चिरतरुण
तो येतो दारावर परिचित दस्तक देत
मी दार उघडतो
बघतो तर हा चिरतरुण, नखशिखांत
ओलाचिंब
कानात अत्तराचा फाया, नजरेत नशीला सुरमा , पायात मस्तवाल मोराची चाल, ओठावर थेंबांची सरगम
मला म्हणतो चल
मी म्हणतो वय झाले सर्दी होईल
तो खट्याळ पोरासारख्या उड्या मारतो
छपरांवर , पागोळ्यांवर, रस्त्यावर
बघता बघता वयात येतो
छत्रीतून जमेल तशी अंगचट करतो
कधी व्रात्यपणाने छत्री उडवतो
बागेतला ओलेता प्रणय पाहतो
थेंबात प्राण ओतून तिला चुंबतो
नशेत भेलकांडत केसातून
पाठीवर रोमांच रेखतो
ती सुस्नात, सल्लज्ज ,शरणागत
तो धुंदितच तिच्यासाठी प्राजक्ताच्या
पायघड्या घालतो
भेगाळल्या भूईचं
हिरवं हिरवं गाणं होतो
मी ही पावसाचा थेंब होऊन
गातो गर्द हिरव्या पानांतून
वाहतो मृदगंधातून
खळखळा हसतो झ-यांतून
होतो चिंब भिजलेला पाऊस
चिरतरुण
© दत्तात्रय साळुंके
५-७-२०१९
वाह! अगदी सुरेख!
वाह!
अगदी सुरेख!
क्या बात है.... मस्तच...
क्या बात है....
मस्तच...
मस्तच
मस्तच
व्वा! मस्तच लिहिलीये..
व्वा! मस्तच लिहिलीये..
सुंदर
सुंदर
सर्वांचे प्रतिसादाबद्दल अनेक
सर्वांचे प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद....
सुंदर! आवडली !!
सुंदर! आवडली !!
अहाहा.... क्या बात क्या बात !
अहाहा.... क्या बात क्या बात !!!
मस्तच.. आवडली !!
मस्तच.. आवडली !!
सुरेख...
सुरेख...
सर्वांचे आभार...
सर्वांचे आभार...
अगदी सुरेख! उशीरा वाचली .
अगदी सुरेख!
उशीरा वाचली .
अप्रतिम!!
अप्रतिम!!