एक रात्र मंतरलेली भाग 2

Submitted by छोटी on 12 July, 2019 - 22:16

#कथा

#एकरात्रमंतरलेली
©अर्चना चौधरी

एक रात्र मंतरलेली भाग 1
https://www.maayboli.com/node/70614

एक रात्र मंतरलेली भाग 2

पावसाचा जोर खूपच वाढला होता... बस डेपोला फोन लागला आणि तिकडून कोणीतरी फोन उचलला पण... मी राघवला गाडी side ला घ्यायला सांगितली...
" hello"
"सर, गाडी नंबर **** बदल विचारायचं होत... late झाली आहे का गाडी?"
"हो, 3 तास late निघाली आहे... तरीही एव्हाना पोहचायला पाहिजे होती पण अजूनही आम्हाला पण काहीच खबर नाही... बस ड्राइवरला कॉन्टॅक्ट होत नाही आहे"
"अरे, अरे..." राघव इतक्या जोरात बाहेर बघून किंचाळला ... इकडे बस डेपोवाल्यानी पण तेवढ्यातच फोन कट केला ... राघव ने parking light on करून पटकन रेनकोट चढवला... आणि तो खाली उतरला... मला काही कळतंच नव्हतं काय चाललंय...मी खाली उतरणार तेवढ्यात अर्ध्या रस्त्यातून राघव धावत परत आला.. कोणाला तरी फोन करून
" hello, emergency... मी राघव बोलतो आहे, highway वरून, राजाजी bridge पाण्यामध्ये वाहून गेला आहे...माझ्या समोर एक कार त्या पाण्यात वाहून गेली... please लवकर इथे मदत पाठवा..."
तो मध्ये येऊन बसला... थरथरत होता... " जानू , वाहून गेली ती कार... माझ्या समोरून.... मी काहीच करू शकलो नाही... काहीच नाही...आपल्याला काही तरी करता यायला पाहिजे ना...काहीतरी करायला पाहिजे... सांग ना जानू सांग ना... काय करूया सांग" ते विस्फारलेले डोळे... तो guilt ... त्याच्या डोळ्यात उतरला होता... कधीही हार ना मानणारा माझा नवरा हतबल दिसत होता... आता वेळ माझी होती खंबीर होण्याची...
" राघव, असं हात पाय गाळून चालणार नाही..."
"मग काय करूया... आपण काय करू शकतो.." आपल्या हातात काहीच राहील नाही... संपलं सगळं संपलं
" अरे काय संपलं ... काय करू शकतो म्हणजे... आपण करायला सुरुवात केली सुद्धा फोन तर केलाच आहे.. त्यांची मदत येईपर्यंत आपल्याला इथून पुढे कोणी जाणार नाही ह्याची तर काळजी घेऊया... मी एक टॉर्च आणला होता... तू पार्किंग light अशीच on ठेव, मोबाईलची पण flashlight आहेत... आपण radium चे स्टिकर घेतले होते... ते कुठे आहेत?"
राघव सुद्धा परत भानात आला...म्हणतात ना मनुष्यप्राणी जास्त वेळ दुःखात राहूच शकत नाही... इथे तर दुःख करायला वेळच नव्हता...आम्ही स्टिकर लावले.. आणि गाडीतून उतरणार तेवढ्यात गाडीच्या काचेवर टकटक झाली.. आम्ही दोघेही दचकलो... कोणीतरी अनोळखी माणूस गाडी वर knock करत होता... आम्ही काच खाली केली
" तुम्हाला काही मदतीची गरज आहे का? एवढ्या मुसळधार पावसाच्या रात्री पार्किंग light on ठेऊन सुमसान जागी उभे आहात म्हणून विचारलं" त्या इसमाने आम्हाला विचारलं..
"सर, समोरचा bridge वाहून गेला आहे.. आताच एक कार पाण्यात पडुन वाहून गेली... "
"काय?" त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता...आम्ही दोघांनीही खाली उतरुन त्या माणसाला सांगितलं..." सर आपल्याला बोलायला वेळ नाही... आम्ही emergency ला फोन लावलाच आहे... तुम्ही परत जाऊन अजूनही काही मदत मिळते का बघाल का? तो पर्यंत मी आणि माझी wife इथे अजून गाड्या पुढे जाणार नाही ह्याची काळजी घेतो.. "
तेवढ्यात माझाही फोन वाजला, केशवच्या आईचा कॉल होता...
" बाळा, अरे केशव तिथून निघालाच late आहे... पावणे बोलले की काहीतरी 6 630 ला निघाला तिथून... पावसाळ्यामुळे अजून उशीर होत आहे... तू काळजी करशील म्हणून फोन केला... अग,खरं सांगू का तुला फोन करेपर्यंत मला ना खूप भीती हुरहूर वाटत होती... तुला फोन केला तू पाहुण्यांना फोन करायची आयडिया सांगितली... मग त्यांच्याशी बोलली...माहिती मिळाली बरं वाटलं... आणि आता पण तुझ्याशी बोलते आहे तर बरं वाटत आहे"
"काकू, नका काळजी करू.. येईल केशव घरी सुखरूप..." आलेला आवंढा गिळत जानूने काकूंना उत्तर दिलं
" तू बोलली ना .... येईल येईल... नक्की येईल... मग ना आपण दगडूशेठ गणपतीला जाऊया..."
"हो काकू, सांगा तुम्ही बाप्पा ला ...आपण नक्की जाऊया..."
विज्ञानवादी म्हणवनऱ्या जान्हवीने बाप्पाला मनात साकडं पण घातलं... बाप्पा काय चुकलं असेल ते माफ कर आमचा केशव सुखरूप असू दे.... काकूंची काळजी ती समजू शकत होती... कारण ती हुरहूर तिलाही लागली होती.... फोन कट झाला...
इकडे राघव ने अजून एक गाडी थांबवली होती... आणि तीही परतवली होती...
" राघव, केशवच काय रे?"
"नाही ग सोन्या..माझ्या ही लक्षात काहीच येईना...सध्यातरी डोक्यात पुलावरून अजून कुठलेलीही गाडी पाण्यात जाऊ नये एवढंच आहे...
... बाकी काहीच कळत नाही... आपण फक्त हेच स्वतःला समजावू शकतो की केशव नदीच्या पलीकडे सुखरूप असेल... आणि लवकरच आपण त्याला भेटू" त्याने त्याच मत माझ्या समोर मांडलं...
"राघव, पूल कधी वाहून गेला हेही आपल्याला माहिती नाही...आणि माहिती काढण्याचा काही रस्ता नाही केशव तिकडून निघालाच उशिरा...इथे पोहचला तेव्हा bridge होता नव्हता काय माहिती... केशवच्या आईचा फोन होता... त्यापण आहेत काळजीत.. त्यांना हे कळलं तर..."
"तु बोलली तर नाही ना?"
"अरे, मी काय बोलू, मलाच काही माहिती नाही... बस डेपो वाले म्हणता आहेत त्यांचाही काही contact होत नाही बस driver बरोबर... तिकडे त्याच्या आईला हाच दिलासा की उशिरा येणार पण येणार.. इथे मला सतत हा भास होत आहे की केशव खूप मोठया problem मध्ये आहे आणि आपल्याला बोलवतो... bridge ची ही हालत..सगळीकडून वाट बंद झाली "
"तूच मला समजावलं आणि तूच हात पाय गाळते आहे... अग देव तारी त्याला कोण मारी... त्याने इथपर्यंत आणलं ना... पुढचा रस्ता पण तोच दाखवणार... "
"बरोबर म्हणतो आहेस राघव...एक काम करूया अजून गूगल मॅप वर update टाकूया ब्रिज बद्दल म्हणजे लोकांना कळेल तरी... देवा आमच्या केशवला सुखरूप ठेव...आम्हाला त्याच्यापर्यंत पोहचायला मदत कर"
दोघेही जण जवळ जवळ 1 तास येणाऱ्या लोकांच्या शिव्या खात त्यांना थांबवत होते... तेच लोक गाडी reverse करताना आशीर्वाद देत होते... त्यानंतर कुठे जाऊन ambulance, fire ब्रिगेड, पोलीस सगळ्यांचा जथा आला.. त्यांच्या बरोबर काही सूर मारणारे., Doctor's ..अशी भली मोठी टीम आली....
"कोणी फोन केला होता? " पोलिसी आवाजात इन्स्पेक्टर साहेबांनी राघवकडे बघून विचारलं..
"सर, मीच केला होता फोन...माझ्यासमोर एक गाडी पाण्यात वाहून गेली..."
"अच्छा अच्छा" करत साहेबांनी कामाला सुरुवात केली... पाऊस बराच कमी झाला होता.. पण नदीच रौद्ररूप काही कमी होईना....सूर मारणाऱ्या लोकांना पण भीती वाटत होती... with all safety majors त्यातल्या दोघांनी उडी मारली...

---–--------–-------–---------------------------–--------–-------–-----------------------------------–-------–-------------
4 तास आधी पुलाच्या पलीकडे

" जीजू, आज तर फुल्ल on वाट लागली ना हो... मोबाईल पाण्यात पडून बंद झाला..तूमच्या मोबाइलमध्ये बॅटरी नाही.. आणि पॉवर बँक आणायला आपण विसरलो...तिकडे माँ साहेब आणि सगळेच tension मध्ये असतील"
"केशव, एवढं नको टेन्शन घेऊस... अजुन 2 तासात आपण घरी असु... एवढं काय त्यात आधीच्या काळात मोबाईल नव्हते तरी पण त्यांचं चालायचं... आपणच electronics वस्तूवर खूप जास्त अवलंबून आहोत..."
"जीजू, तुमचं हे म्हणणं एकदमच पटलं... राहूया एक दिवस मोबाईल शिवाय..." तेवढ्यात पावसाचं पाणी त्याच्या shirt वर पडलं
"कुठली झक मारली आणि बसने आलो असं झालं आहे मला..."
"परत तुझ तेच... एकतर मी कॅब करत होतो... तू नाही बोलला... काय तर म्हणे बस ने जायची मज्जाच काही और... घे आता मज्जा"
"अहो जीजू, खरच छान वाटत मला बस ने येणं पण बघा ना ह्या खिडकीला काही बार नाही नीट ... काच पण कधी फुटेल माहिती नाही....म्हणून हो बाकी काही नाही...."
"बरं तुला मुलगी आवडली का?"
"आवडली तर आहे..एकदा मम्मी-पप्पांशी बोलतो.. राघव आणि जान्हवी ला दाखवतो आणि फिक्स"
"बाप रे, या, ह्या दोघांचं नाव ऐकून ऐकून माझंच....
जिजूंच वाक्य पूर्ण झालंच नाही... आणि

क्रमशः
बऱ्याच गोष्टी होणार आहेत.... stay tuned for next पार्ट....

भाग 3
Coming sooon.....

Group content visibility: 
Use group defaults

एवढा पाऊस पडत असताना, पूल वगैरे वाहून गेला पण मोबाईल, इंटरनेट व्यवस्थित चालतंय हे थोडं पटलं नाही.
पु भा प्र.

Ok