वेजीटेबल स्ट्रॅटा

Submitted by स्वाती२ on 15 October, 2014 - 10:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

दूध १ १/४ कप
अंडी ४
हळद १/२ टी स्पून
तिखट ३/४ टी स्पून
किसलेले शार्प चेडर चीज १/४ कप
मीठ चवी प्रमाणे

ढ्ब्बू मिरचीचे तुकडे १ कप
पालक चिरुन १ १/२ कप
बटन मश्रुम चिरुन १/२ कप
किंवा
साधारण ३ कप होईल इतक्या तुमच्या आवडीच्या भाज्या चिरुन- ब्रोकोली, अ‍ॅस्परॅगस, झुकिनी छान लागतात.
तेल १ टीस्पून
मीठ १/४ टी स्पून
मिरेपूड १/२ टी स्पून

शिळा पांढरा ब्रेड ८ स्लाईसेस
१/२ टी स्पून तेल किंवा ऑइल स्प्रे

क्रमवार पाककृती: 

ओवन ३२५ फॅ. ला तापत ठेवावा. ८ X ८ च्या काचेच्या पॅनला ऑइलस्प्रे मारुन घ्यावा किंवा आतून तेल लावून घ्यावे.
मध्यम आचेवर भांडे तापत ठेवावे. त्यात १ टीस्पून तेल घालावे. तेल तापले की चिरलेला पालक घालून परतावे. मश्रूम आणि ढ्ब्बू मिरचीचे तुकडे घालून परतावे. मीठ आणि मीरेपूड घालून नीट ढवळावे. १ टे. स्पून पाणी घालून, पाणी आटेल इतपत भाज्या शिजवून घ्याव्यात. भांडे आचेवरुन उतरवून बाजूला ठेवावे.
एका भांड्यात दूध घेऊन त्यात हळद, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालावे. वायर विस्कने ढवळून घ्यावे. यात चार अंडी फोडून टाकावीत. मिश्रण वायर विस्कने छान बिट करून घ्यावे.
आता तेल लावलेल्या पॅन मधे ब्रेडच्या चार स्लाईसेस पसराव्यात. त्यावर शिजवलेल्या भाजीच्या मिश्रणातले निम्मे मिश्रण पसरवावे. त्यावर चमच्याने निम्मे दूध-अंडे मिश्रण परवावे. त्यावर किसलेल्या चीजपैकी निम्मे चीज भुरभुरावे. यावर उरलेलेल्या चार ब्रेडच्या स्लाइसेस पसरवून पुन्हा भाज्या, अंडे-दूध, चीज क्रमवार पसरवावे. चमच्याने ब्रेडचे थर जरा दाबून घ्यावे. हे पॅन कमितकमी १५ मिनिटे बाजूला ठेवावे.
तापवलेल्या ओवनमधे ४५-५० मिनिटे बेक करावे. शिजला की छान फुगतो. बाहेर काढून ५ मिनीटे थांबाबे. आवडत असेल तर २-३ मिनिटे ब्रॉइल करावे. तुकडे कापून गरम वाढावे. मला रुम टेंपला आवडतो.

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांसाठी लंच किंवा इतर पदार्थांबरोबर ४ माणसासाठी ब्रंच
अधिक टिपा: 

इथली मंडळी या पाककृतीत मीरेपूड घालतात. पण मी हळद, तिखट घालते. एकदा लेयर लवून झाले की पॅन व्रॅप लावून रात्रभर फ्रीजमधे ठेवले तरी चालते. सकाळी रुम टेंपला आणून बेक करावे. यात भाज्याच्या जोडीला हॅम, सॉसेज वगैरे घालता येइल. तसे केल्यास भाज्यांचे प्रमाण कमी करावे. मी स्किम दूध वापरले. खास ब्रंच असेल तर आणि वाढीव कॅलरीज चालणार असतील तर हाफ अ‍ॅन्ड हाफ वापरावे.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण आणि युएसए विकेंडमधील पॅम अ‍ॅडरसनचा कॉलम
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम होतो हा पदार्थ ! धन्यवाद स्वाती ताई.

अमितव यांच्या फोटोमुळे स्फुर्ती मिळाली. सुरेख फोटो बद्दल धन्यवाद.
एक छोटासा बदल केला सगळ्यात वरचा लेयर ब्रेड आणि अंड्याचा केला. छोटीला भाज्या लपवुन द्याव्या लागतात. Happy

veg_strata.jpg

स्वातीताई, ही रेसेपी करायला घेतलिये पण एक मायनर प्रॉब्लेम आलाय. माझ्याकडे ८*८ इंचाचं चौकोनी पॅन नसल्याने मी माझा ब्रेड लोफचा पॅन वापरतेय. पण आता पॅनची साइझ मोठी झाल्याने अंडं-दुधाचं मिश्रण सगळं तळाशी गेलंय आणि ब्रेडचा वरचा लेयर कोरडा दिसतोय. त्यावर फक्त भाज्या आणि चीझ दिसतंय. २५+ मिनीटं होवून गेलीयेत ओव्हनमध्ये.. तर वरचा ब्रेड जळणं -कोरडा पडून रेसेपी बिघडणं असं काही होवू शकेल का?

बिघडला नाही स्ट्रॅटा. सगळ्यात वरचा ब्रेडचा लेयर किंचीतसा कोरडा /कुरकुरीत झाला होता. मी हळद-तिखट न घालता मिक्स हर्ब्ज + मीरेपुड घातली फक्त. आणि व्हाइट ब्रेड ऐवजी ब्राउन ब्रेड (शिळाच) वापरला. ब्रोकली, मशरुम्स, सिमला मिरची आणि पालक या भाज्या आणि थोडे पनीरचे तुकडे घातले.

ही छान वाटतेय रेसिपी. शार्प (च) आणि चेडर (च) हवं का? आपलं नेहेमीचा मेक्सिकन ब्लेंड किंवा मोझारेला किंवा पार्म चालेल का?

स्वातीताई, आज हि रेसिपी ट्राय केली. मस्त झाली होती...... माझी मुलगी लवकरच युनी ला जाणार आहे. तिला पण खूप आवडली. तिच्याबरोबर एकत्र करताना अजुन मजा आली. धन्यवाद !

स्वातीताई, आज हि रेसिपी ट्राय केली. मस्त झाली होती...... माझी मुलगी लवकरच युनी ला जाणार आहे. तिला पण खूप आवडली. तिच्याबरोबर एकत्र करताना अजुन मजा आली. धन्यवाद !

Pages