भेटली पुन्हा ती वृध्दापकाळी

Submitted by सिद्धेश्वर विला... on 17 August, 2019 - 07:24

भेटली पुन्हा ती वृध्दापकाळी

एके दिवशी बागेमध्ये

दुरूनच ती न्याहाळत होती

लगडलेली हिरवी केळी

मी रममाण नामस्मरणी

बैसलों टेकूनी बाकाला

अंतःपुरातून इशारा येता

डावा डोळा फडफडला

तिने माळलेला मोगरा मजला

बरेच काही सांगुनी गेला

गत आठवणींचे बाष्प जमुनी

चष्मा थोडा ओला झाला

काचा झाल्या धूसर धूसर

नाद लागले खुळचट

विस्मरण ते हरीनामाचे

देठ पुन्हा तो हिरवट

वायपर लावूनी साफ केली

आठवण सारी काचेवरची

हात लावूनी पुन्हा परखली

खाली लिंबू अन मिरची

धीर करुनी पुन्हा टाकले

पाऊल पुढले यौवनात

थेरडी अजूनही भारीच दिसते

समाज गेला मसनात

ओळखलंस का मला म्हणुनी

थेट बैसलों बाजूला

हात टाकुनी खांद्यावरती

जवळ घेतले मी तिजला

नजरेसाठी आसुसलेलो

झालो होतो आतुर

काठी घेऊनि हाणहाणले

फोडलं माझं टकूर

हरी हरी ते पुन्हा आठवले

मसनात गेले देठ सारे

नको पुन्हा त्या कटू आठवणी

सांगुनी गेले मज म्हातारे

सिद्धेश्वर विलास पाटणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हसुन हसुन पुरेवाट..! Proud
नेहमीच्या शैलीत पुन्हा एकदा मजा आणलीत... हिरवा देठ.. लिंबु-मिरची.. छान प्रतिकं वापरलेत Wink

आवडली......
तुमची शैली फार वेगळी आहे.

दादा कोंडके असते तर त्यांच्या सिनेमासाठी तुम्हालाच गीतकार म्हणुन घेतले असेते

==)) ==)) ==))

एव्हढा मोठा पुरस्कार .. जर खरेच नशिबी असता तर आज मी कुठे असतो .. असो ... धन्यवाद दोघांनाही ..