पुरुषांचे नाचाचे वर्ग (क्लास) असतात काय?

Submitted by परत चक्रम माणूस on 24 July, 2019 - 10:45

बऱ्याच दिवसांपासून मला नाच शिकायची इच्छा आहे. पुरुषांसाठी नाचाचे कोणते प्रकार आहेत. भरतनाट्यम सारखे प्रकार सोडून, बाल्या डान्स सोडून. आणि असे क्लास अस्तित्वात आहेत का, कुणी अशा ठिकाणी शिकलं आहे का. सालसा वगैरे प्रकार काय आहे.
छान छान प्रतिसाद लिहा व आपण छान प्रतिसाद लिहालच ही अपेक्षा.
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमचं शहर पहाण्यासाठी प्रोफाईल पाहिलं. नाशिक मध्ये मला काहीच माहीत नाही. पण पुण्यात कमीत कमी अर्धा डझन क्लासेस तरी माहीत आहेत.

मी बॉलिवूड आणि सालसा शिकते, तिथे पुरूष पण शिकतात. कथक क्लासमध्ये पण सगळ्या मुलीबायकांमध्ये एकुलता एक मुलगा आहे. Happy तुम्हाला यापैकी काही नाशिकमध्ये शिक्षण शक्य आहे का पहा. काहीच नसेल तर झुंबा क्लासेस तर सगळीकडे असतात. झुंबाने डान्स आणि फिटनेस दोन्हीचं समाधान मिळेल

मीरा जी धन्यवाद पहिल्या प्रतिसादाबद्दल. सालसा, झुंबा दमवणारे असतात का? तूनळीवर शिकण्यासारखे प्रकार आहेत काय.

हो सगळेच नृत्य प्रकार दमवणारे असतात. आता ऑगस्टपासून सगळीकडे गरबा वर्कशॉप्स चालू होतील, त्यावर पण लक्ष ठेवा. पुरूषसुद्धा गरबा करतात आणि खूप मस्त डान्स फॉर्म आहे.

सालसा, झुंबा चे बिगीनर्ससाठीचे युट्यूब ट्युटोरिअल्स आहेत.

Atul Narang's Dance Institute
Ved Vidya, Ashoka Marg,, Kalpataru Nagar B/H Hotel Siddharth Kamats, Kalpataru Nagar, Nashik, Maharashtra 422011
080 4803 5000
https://maps.app.goo.gl/evcQW7A7XP85jooL6

Mohit Jain's Dance Institute
Vise Mala, College Road, Basement, Patil Plaza, Canada Corner, Vese Mala, Canada Corner, Nashik, Maharashtra 422005
090963 65678
https://maps.google.com/?cid=9219178137600603991

झुम्बा मस्त असतो. स्ट्रॉन्ग झुम्बा तर फारच दमवणारा असतो. पण मजा येते करायला. सुरुवात असेल तर स्ट्राँग करु नका.

च्रप्स हरामखोरा दारू प्यायला सांगतोस, काय वळण लावलं का नाय तुज्या बापानं? नालायक तू मायबोलीवरची मोठी घाण आहेस.

आमच्या इथे बांद्रा साइडला लिंडि हॉप वर्क शॉप असतंय काही काही संध्याकाळी. एक दीड तास वर्क शॉप असते मग फ्लोअर नाचायला ओपन करतात. मजा येत असणार. माझा गुडघा दुखतो सध्या म्हणून नाहीतर मला नक्की जायचंय. ह्याला पार्टनर लागतो हा कुटुन आणायचा हा प्रश्न एक आहे. पण तू मैत्रिणी बरोबर जा मजा करा. फार फास्त डाण्स असतंय ते.

बेस्ट डान्स उत्स्फूर्त भांगडा बेसमेंट मध्ये केलेला. कामाचा सर्व शीण निघून जातो.

धन्यवाद अमा.
घरात लावणी पासून ते दलेर मेहंदी च्या तुनूक तुनूक तारारा अशा गाण्यांवर भरपूर धुडगूस घालतो. पण वराती मध्ये, इतर ठिकाणी मला छाप पाडायची आहे. म्हणून नवे काही तरी शिकायचं आहे.

जर बेसिक डान्स येत असेल किंवा तुमच्यात उपजत ताल लय आणि ग्रेस असेल तर डायरेक्ट शामक दावरची वर्कशॉप्स पण अटेंड करू शकता. नाशिकमध्ये असतात का शोधून बघा. पुण्यात बऱ्याच वेळेस असतात. पण अगदी बिगीनर्सने जाऊ नये, थोडं ऍडव्हान्सड ट्रेनिंग असतं.

नाही मीरा जी बेसिक नाही येत. पण नाचाने डोपामाइन स्रवत असावं असं वाटतं. वेडावाकडा डान्स केला तरी खूप फ्रेश वाटतो. होस्टेलवर एकेकाळी मराठी गाण्यांवर रात्र रात्र गॅंग नाचत असे. धन्यवाद.

काही खास कार्यक्रमात छाप पाडा यची असेल तर प्रायवेट कोरीओग्राफर हायर करा. संगीत मेंदी फंक्षन असेल तर चांगला गृप डाण्स करा. चांगला व्हिडीओग्राफर, ड्रेस डिझायनर पण लागेल.

घूमर गाणे असा सर्च केला तर शेजा री सात आठ विडीओ च्या खाली घूमर व्हिडीओ ट्युटोरिअल येतील. त्यात एक काळा कुडता घातलेला मुलगा नाचतो तो फार एलिगं ट नाचतो. त्याला काँटॅक्ट करा. अगदी स्टेप बाय स्टेप घूमर ( पद्मावत वाले) शिकवतो तो. इतरही करतच असेल.

नाशकात हिले डुले कानावर फुले मंडळी म्हणून नाचाचे वर्ग आहेत, एकत्र असलेल्या लोकांना शिकवतात तिकडे. तिथून शिर्डीला पण जा एकतीस डिसेंबरला. जत्राच असते तेव्हा!

कुणी माझ्या वर जळालं, कुणाच्या बुडाला माझ्या मुळं आग लागली तर नाचून जाम सिलेब्रेट करतो मी. अर्थात कुणी माझ्यावर जळावं असे मी वागत नाही, पण काही लोकांना कारणं लागतच नाहीत जळणेकू.