोडुसर्स (अगेन डिपेंड्स ऑन काँट्रॅक्ट) टु सेल डिस्ट्रिब्युशन राइट्स टु अनदर चॅनल/प्रोव्हायडर ऑर रिजन. >>> नोप, प्रोड्यूसर हॅज राईट ओन्ली टू ओरिजिनॅलिटी ऑफ द कंटेंट, दे कॅन नॉट साईन विथ अनादर डिस्ट्रिब्यूटर. नेफ्लि विल मेक शुअर ऑफ दॅट ईन ईट्स कॉन्ट्रॅक्ट. दॅट्स वॉट एक्स्ल्युझिव राईट्स मीन.
मोस्ट ऑफ द टाईम्स दीज प्रोड्यूसर्स एंड अप विथ हायेस्ट बिडर्स मीन्स दे हॅव ऑलरेडी बीन रिजेक्टेड बाय द आदर हाऊस.

उदा: हाऑका इज नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरिज, बट यु कॅन वॉच इट ऑन आयट्युन्स अ‍ॅज पेपव्यु... >> कंपेरिंग ऑरेंजेस विथ अ‍ॅपल्स . Proud

ऊद्या नेफ्लि आणि अ‍ॅमेझॉनने काही बिग बजेट को प्रोड्यूस केले किंवा फंड्स पूल करून दोघांनी एक्स्लुझिव राईट्स घेतले तरच तो शो दोन्हीकडे दिसेल.

>>उद्या चितळे काका हलवाईची बाकरवडी आपल्या दुकानात ठेवू लागले तर?<<
हि अनॅलजी नेटफ्लिक्स-अ‍ॅमेझान यांचाकरता वापरली असेल तर सपशेल गंडली आहे. चितळे दुसर्‍या हलवायाची मिठाई ठेवणार नाहित, पण नेफि-अ‍ॅमेझानचं बिझ मॉडेलंच कांटेंट प्रोवायडरचं आहे, रिगार्डलेस ऑफ हु मेक्स इट. पुढे सांगतो कसं ते...

>> अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स कडून विकत घेऊन आपल्या चॅनेलवर ऊपलब्ध करण्यासाठी नेफ्लिला पैसे मोजण्यापेक्षा दुसरा चांगला शो प्रोड्यूसर्स कडून विकत घेतील किंवा बनवतील.<<
>>उदा: हाऑका इज नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरिज, बट यु कॅन वॉच इट ऑन आयट्युन्स अ‍ॅज पेपव्यु... >> कंपेरिंग ऑरेंजेस विथ अ‍ॅपल्स <<
काय च्या काय ठोकुन दिलंय; अभ्यास वाढवा. वर मी हाऑकाच्या उदाहरणात आय्ट्युन्स निव्वळ नेफिऐवजी एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे हे सांगण्याकरता दिलेलं. नाउ, स्पिकिंग ऑफ अ‍ॅपल अँड ऑरेंजेस; हाऑका, अ‍ॅमेझान प्राईमवर देखील आहे. इज दॅट "अ‍ॅपल" इनफ फॉर यु?.. Lol

Are Netflix serial streaming on prime itself was a joke. I hoped someone to catch it. I have paid subscription to all Netflix hotstar prime and z five plus Google play movies etc. Free pirated dekhne ka toh sawal hi nahi. Chill guys

टोटल बकवास सिझन...

काही सिन तर मुद्दाम घुसवल्यासारखे आहेत आणि हा पूर्ण सिझन
हिंदु विरोधीच आहे असं वाटलं..

जनसमुदायात हिंदु धर्माविषयी कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय..

आणि आपलेच लोक हे सगळं कौतुकाने पाहतात ह्याच आश्चर्य वाटत मला..

एखादीच अशी कथा असू शकते हे जरी गृहीत धरलं तरी लैला ह्या वेबसिरीज मध्येसुद्धा असाच प्रयत्न केलेला दिसतो..

अजुन बरचं काही लिहायचं होत पण इथे लिहणं योग्य नाही..

फक्त करमणूक म्हणून पाहायच ठरवलं तरी कथा पूर्ण गंडलेली वाटते..
किंबहुना एकतर्फी propaganda सेट करायच्या नादात मुद्दाम गंडवलेली वाटते...

हे सगळं मुददाम चाललं आहे...आहेत काही संघटना ज्या पाॅवरचा अनैतिक वापर करून जनमानसात द्वेष पसरवत आहेत किंवा सिक्रेट मेसेजस देत आहेत..

सैफचं ह्या सिरीजमध्ये कास्टींग कसं झालं ..ह्याच उत्तर मिळालं मला..

टोटल बकवास सिझन...

काही सिन तर मुद्दाम घुसवल्यासारखे आहेत आणि हा पूर्ण सिझन
हिंदु विरोधीच आहे असं वाटलं..

जनसमुदायात हिंदु धर्माविषयी कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय..

आणि आपलेच लोक हे सगळं कौतुकाने पाहतात ह्याच आश्चर्य वाटत मला..

एखादीच अशी कथा असू शकते हे जरी गृहीत धरलं तरी लैला ह्या वेबसिरीज मध्येसुद्धा असाच प्रयत्न केलेला दिसतो..

अजुन बरचं काही लिहायचं होत पण इथे लिहणं योग्य नाही..

फक्त करमणूक म्हणून पाहायच ठरवलं तरी कथा पूर्ण गंडलेली वाटते..
किंबहुना एकतर्फी propaganda सेट करायच्या नादात मुद्दाम गंडवलेली वाटते...

हे सगळं मुददाम चाललं आहे...आहेत काही संघटना ज्या पाॅवरचा अनैतिक वापर करून जनमानसात द्वेष पसरवत आहेत किंवा सिक्रेट मेसेजस देत आहेत..

सैफचं ह्या सिरीजमध्ये कास्टींग कसं झालं ..ह्याच उत्तर मिळालं मला कारण तो स्वतःच त्या संघटनेचा सदस्य आहे..

If you want to enlighten the world, what you need at the very minimum is your own clarity of thoughts. - Heisenberg.
That being said, please allow me to enlighten you Proud

Amazon.com एक मार्केट प्लेस आहे आणि prime membership एक discriminatory service. बरोबर?
ह्या prime membership च्या अंतर्गत तुम्हाला अमेरिकेत free delivery service, Amazon prime videos, prime video distribution platform, Kindle books असे बरेच काही मिळते बरोबर?
जे videos आपण prime video ह्या Amazon च्या streaming platform वर बघतो त्यातले काही Amazon ने Amazon studios अंतर्गत produced केलेले असतात e.g. Manchester by the sea किंवा त्यांचे exclusive streaming licenses वा rights विकत घेतलेले असतात e.g. Marvelous Mrs Maisel.
असे सिनेमे किंवा वेबसिरीज बघणे तुमच्या prime membership च्या अंतर्गत येते, ज्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत. आणि Amazon चा हा business segment, Netflix चा डायरेक्ट competetor आहे.. ज्यांना content producer म्हणतात.
Sacred games चा जेव्हा प्रीमियर ह्या दोघांपैकी एका ठिकाणी होतो तेव्हा ते नवीन streaming content चे production असते आणि ह्यात Amazon, Netflix, Hulu, Disney etc प्रतिस्पर्धी आहेत म्हणुन एकाचे content दुसर्‍या सर्विस वर launch होणार नाही. आले लक्षात?

आता तुमचा Netflix ची House of Cards ही सिरीज Amazon prime video platform वर उपलब्ध असण्याचा मुद्दा पाहू. तर सर ही सिरीज Amazon मार्केट प्लेस वर उपलब्ध आहे जिचा video distribution platform हा prime video आहे. एवढेच. ह्याचा अर्थ Amazon फक्त distributor आहे आणि ही सिरीज पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील.
बॅकग्राऊंड मध्ये हे कसे उलगडते ते सुद्धा सांगतो. सोप्या भाषेत ही सिरीज Netflix ने Amazon ह्या दुकानात rent किंवा sell साठी ठेवली आहे. प्रत्येक rent किंवा sell चा व्यवहार झाल्यावर Amazon स्वतःचे कमिशन कापून उरलेले पैसे Netflix ला देणार. हा व्यवहार Amazon दुसर्‍याने बनवलेले प्रॉडक्ट उदा. Instant Pot विकून, delivery करून आपले कमिशन कापून उरलेले पैसे Instant Pot बनवणाऱ्या कंपनीला देते अगदी तसाच आहे. तुमच्या free box delivery service सारखी ही free video delivery service आहे पण deliver झालेल्या वस्तू साठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार. ह्यात producer आणि Amazon prime video management, production, license, rightsचा काहीही संबंध येत नाही.

आता मला सांगा Netflix आणि Amazon हे content producers म्हणून स्पर्धा करत आहेत की videos चे मार्केट प्लेस म्हणून? हे कोडे सोडवले की तुम्हाला आधी आपण apples आणि oranges ची तुलना कशी करत होतो ह्याचा साक्षात्कार होईल.
Hint:- That HoC Netflix video is just another product for rent or sell at Amazon and Amazon has nothing to do with its content. While Netflix vets all the content made available to its subscribers, Amazon only vets its content that it makes available with its prime membership. Feel enlightened now? Proud

हायझेनबर्ग - क्लॅरिटी ऑफ थॉट्स? इथे तुमची वाचलेलं समजण्याची बोंब आहे, तर थॉट्स क्लॅरिटी कसली आलीय डोंबलाची... Lol

तर हा घटनाक्रम:
१. अमा यांनी आशा व्यक्त केली कि सेक्रड गेम्स कधीतरी अ‍ॅमेझान प्राइम वर येइल
२. अमितवने जोकिंगली ती शक्यता फेटळुन लावली (वाळूचे कण...)
३. हि बाब अगदिच अशक्य कोटितली नाहि हे मी मांडलं, आय्ट्युन्सचं उदाहरण देउन

तर मुद्दा काय आहे - ओरिजिनल कांटेंट एकाच प्लॅटफॉर्म वर सीमीत न रहाता, दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होउ शकते. हाऑकाचं नेफि+अ‍ॅमेझान वर उपल्ब्ध असणं हे मी परत उदाहरणादाखल दिलं. हि बाब आता एव्हढि क्रिस्टल क्लियर असतानाहि तुमची हि वरची ड्ब्ल्युटिएमआय पोस्ट (मला वाट्लं त्यात आता जेफ-मकिंझीचा डिवोर्स येतोय कि काय. Proud ) काय दर्शवते? क्लॅरिटी ऑफ थॉट्स? फिल लाइक आयॅम गेटिंग इंटु ए नॉनएंडिंग आर्ग्युमेंट विथ ए फाइव इयर ओल्ड; नॉट गॉन्ना हॅपन...

Pages