सेक्रेड गेम्स बहुचर्चित मालिकेचा दुसरा सीझन काल पासून नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे. त्याची चर्चा करण्या साठी धागा काढला आहे. आत्ताशी पहिला भाग अर्ध्यापेक्षा जास्त बघून झाला आहे. पण लगेच ग्रिप घेते कथा. गणेश गायतोंडे अॅक्षन मध्ये बघून खूप बरे वाटले कसमसे. कथेची व्याप्ती खूप वाढून मुंबई सोडून परदेशी गेली आहे. पहिल्या भागात मोंबासा मधील कथा आहे.
सैफ पक्षी सरताज एकदम टोन्ड व फिट दिसतो आहे सीरीअलचा हिरो तोच आहे त्यामुळे आब राखून आहे. नवाजुद्दीन आला की स्क्रीन खाउन टाकतो. बंटी, कांताबाई सर्वांना बघून खरे तर पुनःप्रत्ययाचा आनंद फेज मध्ये आहे. आत्ता तरी. ट्विटर, इन्स्टा ग्राम वर मीम्स चालू झाले आहेत.
इथे लिहू शकता येतील असे फारसे नाहीत. पण मकर संक्राति के दिन पैदा हुई थी..... बेस्ट.
झॉया पण दिसली. मराठी कलाकार खूप आहेत. ती यादव बाई पण मराठी नटी. खतर नाक असल्याची अॅक्ट्रिंग करते पण शोभत नाही.
रात्रीस खेळचाले भाग दोन मधील दत्ता भाउ पण कांबळे आहे का ? अमेय वाघ पण आहे म्हणे. बघू कधी येतो ते. ह्या सीझन चे बजेट १०० कोटी आहे असे वाचले. आजचा दिवस तर सेट आहे. तुम्ही कुठपरेन्त आलात? मी हा सीझ न बघेन मग सलग दोन सीझन परत बघेन वीकांताला.
जास्तीची हिंसा, हिंसक भाषा ह्याची आता सवय झाल्याने इतके विचित्र वाटत नाही.
सरताज मेघाशी बोलायला गच्चीवर येतो तो आमच्या येथिल रुणवाल ग्रीन्स वाला भाग आहे. पहिला सीझन पहिला भाग मध्ये पण मुलुंड मधील भकास पडलेला निर्मल मॉल इथे एका मारामारी कम पाठलागाचे शुटिन्ग आहे.
आता दुसरा भाग सुरू झाला आहे. बिंज वॉचिन्ग इज ऑन. अपुन तो फुलॉन देखेला है.
तीनदा!
तीनदा!
Kuch toh lochya hai
Kuch toh lochya hai
मी तीनही प्रतिसाद वाचून काढले
मी तीनही प्रतिसाद वाचून काढले. नंतर लक्षात आला घोळ.
एका वाक्यात सांगायचे तर पहिल्या भागाची पकड कथा असंख्य तुकड्यात विखुरल्यामुळे दुस-या भागात सुटलेली आहे.
अमृता सुभाष बहुधा मेकअपला नकार देत असावी. त्यामुळे चेहरा तेलकट आणि मळकट वाटतो. असू शकतात उसूल एकेकाचे.
अभिनयाची आघाडी नवाझुद्दीन आणि पंकज त्रिपाठी यांनीच मुख्यत्वे सांभाळली आहे. सैफअली खानची भूमिका या सीझन मधे पहिल्याइतकी दमदार नाही. त्यामुळे त्याला अभिनयाला फारशी संधी आहे असे वाटले नाही. डीएसपी परळकर हा एक चांगला अभिनेता या मालिकेने दिला. त्या एका मुस्लीम पोलीस अधिका-याचे नाव लक्षात नाही. हा ही चांगला वाटला.
क्लायमॅक्स म्हणजे लवंगी फटाका निघाला.
नक्की कोणते दृष्य अमा?
नक्की कोणते दृष्य अमा?
झाला एकदचा सिजन बघून, खूप
झाला एकदचा सिजन बघून, खूप आवडला. 5 व्या एपिसोड नंतर खूप छान गती आहे, रहस्य उकल आहे. गायतोंडे चा अध्यात्मिक प्रवास, त्याच्या आजूबाजूची माणसे कशी वागतात आणि का? ह्याची धक्कादायक उकल सुंदर दाखवली आहे.
गायतोंडेला जसे गुरुजींचे शब्द कानात घुमतात तसे सरताजला शेवटी गायतोंडे चे.
मी पहिल्या सिझन चे काही
मला आवडत नाही. पण पहिला सिझन गाजला होता.
क्लायमॅक्स मधे जर सरताज चे
क्लायमॅक्स मधे जर सरताज चे लॉजिक चालले नाही तर सीजन 3 ची सुरूवात अगदी अवेंजर्स एण्ड गेम सारखी होईल ना?
मला खूप वाटताय की सरताज चे लॉजिक चुकीचे आहे. तो फक्त त्याच्या भूतकालाच्या दृष्टीने विचार करतो. शहीद ने जर अण्वस्त्राची रचना केली असेल तर तो दिलबाघ चे साइन का वापरेल पास कोड म्हणून??
स्पोइलेर्स ना परवानगी आहे ना? नाहीतर पोस्ट उडवून टाकते.
https://www.hindustantimes
https://www.hindustantimes.com/tv/sacred-games-2-inspires-hilarious-expe...
no spoilers pls! second
no spoilers pls! second season just came
तिसरा एपि चालू केलाय. अमृता
तिसरा एपि चालू केलाय. अमृता सुभाषला बघून ही आणि कशाला ह्यात असं वाटलं. तिचा रोलही बोअर वाटतोय.
मला त्या गुरुजी प्रकरणाची नीटशी लिंक लागत नाहीये. बहुतेक पुस्तक वाचायला हवं आहे.
जस्ट सुरु केलाय पण आधिचा सिझन
जस्ट सुरु केलाय पण आधिचा सिझन बघावा लागेल कण्टीन्युटी लागते नाहिये, अम्रुता सुभाष बद्दल +१
मी आधीचा सिजन जरा पळवत पळवत
मी आधीचा सिजन जरा पळवत पळवत पाहीला. दुसर्या सिजन चा पाचवा भाग सुरू केला आहे. आतापर्यंत तरी कथानक खूप काही पुढे सरकलं आहे असं वाटलं नाही. दीड दोन एपिसोड तर निव्वळ पाणी वाढवल्यासारखे आहेत.
यातली कॅरॅक्टर्स रिअल लाईफ
यातली कॅरॅक्टर्स रिअल लाईफ मधून घेतली आहेत का? म्हणजे मोसा किंवा शाहिद खान ह्यापैकी एक दाऊद असावा. गणेश गायतोंडे केनियाला गेल्यावर विकी गोस्वामी आणि झोया म्हणजे ममता कुलकर्णी असावी की काय अशी शंका आली.
आत्ता कुठे गुरुजीचा अजेंडा लक्षात यायला लागला आहे.
>>यातली कॅरॅक्टर्स रिअल लाईफ
>>यातली कॅरॅक्टर्स रिअल लाईफ मधून घेतली आहेत का?<<
हो. अगदिच कॉपी-टु-कॉपी नाहि, परंतु मुंबईचं गुन्हेगारी विश्व, अतिरेकि हल्ले, बाबालोक (ओशो) यांसंबंधित बरीच साम्यस्थळं जोडुन कथानकाची गोधडी शिवलेली आहे. गायतोंडेचं कॅरेक्टर विकि गोस्वामी पेक्षा छोटा राजनकडे जास्त झुकणारं आहे...
अच्छा. छोटा राजन मेक्स सेन्स.
अच्छा. छोटा राजन मेक्स सेन्स.
मी काल पहिला भाग पाहिला (सीझन
मी काल पहिला भाग पाहिला (सीझन २ चा). आवडला मला.
सेकंड सीझन बघून संपवला.
सेकंड सीझन बघून संपवला. पहिल्या सीझनइतका प्रभावी नाहीये पण टाकाऊही नाहीये.
सी २ एपि ३ झाला बघून. जरा
सी २ एपि ३ झाला बघून. जरा स्लो वाटतोय अजून तरी पण कंटाळा आला नाही तसा. गायतोंडे च्या कॅरेक्टर चे बारीक सारीक बारकावे मस्त दाखवलेत. वेगवेगळ्या कॅरेक्टर्स शी त्याची वेगवेगळी केमिस्ट्री इंटरेस्टिंग आहे. यादव ताई, जोजो, त्रिवेदी, इसा, पारुलकर, गुरुजी , सरताज चे पापाजी सगळ्याच वेगळ्या शेड्स.
काल हे बघितलं. ह्या सगळ्या
काल हे बघितलं. ह्या सगळ्या एपिसोड्सची नावं एकदम हटके आहेत आणि लोगो‘ज मागचं लॉजिकही थोडं डीप आहे.
https://youtu.be/j_uVFaE0xhU
मला त्या आश्रमांचं
मला त्या आश्रमांचं आर्किटेक्चर व इंटेरिअर खूप च आवडले. ते क्रोएशि यात आहे ह्याने काय नक्की फरक पडला?! पहिल्यांदा सैफ येतो आत तिथे एक पिवळट झाक असलेला असा मार्बलचा जिना व कॉरिडॉर आहे ते खूप मस्त वा टले. त्या रेड पिल्स मध्ये आमच्या जुन्या मॅट्रिक्स मधल्या लाल गोळीचा संदर्भ आहे असे पहिल्यांदा वाटले पण ते फार प्रामाणिक प्रकरण आहे. हे सरसर ड्रग्जच आहेत. गोळी नाही घेतली तर माणूस पॅरानॉइड होतो. असे कल्की काय्म सांगत राहते.
आश्रम भारीच दाखवला आहे.
आश्रम भारीच दाखवला आहे. क्रोएशियात शूट केलंय की नाही ह्याबद्दल शंका आहे. आश्रम साऊथ आफ्रिकेत शूट केला असावा.
नवाज च्या मराठी उच्चारांत मार
नवाज च्या मराठी उच्चारांत मार खाल्लाय. अमराठी लोक मराठी बोलतात तसा बोलतो तो. गायतोंडे चे मराठी ते वाटत नाही.
हो बरोबर. परुळकरचं मराठीही
हो बरोबर. परुळकरचं मराठीही तसंच आहे.
हो त्याचेही. पहिल्या भागात
हो त्याचेही. पहिल्या भागात त्याला फारसे संवाद नव्हते त्यामुळे समजले नाही. जाहिरात वाले, कॉल सेण्टर वाले जसे मराठीकडे दुर्लक्ष करतात तसे यांनीही केलेले दिसते.
@मोसा
@मोसा
मला असं वाटतंय कि शाहिद आणि दिलबाग मध्ये काहीतरी कनेक्शन असावं कारण तो त्याच्या आईशी कि आज्जीशी बोलताना दाखवलेला तेव्हा ती शीख होती आणि फाळणीच्या वेळी पाकिस्तान मध्ये राहिली गुंडांकडून अपहरण होऊन. असं काहीस दाखवलाय . आणि तो सीन डिसॉल्व होतो तेव्हा सरताज ची आई जुना फॅमिली अल्बम बघत असते .
बहुतेक शाहिदची आजी आणि
बहुतेक शाहिदची आई आणि सरताजची आई ह्या बहिणी असतात असं वाटतं.
शाहिद आणि सरताज मावस भाऊ
शाहिद आणि सरताज मावस भाऊ असतात.
व्हय. तिसऱ्या सीझनला मसाला
व्हय. तिसऱ्या सीझनला मसाला नको का?
आता तिसरा सिझन नकोय खरं तर.
आता तिसरा सिझन नकोय खरं तर. गायतोंडे मेला आहे, भोसले, परुळकर मेले आहेत, न्यूक्लिअर अटॅक थांबला आहे. सगळं आलबेल आहे. तोवर सरताजच्या हाताचं बँडेज निघेल पण त्याकरता तिसरा सिझन टू मच होतो.
सायो
सायो

Pages