अती जुने वर्तमानपत्र आंतरजालावर कसे शोधता येईल?

Submitted by vichar on 24 August, 2019 - 15:10

लोकमत , सकाळ, सामना, मटा किंवा लोकसत्ता...
कोणतेही दैनिक असो...
पण काही वर्षांनपूर्वीच्या दिनांकाचे शोधता येईल का?

सर्वसाधारणपणे सर्व मुख्य दैनिके स्वतःच्या वेबसाईटवर २-४ आठवडे डिजिटल कॉपी उपलब्ध करतात, परंतु काही महिने अथवा वर्ष जुने पत्रक पाहायचे असल्यास...त्यांच्या कार्यालयात जान्यावाचून इतर काही उपाय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वसाधारणपणे सर्व मुख्य दैनिके स्वतःच्या वेबसाईटवर २-४ आठवडे डिजिटल कॉपी उपलब्ध करतात, परंतु काही महिने अथवा वर्ष जुने पत्रक पाहायचे असल्यास...त्यांच्या कार्यालयात जान्यावाचून इतर काही उपाय?

कार्यालयाऐवजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या गिरगाव/दादर/ठाणे शाखेत जाणे हाच उपाय. किंवा इतर अशी मोठी वाचनालये.
वर्तमानपत्रांची स्कँन्ड कॉपी करण्याचे काम मात्र त्या पत्रसमुहासच करावे लागेल.

https://epaper.loksatta.com/51302/loksatta-mumbai/10-08-2012#page/3/1

इथे वर तारखेच्या बाजूला कॅलेंडरचा आयकॉन आहे, त्यावर क्लिक करून जुने पेपर्स पाहता येतील. पण आणखीनच जुन्या पेपर्समधले फाँट वाचता येत नाहीत, असा लोकसत्ताबाबत माझा अनुभव आहे.

पेपरच्या बातमीची क्लिप करायची

पेपरच्या बातमीची क्लिप करायची सोय आहे ती बऱ्याचदा एरर दाखवते. मग त्याचा स्क्रिन शॉट घेतो. त्याला CamScanner App वापरून फॉन्ट ठळक करून घेतो. ते जरा अधिक झूम करता येते.