वेजीटेबल स्ट्रॅटा

Submitted by स्वाती२ on 15 October, 2014 - 10:14
लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

दूध १ १/४ कप
अंडी ४
हळद १/२ टी स्पून
तिखट ३/४ टी स्पून
किसलेले शार्प चेडर चीज १/४ कप
मीठ चवी प्रमाणे

ढ्ब्बू मिरचीचे तुकडे १ कप
पालक चिरुन १ १/२ कप
बटन मश्रुम चिरुन १/२ कप
किंवा
साधारण ३ कप होईल इतक्या तुमच्या आवडीच्या भाज्या चिरुन- ब्रोकोली, अ‍ॅस्परॅगस, झुकिनी छान लागतात.
तेल १ टीस्पून
मीठ १/४ टी स्पून
मिरेपूड १/२ टी स्पून

शिळा पांढरा ब्रेड ८ स्लाईसेस
१/२ टी स्पून तेल किंवा ऑइल स्प्रे

क्रमवार पाककृती: 

ओवन ३२५ फॅ. ला तापत ठेवावा. ८ X ८ च्या काचेच्या पॅनला ऑइलस्प्रे मारुन घ्यावा किंवा आतून तेल लावून घ्यावे.
मध्यम आचेवर भांडे तापत ठेवावे. त्यात १ टीस्पून तेल घालावे. तेल तापले की चिरलेला पालक घालून परतावे. मश्रूम आणि ढ्ब्बू मिरचीचे तुकडे घालून परतावे. मीठ आणि मीरेपूड घालून नीट ढवळावे. १ टे. स्पून पाणी घालून, पाणी आटेल इतपत भाज्या शिजवून घ्याव्यात. भांडे आचेवरुन उतरवून बाजूला ठेवावे.
एका भांड्यात दूध घेऊन त्यात हळद, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालावे. वायर विस्कने ढवळून घ्यावे. यात चार अंडी फोडून टाकावीत. मिश्रण वायर विस्कने छान बिट करून घ्यावे.
आता तेल लावलेल्या पॅन मधे ब्रेडच्या चार स्लाईसेस पसराव्यात. त्यावर शिजवलेल्या भाजीच्या मिश्रणातले निम्मे मिश्रण पसरवावे. त्यावर चमच्याने निम्मे दूध-अंडे मिश्रण परवावे. त्यावर किसलेल्या चीजपैकी निम्मे चीज भुरभुरावे. यावर उरलेलेल्या चार ब्रेडच्या स्लाइसेस पसरवून पुन्हा भाज्या, अंडे-दूध, चीज क्रमवार पसरवावे. चमच्याने ब्रेडचे थर जरा दाबून घ्यावे. हे पॅन कमितकमी १५ मिनिटे बाजूला ठेवावे.
तापवलेल्या ओवनमधे ४५-५० मिनिटे बेक करावे. शिजला की छान फुगतो. बाहेर काढून ५ मिनीटे थांबाबे. आवडत असेल तर २-३ मिनिटे ब्रॉइल करावे. तुकडे कापून गरम वाढावे. मला रुम टेंपला आवडतो.

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांसाठी लंच किंवा इतर पदार्थांबरोबर ४ माणसासाठी ब्रंच
अधिक टिपा: 

इथली मंडळी या पाककृतीत मीरेपूड घालतात. पण मी हळद, तिखट घालते. एकदा लेयर लवून झाले की पॅन व्रॅप लावून रात्रभर फ्रीजमधे ठेवले तरी चालते. सकाळी रुम टेंपला आणून बेक करावे. यात भाज्याच्या जोडीला हॅम, सॉसेज वगैरे घालता येइल. तसे केल्यास भाज्यांचे प्रमाण कमी करावे. मी स्किम दूध वापरले. खास ब्रंच असेल तर आणि वाढीव कॅलरीज चालणार असतील तर हाफ अ‍ॅन्ड हाफ वापरावे.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण आणि युएसए विकेंडमधील पॅम अ‍ॅडरसनचा कॉलम
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी. इंग्रेडीयंट शोधायला सोपे. सोपं आणि पौष्टिक वाटतंय, फुल मील होईल याने. लगेच करून बघणार. फोटोपण टाका असेल तर, म्हणजे कसं दिसलं पाहिजे ते कळेल. Happy

पराग, अमितव, सुनिधी, धन्यवाद.
पुन्हा केला की फोटो काढेन. आज लंच साठी केले होते पण मी 'एकच तुकडा' असे म्हणत ब्रेकफस्टलाच खाऊन टाकले. Uhoh

शिळा ब्रेड जास्त क्रिस्पी व्हायला का? ताजा ब्रेड नाहीच का चालणार? Happy ब्रेड शिळा करायला ठेवणे आणि झाला की लक्षात ठेवून हे करणे ही थोडी मोठी स्टेप आहे. ब्रेड असाच उघडा टाकला तर (बायकोच्या बडबडीला दुर्लक्ष करून) पटकन शिळा होतो का? का तापल्या ओव्हन मध्ये २ मिनिटं टाकला तर शिळा क्रिस्पी इफेक्ट येईल?

ब्रेड शिळा करायला ठेवणे आणि झाला की लक्षात ठेवून हे करणे ही थोडी मोठी स्टेप आहे. >> Happy Happy हे म्हणजे नालेसाठी घोडा झाल की! ब्रेड शिळा झाल्यावर लक्षात ठेवून हा पदार्थ करावा. ताजे अन्न बनवण्यासाठी असलेल ताजे अन्न शिळे करून पुन्हा ताजे करायचा कशाला द्राविडी प्राणायाम! Happy

अमितव, शिळा ब्रेड म्हणजे व्रॅपर उघडून एक-दोन दिवस जुना झालेला ब्रेड. त्यासाठी मुद्दाम काही करायची गरज नाही. आमच्याकडे बरेचदा सुटीला लेक येतो तेव्हा १-२ ग्रील्ड चीज सॅडविचेस केली जातात. मग मी एक्सप्रायरी डेटच्या आत उरलेला ब्रेड संपवायला स्ट्रॅटा बनवते.

विकेंड इव्हनिंग्जसाठी चांगला पर्याय वाटतो.

ब्रेड घरी आणला की शिळा होतोच नं? रोज रोज आणायला कोण जातं आणि एका दमात अख्खा तरी कुठे संपतो? तसंही दुकानातही रोज आजचाच पाव (अमेरिकेततरी) विकला जातोच असं नाही. त्याच्या एक्सापयरी डेटपर्यंत असतो त्यामुळे शिळ्या ब्रेडची चिंता नको Happy

सही पाककृती आहे.

एक दोनदा वाचताना शीर्षक 'व्हेजिटेशन स्ट्रॅटा' वाचलं आणि मायबोलीवरल्या अनेक फोटोसेशन्सपैकी कुठल्यातरी व्हेजिटेशनच्या लेयर्स, पट्ट्या यांचे फोटो समजून सोडून दिलं. Proud

हो स्ट्रॅटा नाव बघून मलाही वाटलं की भाज्यांचे वेगवेगळे गट आणि आपल्याला कशा प्रकारचं पोषण हवं त्या दृष्टीने कुठल्या गटातल्या आणि किती भाज्या खाव्या असा काही लेख आहे .. Happy

छान आहे रेसिपी .. फ्रिटाटा सारखी फक्त ब्रेड च्या रूपाने अ‍ॅडेड् कार्ब्ज् आणि कम्प्लीट मील .. Happy एकदम सोपी ही वाटत आहे .. नक्कीच करून बघेन .. ह्यात कुठलेही अर्ब्ज् (herbs) नाहीत का?

भाज्यांचे वेगवेगळे गट आणि आपल्याला कशा प्रकारचं पोषण हवं त्या दृष्टीने कुठल्या गटातल्या आणि किती भाज्या खाव्या असा काही लेख आहे << असा लेख आहे का मायबोलीवर? वाचायला आवडेल Happy

मस्त झालेलं, पुढच्यावेळी आणखी भारतीय बनवणार. कांदा परतून / हिरवी मिरची थोडी असं काहीतरी ट्राय करीन.
बदल/ टीपा:
१. ब्रोकोली, asparagus, झुकीनी, ग्रीन पेपर आणि बीन्स घातलेल्या. पालकाने माझे दात आंबतात. भाज्या भरपूर झालेल्या. तयार फोटोत दिसतं नाहीयेत * टीप ३
२. शिळा ब्रेड न्हवता घरी (आता आहे Happy ) म्हणून ताजाच वापरला. १०-१५ मिनिट ब्रेडवर तूच्छ कटाक्ष टाकले झालं.
३. जेवण मी बनवणार होतो. बायको बाहेर टीव्ही बघत बसलेली. किचनमध्ये पाय ठेवायला नको, काय गोंधळ घालायचा तो घाल या अविर्भावात. श्रेडेड चीज घरातलं संपलय हे शेवटची स्टेप वाचल्यावर समजलं. जाऊन आणतेस का? म्हणण्याचं धैर्य एकवटू शकलो नाही. स्टोर मध्ये पळालो. येऊन बघतो तर भाज्या चांगल्याच आक्रसलेल्या. बायको म्हणाली, वास चांगला येत होता, तर काय करतोयस बघायला आले. भाज्यांची चव आवडली म्हणून वाटीभर परतलेल्या भाज्याच खाल्ल्या. तात्पर्य: सगळे जिन्नस आधी आणावे.
४. फोटोत वर अवकाडो दिसतंय, पण ते शिजवलेलं चांगलं नाही लागतं, किंचित कडवट चव येते.

IMG_20141017_193929.jpgIMG_20141017_210405.jpgIMG_20141017_211035.jpg

अमितवच्या फोटोने मी जाम इंस्पायर झालेय...एकदा पाहावं लागेल. मला मागच्या आठवड्यात ३ वर १ फ्री असं ४ ब्रेड घ्यायचं (का) सुचलं त्यामुळे एक मैत्रीणीला दिला, एक संपला, एक संपतोय तरी एक फ्रीजरमध्ये आहे...

Pages