नू. म. वि. मुलांची प्रशाला व महाविद्यालय

Submitted by हिम्सकूल on 24 July, 2008 - 04:21

नू. म. वि., नू. म. वि., नू. म. विद्यालय...
'हाती घ्याल ते तडीस न्या' ब्रीद दिले आम्हांस...
आज लहान उद्या थोर आम्ही होणार खास...
.
मायबोली वरील नूमवीयांचे हितगुज...

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नू. म. वि. चे माजी मुख्याध्यापक चं. ज. कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.

सतीश, चं.ज्.कु. किती साली मु. होते हे कळेल का?

नक्की कल्पना नाही. मी १९७३ साली ४थी पास झालो. ते त्यानंतर म्हणजे १९७९-८० च्या आसपास मुख्याध्यापक झाल्याचे ऐकले होते.

८२ मध्ये आम्हांला चं ज मु होते

चं. ज. कुलकर्णी सर छोट्या शाळेचे मुख्याध्यापक होते माझ्या माहितीनुसार.. आणि ते ८८- ८९ पर्यंत शाळेत येत होते पण तेव्हा मुख्याध्यापक नव्हते..
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

हो, ते छोट्या शाळेतच होते... ८५ मधला माझा एक त्यांच्याकडून बक्षिस घेतानाचा फोटो आहे म्हणजे तेव्हा तरी ते मुख्याधापक होते.

हो, मलाही मुख्याध्यापक चंज आठवतायत. केसकर बाई एके दिवशी रजेवर असताना त्यांनी आमचा ४थी स्कॉलरशीपचा तास घेतला होता (तो शाळा सुरू व्हायच्या आधी असायचा).

    ***
    If dreams are like movies, then memories are films about ghosts...

    चं. ज. मला ४थी ला वर्गशिक्षक होते. ते अतिशय कडक होते, पण खूप चांगले शिकवायचे. रागावले की ते बेदम मारायचे. ते जोशी-दामले कार्यालयाजवळ एका मोठ्या चाळीत रहात होते. मी व माझ्या वर्गातील काही विद्यार्थी रोज सकाळी त्यांच्या घरी ४थी च्या शिष्यवृत्तीच्या शिकवणीला जात होतो.

    एका अतिशय चांगल्या व तळमळीने शिकविणार्‍या या माझ्या शिक्षकांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली ! असे मनापासून शिकविणारे शिक्षक आता दुर्मिळ झाले आहेत.

    नमस्कार मंडळी.

    दिवाळीची चाहूल कशी अगदी आसमंतात भरून राहिली आहे नाही?
    वर्षातल्या सर्वात मोठ्या या उत्सवात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. घरातली अडगळ काढून साफसफाई करायची आहे. घर रंगवायचे आहे. नवीन खरेदी करायला दोन-तीन दिवस तरी पाहिजेत. प्रियजनांच्या गाठी आणि त्यांच्यासाठी भेटी घ्यायच्या आहेत. नोकरी-धंद्यातल्या संबंधांना यानिमित्ताने उजाळा द्यायचा आहे. बर्‍याच नातेवाई़कांकडे जायचे नियोजन करायचे आहे.. हे ना ते. अनंत विषय मनात असतील, अन् कमी वेळेत कसे कसे होईल हा प्रश्नही!

    या गडबडीत आपल्या दिवाळी अंकाला मात्र विसरू नका, म्हणजे झाले.

    दिवाळी अंकाची घोषणा होऊनच आता आठवडा उलटून गेला आहे. दिवाळी अंकातला आपला सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने हीच वेळ आहे घाई करण्याची.
    आपल्या लाडक्या मायबोलीचा हा नववा 'हितगुज दिवाळी अंक', "मायबोली-मायमराठी- गेले तप आणि येणारे तप" असा विषय घेऊन महाजालावर आपणा सर्वांसमोर येतो आहे, हे दिवाळी अंक घोषणेत सांगून झालेच आहे. या वर्षी आपला दिवाळी अंक मूर्त रूप घेणार आहे तो फक्त शब्दरूपाने नव्हे, तर दृक्-श्राव्य रूपाने सुध्दा. यामध्ये कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, रसग्रहण यांबरोबरच बाल साहित्य व आपल्या गुणप्रदर्शनांचे स्वागत आहे..

    आपण अजूनही विचार करत असाल, विषय ठरले झाले नसतील तर आपण घाई करायला हवी. ऐनवेळी तुमची धांदल नको, म्हणून ही आगाऊ सूचना!
    तेव्हा, लागा बघू तयारीला..!!

    आपले साहित्य तयार असेल तर दिवाळी अंकाची घोषणा व त्यातील सूचना पुन्हा एकदा वाचून, कृपया आपले साहित्य दिवाळी अंक लेखनाच्या खालील दुव्यावर पाठवावे.
    http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1

    काही शंका असल्यास, आपल्या प्रश्नांचे स्वागत आहे..

    --
    संपादक मंडळ
    हितगुज दिवाळी अंक २००८

    रावि नमस्कार बोलल्ल्ल्ल्ल्ल्ल्

    कोणी १९८८ दहवी पास आहेत का ?

    वि.स. हुबाळीकर

    अंधार होत चाललाय
    दिवा पाहिजे
    या देशाला जिजाऊचा
    शिवा पाहिजे ॥

    नेते झाले अफ़जलखान
    काश्मिरचे झाले स्मशान।
    शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
    युवा पाहिजे।
    या देशाला जिजाऊचा
    शिवा पाहिजे ॥

    मराठे झाले यौवनभक्त
    मराठ्यांच्याच तलवारीवर
    मराठ्यांचेच रक्त
    पुन्हा एकदा रायगडावर
    मराठ्यांचा दावा पाहिजे
    हर हर महादेव 'हवा' पाहिजे
    'हवा' पाहिजे
    या देशाला जिजाऊचा
    शिवा पाहिजे .

    मनोज, पानाच्या उजव्या बाजूला तुमच्या सदस्यनामाखाली 'नवीन लेखन करा' असे दिसते, तिथे टिचकी मारून योग्य तो विभाग निवडून लिहा. म्हणजे हे स्वतंत्र कविता दिसेल. इथे कमी वाचले जाईल.
    अर्थात, पुढचे शिवबा हे नूमवितूनच घडतील असे वाटत असेल तर तुम्हाला अनुमोदन आणि हे राहू दे इथेच Happy

      ***
      दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
      पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

      अर्थात, पुढचे शिवबा हे नूमवितूनच घडतील असे वाटत असेल तर तुम्हाला अनुमोदन आणि हे राहू दे इथेच >>>
      स्लार्ट्या.. केवढा तो आशावाद....
      =========================

      गप रे Happy आशावाद नाही, 'आज लहान उद्या थोर आम्ही होणार खास...' हे काय उगीच का ? Happy

        ***
        दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
        पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

        नूमवि तील माजी शिक्षक प्रभूदेसाई यांचे काल निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांना व अजून एका शिक्षकांना (बहुतेक चं. प्र. जोशी असावेत) १९७५-७७ या काळात (आणीबाणीत) संघाशी संबंध असल्याच्या संशयावरून २० महिने तुरुंगात टाकले होते.

        नूमवि तील माजी हस्तकला शिक्षक श्री. कवठेकर सर यांचे २८ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ते व ताडफळे सर ही हस्तकला शिकवणारी जोडी प्रसिध्द होती. हस्तकलेव्यतिरिक्त शाळेतील ध्वनिव्यवस्था देखील सांभाळायचे. त्यांना रेडिओ दुरूस्तीचे देखील उत्तम ज्ञान होते.

        नूमवि तील माजी शिक्षक श्री. इंगळे सर यांचे ३-४ दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. ते गणित व शास्त्र शिकवायचे. इंगळे सरांना माझी श्रध्दांजली!

        नुमवी तले बेलसरे सर चिंचवडला रहातात. मी दहावीला त्यांच्या इंग्रजी विषयासाठी क्लासला ( खाजगी शिकवणी ) जायचो ( १९७९ ). आजही माझी ओळख ठेऊन आहेत. रस्त्यात भेटले की भरभरुन बोलतात.

        इथे कोनि ८३, ८७ चे आहे का?

        आहे ना मी, नुमविशी ११ वी १२ वी असे दोनच वर्षे संबंध आला (१९९९-२००१)

        बेलसरे सर आठवतात फक्त ते शिकवायला नव्हते पण त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आयुष्यभर आनंद देवून गेली
        ती अशी-
        तुमच्या मनात एखादी गोष्ट आली कि ती पटकन करुन टाका , त्याच्या फायद्या तोट्याचा विचार करु नका ते करत बसलात तर ती वेळ निघून जाते आणि तेव्हा ती गोष्ट केली असती तर बरे झाले असते असे वाटते,
        हॅट्स ऑफ अशा लोकांना मी आज बांधकाम क्षेत्रात व्यावसाय करतोय कदाचित याच प्रेरणेमुळे .
        ११ वीच्या बायलॉजीच्या पाटणकर मॅडम, आणि फिजिक्सचे मांढरे सर आठवतात.

        (टीप : वरील सर्व पोश्टी माध्यमिक शाळेशी संदर्भातील आहेत असे वाटते, मी तिथे कनिष्ठ महाविद्यालयात होतो, नुमविचे नाव वाचले कि त्या धाग्यावर पळत पळत आलो.

        नुमविशी माझा प्रत्यक्ष संबंध नाही , पण तुमच्या पैकी कोणाला ह्या प्रकरणात मदत करता आली तर म्हणुन हा प्रतिसाद.........

        https://www.facebook.com/gholapgaurav/posts/347557505395380

        काल शाळेच्या वास्तूला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून शाळेत समारंभ होता...

        आणि त्या निमित्ताने २८ तारखेला सकाळी ९ ते दुपारी १ ह्या वेळेत शाळेतच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की या...

        फेसबुकवर फोटो बघितले...शाळा मस्त सजवली होती. परचुरे सर सोडून बाकी ओळखीचे कोणीच दिसले नाही (किंवा बाकीच्यांचे फोटो नव्हते)

        नमस्कार.
        कसे आहात.
        गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
        ---
        riksha 2.jpg