धुरंधर

Submitted by सिद्धेश्वर विला... on 12 August, 2019 - 05:03

पेटता पेटता विझलो कधी

माझे मलाच कळले नाही

दिला होता शब्द खरा

पण काय ते नीट आठवलेच नाही

या स्मृतीला कोण जाणे

कुणाचा विखारी दंश झाला

जो तो ओळखीचा असूनही

इथे मलाच परका झाला

कोणता हात धरू मी ?

कोणता सोडून देऊ ?

या हातांच्या विळख्यातच

माझा नक्की कोणता ? तोच कळेनासा झाला

समजत होतो धुरंधर स्वतःला

पण या हळव्या हृदयाने घात केला

मेंदूने बरेच समजावून पहिले त्यास

पण हळूहळू तोही त्या हृदयात गेला

इथेच घेतली समाधी मनाने

इथेच माझा अंत झाला

हाच तो विखारी दंश होता

ज्याने धुरंधर परागंदा झाला

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

=====धन्यवाद======

हि एका वेड लागलेल्या प्रेमपूजाऱ्याची कहाणी आहे .. सुरुवातीला बर्याच पोरी खेळवलेल्या आहेत त्याने ... त्यापैकीच एक त्याला वेड लावून जाते .. बर्याच खोट्या आणाभाका घेऊन झाल्यात त्याच्या प्रेमामध्ये .. पण ह्या मुलीबरोबर नक्की शब्दांची काय देवाणघेवाण झालीय तेच त्याला आठवत नाही .. पोर जणू लावण्याची खाण म्हणायला हवी , जिने ह्या धुरंधर समजणाऱ्याला पार वेड लावून टाकलंय... तिने त्याची लायकी ओळखून लगेच स्वतःला सावरलं पण हा धुरंधर मात्र तिच्यामागे भरकटत गेला ..