टाय टाय ईंग्लिश ! विश्वचषक २०१९

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 July, 2019 - 16:56

टाय टाय ईंग्लिश ! विश्वचषक २०१९

सर्वप्रथम ईंग्रजांचे अभिनंदन !

पटो न पटो, विजेत्यांचे अभिनंदन करावे. शास्त्र असते ते.

माझ्या वैयक्तिक सर्वेक्षणानुसार आज सामना सुरु होण्याआधी किमान ८० टक्के भारतीय क्रिकेटप्रेमींना किवीज जिंकावे आणि ब्रिटीश हरावे असे वाटत होते.

सामना संपेसंपेपर्यंत नव्याण्णव पुर्णांक नव्याण्णव टक्के लोकांना न्यूझीलंडबद्दल हळहळ वाटली असावी.

पहिले जिथे स्टोक्सची कॅच व्हायला पाहिजे तिथे सिक्स गेला.
दुसरे स्टोक्सच्याच अंगाला चेंडू लागून ओवरथ्रोचा चौकार मिळाला.
नावच स्टोक्स असेल तर असे स्ट्रोक्स न खेळताही रन्स मिळतात.
किवीजच्या नशीबाची खरेच किव वाटली.

बरं हे दान पदरात पडूनही ईंग्लंडने लक्ष्य पार केले नाही. तर बरोबरी केली.
आधी पन्नास-पन्नासमध्ये बरोबरी केली.
मग सुपर ओवरमध्येही कोणी उपर जाऊ शकले नाही.

अखेर १०२ ओवरच्या खेळानंतर भारतात रात्रीचे बारा वाजता न्यूझीलंडचेही बारा वाजले...

खरे तर वाजवले गेले..
कारण नियम असा होता की दोन्ही संघाच्या धावा समसमान झाल्यास जो जास्त बाऊंडरीज मारणार तो विजेता ठरणार.
आणि हाच नियम गंडलेला वाटतो. आक्षेप ईथेच आहे.

धावा सिंगल डबल घेत केल्या काय किंवा चौकार षटकार मारत केल्या काय, त्यांची किंमत समानच नाही का !

किंबहुना जास्त चौकार षटकार म्हणजेच जास्त रिस्क घेत केल्या गेलेल्या धावा. जर कोणी तितक्याच धावा तितक्याच षटकात कमी रिस्क घेत करत असेल तर माझ्यामते तोच सरस झाला.

जर काही निकष लावायचाच असेल तर कोणी त्या धावा कमीत कमी रिसोर्सेस वापरून म्हणजे कमीत कमी विकेट टाकत केल्या हे बघायला हवे.
डकवर्थ लुईस कॅलक्युलेशन मेथड मध्येही हेच विचारात घेतले जाते.

आणि तसं असते तर आज ईंग्लंडला ऑल आऊट करणारे न्यूझीलंड वर्ल्डचॅम्पियन असते.
हार्डलक न्यूझीलंड Sad
बेटर लक नेक्स्ट टाईम काने मामा ..

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नैतर काय.
-----
पण एकूण खेळांचे शेवटचे सामने गचाळ होतात.

खरं आहे. आणि शेवटी 'क्रिकेट विन्स' वगैरे पटण्यासारखं नाही वाटलं काल. न्यूझीलंडचं वाईट वाटलं.
हेच फेडरर-जोकोविच सामन्यात मात्र टेनिस विन्स Happy फेडरर जास्त आवडत असूनही जोकोविच जिंकला याचं वाईट नाही वाटलं.

नैतर काय.
हार्डलक न्यूझीलंड >>+१
पटो न पटो, विजेत्यांचे अभिनंदन करावे. शास्त्र असते ते.>>> + १
मैने आधीच बोला था इंग्लंड जितेगा.

इंग्लंडचे अभिनंदन
हार्ड लक न्यूझीलंड ..
राहता राहिले त्या चौकारच्या नियमांबद्दल .. हा नियम टूर्नामेंट च्या आधीच डिक्लेर केला होता व सर्व संघानी मान्य केला होता ... विषय संपला

क्रिकेट या खेळात बहुतांश नियम फलंदाजांच्या बाजूने आहेत.
Overthrow मध्ये कोणाचीच चूक नव्हती पण फायदा मात्र एकाच टीमला का?
विजेता चौकार षटकारांवरच का ठरवला जातो डॉट बॉल्सवर का नाही?

. हा नियम टूर्नामेंट च्या आधीच डिक्लेर केला होता व सर्व संघानी मान्य केला होता .

>>>>

जर दहा पैकी एका संघाने मान्य केला नसता तर काय झाले असते त्या स्थितीत?

जर दहा पैकी एका संघाने मान्य केला नसता तर काय झाले असते त्या स्थितीत? >>>>>>
>>>>
हे विषय ICC च्या टेक्निकल कमिटीत चर्चेला येतात व सर्व साधारण सभेत बहुमताने मान्य होतात ... त्यानंतर कोणालाच आक्षेप घेता येत नाही

अर्थात सामन्याचा निकाल हा मैदानातच ठरवला जावा असेच माझे मत आहे ...

याच वेळी दुसरी कडे विम्बल्डन फायनल चालू होती ,, पाचव्या सेट मध्ये टायब्रेक नसतो ... त्यामुळे कितीही गेम्स झाल्या तरी चालतील पण डिफरन्स ऑफ टु पर्यंत मॅच चालू राहते

क्रिकेट मध्येही तसेच हवे... एका सुपर ओव्हर मध्ये निकाल नाही लागला तर दुसरी सुपर ओव्हर खेळावी ...

आता विम्बल्डन चा नियम बदलला आहे.
शेवटच्या सेटमध्ये १२-१२ झाले की टायब्रेकर असतो ज्यात काल Djokovic जिंकला.

क्रिकेट मध्येही तसेच हवे... एका सुपर ओव्हर मध्ये निकाल नाही लागला तर दुसरी सुपर ओव्हर खेळावी ...>>>

सुपर ओव्हरचेही लिमिट हवे, जर ठराविक सुपर ओव्हर पर्यंत निर्णय होऊ शकला नाही तर टेनिसमधील टायब्रेकर प्रमाणे एका बॉलला एका टीमला फलंदाजी, मग दुसर्‍या बॉलला दुसरी टीम, दुसर्‍या टीमने पहिल्या टीमपेक्षा जास्त धावा केल्या तर ती जिंकली नाहीतर मग पहिली टीम विजेती. टाय झाला तर मग पुन्हा पहिल्या टीमला फलंदाजी. थोडं सुपर ओव्हर सारखंच पण निकाल लवकर लागेल Happy

लेटेस्ट खबर ऐकली का?
ओवरथ्रोचे सहा नाही तर पाच रन्स दिले पाहिजे होते. कारण थ्रो फेकला गेला तेव्हा नियमानुसार दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना क्रॉस केले नव्हते.
ईतकेच नाही, तर स्ट्राईकला सुद्धा स्टोक्स नाही तर आदिल रशीद हवा होता.

चीकू
एवढे एकेक बॉल करायची गरज नाही.
अजून एखादी सुपर ओवर आणि निकाल लागला असता.
क्रिकेटचा सामना टाय मग सुपर ओवर टाय आणि पुन्हा पुन्हा टाय याची शक्यता ती किती..