सकाळ झाली मी उठलो.
तसंही सकाळी सगळेच उठतात.
आरशात चेहरा बघून दोन तीन थपडा लगावल्या स्वतःला. तेवढीच एक जागेपणाची फिलिंग.
समोरच्या खिडकीत ती दिसतेय का?
आजकाल दिसतच नाही जास्त.
सुंदर आहे ती, एंगेज असेल बहुतेक कुणाला.
सुंदर फुलावर भुंगे जास्त फिरतात.
चला, निघा लवकर. कामावर जायचंय.
फ्रिजरही खचाखच भरलंय, साफ करायचंय...
मी खसाखसा दात घासले, फ्रिजर साफ केलं. अंघोळ केली. गार पाण्यानेच. ताजा हो ले...
चहा तर मी घेत नाहीच.
अरे, अजूनही तिची खिडकी बंद कशी, आतापर्यंत एकदातरी उघडायला हवी होती.
साला, आपला दिवस वाईट जाणार आज...
जाऊन बघावं काय?
जाऊन करणार काय? ओळख ना पाळख.
मी आवरलं, आणि निघालो. कुलूप दोन - तीनदा ओढून बघितलं. पॅक लागलं.
आजकाल चोऱ्या जास्त होतात. पैशापायी लोक एकमेकांचा जीव घेतील. घोर कलियुग...
अरे यार... आज कचरा कुठे टाकणार... विचारच केला नाही...
मरू दे, नदीतच टाकतो. नदी... सगळं पवित्र करते...
मी नदीकडे निघालो...
★★★★★
संध्याकाळी मी परत आलो.
दार उघडतानाच शेजारचे लेले आले. सोसायटी टाइम्स.
अहो कळलं का? समोरच्या बिल्डिंगमध्ये आज पोलीस आले होते. एक मुलगी बेपत्ता आहे तीन दिवसांपासून. मागच्या महिन्यासारखीच केस...
देवा घोर कलियुग...
मी सुन्न मनाने मध्ये आलो, सोफ्यावर अंग लोटलं.
साली हीसुद्धा तिच्यासारखीच एंगेज निघाली, आमच्यासारख्याची काही किंमतच नाही...
तसंही सुंदर फुलावर भुंगे जास्त फिरतात...
...आणि काही भुंगे फुलं पोखरतातही...
भुंगा...
Submitted by अज्ञातवासी on 28 August, 2019 - 01:00
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त!
आवडली छोटीशी कल्पक स्टोरी!!
आवडली छोटीशी कल्पक स्टोरी!!
अज्ञातवासी यांच खरं आगमन आज
अज्ञातवासी यांच खरं आगमन आज झालंय..
पोचली तुझी छोटुशी कथा...
छोटीशी. पण छान आहे कथा.
छोटीशी. पण छान आहे कथा.
खचाखच भरलेला फ्रिजर.. मस्त
खचाखच भरलेला फ्रिजर.. मस्त कथा!
पण म्हणजे काय? निवेदकानेच
पण म्हणजे काय? निवेदकानेच तिला मारून फ्रिजरमधे 3 दिवस ठेवलं होतं की काय?
फ्रीजर खचाखच भरलेला ! म्हणजे?
फ्रीजर खचाखच भरलेला ! म्हणजे? बापरे !
एक तर मला कळाली नाही किंवा हे
एक तर मला कळाली नाही किंवा हे काही तरी छोटं पण भयानक होतं ....
> निवेदकानेच तिला मारून
> निवेदकानेच तिला मारून फ्रिजरमधे 3 दिवस ठेवलं होतं की काय? > हो आणि तुकडे हळूहळू नदीत टाकून देतोय आणि हे त्याने याआधीदेखील केले आहे.
चैतन्यने लिहलेली गारेगार आठवली.
मला पण आधी नाही काळाली होती.
मला पण आधी नाही काळाली होती. छोटुशी पण भयानक
हो आणि तुकडे हळूहळू नदीत
हो आणि तुकडे हळूहळू नदीत टाकून देतोय आणि हे त्याने याआधीदेखील केले आहे.
>>>> ओह्ह.
भयंकर आहे. कमी शब्दात छान
भयंकर आहे. कमी शब्दात छान लिहिली आहे. शेवटचे वाक्य वाचून संशय आला, मग प्रतिसाद वाचले आणि मग फ्रीजरवाला भाग परत वाचला.
मस्तच,ते फ्रीझर खचाखच शेवटी
मस्तच,ते फ्रीझर खचाखच शेवटी लक्षात आले,मस्तच कथा
एकदम खास अज्ञातवासी टच...
एकदम खास अज्ञातवासी टच... जबरदस्त.....
जुन्या कथा कधी संपणार?
Ohhh ... Great... N welcome
Ohhh ... Great... N welcome back
जुन्या कथा कधी संपणार? +11
जुन्या कथा कधी संपणार? +11
ही मस्तय गोष्ट
तुम्हाला जास्त लिहिण्याचा
तुम्हाला जास्त लिहिण्याचा कंटाळा आहे का हो, म्हणून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त प्रभाव पाडण्याकडे तुमचा कल असतो?
शॉर्ट फिल्म बघितल्याची फिलिंग येतेय.
पुढच्या कथा कधी...?
मस्तच,ते फ्रीझर खचाखच शेवटी
मस्तच,ते फ्रीझर खचाखच शेवटी लक्षात आले,मस्तच कथा >>=+११११११
छान आहे...पहिल्यांदा वाचली
छान आहे...पहिल्यांदा वाचली तेव्हा कळली नाही...मग लक्षात आलं..
भयंकर
भयंकर
आधी पार्ट 2 वाचून ही वाचली.मस्त.
अश्या अजून लिहा.
आवडली... छान आहे कथा.
आवडली... छान आहे कथा.