सेक्रेड गेम्स बहुचर्चित मालिकेचा दुसरा सीझन काल पासून नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. त्याची चर्चा करण्या साठी धागा काढला आहे. आत्ताशी पहिला भाग अर्ध्यापेक्षा जास्त बघून झाला आहे. पण लगेच ग्रिप घेते कथा. गणेश गायतोंडे अॅक्षन मध्ये बघून खूप बरे वाटले कसमसे. कथेची व्याप्ती खूप वाढून मुंबई सोडून परदेशी गेली आहे. पहिल्या भागात मोंबासा मधील कथा आहे.
सैफ पक्षी सरताज एकदम टोन्ड व फिट दिसतो आहे सीरीअलचा हिरो तोच आहे त्यामुळे आब राखून आहे. नवाजुद्दीन आला की स्क्रीन खाउन टाकतो. बंटी, कांताबाई सर्वांना बघून खरे तर पुनःप्रत्ययाचा आनंद फेज मध्ये आहे. आत्ता तरी. ट्विटर, इन्स्टा ग्राम वर मीम्स चालू झाले आहेत.
इथे लिहू शकता येतील असे फारसे नाहीत. पण मकर संक्राति के दिन पैदा हुई थी..... बेस्ट.
झॉया पण दिसली. मराठी कलाकार खूप आहेत. ती यादव बाई पण मराठी नटी. खतर नाक असल्याची अॅक्ट्रिंग करते पण शोभत नाही.
रात्रीस खेळचाले भाग दोन मधील दत्ता भाउ पण कांबळे आहे का ? अमेय वाघ पण आहे म्हणे. बघू कधी येतो ते. ह्या सीझन चे बजेट १०० कोटी आहे असे वाचले. आजचा दिवस तर सेट आहे. तुम्ही कुठपरेन्त आलात? मी हा सीझ न बघेन मग सलग दोन सीझन परत बघेन वीकांताला.
जास्तीची हिंसा, हिंसक भाषा ह्याची आता सवय झाल्याने इतके विचित्र वाटत नाही.
सरताज मेघाशी बोलायला गच्चीवर येतो तो आमच्या येथिल रुणवाल ग्रीन्स वाला भाग आहे. पहिला सीझन पहिला भाग मध्ये पण मुलुंड मधील भकास पडलेला निर्मल मॉल इथे एका मारामारी कम पाठलागाचे शुटिन्ग आहे.
आता दुसरा भाग सुरू झाला आहे. बिंज वॉचिन्ग इज ऑन. अपुन तो फुलॉन देखेला है.
गुरुजीही गेलेत
गुरुजीही गेलेत
स्पॉलयर अलर्ट...
स्पॉलयर अलर्ट...
सातही पार्ट पाहिले, महा बोर निघाले...
गुरुजींचा पार्ट सॉलीड घेतलाय, नवाजुद्दिन आणि सैफ दोघांनीच सिरिज खाल्लीये...
माजीद पण अगदी लक्षात राहण्यासारखा....
पण शेवट तर अत्यंत भिकार....जरी मान्य केलं की सगळं संपणार आहे तरीही जिवंत हातात सापडलेल्या अतिरेक्याला ठार कसे काय मारू शकतात.....
त्यातून ती एक्सर्ट बाई, मनात येईल ते पासवर्ड टाकते आणि तोंड पाडून म्हणते चुकला....
मला फिस्सकन हसूच आलं तिच्या रिएक्शनवर....शेकडो नव्हे हजारोंच्या संख्येत कॉंबिनेशन होऊ शकणारा प्रकार आणि ही गिरमिटवून म्हणतीय चुकला.
अगदीच आवरा.
आणि अॅटॅक थांबला कुठे, सैफ चुकीचाच पासवर्ड टाकतो की, शाहीदचा वेगळा होता, एक सरळ लाईन मग खाली वगैरे, त्याचा आणि सैफचा कुठेच मॅच होत नाही.
बरोबर असणार तो पासवर्ड आशुचँप
बरोबर असणार तो पासवर्ड आशुचँप. तिसरा सिझन त्यांना त्याकरताच काढायचा असणार.
तोवर सरताजच्या हाताचं बँडेज
तोवर सरताजच्या हाताचं बँडेज निघेल पण त्याकरता तिसरा सिझन टू मच होतो. Wink। >>>>>
सायो
सायो
शेवटची पाच मिनिटं... मे बी अर्धा तास.. सोडला तर मला आवडला हा पार्ट.
वरच्या आशूच्या प्रतिक्रियेतील एक्झॅक्ट विचार आलेले. अरे एवढ्या ६० बाय ४० च्या ग्रिडवर फक्त ६ पासवर्ड अलाऊड असताना एक पासवर्ड रँडम क्लिक केला तर प्रोसेस समजायला केला असं समजू शकतो. तीन वेळा चू*माफिक कोणी कसे पासवर्ड गेस करू शकतं? ते ही न्यूक्लिअर सायन्टिस्ट! ती साउथ इंडिअन साडी घातलेली, कुंकू आणि भस्म लावलेली स्टिरिओटाईप सायंटिस्ट कशाला आणली?
बरं त्या कालग्रंथाचं प्रयोजन काय? आणि कालग्रंथ म्हणजे त्या गुरुजीची तीन चार पानी मेम्वॉ आणि मग रँडम माणसांच्या हाताचे ठसे आणि रँडम आ़कृत्या? वर्षानुवर्ष लिहितोय म्हणजे काय तरी एकदम ब्रह्मज्ञान असणार असं वाटलेलं. तर या टोळक्यांचे हात आणि संपलं. कालग्रंथ म्हणे!
सैफ शेवटच्या क्षणी सगळ्या अहम ब्रहमास्मी लोकांना मारतो आणि कालग्रंथ कशाला बरोबर आणतो? बरं आणतो तर आणतो... तो जिकडे लाईव्ह बाँब आहे, शाहीद आहे ज्याला याला मारायचं आहे तिकडे कार मधून उतरताना हातात कशाला घेऊन येतो... असले प्रश्न पडताहेत तोवर ग्रिड बेस्ड पासवर्ड दिसला आणि मग उलगडा झाला! की याने गाडी खालच्या लेव्हलला पार्क केली आहे. धावत खाली जाऊन काग्र घेण्यापेक्षा लागणारच आहे तर आधीच घेऊन जाऊ असा विचार केला असणार!
मला अद्याप गाडीला चावी विसरून गेलेली अनलॉक गाडी पार्किग मध्ये एकदम समोर कधी दिसली नाहीये. मीच पार्क केलेली गाडी सापडताना नाही नऊ. पॅनिक बटण दाबा... त्याने पॅनिक आवाज 'न' येणे, मग माझ्या मनात पॅनिक येणे. मग सैरावैरा एकदा वरच्या लेव्हलवर मग खालच्या लेव्हलवर असं पळत सुटणे. तरी गाडी न मिळणे. मग हेच पार्किंग होतं का असले भलते प्रश्न मनात येणे... यातलं काही होतंच नाही. डायरेक्ट गाडी उभी! अर्थात मी एन्ड ऑफ वर्ल्ड कधी एक्सपिरिअन्सही नाही केलेला, ते कारण असेल.
बरं.. त्या टीम मधल्या कोणी मोबाईलवर असा ग्रिड बेस्ड पासवर्ड कधी सेट केला नाहीये का? एकदा हात उचलला की पासवर्ड एंटर होतो. सैफ बिंदास त्या नक्षत्रांचे शेप्स उलट सुलट शेप्स काढतोय . रीड्रॉ केलेलं चालतं का आठवत नाही, एल्स हे फिजिबल नाहीये हे.
नवाजुद्दिन (कशाला दुसरे बाप शोधतोय) स्वत: बाप माणूस आहे! अरे प्रत्येक माणसाबरोबर वेगळी केमिस्ट्रि. त्याची कन्टिन्यूइटी. टोटल फिदा.
या भागातले नवे कल्की, रणविर शौरे आणि पंकज त्रिपाठी आवडले. अमृता सुभाषही ठीक वाटली नंतर.
शाहीदची आई आणि सैफची आई या बहिणी दाखवून काय मिळवलं? शाहीदच्या आईला पळवून पाकिस्तानात नेलं तो पार्ट आणि गोल्डन टेंपलला जायची ओढ हे पुरेसं मन हेलावून टाकत होतं. ग्रिम फीलिंग देत होतं. बहिणी नसतं दाखवलं तर काय झालं असतं? किंवा दाखवून काय झालं? तू मेरा भाई है असले डायलॉग जसे नक्की दाखवणार न्हवते तर मग मुद्द्लात भाऊ तरी कशाला दाखवायचे?
बाकी सैफ कल्टला जाऊ लागतो... ते काय आहे हे जाणून घ्यायची ओढ आणि हेट अॅट द सेम टाईम ... आणि शेवटी तो जॉईन होतो, ही ट्रान्झिशन्स. तो पुलिस आहे आणि हाडामासाचा माणूस ही आहे, ज्याला भूतकाळ आहे. ते द्वंद्व ही छान दाखवलं आहे. त्याच्या संसाराची आणि काटेकरच्या कुटुंबाची वाताहात... याला फक्त बघायला लागते. तो बदलवू बघतो, पण काहीच बदलत नाही. हा सल आणि त्यावर ड्रग्ज (पक्षी आश्रम) हा इलाज नंबिंग फीलिंग देतो.
सैफ सुरुवातीला नेपोटिझम गँगचा वाटायचा. नाव आय रिस्पेक्ट हिम. सुंदर काम केलंय.
साईड स्टोर्या चांगल्या फुलवल्या आहेत. शाहिदच्या आजीची (का आईची) स्टोरी दाखवल्यावर शाहीद बद्दल अचानक जास्त माहिती समजल्याने एक ह्युमन अँगल आला. २-३ मिनिटांची स्टोरी असेल पण आणखी एक पर्स्पेक्टिव्ह समजल्याने काय परिणाम होतो याचा एक मस्त नमुना बघायला मिळाला. तशीच यादव बाई कोण आणि कशी आहे. अशा बॅकग्राऊंड स्टोर्या ज्याचे मानवी मनाचे पदर दिसतात आणि त्या सहज आणता आल्या तर मूळ कथानकाला फार धक्काही पोहोचत नाही. बघायला एक वेगळंच परिणाम देतात.
शेवटी बाँब फुटला... आणि सगळ्यांबरोबर हे ब्रह्मास्मि लोकंही मेले. हेच बघायला आवडलं. पुढे काहीही आणू नये.
विनाश इच्छिला की सिलेक्टिव्ह असं काहीही नसतं.
वीकेंड वेल स्पेंट!
अमितचे पोस्ट बरेचसे पटले.
अमितचे पोस्ट बरेचसे पटले.
नवाजुद्दिन (कशाला दुसरे बाप शोधतोय) स्वत: बाप माणूस आहे! अरे प्रत्येक माणसाबरोबर वेगळी केमिस्ट्रि. त्याची कन्टिन्यूइटी. टोटल फिदा. >>> अगदी!
सैफनेही सुंदर काम केलंय. तो चांगल्या दिग्दर्शकासोबत एकदम मस्त काम करून जातो! इथे सरताज अगदी भिनवलाय त्याने बॉडि लँग्वेज मधे.
पंकज त्रिपाठी चे तर क्या कहने! पोचलेला माणूस आहे! काय ते सात्विक भाव, शांत हळूवार पण चिल्स देणारे ते डायलॉग्ज! जबरा कॅरेक्टर.
रणवीर शोरी पण असाच गुणी कलाकार, पण इथे त्याला तसा कमी वाव होता.
अमृता सुभाषही ठीक वाटली नंतर. >> हो सरप्रायजिंगली ती नंतर इतकी खटकली नाही. सूट झाली तिथे असे वाटले.
मला जोजो पण खूप आवडली. आणि तिची गायतोंडे सोबत केमिस्ट्री पण.
हो जोजो बद्दल लिहायचं राहिलं.
हो जोजो बद्दल लिहायचं राहिलं. एकदम फिदा कॅटेगरी. अगेन नुसती सेक्स वर्कर इ. पेक्षा बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याची स्टोरी, त्यामुळे आत्महत्येचे अनेक प्रयत्न आणि मरता येत नाही म्हणून जगत असलेली... गायतोंडेच्या प्रेमात का/ पण विनाशाला कारणीभूत.. नक्की कुठली खरी... अशा मिल्टिपल ग्रे शेड्स. दिसते पण शिव्या ऐकत रहाव्या अशीच!
अमितव मस्त लिहिलं आहे
अमितव मस्त लिहिलं आहे
अगदी मनातलं
मला आधी वाटलं चर्नोबेल नुकतीच बघितल्याने त्यापुढे जास्त सुमार वाटली
पण नंतर अनेकांचे रिव्ह्यू वाचले
(कटाक्षाने टाळलेले) तेव्हा कळलं खरंच गंडली आहे सिरीज
नवाज चांगला आहे पण काकणभर
नवाज चांगला आहे पण काकणभर जास्तच ओव्हररेटेड आहे असे जाता जाता सांगून टाकतो
आणि त्याचे संवाद! कल्पना करा, नाना पाटेकर ने हिंदी बेल्ट मधल्या एखाद्या कथेत - बनारस, लखनौ, दिल्ली वगैरे मधले स्थानिक कॅरेक्टर उभे करताना जर त्याचे मराठी टोन वाले हिंदी उच्चारत संवाद म्हंटले असते, तर काय प्रतिक्रिया आली असती.
इथे हा "गायतोंडे", "तू कोण आहेस?", "तू असे कशाला करत आहेस?" वगैरे पुस्तकी संवाद म्हणतो. इव्हन माधुरी दिक्षीत बकेट लिस्ट मधे यापेक्षा चांगले मराठी बोलते
आणि ते शिव्यामिश्रीत संवाद
आणि ते शिव्यामिश्रीत संवाद कृत्रिम रीत्या घुसडलेल्या शिव्या वाटतात. जरा गां*, भो**** वगैरे टाकले की कूल वाटेल अशा आशेवर लिहील्यासारखे. म्हणजे मटा च्या "यंग" पुरवणीत उगाचच कोंबलेले इंग्रजी शब्द असतात तसे.
अत्र्यांनी पूर्वी एकदा म्हंटले होते - एखाद्याने "अन्" चा वापर कवितेत केला की इतरही तो जेथे तेथे करून कवितेची अन्नान्नदशा करून टाकतात- तसे या सिरीज चे झाले आहे.
हो त्याचं मराठी ठीक नाहीये पण
हो त्याचं मराठी ठीक नाहीये पण गायतोंडे वय १० असतानाच घरातून पळालेला आहे आणि त्यानंतर सगळे बंबैया हिंदीच शिकला असेल असा विचार केला मी.
मला अॅक्चुअली ७०ज मधल्या भिक्षा मागून जगणार्या शेंडीवाल्या ब्राह्मणाच्या कुटुंबाच्या मानाने गायतोंडेची आई आणि लहानपणचा गायतोंडे यांची रहाणी, केस, कपडे हे गंडलेले वाटले.
या मालिकेत न्युक्लिअर अ
या मालिकेत न्युक्लिअर अॅटॅकची गरज नव्हती. त्याशिवायच चांगले चालले होते.
अलिकडे बुद्धिजीवी वर्तुळात वैज्ञानिक प्रगती आणि अध्यात्म अशी सांगड घालण्याची एक ओढ दिसते. जे जे बुद्धीशी संबंधित ते आपणासी ठावे हा अट्टाहास असावा कदाचित. म्हणूनच विश्वाचा धमाका काय, वर्म होल्स काय आणि शून्यातून आलो शून्यात जाणार असे तत्त्वज्ञान काय. खरे तर हा भाग अधांतरी आहे. पंकज त्रिपाठीने तो उत्तमरित्या निभावला आहे. हे कॅरेक्टर डबलश्री वरून घेतले असावे अशी दाट शंका पाहताना येत होती. आयुर्वेदीक चहा मुळे ती अधिक गडद झाली. सतत लो टोन मधे बोलण्याचे टेक्निक पण तेच आहे.
जगाचा विनाश पेक्षा वेगळे काही घेता आले असते तर जेम्स बॉण्डच्या मार्गाने मालिका गेली नसती. त्याच्या अनेक सिनेमात असंख्य वेळा पाहीलेला शेवट यात आल्यामुळेच मालिका गंडली आहे. एव्हढा मोठा अॅटॅक होत असताना मुंबई पोलीसचा एक ज्युनिअर इन्स्पेक्टर फक्त त्या मागे आहे. आयबी आणि रॉ गाफील आहेत हे ही पटण्यासारखे नाही. मूळ कादंबरीत हेच असेल तर मग नाईलाज आहे.
आशु, अमित, पगारे ++
आशु, अमित, पगारे ++
फ्लॉपच होता म्हणावा लागेल दुसरा सीझन.
डिरेक्टर विक्रमादित्य मोटवाने ला घायवानने रिप्लेस का केलं?पहिल्या सीझनमधली मोटवानेची सैफ ओरिएंटेड सीन्सची ग्रीप आजिबातच दिसली नाही घायवान च्या डिरेक्शनम्ध्ये.
कश्यपचीही ग्रीप सुटल्यासारखी वाटली. तो मोम्बासा मधला ड्रग लॉर्ड आणि त्याला काय टपोरी लोकांसारखं मारलं ... एवढ्च सोपं होतं तर त्यात रॉ आनि गायतोंडे तो गुजू त्याची बायको काय नि काय कशाला हवे होते... कशाला कशाचा ताळमेळ नाही. (दाऊद, गोस्वामी, राजन, वगैरे parallels अगदीच हट्टाने आणायचे म्हणुन आल्यासारखे वाटले.)
सीआयए चा reference नुसताच डॉक्युमेंटरी पुरता म्हणुन वापराला.
असे रे. अॅ. मटेरियल मार्केट मध्ये येते आणि त्यांना काहीच माहित नाही कसे शक्य व्हावे.
पंकज त्रिपाठीचा पर्फॉर्मन्स ऑन अँड ऑफ होता. काही सीन्समध्ये जबरद्स्त तर काही सीन्स मध्ये रटाळ. नवाझ आणि सैफच्या रोल्सची कंटिन्युटी चांगली होती. भोसले ह्या भागातही ईरिटेटिंगली लाऊड होता. ते राम गोपाल वर्मा, कंगना राणावत चे रेफरंस सीन्स अतिशय क्लिशे होते, ना विनोदी ना सटायर काहीच नाही. माल्कम आणि बंटी शर्माचा गेम मधला रोल पण काही क्लिअर झाला नाही. सुरवीन चावला(जोजो) नी मात्र चांगलं काम केलं आहे.
ती रेड पिल/गोची म्हणजे नेटिव अमेरिकन लोक त्यांच्या बाप्टिझम टाईप्स सेरेमोनी मध्ये ते पिओटे वापरतात ज्याने हल्युसनेशन होऊन सबकॉशस माईंड्मधून सगळे वीकनेसेस बाहेर पडून माणूस फीअरलेस होतो, क्लॅरिटी ऑफ माईंड येते तसेच काही तरी होते.
ते अहं ब्रम्हास्मि लोक ब्लास्टच्या ड्रायविंग रेडियस मध्ये बंकर बनवून का राहतात हे मला न ऊलगडलेलं कोडं आहे. जो काही सेक्रेड गेम आहे आणि त्यामागचं लॉजिक आणि पुराणातल्या गोष्टींचा आधार अगदीच ईलॉजिकल, फुसका बार निघाला. बहुतेक पहिल्या भागाने खूप अपेक्षा वाढवल्या होत्या म्हणून की काय पण साफ निराशा केली ह्या भागाने.
अमितव, पोस्ट पटलं. तो
अमितव, पोस्ट पटलं. तो क्रिकेटवाला साद आणि तो बटाटे डोळेवाला अमेय वाघ यांना कशाला आणलं आणि कशाला तो इतका व्हायोलंस दाखवला असा प्रश्न पडला.
जोजोचं काम छान होतं. तिची आणि गायतोंडे केमिस्ट्रीही छान.
>>सैफ सुरुवातीला नेपोटिझम
>>सैफ सुरुवातीला नेपोटिझम गँगचा वाटायचा>> का बरं? त्याचं काम दिल चाहता है, हम तुम मध्ये चांगलं होतं. हे दोनच पटकन आठवले. आणखीनही असतील आवर्जून सांगण्यासारखे.
हाब +१ त्या मोंबासा मधल्या
हाब +१ त्या मोंबासा मधल्या ड्रग लॉर्डला अगदीच खर्चा कम मारला. मग इतका अट्टाहास कशाला तो रॉचा?
त्या सेक्स स्टार्व्ड गुज्जू बायकोचा काहीतरी मिनिंगफुल वापर होईल असं वाटत होतं पण ते ही फक्त सेक्स लेव्हलवरच राहिलं.
रागोवचा इतका नामसाधर्म्य वापर कशासाठी केला ते ही झेपलं नाही. सटल केलं असतं तरी समजलं असतं की. कंपनी बघितला पाहिजे.
माल्कम का मरतो? तो सरताजला का मारत नाही? तो काय बिगर गुड/ सॅक्रिफाईज करत असतो स्वतः मरून की त्याच्या मरणाची वेळ आली आहे हे त्याला समजतं? हे कोणाला समजलं का? त्याचा रोल अजिबात डेव्हलप केला नाही ते जाम खटकलं. तो पहिल्या पासून गुरुजी बरोबर आहे. त्याची काहीतरी बॅकस्टोरी होती का पहिल्या सीझन मध्ये. पुसटसं आठवतं. पण या सीझन मध्ये फक्त हिटमॅन आणि शेवटी काय करावं कळेना म्हणून आत्महत्या???
सायो, साद आणि अमेय वाघ हे जगात कशी फूट पाडली/ गोंधळ माजवला की कलीयुगाच्या अंताकडील प्रवासाचा वेग वाढेल हे दाखवायला. त्यात काटेकरच्या मुलालाही आणलं सादला शेवटी मारताना. सरताज त्याला स्लिपरी स्लोप वरुन बाहेर काढायचा प्रयत्न करतोय पण तो खोल खोल जात रहातोय आणि सरताजचा गिल्ट वाढतोय.
भोसले म्हणजे बाळासाहेब ठाकरे वाटले. नुसता माज आणि भलत्या लोकांकडून वापर.
सरताज शेवटी दिलबागचा पॅटर्न काढतो ना? गायतोंडे सरताजला नेहेमी सांगत असतो, 'सरदारजी सिर्फ तुमही बम्बई को बचा सकते हो' सो दिलबागचा ग्रिड पॅटर्न 'स्टॉप सिक्वेंन्स असतो' असलं काही प्लीज असू नये. शेवटच्या क्षणाला दिलबागचा पॅटर्न काढतो आणि बाँब फुटतच नाही. ढुस्सस!!!
) पण काळ सोकावू नका.
अरे नका रे करू असं काही. मुंबई बेचिराख झाली तरी चालेल (सिरियल मध्ये
इफ यु विश टू डिस्ट्रॉय द वर्ल्ड, यू आर बाऊंड टू डाय फर्स्ट! ह्या नोटला संपवलेली आवडेल मला. वर्ल्ड सेव्ह नका करायला जाऊ.
इफ यु विश टू डिस्ट्रॉय द
वर्ल्ड सेव्ह नका करायला जाऊ.>> After all this work is outsourced to Avengers, James Bond, Ethan Hunt etc.
मला एक छोटी शंका आहे, जेव्हा
मला एक छोटी शंका आहे, जेव्हा सरताज शेवटचा पासवर्ड टाकायला जातो तेव्हा त्याला गायतोंडे दिसतो, तो अहम ब्रम्हास्मि म्हणतो तेव्हा सरताज तेच म्हणतो आणि पासवर्ड टाकतो, म्हणजे तो मनाने स्विकारतो का की आता आपण काहीच करू शकत नाही आणि आपली हार मान्य करतो का?
तसेच सरताज आणि शाहीद खान ची स्टोरी दाखवायला एखादा बोनस एपिसोड चालेल तसेच जर पासवर्ड वर्क झाला असेल तर त्यामागचं लॉजिक बघायला पण आवडेल, कारण बॉम्ब चालू करताना शाहीद खानने टाकलेला पासवर्ड आणि नंतर सरताज टाकत असलेला पासवर्ड वेगळे आहेत हे लक्षात येतं
अहो लॉजिक काय हो शंभर देता
अहो लॉजिक काय हो शंभर देता येतील...
मल्टिपल पासवर्ड होते, सारताजच्या वडिलांची आकृती इमर्जन्सी स्टॉप होती, सरताज तेव्हा अहं ब्रह्मासमी म्हणतो तो त्या मशीनचा वेक वर्ड होता ... ओके गूगल किंवा हे सिरी सारखा.. सो वेक झाल्यावर पहिली प्रोसेस बॅकग्राउंडला गेली आणि इंटरपट झाली, बायोलॉजीकल काही की होती.. जी जेनेटिकली सरताज कडे आलेली.... ब्ला ब्ला ब्ला...
सारताजच्या वडिलांची आकृती
सारताजच्या वडिलांची आकृती इमर्जन्सी स्टॉप होती>> असे आहे का? एकदा परत बघायला हवे.
एक बारकी शंका इतका मोठ्या शक्तीचा बाँब आहे तर लोकांना इवे क्युएट करून तरी काय साध्य होईल? रेडिए शन मु ळे पूर्ण महा रा ष्ट्र च धोक्यात असेल का?
ती फोन ट्रॅक करत बसलेली मुलगी डब्यातून फणसाची भजी खात असते. सैफला ऑफर करते. पण शेव टी म्हणते माझी फॅमिली विदर्भातली आहे. हे बरोबर वाटत नाही. तिची फॅमिली कोकणातली हवी बाय फण स भजी लॉजिक.
किती तो स्टीरिओटिपिकलपणा!
किती तो स्टीरिओटिपिकलपणा! विदर्भी लोक फणस नाही खाऊ शकत का? किंवा आता मूव्ह झाले असतील ...
विदर्भी लोक फणस नाही खाऊ शकत
विदर्भी लोक फणस नाही खाऊ शकत का?>> डब्यात फणसाची तळलेली भजी मी अस्सल गाँयकार घरातून आलेली बघितली आहेत किंवा इथे मुंबईत जे लोक कोकणात्सून येउन सेटल झाले आहेत. ते करतात. वैदर्भिय माणूस फणस खाईल पण शक्यता पक्षी प्रॉबेबिलिटी कमी वाट्ते.
मला मुंबईच्या डेमोग्राफि क चा अनुभव आहे आठ वर्शांचा.
आता मुव्ह झाले असतील>> शक्य आहे किंवा राधिका मसाले वापरत असतील. नागपुरात फण साची लागवड होत असेल. दुरिआन कापा का बरका
Durian फणस नसतो वेगळं फळ असतं
Durian फणस नसतो वेगळं फळ असतं, फणस - jackfruit
वैदर्भिय माणूस फणस खाईल पण शक्यता पक्षी प्रॉबेबिलिटी कमी वाट्ते.--/ म्हणींग करेक्ट
मी काय बघितला नाही हा पार्ट; फक्त इथे फणस चर्चेला आले!
स्पॉयलर्स नको म्हणून
स्पॉयलर्स नको म्हणून स्टोरीबद्दल लिहीत नव्हते पण सगळेच लिहितायत तर लिहिते.
हास्यास्पद वाटले.
शेवटचे २ भाग मला फसलेले वाटले. त्यांच्याकडे २-३ जबरदस्त धागे होते कथेचे. कॅरेक्टर्स पण. पण शेवटाला त्यांना एकत्र आणताना गडबड झाली आहे. गुरुजी चे षडयंत्र किती मोठे ते दाखवायला स्टोरी चा कॅनव्हस मोठा मोठा करत गेले, मग जे काही जगात वाईट घडले ते त्यांनीच केले हे दाखवण्याच्या अट्टाहासात लॉजिक कै च्या कै झाले. अमेरिकेत बंदुका अन पार्कलँड शूटिंग वगैरे. मॉब लिंचिंग ची घटना पण असंच आपलं सगळे करंट अफेअर्स कवर करायला घातले असे वाटले.
१९४७, शहिद खान चे फाळणीशी कनेक्शन ठीक पण सरताज शी कनेक्शन उगीच वाटले. कारण त्याचा तसा काही उपयोग केला नाही.
पारुल्कर आणि भोसले ला गुंडाळले. पारुलकर ला आपण इसा ला मदत करत होतो हे जस्टिफायेबल वाटत असते पण आपण नकळत शाहिद खान ला मदत केली हे कलताच त्याचा ब्रेक डाउन झाला?? दॅट्स इट!! दॅटस व्हेअर ही ड्रॉज अ लाइन !!
सरताज चे वडील कसे गेले ? जोजो आणि झोया चा पण नीट शेवट केला नाही.
गायतोंडेच्या खर्या बापाचे नाव त्रिवेदी निघाले ? हे झेपले नाही. त्या पासवर्ड चा घोळ, अॅक्चुअल एक्सपर्ट बाई ने काही विचार न करता काहीही एन्टर करून पहाणे, हे पण काहीही. एंड ओपन ठेवलाय थोडा फार. पण यापुढे काही उरलेय असे वाटत नाही.
तरीही, बॉटमलाइन, सैफ आणि गायतोंडे चे कॅरेक्टर आर्क्स जबरदस्त जमलेत, इतरही बहुतेक कॅरेक्टर्स आणि त्यांचा अभिनय यामुळे बराच भाग बघताना मजा आली. याबद्दल अॅक्टर्स आणि दिग्दर्शकासाठी टाळ्या!!
बरोबर मै. उगाच ह्याचं कनेक्शन
बरोबर मै. उगाच ह्याचं कनेक्शन त्याला लावलं पण त्याचा काही उपयोग न करता अर्धवटच सोडून दिलं. मला वाटलं शेवटी आता शाहिद खान आणि सरताज आपण एकमेकांचे मावसभाऊ कळताच गले मिलो होणार की काय.
मला आवडली.
मला आवडली.
गायतोंडेच्या खर्या बापाचे नाव त्रिवेदी निघाले ? -> हे मला पण कळले नाही पण गायतोन्डे raw साठी काम करत होता म्हणून witness protection मध्ये नाव बदलून मिळाले असावे.
सरताज च्या वडिलांकडे Croatia ला जायला पैसे आणि सुट्टी कधी मिळाली असेल?
माझ्या मते गायतोंडेच्या
माझ्या मते गायतोंडेच्या भिक्षुक वडिलांना तीन वेद मुखोद्गत असावेत, आणि हे गायतोंडेला माहीत असावं, म्हणून त्याने त्यांना त्रिवेदी म्हटलं.
त्रिवेदी गायतोंडेचा
त्रिवेदी गायतोंडेचा बायोलॉजीकल बाप असतो ना/ का? शेवटी तो ग्रंथ त्यांना पाठवतो. तो पहिला शेंडीवाला मराठी नक्कीच नसतो.
मै +1
पण जोजो चा शेवट चांगला केला की! तिला एकदम पहिल्या भागात गगा गोळी घालताना आणि प्रेत ओढून आणताना दाखवलाय आणि अगदी शेवटी उलगडा होतो तो तिला का मारतो ते.
नाशिक सांगून क्रोएशिआ ला जायचे.
अमेरिकेहून युरोपला जायचं तर क्रोएशिआ ची तिकिटं सगळ्या स्वस्त असतात, तेव्हा ही तसच असेल
मी एकदम थाई प्लेस सारखा 'थाय आईस टी' बनवलाय आणि आज हापिसात घेऊन जाणारे. कोणाला पितो का विचारलं तर मी देसी मराठी आहे सांगू का सायगॉन सांगू?
जोजो ने खरंच गायतोंडे ला
जोजो ने खरंच गायतोंडे ला मॅनिप्युलेट केले असते की नाही? कसे? की तिला केव्हाचीच मरायची घाई झालेली असते म्हणून ती हो मी केले असे मुद्दम सांगून त्याच्या हातून गोळी घालून घेते? ते क्लिअर झाले नाही.
आधी गायतोंडे ची फॅमिली मराठीच दाखवली आहे की. म्हणूनच मला झेपले नाही त्रिवेदी प्रकरण. तोच त्रिवेदी हे कसे कळले तर सरताज तो टुकार बायोग्राफीवाला मूव्ही बघतो तेव्हा त्या अटकेच्या सीन मधे त्याला त्रिवेदी अशी हाक मारतात पोलिस त्यावरून. गायतोंडे कोणाचे नाव मग?
त्याची आई स्लीप्स विथ अदर मेन
त्याची आई स्लीप्स विथ अदर मेन... वरून मला नाव गायतोंडे पण बायोलॉजीकल त्रिवेदी वाटलं.
सरताजला मूव्ही बघून पत्ता समजतो म्हणजे त्या मूव्ही मध्ये ह्याच्या बापाचं काम केलेला ऍक्टर असेल की काय? गोची न घेताच ही अवस्था!
Pages