नरेंद्र मोदी - धम्माल विनोदी हास्यस्फोटक वेबसिरीज

Submitted by म्याऊ on 1 August, 2019 - 13:34

हसवणं सर्वात अवघड असतं असं म्हणतात.

या कसोटीवर भारताचे अनिवासी प्रधानसेवक मा. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत काल्पनिक व वास्तवाचं मिश्रण असलेली वेबसिरीज कॉमन मॅन्स पीएम - नरेंद्र मोदी अगदी बावनकशी सोनं आहे. या मालिकेवर निवडणुकीच्या काळात बंदी घातली याबद्दल निवडणूक आयोगाचा करावा तेव्हढा निषेध थोडा आहे. असा निखळ बालीश विनोद अलिकडे कुठे पहायला मिळतो ?

मालिकेची सुरूवात आणिबाणी लागू करण्यावर होते. सर्वसामान्य लोक एकमेकांना विचारत असतात की आणिबाणी म्हणजे काय ?
एका गुजराती घरामधे जमिनीवर दोन माणसं जेवायला बसलेली असतात. त्यातला एक १५/२० वर्षांपूर्वी मिंग्लिश चॅनेल्स वर कोंबडीयन म्हणून येत असे. तो काहीतरी अतर्क्य बडबड करत असे.

यामधे तो वकीलसाहेब बनला आहे. हे आपल्याला जेवायला बसताना नाही समजत. वकीलसाहेब जेवायला बसणार इतक्यातच दोघे जण धापा टाकत येतात. त्या आधी वकीलसाहेबांच्या एका दाढीधारी तरूणासोबत गप्पा चालू असतात. या गप्पा साध्या सुध्या नसतात. त्या देशप्रेमी लोकांच्या गप्पा असतात. देशप्रेमी लोक जेवताना, झोपताना, दात घासताना, स्नान करताना देशप्रेमाच्याच गप्पा मारत असतात. इथे तर दोन दोन देशप्रेमी माणसे एकमेकांसमोर बसलेली.

तर जेवायला सुरूवात करणार तोच एक जण सांगतो की वकीलसाहेब आणिबाणी लागू झाली. आणिबाणी म्हणजे काय ?
वकील शांत होतात. घास ताटात पुन्हा ठेवतात. (वैफल्य , वैफल्य)
मग ते कोमान की मौनात जातात. तोपर्यंत आणिबाणी म्हणजे आपातकाल वगैरे गप्पा होतात.
वकीलसाहेब पाच मिनिटांनी उत्तर देतात. आणिबाणी म्हणजे आपातकाल. मघाशी ज्याने हा शब्द वापरला तो ही पहिल्यांदाच ऐकल्याप्रमाणे मान डोलावतो.

यानंतर मग नेहरू कसे चुकले, आणिबाणी मुळे देशातल्या नागरिकांच्या स्वातंत्र्यावर कशी गदा आली यासंबंधात प्रचारकी थाटात संवाद सुरू होतात. पडद्यावरचे श्रोते म्हणजेच देशातले मूढ नागरीक , ज्यांना संघ आणि संघोट्यांना शहाणे करून सोडायचे आहे, त्यांना काहीच समजत नसल्यामुळे यांच्या खांद्यावर मोठेच ओझे येऊन पडले असल्याने ते सनातन प्रभातच्या लेखात संपादकांच्या टिपा असाव्यात तसे बोलत राहतात. कंसातली टणाटणा प्रभात ची वाक्ये मग संपूर्ण मालिकाभर आपला पिच्छा सोडत नाहीत.

इथूनच भन्नाट मनोरंजनाला सुरूवात होते.
वकील साहेब संघाचे प्रचारक असतात हे आता आपल्याला समजते. तो मघाचा तरूण म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्याचे सवंगडी.
आता वकील साहेब म्हणतात दुसरे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले आहे असे समजा.
आपले काम आहे सरकारच्या हाती लागायचे नाही.

पुढच्या एका दृश्यात मग दहशतवादी संघटनेच्या मागे पोलीस लागतात. त्यातले काही दहशतवादी पोलिसांच्या हाती लागतात. पोलीस त्यांना स्लो मोशन मधे हळुवार डंडे मारत असतात. तरीही काही तुलट दशहतवादी एव्हढे नाजूक असतात की डंडे पडले की रक्त वाहू लागते. यातून आपल्याला या संघटनेने किती खस्ता खाल्ल्या याचा बोध होतो. स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला नाही म्हणून काय हिणवता ? स्वतंत्र भारतात स्वातंत्र्ययुद्ध लढलेच ना ?

मग नरेंद्र मोदी एका दृश्यात सहका-यांना सांगतात आपल्याला आंदोलन करायचे आहे. आणि पळून जाणे हा या आंदोलनाचा मुख्य भाग आहे. इथून मोदींची पळापळा सुरू होते. मोदी पुढे, पोलीस मागे.

मधेच त्यांचं लहानपण सुरू होतं.
एक मिसरूड फुटायच्या बेतात असलेला एक जडशीळ मुलगा बारा वर्षांचा नरेंद्र मोदी दाखवला आहे. या मुलाला पाहून अजिबात चुणचु़ईत हा शब्द उच्चारावासा वाटत नाही. इथल्याच एका वाहत्या पानाच्या भूतपूर्व मालकाच्या डोक्यावर जर केस असते तर कसा दिसला असता तसा हा मुलगा दिसतो आणि जाम बोअर करत राहतो.

त्याच्या लहानपणात त्याने केलेल्या प्रत्येक कृतीमधे कसे मोठे अर्थ लपलेले आहेत हे आजूबाजूची पात्रं सांगत राहतात.
स्काऊटच्या सरांची छडी खाण्यास नकार देणारा बालनरेंद्र हा बालपणाच्या कहाणीचा कळसोध्याय. मी चूक केली नाही, मी छडी खाणार नाही.

सरांची चूक पकडल्यावर सरांना हेडसरांकडे तक्रार करीन म्हणत ब्लॅकमेल करणारा नरेंद्र मांडवलीला तयार होतो.चर्चा समाधानकारक झाली नाही की रडायचं नाटक करतो, मनासारखी झाली की रडणे बंद. थोडक्यातच या गुणांचा विकास लहानपणीच कसा झाला होता हे मात्र बरोब्बर दाखवले आहे.

बाकी चहा विकण्याचे सर्वच काल्पनिक प्रसंग हसवणारे आहेत. ग्राहक ए चाय म्हणून हाक मारतो तेव्हां मी चाय नाही चायवाला आहे असे बाणेदारपणे उत्तर देणारा नरेंद्र असो किंवा साधूंना चहा नेऊन देऊन ज्ञान घेणारा नरेंद्र असो. प्रत्येक दृश्यात प्रेक्षक ज्ञानी होऊन उठतो. मात्र नाठाळ प्रेक्षक या दृश्यांना हसत असतो. त्यास त्यात मनोरंजन मूल्य दिसते.

यातले सर्व प्रसंग खरे आहेत असे समजणा-या देशभक्तांच्या दृष्टीने असा कुठेही कुणालाही हसणारा प्रेक्षक हा देशद्रोहीच आहे. अशाच लोकांना शासन करणे हे या सरकारचे काम आहे. त्या तीन साधूंनी सांगितल्याप्रमाणे देवाने अवतार घेतला आहे. संन्यास्त राजकारणी पैदा झाला आहे.

हास्यस्फोटक प्रसंगांची फोड इथे करून स्पॉयलर्स द्यायचे नाहीत. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीवर पहावी अशी ही दोन घटका मनोरंजन करणारी मालिका नक्कीच पहावी. मी तर आता विवेक ओबेरायचा सिनेमा सुद्धा आवर्जून पाहणार आहे.

सर्वांना शुभेच्छा !
https://www.youtube.com/watch?v=2VkTYeDEmEM
जिओसिनेमा किंवा युट्यूबर उपलब्ध आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय जनता पक्ष आणि खिलाडूपणा यात ३६ चा आकडा आहे.
मोदींवर वेबसीरीज बनवली, सिनेमा बनवला, आता अमित शाह यांच्यावर बनवत आहेत. त्याच वेळी दिवंगत इंदिरा गांधी यांच्यावर इंदू सरकार आणि मनमोहनसिंग यांच्यावर अ‍ॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर यासारखे वैयक्तिक हल्ले करणारे सिनेमे बनवले. पण हे सर्वच सिनेमे आपटले. तर मग यांना मत कोण देतं हा प्रश्नच आहे.

धाग्यापेक्षा मोठी करमणुक तर प्रतिसादान्मध्ये होतेय !

@सन्जय पगारे भाउ, चित्रपटावरुन मतदानाचा कल काय असेल याचा अन्दाज बान्धल्याबद्धल तुम्हाला इथुनच साष्टान्ग नमस्कार.

मोदींना हसल्यावर राहुल गांधींपासून सर्वांची नावे लिहून मी-माझा यांची झालेली तडफड थोडासा कच्चा खिलाडी सापडताच थोडीशी कमी झाली.
मी-माझा यांच्याशी वादविवाद करायचा म्हणजे आपणही मूर्ख असायला हवे.
बुटक्यांच्या देशात उंच असणे हा गुन्हा असतो. Lol

मोदींना हसल्यावर राहुल गांधींपासून सर्वांची नावे लिहून मी-माझा यांची झालेली तडफड थोडासा कच्चा खिलाडी सापडताच थोडीशी कमी झाली.
मी-माझा यांच्याशी वादविवाद करायचा म्हणजे आपणही मूर्ख असायला हवे.
बुटक्यांच्या देशात उंच असणे हा गुन्हा असतो. Lol

नवीन Submitted by म्याऊ on 2 August, 2019 - 23:56>>>

ढण्यवाद म्याऊ ताई, तुझ्यासारख्या विदुषी इथे आहेत हे आमचे केवढे मोठे अहोभाग्य ! असेच ज्ञानकण उधळत रहा. कच्चे खिलाडीही मग हुषार होतील.

तुम्हाला वाईट वाटले का मी-माझा ?
वाईट वाटण्यासारखे काहीच नाही त्यात. हो ना ? Lol

नवीन Submitted by म्याऊ on 3 August, 2019 - 00:16 >>

नाही म्याऊ ताई, तुझ्या बोलण्याला कोण बरे मनाला लावुन घेईल? नुकत्याच चालायला शिकलेल्या लहान मुलान्नी काही खोड्या केल्या तर आपल्याला वाइट वाटत का? उलट "अल्ले अल्ले मस्त" करुन ते मुलच कसे श्रेष्ठ हे दाखवण्याचा आपण प्रयत्न कौतुकाने करतो ना? तसच माझ बोलण आहे अस समज... Lol

अल्ले बबडू.. मोदीबाबांना बोललेलं आवडलं नाही का गुलामाला.. ललु नको, आपण सेनगर काकांना सुपारी देऊ हा.. त्यांना नाही जमलं तर आलेसेसला सांगू.. मग ते मोदींविरोधात लिहिणारे मॉर्निंग वॉकला गेल्यावर धिशक्यांव!

अल्ले बबडू.. मोदीबाबांना बोललेलं आवडलं नाही का गुलामाला.. ललु नको, आपण सेनगर काकांना सुपारी देऊ हा.. त्यांना नाही जमलं तर आलेसेसला सांगू.. मग ते मोदींविरोधात लिहिणारे मॉर्निंग वॉकला गेल्यावर धिशक्यांव!

नवीन Submitted by अजिंक्यराव पाटील on 3 August, 2019 - 00:53>>>

मी तर लहान मुलांशी कसे बोलतात ते सांगत होतो, पण तुमची बोबडी का वळली अजिंक्यराव? समदं ठीक हाय नव्ह? औषध वेळेवर घेत जावा..

किती हा संभ्रमित लोकांचा संभ्रम. जळी स्थळी काष्ठी पाषाणी मोदी दिसतात यांना. स्वप्नात मोदी दिसले तर दचकून उठत असतील संभ्रमु.

मायबोलीच्या केशव उपाध्येंचे सूडभावनेने केलेले चिडखोर विनोद किती केविलवाणे वाटतात..
कसं काय हसायला येतं कुणास ठाऊक. संभ्रमावस्था अन काय काय.
हल्ली गझला फ्लॉप, कथा फ्लॉप... हे राम !
ते हे पण आले बरं का परत.. तेच ते लाज काढून घेऊन गेलेले

मज्जा आली सातपुत्याचा दी एण्ड बघताना. एव्हढी भयंकर मौत, ते ही थोबाड फोडून आणि सगळी हिरोगिरी डिलीट करून
काय लाथा घातल्या अ‍ॅडमिननी... हमे तो मजा आया ! आता पुन्हा तीच एण्टरटेणमेण्ट, तेच थुत्तरफोड मनोरंजन
सातपुत्याचं थोबाड पुन्हा एकदा पुटणार ! Rofl

सिझन २ येणार आहे आता...
"सन्यास लेने आये थे ना ? संसार याद आया ?"
"नही, समाज याद आया"

एकदम क्रीन्जफेस्ट ट्रेलर असतात या सगळ्या मोदी चित्रपट/मालिकांची.
ट्रेलरच्या पुढे काय जात नाही ब्वा आम्ही.

तिथे जाऊन
"मैं बचपन से ही पोप बनना चाहता था"
वगैरे काही बोलले का?

Pages