कबीर सिंग- चित्रपट चर्चा

Submitted by सूर्यगंगा on 18 July, 2019 - 11:32

कबीर सिंग चित्रपटावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते 'शाहीद' आणि 'शाहिद' मधे काय फरक आहे ,अर्थाचा अनर्थ झाला की काय माझ्याकडून ::( चूकीबद्दल क्षमा असावी मायबोलीकरानों...

तद्दन भंगार, अर्थहीन, प्रेमाचे (??????) उदात्तीकरण (प्रेम करणे हि खूप चांगली बाब आहे पण यात नेमके "आखिर केहना क्या चाहते हो भाई?" असे वाटते), कियाराची चेहऱ्यावरची माशी न हलणे यामुळे ती रोगिष्ट आहे का असे मनात वाटते. त्या शाहिदचे दारू पिणे, ड्रग्स घेणे, कियाराबरोबर त्याला वाटेल तसे वागणे, सेक्स करणे आणि व्यसनाचे जे नानाविधी प्रकार असतील ते करणे म्हणजे "कबीर सिंग' मुवि. चार आण्याची मुर्गी आणि बारा आण्याचा मसाला स्टोरी. मुवि बघून विसरलात तरी काही फरक पडणार नाही. (हे माझे मुवि बघून झालेले पर्सनल विचार कुणाला नाही पटले तरी ते बदलणार नाहीत.)

अजनबी दमला असाल तर श्वास घ्य बरे.
आणि तुम्ही जर हा चितरपट चितरपटगुरुहात बघुन आला असाल तर आपको 210 तोफोकी सलामी.

कबीर सिंग पाहिला. अगदी आतापर्यंतच्या चित्रपटात जे
आचरण खलनायकाचे लक्षण समजले जायचे त्यालाच
यामध्ये हीरो केलेले आहे. नायिकेचा थंडपणा पाहून ती
आंधळी मूकी बहीरी असावी अशी शंका येत राहते. तिला
वस्तू समजून कबीर क्लास समोर जे मनोगत व्यक्त करतो
तेव्हासुध्दा तीच्या चेहऱ्यावरची रेषपण हलत नाही, धन्य आहे
प्रीतीची भूमिका ( नायिकेचे नाव ).

मी दोन वेळा पहिला थेटरात .
मला खूप आवडला. आणि खरंच मस्त चित्रपट आहे.
ज्यांना नाही आवडला त्यांच्याबद्ध आदर आहेच.

2019 चा haighest ग्रॉसर मोवी झाला आहे कबीर सिंग . उरी आणि भारत ला मागे टाकले आहे.

काहीही आहे सिनेमा. नाही आवडला.
फक्त सिनेमाच आहे असं असलं तरी कोणता सर्जन डॉ असं वागेल?
कोण डॉ मुलगी एवढी मंद असेल?
तिला स्वतः ची काहीच मतं नाहीत?
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी, काही तासांतच एखादा सिनीयर किस करतोय आणि ही बया ढिम्म एकदम!! काही च बोलत नाही त्याला!!!
मला नीट मांडता येत नाही कदाचित पण अजिबात नाही आवडला..

हा चित्रपट दिवास्वप्न रंगवतो, ते दिवास्वप्न बघून पब्लिक आकर्षित होतं.

हे दिवास्वप्न असं आहे की, मी पाहिजे त्या पोरीला कॉलेज मध्ये पटवेल, सगळ्यांसमोर तिची पप्पी घेईल, मी म्हणेल मग ती माझी गर्लफ्रेंड होईल, मी म्हणेल तसं माझी गर्लफ्रेंड करेल, मग आम्ही दोघे एकत्र राहू, सेक्स करत अभ्यास करत सेक्स करू, तरीही कॉलेज मध्ये गोल्ड मेडल मिळवू, मी पाहिजे त्याला मारेल, कारण मला राग वगैरे खूप येतो, मला कोणी परत मारणार नाही, कारण ते शक्यच नाही, कारण मी भारी, मग गर्लफ्रेंड सोडून गेल्यावर पाहिजे तेवढी दारू घेईल, त्यात मी श्रीमंत आहे, कधीच व्यायाम न करता, पण माझे ऍब्ज असतील, मी किती ही आरडा ओरडा केला तरी चित्रपटाची यशस्वी हेरॉईन माझ्या प्रेमात पडेल, ती स्वतःहून म्हणेल चल...गाडीत एकमेकांना घेऊ, हे लिहिताना पण हसायला येत आहे. शेवटी माझी गर्लफ्रेंड, माझं मुलं घेऊन माझ्यासाठी शेवट पर्यंत थांबेल, आई ग.. असं सुपरमॅनच्या कथेत पण होतं नाही, कबीर सिंग सुपरमॅनच्याही वर आहे.

हा फार जुना लेखनाचा प्रकार आहे, ज्यात लेखक वास्तववादी मांडणीत दिवास्वप्न रंगवतो, अशा स्वप्नात तरुण बुडून जातो, असं लेखन, ये जवानी है दिवानी या चित्रपटात पण झालं होतं, तिथे आपला भाऊ, पाहिजे तिथे फिरतोय, पाहिजे त्या पोरीवर लाईन मारतोय, पटवतोय, सगळ्यांना नाचवतोय, बाप रे.. त्यात हेरॉईन हिरोसाठी सात वर्ष का काय थांबते.. कारण? ऑफकोर्स पहिलं प्रेम. ते कसं विसरणार? इथे नेट बँकिंग चा पासवर्ड दहा वेळा लिहून ठेवल्यावर लक्षात राहतो.

असं माझ्या बाबतीत पण होईल, माझी लोव्हस्टोरी सुद्धा अशीच एपिक असेल, असं ते दिवास्वप्न आपण रंगवत बसवतो, त्यात अडकतो

@सुर्यगंगा, आवडण्या मागचे कारण एकच. चित्रपट कसा असू नये याचे उत्तम उदाहरण. सहजासहजी बहकवतो. आपण काहिही करू शकतो तरीही लोक आपल्याला परत स्विकारतील. अशी भ्रामक कल्पना.
आपलं बारकं पक्षी हिरो कायमच कॅडबरी चाॅकलेट हिरो. उगाचच मोठ्ठ वाढून दिसायला चेहराभर केस वाढवून फिरतय चित्रपटात . "हैदर" बघून वाटले होते पोरगं सुधारतय पण पहिले त्या उडणार्या पंजाब ने निराशा केली अन आता कबीर ने.

अजुन नाही बघितला.. आणि बघायची इच्छा पण नाहीये.
Trailer च नाही आवडला.गाणी मात्र सगळी छान आहेत.
अर्थातच हे माझे वैयक्तिक मत आहे.

Pages