अ‍ॅलर्जीफुड

Submitted by रश्मी. on 4 July, 2019 - 23:58

खरे तर इथे काय लिहावे समजेना म्हणून प्रश्न विचारतेय. हा धागा आरोग्य मध्ये हवा होता. पण हा आहाराशी संबंधीत असल्याने इथे पाककृतीत विचारतेय. माझ्या मैत्रिणीच्या धाकट्या मुलीला कसलीशी अ‍ॅलर्जी झालीय. अंगावर खूप खाज येते. स्किन स्पेशालीस्ट ला दाखवल्यावर त्यांनी २ महिन्याकरता दूध व त्याचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ जसे इडली, डोसा, अप्पे, केक, ब्रेड, पिझ्झा, बर्गर वगैरे, तळलेले पदार्थ, तेलबिया म्हणजे शेंगदाणे- त्याचे कुट, काजू, पिस्ते, बदाम तसेच बेसन बंद करायला सांगीतले आहे.

आहारात मुगाचे वरण, खिचडी, पोळी, भाजी सांगीतलीय. सिमला मिर्ची, गवार, बटाटा, वांगी वर्ज्य सांगीतलीय. पण प्रश्न हा आहे की मुलगी १२ वर्षाची आहे. शाळेत टिफीन मध्ये काय नेणार? कारण बटाटा नको, मिर्ची नको.

खाण्यात मग या व्यतीरीक्त काय सुचवु शकता? स्नॅक्स काय द्यावे? ती गोड फारसे खात नाही. त्यामुळे लाडु, शंकरपाळ्या नको म्हणते. तळलेले पण चालणार नाही. प्लीज सुचवा. धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतक्या सगळ्या पदार्थांची अ‍ॅलर्जी सहसा नसते. अ‍ॅलर्जी स्पेशालिस्टकडे (स्किन स्पेशालीस्ट वेगळा) जाऊन नक्की कशाची अ‍ॅलर्जी आहे ते शोधता येइल. ते नक्की झाले की खाण्याचे बरेच पर्याय ओपन होतील.

, बटाटा, वांगी वर्ज्य सांगीतलीय. >>>>> वैद्य कानिटकरांनी वर्ज्य गोष्टींची यादी दिल्यावर मी म्हटले होते,की एवढे खायचे नाही तर काय खाऊ? तर मिष्किलपणे म्हणाले की खा हो सगळे पण कमी प्रमाणात खा.
असो.
शाळेत टिफीन मध्ये काय नेणार....
पोळी भाजी, धिरडी, थालीपीठ,रव्याचा केक,उडीद डाळ्+थोडी मूग डाळ यांचे आप्प्पे(रात्री किंवा एक तासभरआधी भिजत घालून वाटून लगेच होतात.),काकडीचे पोळे देता येतील..अंडे खात असल्यास उकडलेल्या अंड्याचे स्लाईस पोळीमधे घालून सँडविच टोस्टरमधून काढावे.मिरीपूड,मीठ घालावे.दही भात आवडत असल्यास देता येईल.
दूध व त्याचे पदार्थ जरी मना असले तरी ताक,दही चालतात.अर्थात डॉकटरांना विचारावे.

माझ्या मुलाला पण काही महिन्यांपूर्वी अचानक अंगाला खाज सुटायला लागली. डॉ. कडे नेले. पण फारसा फरक पडला नाही. शेवटी मीच प्रयोग करत 'काय खाल्ले की त्याला त्रास होते' ते शोधले. गवारची अ‍ॅलर्जी व्हायची त्याला, कदाचित त्यावरच्या केमिकलमुळे असेल कदाचित!

त्यामुळे आधी प्रॉब्लेम काय आहे ते शोधा.

जरी आंबवलेले पदार्थ नसले द्यायचे तरी तांदळाचे घावन चालतील. मुगाची धिरडी, रव्याचा शिरा, उपमा, खांडवी, दलिया ची खीर, मसाले कमी घालून लापशी रव्याचा मसालेभात, बाकी शक्य त्या भाज्यांचे पराठे. आणखीन आठवलं की सांगते

खरे तर लोकाच्या मुलाच्या खाणे संदर्भात पडू नका. काही झाले तर प्रॉब्लेम येइल. त्यांचे त्यांना बघू द्या . तुला अ‍ॅलर्जी असेल पण मला एंपथी नाही. हा ह्या युगाचा मंत्र आहे.

तथापि साधारन अ‍ॅलर्जी नटस ग्लुटेन मिल्क पक्षी लॅक्टोज इन्टॉलरन्स ह्या असतात त्या अनु षंगाने व्हीगन रेसीपी शोधा. रग्गड मिळतील. मिल्क ऐवजी आमंड मिल्क, कोकोनट मिल्क, सुपर फूड स पक्षी मिलेट्स ओट्स ऑरगॅनिक पद्धतीच्या पिकवलेल्या भाज्या व अंडी चिकन फिश चालत असल्यास ते. ह्यात होउन जाईल. त्यात शेलफिश अ‍ॅलर्जी असू शकते लक्षात ठेवा . मुख्य म्हणजे अ‍ॅलर्जीचा जो शॉक असतो त्याला इमर्जन्सीतच ट्रीट करावे लागते. तेव्हा बाळाच्या आईला ती कल्पना देउन ठेवा. प्रोसेस्ड फूड पासून तसेच दूर ठेवा.

डॉग हेअर कॅट हेअर डँ डर धूळ पोलन हे दूर करा.

ती मॅचुअर झालेली असल्यास इतर चेक्स करून घ्या जसे पीसीओडी, साबण शांपूची पण अ‍ॅलर्जी असू शकते. सीटाफिल हायपो अ‍ॅलर्जेनिक शांपू व साबण वापरा. माझ्याकडे एक नटस अ‍ॅलर्जीवाली अमेरिकन सिटिझन पाव्हणी आली होती त्यामुळे तिला पोहे केले त्यात दाणे घालता आले नाहीत हाउ रिडिक्युलस इज दॅट. पण ती घरातून सुखरूप गेल्यावर मला हायसे वाटले.

<< 'काय खाल्ले की त्याला त्रास होते' ते शोधले. >>
-------- सहमत. एका वेळी एकच खाण्याचा नवा पदार्थ तपासायचा.... आणि अ‍ॅलर्जीकडे लक्ष ठेवायचे. २-३ दिवस दिल्यानंतर त्रास नाही झाला तर पुढचा पदार्थ घ्यायचा.
अ‍ॅलर्जी टेस्ट करुन घेतली का ? टेस्टमधे अ‍ॅलर्जीचे कारण कळण्याची शक्यता असते. भली मोठी यादी लहान झाली तरी चांगलेच आहे.

आजकाल ॲलर्जी नक्की कसली आहे हे कळणेही खुप अवघड झाले आहे. मध्यंतरी मला त्रास झाला तेंव्हा शेंगदाने, गवार, वांगे इत्यादी बंद करायला सांगीतले. आणि ते बंद केल्यावर त्रासही कमी झाला. पण आवडत्या भाज्या असल्याने मी गावी गेल्यावर पथ्य मोडले पण त्रास झाला नाही. पुण्यात आल्यावर त्याच भाज्यांनी पुन्हा त्रास व्हायला लागला. मग लक्षात आले की गावरान भाज्यांनी त्रास होत नाही. लाल शेंगदाणे, आकाराने लहान गवार, लेकूरवाळी मेथी, काटेरी वांगी वगैरेंनी त्रास होत नाही. याचा अर्थ त्रास भाज्यांचा नसुन विशिष्ट बियाणांचा, औषधे, खते यांचा आहे.
प्रतिसाद धाग्याशी संबंधीत नाहीए पण सांगावे वाटले येथे.

नसुन विशिष्ट बियाणांचा, औषधे, खते यांचा आहे.>> त्यात वापर लेली गेलेली रसायने. केमिकल्स वापरावर बंधने आहेत पण भारतात ती फॉलो होतातच असे नाही. शिवाय जैविक वस्तूंची पण अ‍ॅलर्जी होउ शकते जसे फंगस. काल मी २५ एप्रिलला पॅक बंद केलेले एक मलबार पराठा चे पाकीट उघडले तर त्यांना बुरशी आलेली होती. भारतात फ्रोझन वस्तुंची कोल्ड चेन पूर्ण फॉलो होतेच असे नाही. तरीही वस्तु विकल्या जातात. अ‍ॅलर्जेन फ्री असे पाकिटावर बघून मगच खरेदी करा. एफ एस एस आय प्रमाणित उत्पादने घेतली पाहिजेत.

चपाती+पालेभाज्या देऊ शकता.
चपाती+कडधान्याच्या उसळी,
थालीपीठ/घावन्+चटणीशेंगदाणा, खोबर्‍याची चटणी
कोबी पराठा, दुधी पराठा, मेथी पराठा
फोडाणीचा दलीया, गोड दलीया, उपमा, शीरा
मसाले भात, पुलाव
घट्ट पिठलं+चपाती/भाकरी (आज मी डब्यात आणलंय..! Wink )
तोंडली, फ्लॉवर, दोडका, कोहळा, लाल भोपळा, दुधी, सुरण, नुसत्या कांद्याची तिखट टाकुन परतुन केलेली भाजी + चपाती
कांद्याची पातीची भाजी, टोमॅटो भाजी,

डब्यासाठी पोळी भेंडीची भाजी, दुधीची भाजी, पालक भाजी, मेथीची भाजी देऊ शकता. Snacks साठी लाल भोपळ्या ची गोड पोळी, कणकेचा शिरा, थालीपीठ (फक्त ज्वारी पीठ आणि थोडस gavhach पीठ घालून )असं देता येईल. लहान मुलांना पथ्य सांगितलं कि नको वाटत. हे त्यांचं खाण्या पि ण्याचं वय असत. माझ्या मुलालाही पोटाच्या problएम्स मुळे वडापाव, pizza खाता येत नाही. त्यात पोषण मूल्य काही नसलं तरी मुलांना खायला आवडत आणि once in a while खायला काही हरकत नाही. तुमच्या मैत्रिणीच्या मुलीला लवकर आराम पडो आणि सगळं खाता येवो.

धन्यवाद सगळ्यांना.

माधव - डॉ नी २ महिन्यानंतर फुड टेस्ट चा विचार करु असे सांगीतलेय.

देवकी- हो, अप्पे बरे आहेत की. आंबवावे पण लागणार नाहीत. तिच्या शाळेत अंडे चालत नाही असे मैत्रिण म्हणाली.

विनीता- तेच बघायचे आहे की नक्की प्रॉब्लेम काय आहे.

प्राची - हे पदार्थ छान आहेत हलके पण आहेत पचायला.

अमा - खरच धन्यवाद, कारण मुले मोठी व्हायला लागली की हार्मोन्स चेंज होऊन त्यांच्या आवडी नावडी तसेच शरीराची पण जडण घडण बदलतेच की.

उदय- नाही डॉ नी अजून औषधेच घ्यायला सांगीतलीय.

शाली - धाग्याशीच संबंधीत आहे की तुमचा प्रतीसाद. असेही असु शकते कारण हायब्रीड पदार्थांनी पण त्रास होतोच. काळ्या मातीतली जमीन असेल तर आणी भरपूर पाणी असेल तर खरच काहीही खते न टाकता सुद्धा अगदी घरगुती पद्धतीने भाज्या उगवतात.

डिजे- यादी मस्त आहे. सांगायचे विसरले की तिला डॉ नी टोमेटो व लिंबु बंद सांगीतले आहे, कोकमे / आमसुले वापरायला सांगीतलीत.

मी ऋचा - धन्यवाद, हो ना या पावसाली हवेत सगळ्यांनाच वडा पाव, बर्गर, भजी हवी असतात. पण त्याने त्रास होतोच.

शालीदा , अमा - चांगला प्रतिसाद .
अवांतर - मलाही कधीतरी असा त्रास उदभवतो . कधीतरी अंगावर रॅशेस उथून प्रचंड खाज येते , कधीतरी हातावर नुसतेच रॅशेस उठतात बाकी काही त्रास होत नाहि .
बर्याच वेळा प्रयत्न केला पण अजून कळत नाही नक्की काय खाल्याने होतयं . बघूया.

च्रप्स - माझी मैत्रिण घरात फार तर उकडलेली अंडी, ऑम्लेट एवढेच खाते, तिची मुलगी पण कधीतरीच अंडी खाते. त्यामुळे चिकन, मटण करत नाहीत तिच्याकडे. पण धन्यवाद सुचवल्याबद्दल.

१) सर्व खाऊ द्या.
२) त्रिकटू चूर्ण (सुंठ मिरी पिंपळी समभाग) तयार मिळते ते दहा ग्राम(३०रु) आणा. हे थोडे थोडे असे प्रत्येक जेवणात दहा पंधरा दिवसांत संपवा. (जास्ती आणू नका,पावसाळ्यात बुरा येतो.)

३) आवळा चूर्ण शंभर ग्राम(३०रु) आणून त्यातले एकेक चहाचा चमचाभर दोनदा.
(( मोठ्या प्याकिंग बाटल्या नको))

नंतर सतत घेण्याची गरज नाही.

Srd , धन्यवाद ! चांगला उपाय आहे. आणी पावसाळ्यात सुंठ , आले व गवती चहा वापरले की चांगले असते.

अँलर्जीमुळे खाज येत असेल तर इतरही कारण असू शकते. बस किंवा अँटोने प्रवास करताना सिट कव्हरच्या संपर्कामुळे सुध्दा असा त्रास होवू शकतो. मला असा त्रास झाला होता, म्हनून धाग्याशी संबंधीत नसूनसुध्दा हा प्रतिसाद.

१) सर्व खाऊ द्या.
<<
कमी जास्त झाले तर नवीन बाळ जन्माला घालता येईल, असे हि लिहा. कधी सिव्हियर anaphylaxis पाहिलं आहे का वैदू दादा तुम्ही?

किंवा कुणी नुसत्या अलर्जीमुळे मेलेलं?

सुधरा हो जरा. सुधर रे जरा. माणसाच्या जीवाशी खेळ काय असतो ते समजतं का रे तुला? मूर्ख कुणीकडचा.

अन तू, रश्मी..

ट्रीटमेंट हा काय क्राऊडसोर्स करायचा विषय आहे?

कुणीही काय वाट्टेल ते सल्ले देऊ लागतात. त्या ओरिजिनल डॉक्टर ला काय दक्षिणा देऊन पेशंट स्वर्गात आनंदाने पोहोचावा अशी प्रार्थना करताहेत का तुम्ही?

त्याला विचारा काय खाऊ घालू ते. पैसे मोजलेत सल्ल्या साठी. उत्तर निट दिलं नाही तर शेंडी धारा त्याची. पण रँडमली याला त्याला नका विचारू.

फुड अ‍ॅलर्जी हा अत्यंत गंभीर असा सहजगत्या घेण्यासारखा विषय नाही. ( स्वानुभवातुन अत्यंत कळकळीने सांगत आहे.) डॉक्टर दोन महिन्यांनी टेस्ट करून रँडम पदार्थ बंद करायला सांगताहेत ते पटले नाही. रश्मी मैत्रीनीला दुसरा डॉक बघीतला तर बरे होईल अस सांगता येईल का ?. पेडीयॅट्रिशिअन आणि त्यांच्या रेफरन्सने अ‍ॅलर्जी स्पेशॅलीस्ट कडे जाण बर पडेल. टेस्ट लवकरात लवकर करण योग्य.
समजा जर वरील कुठल्याही पदार्थाची अ‍ॅलरजी असेल तर तो खावून चालणार नाही. अगदी त्यांचा बारीक कण जरी संपर्कात आला तरी जीवावर बेतु शकते.

हो रे हो. पदवीदान विनोदाने स्विकारत आहे.
( मेडिकल काउन्सल ओफ इंडिया कोणकोणते अधिकार देते?)

बाकी क्राउडसोर्सिंग करून औषधोपचार करण्याच्या हेतुने कुणी मायबोलीवर विचारत नसेल. इथे दुरूनच प्रश्न आणि उत्तरं असतात त्यामुळे आर्थिक ऐपत आणि गांभीर्य ओळखूनच उपचार करून घेत असतात बाहेरून. मी माझे औषध सांगितले एवढंच .
त्यामुळे सांगितलेली औषधं/ सल्ले बरं करतील का पोहोचवतील याची खात्री नसतेच. पुढे जाउया ना?

---
लेखाचा विषय सोडून अवांतर झाले माफ करा. अशा चर्चेने विचारणारे पळून जाऊ नयेत हीच इच्छा.

कधी सिव्हियर anaphylaxis पाहिलं आहे >> मला तीच काळजी वा टत होती. अ‍ॅलर्जिक वस्तू खाण्यात आल्यास अगदी लगेच मेडिकल अटेन्शनची गरज पडू शकते. आतून सूज येउ शकते. बरं मुले कधी काय खातील आपल्या लक्षात येत नाही.

डॉ. तुम्ही म्हणताय ते सगळे पटतेय. मी स्वतः सुद्धा आतापर्यंत डॉ च्या सल्ल्याशिवाय कधीच कुठलीही औषधे घेतली नाहीत. काल मैत्रिणीने ओळखीतल्या कुणाला असा अनूभव आला आहे का, आणी पथ्य कशी असतात असे विचारल्याने इथे लिहीले.

बर्‍याच जणांना असाही अनूभव कदाचीत आला असेल की लहान मुलांना शाळेचा कंटाळा असेल तर पोटात दुखतेय, डोके दुखतेय असा बहाणा ते करतात. मैत्रिणीला अशी पण शंका आली होती. पण मुलीला हात व पाय दोन्ही बर्‍याच वेळ खाजवतांना पाहील्यावर कसली तरी अ‍ॅल्लर्जी असावीच हे लक्षात आले. डॉ . नी ( स्किन स्पेशालीस्ट ) तिला आंबट व आंबवलेले पदार्थ सध्या २ महिन्याकरता बंद सांगीतलेत.

सीमा, हे डॉ नावाजलेले आहेत. मैत्रिणीच्या जावेलाच चांगला अनूभव असल्याने तिने त्यांच्याकडे मुलीला नेले. आज परत बोलावले आहे, त्या वेळी सविस्तर परत बोलणार आहेच. उद्या विचारते मी तिला काय झाले ते. कारण खरच अ‍ॅलर्जी फुड मुळे जीवावर बेतु शकते. पण वेळेवर डाँ कडे जाणे उत्तम.