आज पुन्हा नापास झालो

Submitted by सिद्धेश्वर विला... on 18 June, 2019 - 07:11

आज पुन्हा नापास झालो

पुढल्या वेळेस पास होईन

हीच आशा मनी बाळगून

पुन्हा जोमात तयारीला लागलो

मम्मी पप्पा दोघेही घरी

चिंतातुर असतील

मला वाईट वाटू नये

म्हणून हळूच रडत असतील

मी ठरवलंय मनाशी घट्ट

हार मानायची नाही

देत जायचं असेच पेपरवर पेपर

जोपर्यंत नीट कळत नाही

कधीतरी उगवेल सूर्य, माझाही

कधीतरी असेंन मीही कुणाचा तरी बाप

पण सालं माझं पोर माझ्यावाणीच निघालं

तर होईल नको तो ताप

पन कितीही झालं तरी मी माझी विकेट फेकणार नाही

बापाने एवढा पैसा जो लावलाय माझ्यावर

फुक्कट घालवणार नाही

माहित आहे , मुद्दल वाढत चाललीय

एक दिवस , व्याजासकट नक्कि देईन परतावा

त्याआधी मला या परीक्षेत पास तरी कर,, देवा

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults