तीन पोलीस, एक गुन्हेगार आणि मी

Submitted by नितीनचंद्र on 12 July, 2019 - 01:59

व्यवसाया निमीत्ताने पुणे ते बेळगाव महिन्यातून एकदा प्रवास बरेचदा मी करतो. ११ जुलैला ( ट्रेनचे नाव , कपार्टमेंट आणि माझा सीट नंबर मुद्दमच लिहलेला नाही ) __नंबरची सीट शोधून बसताना " तुमचा नंबर __ का " अशी विचारणा झाली. छाप पडेल असा तांबुस वर्णाच्या धडधाकट माणसाने विचारताना मी त्याच्या कडे पाहीले. त्याची नजर बहूदा माझा व्यवसाय, व्यक्तिमत्व न्याहाळतना दिसली. ८ माणसे झोपतील अश्या कंपार्टमेंट मधे एकच माणूस डोक्यावर पांघरुण घेऊन संध्याकाळी सात वाजता झोपलेला आणि या तरतरीत माणसाच्या सोबत अजून दोन माणसे.

मी प्रश्नार्थक चेहेरा करुन पुण्याचा नसलो तरी पुण्याला जन्माला आलो याची जाण ठेवत " काय ये SSS " असा स्वर काढणार होतो. जागा होती, माझ्या सीटवर कुणीही बसलेले नव्हते अश्यावेळी या माणसाला काय अडचण आहे असा भाव माझ्या चेहेर्यावर होता. तो माणूस लगेचच म्हणाला " आम्ही पोलीस आहोत आणि आमच्या सोबत गुन्हेगार आहे" . मी म्हणालो " ठिक आहे. मला काही अडचण नाही."

असे म्हणलो खरे पण गुन्हेगाराला आत्ताच अटक केली आहे असे दिसत नव्हते. शिवाय ज्या जिल्ह्यात अटक करतात त्या जिल्ह्यात कोर्टात हजर करुन पोलीस कस्टडी मागून ट्रान्सीट रिमांड इत्यादी सोपस्कार होईस्तोवर बराच काळ गेलेला असतो. तो पर्यंत गुन्हेगाराला पळून जाणे हा विचार सहसा सोडून द्यावा लागत असेल. नुकत्याच अटक केलेल्या गुन्हेगाराला कोर्टासमोर हजर न करता पोलीस कस्टडी शिवाय राज्य पार करुन रेल्वेने महाराष्ट्रात आणण्याच्या भानगडीत सहसा कोणी पडत नाही.

इतका विचार करुन मला दिलासा मिळाला की हा गुन्हेगार काही पळून जाणार नाही, म्हणजे इथे झटापट होणार नाही. आपल्याला धोका नाही . असे म्हणून मी बसलो आणि दिर्घ श्वास घेतला. मग जाणवले की आम्ही पोलीस आहोत सांगणारे सिव्हील ड्रेस मधे आहेत. आपली अक्कल पाजळत मी विचारले पुणे पोलीस ?

त्यावर तरतरीत इसम म्हणाला नाही मुंबई पोलीस, क्राईम ब्रँच. यावर मी म्हणालो "

हो हो. मला माहित आहे तुमची क्राईम, गुप्त वार्ता आणि स्टेशन ड्युटीवरील अशी खाती असतात."

बोलताना तरतरीत पोलीसाला बोलण्यासाठी उत्सुकता आहे असे जाणवत होते. पण आपल्याशी हा संवाद का चालू आहे याचे कारण कळत नव्हते. माझ्या मनात फक्त एकच शंका होती की त्या गुन्हेगाराला हातकडी घालून दुसरे टोक कुठे अडकवले आहे किंवा नाही ? कारण मधेच तो ब्लॅकेट खालून डोळे उघडून पहात होता.

खडा खडी झाली तरी मी माझा व्यवसाय सांगत नव्हतो पण तरतरीत पोलीसाची मात्र उत्कंठा वाढत असावी की हा पांढरपेशा समाजाचा दिसणारा माणूस पोलीस किंवा गुन्हेगार सोबत आहे म्हणून घाबरत नाही उलट आपलीच चवकशी कसा करतो आहे ?

पोलीसांचे जवळचे नातेवाईक म्हणजे वकील मंडळी हे जाणून "तुम्ही वकीली करता करता का" असा प्रश्न मला केला.

तेव्हड्यात माझा फोन वाजला. पलीकडे दिल्लीत स्थाईक असलेली एक स्त्री मुलाची जन्मकुंडली पाहिली का असे विचारत होती.
मी " हो पाहीली."

त्यांच्या बारावी झालेल्या मुलाला दिल्लीत कॉप्युटर सायन्स ला प्रवेश मिळेल पण तुमच्या अपेक्षेनुसार दिल्ली मधे न मिळता अन्य शहरात मिळेल असे मी सांगीतले. त्यावर मुलाला सध्या पहिल्या राउंडला इलेट्रीनिक्स आणि टेलीकम्युनीकेशन मिळालेले आहे पण मग कॉप्युटर करावे की इलेट्रीनिक्स आणि टेलीकम्युनीकेशन असा प्रश्न त्यांनी विचारला. मी आता ज्योतिष व्यवसाय सोडून करीयर गायडन्स या माझ्या दुसर्या व्यवसायात आलो आणि पुणेरी अधिकार वाणीने विचारले की मुलाला काय हवे आहे?

यावर ती स्त्री म्हणाली " त्याचे तसे काहीच म्हणणे नाही " यावर मी काहिही केले तरी तो उत्तम मार्कांनी इंजिनीयरीग पास होईल. त्याचे चांगले करीयर होईल " असे सांगीतले आणि विषय संपला.

तर तुम्ही करीयर कन्सलटंट आहात असा प्रश्न तरतरीत पोलीसांकडून आला. वास्तवीक हात पुढे करत मी आपले नाव , व्यवसाय सांगायला हवे होते पण बधेल तो पुणेकर कसला.

" मी आज बेळगावला बिझनेस कन्सलटन्सी च्या कामाला गेलो होतो. जेंव्हा हे काम नसते तेंव्हा मी ज्योतिष पहातो आणि करीयर कन्सलटन्सी सुध्दा करतो सांगून आपले नाव सांगायचे टाळले. उद्देश एकच काही लफडे झाले तर साक्षी साठी मला जायला लागू नये.

मधेच दुसरा पोलीस उठला. त्याने गुन्हेगाराला वरच्या बर्थवर जायला सांगीतले. तो वर जाताना त्याच्या कपाळाला आणि गळ्याला हात लाऊन ताप आहे का ते पाहीले. तरतरीत पोलीस म्हणाला "आहे का ताप ?" त्यावर नंबर दोन म्हणाला फारसा नाही. मग गुन्हेगाराला टॉयलेट मधे जायचे का विचारत त्यांनी त्याला वर उशी, चादर , ब्लॅकेट वर दिले. हे करताना त्याची बेडी माझ्या नजरेतून सुटली नाही. तो जेंव्हा खाली झोपला होता तेंव्हा बेडीचे टोक दुसरी कडे अडकवले नव्हते पण वर गेल्यावर मात्र नंबर दोन ने बेडी ची किल्ली काढून, दुसरे टोक रेल्वेच्या वर्थ मधील एका जागी अडकवून ते ठीक अडकले आहे याची खात्री केली.

गुन्हेगाराच्या चेहेर्यावरचे भाव पहात मी सगळे स्थिर स्थावर झाल्यावर प्रश्न केला सराईत दिसतोय. यावर तरतरीत इसमाने हात पुढे करत " ते राहू द्या माझा हात पाहून सांगा प्रमोशन कधी होईल ?" असा हंड्रेड डॉल्रर प्रश्न केला.

यावर मी मला कुंडलीवर आधारीत भविष्य येते, हात फारसा समजत नाही असे म्हणत हाताचा स्पर्श पाहीला. हात चांगलाच उबदार होता. मंगळ प्रभावी आहे हे त्याचे टक्कल पाहून मी जाणले होते. हातावरचे मंगळ उंचवटे पाहून खात्री झाली हा खरा पोलीस आहे. बुधाच्या उंचवट्यावर दोन रेषा पहात मी म्हणालो इथे दोन रेषा आहेत. यावर बाजूचे दोन पोलीस गालातल्या गालात हसू लागले. या दोन रेषा म्हणजे आयुष्यात दोन स्त्रीयां आयुष्यात येतात हे या दोघांनाही माहीत असावे

" मेजर, तुमचा हात यांनी बरोबर पाहीला" असे नंबर तीन म्हणाला. सिनीयर पोलीसाला मेजर म्हणण्याची प्रथा आहे. यावरुन तरतरीत हेड कॉन्स्टेबल असावा असे मी ताडले.

तीन नंबरचा पोलीस मगाच पासून व्हाटस अप पहात होता, मधेच ऑस्ट्रेलीया - इंग्लंडचे अपडेट देत होता. मधेच कुणाची बदली कुठे झाली याचे ही अपडेट देत होता. नंबर तीन च्या कमेंटवर तरतरीत पोलीसाने

" हे बरोबर सांगीतले " असे सांगत मी ज्योतिषीच असल्याची खात्री केली आणि जाहीर पणे बायको शिवाय त्याच्या आयुष्यात अजून कोणी आहे हे मात्र सांगायचे टाळले. कारण तसेच असेल. एकतर सरकारी नोकरी आणि उरलेल्या दोघांना मेजरच्या आयुष्याची चांगलीच माहिती असावी.

पण प्रमोशनचे काय ? असे त्याने पुन्हा विचारले. यावर मी म्हणालो तुमची जन्मतारीख सांगा, जन्मवेळ सांगा त्यावरुन सांगतो असा पवित्रा घेतला. कन्सलटंन्सी मधे आल्यापासून आपले काय झाकायचे आणि काय पाजळायचे याचे गणीत जमले होते. मला हस्तरेषा फारश्या समजत नाहीत हे म्हणण्या पेक्षा जन्मकुंडली वरुन पहातो असे म्हणणे चांगले.

आमची काय हो जन्मतारीख १ - ६ आहे असे म्हणत गावातल्या शाळेत डावा हात डोक्यावरुन उजव्या कानाला लागला म्हणजे वय सहा आहे, याला पहिली यत्तेत प्रवेश द्यायचा हा सरकारी खाक्या तरतरीत पोलीसाने कृतीने दर्शविला.

अनेकांच्या जन्मतारखा नीट नोंदवलेल्या नसतात ही भारतात असलेल्या अशिक्षीतांच्या व्यथेत तो ही सामील होता. मग चर्चा ज्योतिष, राजकारण, समाजकारण अश्या विषयाला स्पर्श करत माझ्या आवडीच्या पोलीस चातूर्य कथा, दक्षता, क्राईम रिपोर्ट आणि एक शुन्य शुन्य वर आल्यावर त्यांना उलगडा झाला असावा की पोलीस हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या चर्चेत त्यांनी मी चिंचवडला चाफेकर पुतळ्या जवळ रहातो हे जाणुन घेतले. पत्ता विचारल्यावर त्यांची आपापसात नेत्र पल्लवी झाली. मग त्यांनी नंबर तीन ने या अंगाने अजून दोन तीन प्रश्न विचारले.

आपापसात बोलताना नंबर एक , तीन नंबरला अप्पा म्हणत होता. हा अप्पा रायटर असावा हे त्याच्या वर्णावरुन, तब्येतीवरुन लक्षात येत होते. नंबर दोन फारसा चर्चेत भाग घेत नव्हता. तेव्हड्यात एक जेवणाची ऑर्डर घ्यायला आला. मी नेहमीच्या सवयी प्रमाणे सीट नंबर सांगीतला आणि त्याला मेन्यु विचारला. मग पोलीसांनी पण त्याच्या कडे ऑर्डर दिल्यावर पुन्हा गप्पा सुरु झाल्या.

मी सराईतपणे १२० ब, ४१९ / ४२० आय पी एल ची कलमे पेरत त्यांची गंमत पहात होतो. ४१९ म्हणजे भासवणे आणि ४२० म्हणजे फसवणे हा फरक एका केस मधे मी सांगीतल्यावर त्यांनी माझ्या पुर्वायुष्याची बरीच चौकशी केली एच आर आणि अ‍ॅडमीन मधे काम करताना कंपनीतल्या चोर्या, मारामार्या हे गुन्हे नोंदवताना मी अशी कागदपत्रे तपासण्यात समजाऊन घेण्यात वाकगबार झालो होते. हे सांगीतल्यावर मग त्यांनी या विषयी पुढे प्रश्न विचारणे बंद केले.

जेवण आल्यावर आम्ही सर्वांनी अंगत पंगत मांडली. गुन्हेगारासाठी सुध्दा जेवण मागवले होते. गुन्हेगार जेवला नाही. मग आम्ही बेड तयार करुन झोपायच्या तयारीत लागलो. मी जागा आहे तुम्ही झोपा हे तरतरीत पोलीसाने दोघांना सांगीतले. मी झोपेतून दोन वाजता जागा झालो आणि मोबाईलवर लावलेला अडीचचा गजर बंद करत तरतरीत पोलीस जागा आहे हे पाहीले.

दोन वाजून पन्नास मिनीटांनी रेल्वे पुण्याला पोहोचणार होती. मला अपचन झाले होते. पण उलटी होत नव्हती. कसातरी वेळ काढत मी त्याला म्हणालो निघतो साहेब. त्याने ही हस्तांदोलन उठून बसून केले. बाकीचे तिघे आणि इतर प्रवासी गाढ झोपेत होते.

पुणे स्टेशन ते चिंचवडला येई पर्यंत मी हाच विचार करत होतो की हे लोक माझा काय म्हणून विचार करत होते. कदाचीत तो गुन्हेगार आजारी असावा, जर प्रवासात त्याला कमी जास्त झाले तर पोलीसांचा काही दोष नाही हे सांगणारा माणूस ते तयार करत होते ही माझी शंका. कदाचीत तो तरतरीत पोलीस माझ्या प्रमाणे बडबड्या असावा. अश्या माणसांना गप्प बसता येत नाही हेच खरे असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळा अनुभव. पोलीस व गुन्हेगार यांच्याबरोबर प्रवास केलात. धाडसच आहे.

पोलीस जेवढा संशय बायकोवरदेखील घेतील त्या पेक्षा जास्त संशय तुम्ही पोलीसांवर घेत आहात. गुन्हेगाराला काही झालेच तर सरळ तुमचे डिटेल त्यांनी घेतले असते. अन मग रेल्वे कडचा आरक्षण तक्ता काय कामाचा?

अन कंपार्टमेंटमध्ये तुम्ही चारच लोकं थोडीच होते?

व्यर्थ शंका.

पाषाणभेद,
मला स्वतःअर्थ बोध झाला नाही.

मी तुमच्या जागी असतो तर पोलिसांना टाळून दुसरीकडे बसलो असतो,भले खाली बसावं लागलं असतं तरीही. पोलिस फक्त वरिष्ठ, वकील व पत्रकार लोकांना बरी वागणूक देतात. सामान्य लोकांना फारच तुच्छ वागणूक देत असतात. तुमच्यासारखा टशन देणारा माणूस त्यांना सहन होत नाही. तुम्हाला भविष्य कळतं ही उपयुक्तता समजून तुम्हाला सहन केले. नाहीतर शिविगाळ चालू करून तुम्हाला उबग आणला असता व तुम्ही आपोआप दुसरीकडे गेला असता.

असे, तू कोण, कुठला, काय करतोस, इथे कुठे आणि का आला होतास, आता कुठे चालला आहेस अशी चौकशी करणारे खूप भेटले हो प्रवासात.
जास्त विचार करू नका. असतात असे लोक. ते पोलीस आहेत की वारकरी याने काही फरक पडत नाही.

पोलीस लोकं कुणाचीही अशीच चौकशी करतात. विनाकारण.
थोडक्यात त्यांचा व्यवसाय त्यांच्या अंगात मुरलेला असतो. जास्त नोकरी झालेली असेल तर हे जास्तच जाणवते.
असो. टेन्शन घेवू नका. त्या गुन्हेगाराला काही झालेच असते तर तुम्हालाच काय पण साक्षीदार म्हणून त्यांनी इतरांनाही जमेस धरले असते.
त्यांची पद्धतीच तशी आहे.