Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 26 July, 2019 - 13:27
तुला पाहिले
आणि कळले
प्रेम इतुके
सुंदर असते
ओठांना या
अन् उमजले
स्पर्श कोंवळे
मधूर कसे ते
चांदण्यातले
स्पर्श रेशमी
डोळ्यांमधले
रंग उसळते
तुला पाहता
ह्रदय थबकते
पाऊल अडते
खरे हे असते
आपण व्हावे
कधी कुणाचे
याहून मधुर
काहीच नसते
या क्षणावर
जीवन सारे
ओवाळावे
असेच वाटते
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
येथे मार्च ०७, २०१९ कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुं द र...
सुं द र...
आपण व्हावे
आपण व्हावे
कधी कुणाचे
याहून मधुर
काहीच नसते
>> खूप सुंदर.
आवडली!
आवडली!
तो इतुके शब्द बदलुन इतके कराल
तो इतुके शब्द बदलुन इतके कराल का.
अक्की कवितेत इतुके हा शब्द
अक्की कवितेत इतुके हा शब्द योग्यच आहे.
अनेक धन्यवाद ,अक्की, व भल्या
अनेक धन्यवाद ,अक्की, व भल्या मित्रा
इतुके हा शब्द योग्यच आहे ..मला ही असेच वाटते
भला मित्र संबोधल्या बद्दल
भला मित्र संबोधल्या बद्दल अनेक धन्यवाद!
तेच योग्य आहे .नाही का?
तेच योग्य आहे .नाही का?