नरेंद्र मोदी - धम्माल विनोदी हास्यस्फोटक वेबसिरीज

Submitted by म्याऊ on 1 August, 2019 - 13:34

हसवणं सर्वात अवघड असतं असं म्हणतात.

या कसोटीवर भारताचे अनिवासी प्रधानसेवक मा. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत काल्पनिक व वास्तवाचं मिश्रण असलेली वेबसिरीज कॉमन मॅन्स पीएम - नरेंद्र मोदी अगदी बावनकशी सोनं आहे. या मालिकेवर निवडणुकीच्या काळात बंदी घातली याबद्दल निवडणूक आयोगाचा करावा तेव्हढा निषेध थोडा आहे. असा निखळ बालीश विनोद अलिकडे कुठे पहायला मिळतो ?

मालिकेची सुरूवात आणिबाणी लागू करण्यावर होते. सर्वसामान्य लोक एकमेकांना विचारत असतात की आणिबाणी म्हणजे काय ?
एका गुजराती घरामधे जमिनीवर दोन माणसं जेवायला बसलेली असतात. त्यातला एक १५/२० वर्षांपूर्वी मिंग्लिश चॅनेल्स वर कोंबडीयन म्हणून येत असे. तो काहीतरी अतर्क्य बडबड करत असे.

यामधे तो वकीलसाहेब बनला आहे. हे आपल्याला जेवायला बसताना नाही समजत. वकीलसाहेब जेवायला बसणार इतक्यातच दोघे जण धापा टाकत येतात. त्या आधी वकीलसाहेबांच्या एका दाढीधारी तरूणासोबत गप्पा चालू असतात. या गप्पा साध्या सुध्या नसतात. त्या देशप्रेमी लोकांच्या गप्पा असतात. देशप्रेमी लोक जेवताना, झोपताना, दात घासताना, स्नान करताना देशप्रेमाच्याच गप्पा मारत असतात. इथे तर दोन दोन देशप्रेमी माणसे एकमेकांसमोर बसलेली.

तर जेवायला सुरूवात करणार तोच एक जण सांगतो की वकीलसाहेब आणिबाणी लागू झाली. आणिबाणी म्हणजे काय ?
वकील शांत होतात. घास ताटात पुन्हा ठेवतात. (वैफल्य , वैफल्य)
मग ते कोमान की मौनात जातात. तोपर्यंत आणिबाणी म्हणजे आपातकाल वगैरे गप्पा होतात.
वकीलसाहेब पाच मिनिटांनी उत्तर देतात. आणिबाणी म्हणजे आपातकाल. मघाशी ज्याने हा शब्द वापरला तो ही पहिल्यांदाच ऐकल्याप्रमाणे मान डोलावतो.

यानंतर मग नेहरू कसे चुकले, आणिबाणी मुळे देशातल्या नागरिकांच्या स्वातंत्र्यावर कशी गदा आली यासंबंधात प्रचारकी थाटात संवाद सुरू होतात. पडद्यावरचे श्रोते म्हणजेच देशातले मूढ नागरीक , ज्यांना संघ आणि संघोट्यांना शहाणे करून सोडायचे आहे, त्यांना काहीच समजत नसल्यामुळे यांच्या खांद्यावर मोठेच ओझे येऊन पडले असल्याने ते सनातन प्रभातच्या लेखात संपादकांच्या टिपा असाव्यात तसे बोलत राहतात. कंसातली टणाटणा प्रभात ची वाक्ये मग संपूर्ण मालिकाभर आपला पिच्छा सोडत नाहीत.

इथूनच भन्नाट मनोरंजनाला सुरूवात होते.
वकील साहेब संघाचे प्रचारक असतात हे आता आपल्याला समजते. तो मघाचा तरूण म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्याचे सवंगडी.
आता वकील साहेब म्हणतात दुसरे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले आहे असे समजा.
आपले काम आहे सरकारच्या हाती लागायचे नाही.

पुढच्या एका दृश्यात मग दहशतवादी संघटनेच्या मागे पोलीस लागतात. त्यातले काही दहशतवादी पोलिसांच्या हाती लागतात. पोलीस त्यांना स्लो मोशन मधे हळुवार डंडे मारत असतात. तरीही काही तुलट दशहतवादी एव्हढे नाजूक असतात की डंडे पडले की रक्त वाहू लागते. यातून आपल्याला या संघटनेने किती खस्ता खाल्ल्या याचा बोध होतो. स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला नाही म्हणून काय हिणवता ? स्वतंत्र भारतात स्वातंत्र्ययुद्ध लढलेच ना ?

मग नरेंद्र मोदी एका दृश्यात सहका-यांना सांगतात आपल्याला आंदोलन करायचे आहे. आणि पळून जाणे हा या आंदोलनाचा मुख्य भाग आहे. इथून मोदींची पळापळा सुरू होते. मोदी पुढे, पोलीस मागे.

मधेच त्यांचं लहानपण सुरू होतं.
एक मिसरूड फुटायच्या बेतात असलेला एक जडशीळ मुलगा बारा वर्षांचा नरेंद्र मोदी दाखवला आहे. या मुलाला पाहून अजिबात चुणचु़ईत हा शब्द उच्चारावासा वाटत नाही. इथल्याच एका वाहत्या पानाच्या भूतपूर्व मालकाच्या डोक्यावर जर केस असते तर कसा दिसला असता तसा हा मुलगा दिसतो आणि जाम बोअर करत राहतो.

त्याच्या लहानपणात त्याने केलेल्या प्रत्येक कृतीमधे कसे मोठे अर्थ लपलेले आहेत हे आजूबाजूची पात्रं सांगत राहतात.
स्काऊटच्या सरांची छडी खाण्यास नकार देणारा बालनरेंद्र हा बालपणाच्या कहाणीचा कळसोध्याय. मी चूक केली नाही, मी छडी खाणार नाही.

सरांची चूक पकडल्यावर सरांना हेडसरांकडे तक्रार करीन म्हणत ब्लॅकमेल करणारा नरेंद्र मांडवलीला तयार होतो.चर्चा समाधानकारक झाली नाही की रडायचं नाटक करतो, मनासारखी झाली की रडणे बंद. थोडक्यातच या गुणांचा विकास लहानपणीच कसा झाला होता हे मात्र बरोब्बर दाखवले आहे.

बाकी चहा विकण्याचे सर्वच काल्पनिक प्रसंग हसवणारे आहेत. ग्राहक ए चाय म्हणून हाक मारतो तेव्हां मी चाय नाही चायवाला आहे असे बाणेदारपणे उत्तर देणारा नरेंद्र असो किंवा साधूंना चहा नेऊन देऊन ज्ञान घेणारा नरेंद्र असो. प्रत्येक दृश्यात प्रेक्षक ज्ञानी होऊन उठतो. मात्र नाठाळ प्रेक्षक या दृश्यांना हसत असतो. त्यास त्यात मनोरंजन मूल्य दिसते.

यातले सर्व प्रसंग खरे आहेत असे समजणा-या देशभक्तांच्या दृष्टीने असा कुठेही कुणालाही हसणारा प्रेक्षक हा देशद्रोहीच आहे. अशाच लोकांना शासन करणे हे या सरकारचे काम आहे. त्या तीन साधूंनी सांगितल्याप्रमाणे देवाने अवतार घेतला आहे. संन्यास्त राजकारणी पैदा झाला आहे.

हास्यस्फोटक प्रसंगांची फोड इथे करून स्पॉयलर्स द्यायचे नाहीत. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीवर पहावी अशी ही दोन घटका मनोरंजन करणारी मालिका नक्कीच पहावी. मी तर आता विवेक ओबेरायचा सिनेमा सुद्धा आवर्जून पाहणार आहे.

सर्वांना शुभेच्छा !
https://www.youtube.com/watch?v=2VkTYeDEmEM
जिओसिनेमा किंवा युट्यूबर उपलब्ध आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राच्या दुसऱ्या क ने
विवेक ओबेरॉय च्या पिक्चर चे काय झाले? रिलीज झाल्यावर त्या बद्दल काहीच ऐकू आले नाही

आजवर भारतीय जनता पक्षात अनेक नेते झाले. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, कल्याण सिंग इ. पण कुणाच्याही जीवनावर सिनेमा, नाटक किंवा मालिका असं काही आलं नाही. इतर पक्षातही संघर्ष करून पुढे आलेले अनेक नेते आहेत. जयप्रकाश नारायण, लालूप्रसाद यादव, शरद यादव, जॉर्ज फर्नांडीस, विश्वनाथ प्रताप सिंह, चौधरी चरणसिंह, कांशीराम अशी मालिकाच आहे.

संन्यस्त वृत्तीच्या नेत्यावरच मालिका, सिनेमा यावं हा योगायोग आहे.

Ase mhanata?

आजवर भारतीय जनता पक्षात अनेक नेते झाले. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, कल्याण सिंग इ. पण कुणाच्याही जीवनावर सिनेमा, नाटक किंवा मालिका असं काही आलं नाही. इतर पक्षातही संघर्ष करून पुढे आलेले अनेक नेते आहेत. जयप्रकाश नारायण, लालूप्रसाद यादव, शरद यादव, जॉर्ज फर्नांडीस, विश्वनाथ प्रताप सिंह, चौधरी चरणसिंह, कांशीराम अशी मालिकाच आहे>>>>>

तेव्हा मीडिया मर्यादित होता, त्याची ताकद किती आहे त्याची कल्पना कोणाला आली नव्हती. आता मीडिया अमर्याद आहे, आधीसारखी लिखित व दृश्य मीडियावर सरकारी सेन्सॉरशिप राहिली नाही.

आता जमाना बदललाय. आता यापुढे गल्लीतल्या नेत्यावरही मालिका येतील. तुम्ही फक्त वेळ काढा पाहण्यासाठी.

ज्यांची नावे तुम्ही घेतलीत, त्यांना चाहतावर्ग आहे , त्यांच्यावरील मालिकांना प्रतिसाद जोरदार लाभून आपला फायदा होऊ शकतो असे मालिका बनवणारे, दाखवणारे व यासाठीचा पैसा गुंतवणारे या त्रयीला वाटले तर त्यांच्यावरही मालिका येतील.

प्रतिसाद जोरदार लाभून आपला फायदा होऊ शकतो असे मालिका बनवणारे, दाखवणारे व यासाठीचा पैसा गुंतवणारे या त्रयीला वाटले तर >>>>> नरेंद्र मोदी यांच्यावरील सिनेमाला मिळालेले यश (बॉक्स ऑफीसवरचा आजवरचा धंदा)

https://www.news18.com/news/movies/pm-narendra-modi-biopic-box-office-vi...

उपग्रहाचे हक्क, परदेशातील हक्क, इतर लाभ हे वगळले तर निव्वळ स्क्रीनिंगमधून भारतात या सिनेमाने १.३ कोटी रूपये कमावले आहेत.

वाजपेयींच्या काळात साधने मर्यादीत होती हे वाचून आश्चर्य वाटले. इंडीया शायनिंग च्या कँपेनची आठवण नाहीये का ?

कोण ह्या तंतूलीत तै?
इंदिरा गांधी यांच्या वर अलिकडे एक सिनेमा निघाला होता जणू.

लेख मस्त आहे. काही लोकाना ज्या गोष्टी गम्भिर वाटतात, त्या काही लोकाना हसण्यासरख्या तर काही लोकान्ना राजकीय फायदा उचलण्याच्या वाटतात. बाकी हसवण अजिबात अवघड नाही. आजपर्यन्त रा.गा. ने कुठलेही विशेष प्रयास न करता एकहाती सगळ्याना हसवलेय (कुणी कोन्गी समर्थक असहमत असेल तर क्रुपया तसे सान्गावे). अर्थात त्याच्यावरील चित्रपट वा वेब सिरिज ला मोदिन्च्या वेब सिरीज एव्हढा टी आर पी मिळणार नसल्याने त्याच्याकडे अजुन कुणाचे लक्ष गेले नसावे. पण काही दिवसान्नी रा गा, प्रियान्का, रोबर्ट वा तेही नाहीच तर महाराष्ट्रातील थोर नेते राज ठाकरे यान्च्यावर नक्कीच वेब सिरिज येतील असा माझा ठाम विश्वास आहे. त्यावेळीही असेच कसदार लिखाण म्याऊ ताईन्कडुन होईल ही अपेक्षा...

फर्रबच्या मेंदूत रागा जितका बसला आहे तेव्हढा मोदीच्या पण नसेल

नवीन Submitted by चिवट on 2 August, 2019 - 13:41 >>>

विठ्ठल अण्णा नाईकाच दैवत रागा भल्याभल्यान्च्या डोक्यात जातो.

गुजरातेत वडोदऱ्यात पुराच्या पाण्याबरोबर मगरी आल्यात आणि गरीब बिचाऱ्या श्वानांच्या जीवावर उठ्ल्यात
https://www.youtube.com/watch?v=IDkDIXn2XTc

आमचे साहेब नक्की दखल घेतील आणि श्वानांना वाचवतील

सर्वांचे आभार. काही काही प्रतिसाद वाचताना एकदम लोल
काहीतून करपलेला वास आला... पण नाईलाज आहे
मी थोडी ना बनवलीय ही मालिका !!
हलके घ्यायला काहींना जमत नाही यात माझा काय दोष !!
आणि काही अंधारात चाचपडणारे जीव पाहून करूणा दाटली.
Lol

Biggrin

जगी या खास वेड्यांचा पसारा माजला सारा ...
सत्ता जाऊन सहा वर्षे झाली आणि पुढील साठ वर्षे सत्ता येण्याची काडीमात्र शक्यता नसतांना ही खांग्रेसी धेंडं अजून जिवंत कशी असा यक्षप्रश्न पडतो कधीकधी...

निवडणुकीत पराभूत झालेल्यांना जिवंत राहायचा हक्क नाही, राहत असतील तर संपवा असा संदेश दिसतोय इथे.

भाजपच्या.राक्षसी सत्तालोलूपतेचं कारणही दिसतंय.

Pages