एक रात्र मंतरलेली - भाग 1

Submitted by छोटी on 11 July, 2019 - 23:56

#कथा

#एकरात्रमंतरलेली
©अर्चना चौधरी

एक रात्र मंतरलेली भाग 1

"हे बघ , तू फोन ठेव... मला बोलायचं नाही तुझ्याबरोबर... परत परत तेच बोलून कंटाळा आला आता...तुला काय करायचं ते कर...किती वाजता जाणार आहेस? मी काय विचारते आहे कळलं का?"
मी फोन कट केला...राघव शांतपणे पलंगावर माझ्या शेजारी बसून game खेळत होता...त्याला आता अश्या माझ्या भांडणाची सवय झाली होती..तरी पण आज खूप दिवसांनी मोबाइलला मधून डोकं बाहेर काढून
" अग त्याचा प्रश्न आहे...त्याने कोणाशी लग्न करायचं की नाही...तू कोण त्याला हो की नाही म्हणणारी???"
"राघव, मी जर कोणीच नाही मग मला कशाला फोन करतो केशव...मला सांगितलंच नाही तर मी माझं मत देणार नाही आणि आमचे मतभेद होणार नाही"
"जानू, तू जे करते त्याला भांडण म्हणतात...मतभेद नाही...good night" असं म्हणून चक्क शेजारी झोपून घोरायला लागला... आमचं लग्न होऊन 2 वर्ष झाली... आमचा मित्र केशव onsite ला असतो... लग्नासाठी मुलगी शोधतो आहे...उद्यासुद्धा एक मुलगी बघायला चालला आहे... मुलगी म्हणे सावळी आहे...मी फोटो बघितला सुंदर आहे...त्याला आणि घराला शोभेल अशी...माझं म्हणणं एवढंच आहे की उगाच नकारघंटा वाजवत का जायच??...आणि सावळी आहे हा मुद्दा असेल तर बघायला जायचं कशाला ...स्वतः चा आणि समोरच्याचा वेळ वाया घालवयचा...नको जाउ...ह्यावरून आता आमचे मतभेद झाले किंवा भांडण झालं...
आमची भांडणं कॉलेजमध्ये असल्यापासून सुरू आहेत आणि बहुदा ह्या जन्मात तरी काही होणं अशक्य आहे...
सकाळच्या आवरावरीत फोन वाजला मी बघितलाही नाही..राघव ने उचलला फोन... "हो हो आगीचा बंब रात्री पासून धगधगतो आहे...अजूनही शांत नाही झाला...बर बरं सांगतो तिला...आरामात जा..कळव काय झालं ते" फोन कट केला आणि अंघोळीला गेला
.. काही सांगितलं पण नाही, मी आपली अस्वस्थ... स्नान झाल्यावर बाहेर पडताच मी विचारलं...
"काय बोलला केशव?"
"एवढीच माहीत हवी होती तर तू उचलायचा होता फोन आता कशाला कळवळते"
"मी काही कळवळत नाही आहे फक्त विचारते आहे"
"तू आणि तुझा विचार...तो आणि त्याचे जीजू निघाले.. 1 पर्यंत पोहचतील... तिथून परतीला लागला की करेल फोन...तोपर्यंत आहे वेळ शांत व्हायला"
"तू म्हणतो तेच बरोबर मला काय घेणं देणं करो नाहीतर नको करू दे मलाच उगाचच्या पंचायती"
"Oye पश्चाताप, 6 वर्षांपासून बरोबर आहोत आपण ...तुझ्या आणि केशवंच 'मला काय करायचं' इतक्या वेळा ऐकलं आहे की ह्या वाक्याना काही अर्थ आहे की नाही माहीत नाही... निघतांना फोन केला की परत टमाटमा चालू होईल...आवर ...9 30 ला client meeting असते मॅडम विसरलात का?"
"आई शप्पथ,केशवच्या नादात वाट लागायची" मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं होत... कळत नव्हतं अस का आहे म्हणून...
फटाफट आवरून आम्ही निघणार मी राघवला म्हटलं
"कसंतरी होतंय मला।..."
"म्हणजे नेमकं काय होत आहे कळेल का?Already late झालो आहोत... bp check करूया का "
"नाही, तस काही नाही निघुया आपण"वाटेत राघवने मला ऑफिसला सोडलं आणि तो पुढे त्याच्या ऑफिसला गेला... मीटिंग आटोपली आणि मीही कामाला लागली..पण अस्वस्थ वाटतच होत... काहीतरी चुकत काहीतरी चुकत अशी जाणीव होत होती...पण काय होत आहे ते कळत नव्हतं...काम आवरता आवरता काही चुकलंय का ह्याचाच विचार करत होती...केशवला तर मी कधीही काहीही बोलु शकते... मग आज चुकीचं काय वाटत आहे... अस्वस्थपणा काही काम करू देईना...पण deadline खूप जवळ आली होती...काम करणं महत्वाचं होत... त्यामुळे आलेल्या review request मी clear out करत होती...4 वाजत आले होते पण अजूनही फोन नाही आला केशवचा म्हणून वेगळीच हुरहूर... न राहून तिने फोन केला... "अभि संपर्क हो नही सकता" कदाचित range मध्ये नसेल...5 ला फोन लावला तरी तेच...6 ला लावला तेच... 6:30... 7:00.. 8:00.. 8:05..काम पण आटपल होत राघवला फोन केला.
"निघाला का?"
"अजून नाही...वेळ होईल मला तू निघ पुढे"
"ऐक ना सकाळपासून खूप अस्वस्थ वाटत आहे... आणि केशवचा फोन सुद्धा लागत नाही"
"अग range नसेल..."
"4 वाजेपासून प्रयत्न करते आहे..."
"Battry संपली असेल"
"मला खूप अस्वस्थ वाटत आहे...आपण निघुया का plz"
"अग खूप काम आहे ...wrap up करणं अवगड आहे"
"वर्क फ्रॉम होम घे ना..."
"Ok... work from home घेतो निघुया आपण.."
राघव येईपर्यंत 9 वाजले...त्यातपण मी 10 फोन लावले होते...राघव आला तेव्हा फोन वाजला...
"Hello जानू,केशवची मम्मी बोलते आहे"
"हा काकू बोला ना..." मी साधारण अंदाज घ्यायचा प्रयत्न केला...
"अग केशव आला आहे का तिथे?"
"नाही काकू, नाही आला अजून...तिथून निघाला का तो काही idea आहे का?"
"हो निघाला तेव्हा केला होता फोन जवळ जवळ 3 ला आला होता फोन"
आता घडळ्यात 9 वाजत आले होते एव्हाना तो पोहचायला पाहिजे होता...
"काकू, कुठल्या बस ने निघाला माहिती आहे का?त्या पाहुण्यांचा नंबर असेल तर द्या त्यांना विचारुया...पावसाळ्याचे दिवस आहेत...बस डेपो मध्ये चौकशी करता येईल आपल्याला late झाली का? होते बस late" माझा आवाज जितका शक्य होईल तितका नॉर्मल ठेवायचा मी प्रयत्न करत होती....
"हो ग हो.. काकांना सांगते... ते देतील नंबर"
काकांनी मला नंबर आणि नाव सांगितलं...
"काका काही कळालं तर सांगते" असं सांगून मी फोन कट केला...
"काय ग,काय झालं?.. सगळं ठीक ना" माझा कावराबावरा चेहरा बघून राघवला बऱ्यापैकी अंदाज आला
"राघव,ह्या नंबर वर फोन करून जरा चौकशी कर ना..केशव कुठल्या बस ने निघाला"
राघवने त्या पाहुण्यांना फोन लावला...बसची चौकशी केली...पाहुण्यांनी माहिती दिली..
बस डेपो मध्ये मी फोन लावला पण कोणी फोनच उचलेना... एवढ्या वेळात आम्ही घरी पोहचलो...
"राघव.."
"हो बाई...हो जाऊया..वरती जा चार्जेर घे, महत्वाच्या गोष्टी घे आणि निघुया" राघव खालीच थांबला ..
न सांगता समजून घेणं म्हणजेच प्रेम ना...मी पटापट वरती गेली...चार्जेर, power bank, rain coat, राघवचे 2 ड्रेस, खायला बिस्कीट, dry snacks... अस जे जे सुचत होत ते ते बॅग मध्ये भरत सुटली...खाली आली तो पर्यंत राघव काही गोष्टी गाडीत टाकत होता...ह्या दरम्यान पण त्याला फोन लावणं चालुच होत...आता मात्र अस्वस्थपणा जाऊन भीती वाटायला लागली होती...As they said no news is good news... Hopes are on... Fingers crossed...

मी आणि राघव त्याच गावाला by road निघालो... रोड वरती बऱ्यापैकी शुकशुकाट होता...weekday त्यात पाऊस...रोड रिकामा होता...पण मनात मात्र काहूर माजलं होत...आणि आता तर पाऊस पण धो धो यायला सुरू झाली...फोन लावून लावून फोन discharge व्ह्याला आला होता...मध्ये range पण जात येत होती
"आता बस झालं...जातो आहोत ना, त्यालाच शोधायला...तु वेड्यारखी नको करुस..."
"राघव मला खूप टेन्शन आला आहे काहीतरी अघटित घडत आहे...खूप विचित्र, वाईट वाईट विचार येत आहे मनात....खूप भीती वाटते आहे..." मन चिंती ते वैरी न चिंती असा प्रकार चालला होता...
राघव बोलत नव्हता पण तो पण टेन्शन मध्ये आला होता...त्याची गाडी भरधाव जात होती ...

क्रमशः

केशवला नेमकं काय झालं...राघव आणि जान्हवी केशवला मदत करु शकणार का हे जाणून घ्यायला थोडी वाट बघा... भाग 2 ची...लवकरच पोस्ट करते...

भाग 2
https://www.maayboli.com/node/70628

Group content visibility: 
Use group defaults

छान सुरुवात !!
फक्त फार वेळ लावु नका पुढचे भाग टाकायला Wink
इथले आम्ही वाचक लोकं फार अधाशी आहोत वाचनाच्या बाबतीत हे ध्यानात ठेवा Wink

छान सुरुवात !!
फक्त फार वेळ लावु नका पुढचे भाग टाकायला
इथले आम्ही वाचक लोकं फार अधाशी आहोत वाचनाच्या बाबतीत हे ध्यानात ठेवा +111111 same feeling

मस्त सुरुवात
आणि ओघवते लिखाण
लवकर द्या पुढील भाग

छान सुरुवात.

तेवढ ते फिंगर्स क्रॉस्ड हवय>>>>>Change केला आहे..धन्यवाद....

कोणाला आयडिया आहे का की ह्या page ची लिंक कॉपी कशी करायची मोबाईल अँप मधून मला सेकंड पार्ट मध्ये फर्स्ट पार्ट ची लिंक द्यायची होती आणि vice versa

एक रात्र मंतरलेली
भाग - २

----------
एक रात्र मंतरलेली
< a href="https://www.maayboli.com/node/70628"> भाग - २

हे समजून येण्यासाठी पहिल्या < नंतर स्पेस दिलीय. तुम्ही प्रत्यक्ष वापर करताना ती स्पेस काढून टाकली की लिंक दिसू लागेल.