लव्ह इन ट्रबल भाग- ११

Submitted by स्वरांगी on 14 June, 2019 - 12:36

लव्ह इन ट्रबल भाग- ११
अनु आणि अभिजित डायनिंग टेबलवर बसून गरमागरम मॅगी खात होते…उशिरा घरी आल्यामुळे आणि दोघांनाही भूक लागल्यामुळे मॅगी हाच बेस्ट ऑपशन होता…
“ बाय द वे, मला असं वाटतं की आपण काही गोष्टी discuss करायला हव्यात…” अभिजितने तोंड उघडलं..अनुने त्याच्याकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली..
“हम्म..काही गोष्टी आपण आत्ताच ठरवलेल्या बऱ्या अस मला वाटतं..तुला काय वाटतं??” अभिजीतने विचारलं..
“ बरोबर…आपण समोरासमोर बसून, बोलून सगळं क्लिअर करून घ्यायला हवं..” अनु म्हणाली..
“ finally!! At least this time we think the same way!!” असं म्हणून अभिजितने हाय फाईव्ह साठी हात वर केला आणि अनुनेही त्याला टाळी दिली..
“ तर मी म्हणत होतो की…”
“ त्या रात्री आपल्यात काय झालं??” त्याचं बोलणं तोडत अनुने बॉम्ब टाकला.
“ काय बोलतेयस तू?!!!” अभिजितने आश्चर्याने विचारलं…
“ म्हणजे!! हा टॉपिक नाहीये का discussion चा??
“ नो!!! ऑफ कोर्स नॉट!!!” अभिजित ओरडला..
“ सॉरी!! माझा गैरसमज झाला मग..मला वाटलं हीच गोष्ट आपल्याला क्लिअर करायचीय…” असं बोलून अनु शांतपणे मॅगी खाऊ लागली.. अभिजित तिच्याकडे पहातच राहिला..आणि त्यानेही मॅगी खायला सुरवात केली…
“ अजून मॅगी हवी असेल तर घे!!” अभिजित शक्य तितक्या शांतपणे म्हणाला..अनुने एकदा त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं आणि त्याची नजर चुकवत अजून थोडी मॅगी घेतली..

आज अभिजितला ऑफिसला जायला उशीर झाला होता…
“ तू आज उशिरा उठलास?” बर्वे आणि अभिजित एकत्रच ऑफिसमध्ये शिरले..
“ सिरीयसली?!! तू आज उशिरापर्यंत झोपला होतास? पण तुला तर insomnia आहे ना!!” पुष्करने विचारलं..
“ जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक आणि शारीरिकरित्या थकलेली असते तेव्हा मला वाटतं कुणालाही झोप आवरणार नाही..” अभिजित बर्व्यांना म्हणाला..
“ पण एवढं काय झालं तुला थकायला!!” पुष्करने मिश्कीलपणे विचारलं..अभिजितने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं…
“ तू पहिलाच एम्प्लॉयी असशील ज्याला मी उशिरा आल्याबद्दल congratulate करतोय..” बर्वे म्हणाले.. अभिजित डोकं धरून खुर्चीत बसला.. बर्व्यांची बडबड सुरूच होती…अभिजित आता शून्यात नजर लावून बसला होता..पुष्कर दोघांचं काय चाललंय ते पहात होता..
“ तू असंच जर वागत राहिलास तर कोणतेही claint येणार नाहीत तुझ्याकडे आपली केस घेऊन!!!
“ हम्म…” अभिजित शांतपणे म्हणाला..
“ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफची तुझ्या विरुद्ध complaint आहे की तू त्यांच्याशी नीट वागत नाहीस, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोस!!” बर्वे तावातावाने बोलत होते..
“हम्म….” अभिजित उद्गारला..
“ आणि मला असं वाटतंय की तुझं आत्ता माझ्या बोलण्याकडेही लक्ष नाहीये..” बर्वे अभिजीतचा अंदाज घेत म्हणाले..
“ हम्म…” अभिजितचं थंड उत्तर…आता मात्र बर्वे आणि पुष्कर चकित झाले..
पुष्करला तर बर्व्यांची अवस्था पाहून हसू आवरेना..
“ असं किती वेळ बघत होतीस तू अनघा माझ्याकडे??” अभिजित चक्रावून मनातल्या मनात म्हणाला..त्याला आज सकाळचा प्रसंग आठवला..

“ कुलकर्णी सर!! कुलकर्णी सर!! आपल्याला उशीर होतोय निघायला….उठताय ना!!” अनु अभिजीतच्या बेडरूमच्या दारावर knock करत म्हणाली…आतून काहीच आवाज नाही म्हटल्यावर तिने दार उघडून आत डोकावून पाहिलं… अभिजित शांतपणे झोपला होता…अनुने त्याच्याकडे पाहिलं आणि पहातच राहिली…
“ तुम्हाला उठायला हवं आता..ऑफिसला जायला उशीर होईल तुम्हाला…” कसंबसं अनु एवढं बोलली आणि ती त्याला एकटक पाहण्यात दंग झाली…पोटापर्यंत पांघरूण घेऊन आणि दोन्ही हात एकमेकांत गुंफून अभिजित गाढ झोपला होता..
“ झोपेतसुद्धा किती cute दिसतो हा!!!” अनु प्रेमात पडल्यासारखी त्याच्याकडे पहात होती..तिच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता…किती वेळ गेला कोण जाणे पण इतक्यात अभिजीतचे डोळे खाडकन उघडले..आणि त्याने बाजूलाच बसलेल्या अनुकडे पाहिलं…त्याला अचानक उठलेलं पाहून अनुही घाबरली आणि तिने रूमबाहेर धूम ठोकली…पण दारातून बाहेर पडताना ती उंबरठ्यात धडपडली आणि दारासमोर सपशेल आडवी झाली..आणि इकडे अभिजित मोठे डोळे करून बेडवर उठून बसला..तो विचित्र नजरेने तिच्याकडे पहात राहिला…आणि अनुने दोन्ही हातानी आपला तोंडात मारल्यासारखा झालेला चेहरा झाकून घेतला….

आणि हाच प्रसंग आठवून अनुने घटाघट पाणी पिऊन टाकलं…
“ शी!! लाज वाटतेय आता मला माझीच…” अनु मोठ्याने म्हणाली..
“ मला काही म्हणालात का??” समोरच्या तरुणाने विचारलं…झेंडेंनी फॉरेन्सिक डिपार्टमेंटमधून एका माणसाला चेकिंग करण्यासाठी बोलवून घेतलं होतं..डोक्यावर डिपार्टमेंटचा लोगो असलेली हॅट आणि तसाच लोगो असलेला शर्ट अशा वेषात तो अनुसमोर उभा होता..हॅन्डग्लोवज घालून त्याने चेकिंग करायला सुरुवात केली..त्यासाठीच तो अनुच्या ऑफिसमध्ये आला होता..आणि काही clue मिळतोय का हे पाहत होता..
“ हा?? नाही!! तुम्हाला नाही!! मी स्वतःशीच बोलत होते..” अनु हसून म्हणाली..
“काही महत्वाचं मिळालं का तुम्हांला??” अनुने टेबलापाशी येत विचारलं…
“ नाही!! अजून तरी नाही…बरेच जण येऊन गेलेत ऑफिसमध्ये त्यामुळे नक्की एकाला शोधणं कठीण आहे..” तो आपलं काम करता करता म्हणाला..
“पण तरीही तुम्ही नीट तपासून पहा..फिंगरप्रिंट किंवा DNA काहीतरी मिळालंच पाहिजे..” अनु म्हणाली…
“ तुम्ही या बिल्डिंगचं CCTV फुटेज चेक केलं का??” त्याने विचारलं..
“ हो पण त्याने हॅट घातली होती आणि चेहऱ्यावर मास्क होता..आणि त्यातही त्याने प्रत्येक कॅमेरा शक्य तितका avoid केलाय त्यामुळे काहीच दिसलं नाही फारसं..” अनु म्हणालीय..
“ तुम्ही त्याचं स्केच बनवून घेऊ शकता, जर तुम्ही त्याला ओझरतं का होईना पाहिलं असेल तर..” त्याने सुचवलं…
“Unfortunately ,मी त्याचा चेहरा नाही पाहिलाय!!” अनु हताशपणे म्हणाली..
“ओह!! That’s so bad!!” असं म्हणून त्याने पुन्हा काम करायला खाली मान घातली…त्याच्या डोळ्यांत आता वेगळीच चमक आली होती..आणि चेहऱ्यावर गूढ हसू…तो उगाचच चेक केल्याचं नाटक करत होता..एवढ्यात त्याला टेबलखाली काहीतरी दिसलं म्हणून तो तसाच उभा राहून निरखून पाहू लागला…
“ मी काही हेल्प करू का तुम्हाला??” अनुच्या या प्रश्नाने तो भानावर आला..
“ हं?? हो…मला जरा एक ग्लास पाणी देता का??” त्याने विचारलं..
“ हो देते ना!!” असं म्हणून अनु पाणी आणायला वळली..तिने पाठ फिरवली हे पाहून त्याने झटकन ती वस्तू उचलली आणि हाताच्या मुठीत घट्ट धरून ठेवली…तोच अनु पाणी घेऊन आली..तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं आणि तिने विचारलं , “ काही मिळालं का??”
“ नाही!!” तो म्हणाला आणि त्याने पाण्याचा ग्लास घ्यायला हात पुढे केला…अनुनेही ग्लास पुढे केला..पण त्याने मुद्दाम ग्लास घेताना अनुच्या हाताला धक्का दिला आणि ग्लास खाली पडला…
“ओह नो!!! आय अॅम सो सॉरी!!! मी करतो सगळं साफ…” तो नाटकीपणे म्हणाला..
“ नो!! नो!! इट्स ओके!! मी करते हे सगळं साफ!!” अनु खाली पडलेला ग्लास उचलत म्हणाली..
“ सॉरी हा!! माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास झाला..” तो खोटंच म्हणाला..
“ नाही हो!! ठीक आहे..तुम्ही सॉरी नका म्हणू..” अनु हसून म्हणाली…आणि लादी पुसण्यासाठी mop आणायला ती वॉशरूममध्ये गेली…ती गेली असं पाहून त्याने हळूच हातातली वस्तु पँटच्या खिशात सरकवली…त्याला आठवलं रात्री ऑफिसमध्ये असताना बाहेर पावलांचा आवाज आला म्हणून तो घाईघाईने किल्ली घेऊन दाराआड लपला होता तेव्हा त्या किल्लीला अडकवलेलं कीचेन तुटून तिथेच टेबलाखाली पडलं होतं..आणि तेच त्याने आता उचलून खिशात ठेवलं…अनुने बाहेर येऊन लादी पुसायला घेतली..तिला पाहून तो खोटंच हसला..अनुही त्याच्याकडे पाहून हसली…

थोड्या वेळाने तो बिल्डिंग बाहेर आला..त्याने एकवार गंभीरपणे मागे वळून पाहिलं..आणि तो तिथून निघाला…तो निघतोय तोच झेंडे अनुच्या ऑफिसचा पत्ता शोधत तिथे पोहोचले…दारावर knock केल्याचा आवाज आला म्हणून अनुने तिकडे पाहिलं आणि तिला आठवलं..
“ जमलं तर मी आज येऊन जाईन तुझ्या ऑफिसला..” अभिजित सकाळी अनुला ऑफिसला सोडताना म्हणाला.. ते आठवून अनुने पटकन मोबाईल स्क्रीनवर आपला चेहरा पाहून घेतला..केस हाताने सारखे केले आणि हसून म्हणाली,
“ येस!! कम इन!!”
दार उघडून मोठं smile देत झेंडे आत आले..आणि अनुच्या चेहऱ्यावरचं smile पळालं…
“ओह!! झेंडे तुम्ही??” अनु निरुत्साहिपणे म्हणाली..तिचा चेहरा असा झालेला पाहून झेंडेंचाही चेहरा उतरला..त्यांचं तोंड वाकडं झालेलं पाहून अनु बत्तीशी काढत म्हणाली,
“ अरे वा!! झेंडे तुम्ही!! या ना!! तुम्ही इकडे कसे?!!”
“ कुलकर्णी सरांनी मला इकडे यायला सांगितलं..आणि म्हणूनच माझ्या बिझी शेड्युलमधून वेळात वेळ काढून मी इथे आलोय तुमच्यासाठी!!” झेंडेंचं तोंड अजूनही वाकडंच होतं..
“ हो का!! Thank you so much झेंडे!!” अनु कसंबसं हसून म्हणाली..अभिजित न आल्याने ती आतून पूर्ण खट्टू झालेली..
“ बाय द वे, आत्ता बाहेर मला या जागेचे ओनर भेटले..ते म्हणाले की ते आजपासून इथलं इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याचं connection कट करतायत..” झेंडे मक्ख चेहरा करून म्हणाले..
“आजपासूनच??!” अनुने विचारलं..
“ हो आणि तूम्ही फक्त deposit देऊन बऱ्याच महिन्यांचं भाडं थकवलं आहे त्यामुळे ते तुम्हाला लवकरच इथून हाकलण्याच्या तयारीत आहेत..” झेंडेंनी आणखी माहिती पुरवली…आणि ते ऐकून अनुने उसासा टाकला..

झेंडे आणि अनु आत्ता एका शॉपमधून बाहेर पडले..अनुने ज्या ठिकाणी ते smiley असलेलं पोस्टर चिकटवलं होतं बरोबर त्याच्याच समोर एक ज्वेलरी शॉप होतं..कदाचित तिथल्या CCTV त तो खुनी capture झाल्याची शक्यता होती..म्हणूनच तिथल्या रस्त्याच्या बाजूच्या कॅमेराचं फुटेज घेऊन दोघेही बाहेर पडले..
“ मला वाटंत नाहीये की या फुटेजमधून काही मिळेल..कारण तसही मी त्याचा चेहरा नाही पाहिलाय..”
“हम्म..” झेंडे काहीतरी बोलायचं म्हणून बोलले..
“ पण मी मगाचपासून बघतेय तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही आहात!! का??” अनुने विचारलं..
“ कारण ही तुझी शिक्षा आहे!! मला पाहून चेहऱ्यावर अपेक्षाभंग दाखवल्याची!!” झेंडे हिरमुसून म्हणाले…अनु हसली..
“ मी तुम्हाला पाहून तशी रिऍक्ट नाही झाले हो!! खरं तर मी स्वतःवरच नाराज झाले म्हणून तसा चेहरा झाला माझा…मी खूप दिवस एका व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न करतेय पण तरीही पुन्हा पुन्हा त्याचीच आठवण काढतेय..म्हणून मी स्वतःवर चिडले..” अनु झेंडेना समजावत म्हणाली…
“ मला माहितेय ती व्यक्ती कोण आहे ते!!!” झेंडे गालातल्या गालात हसत म्हणाले…
“ कोण??” अनुने विचारलं…
“ कुलकर्णी सर… बरोबर की नाही?!!” झेंडे अनुला चिडवत म्हणाले…अनुचे डोळे विस्फारले गेले..
“ तुम्हाला कसं माहीत?!!” अनुने आश्चर्याने विचारलं..
“ तुझ्या डोळ्यात दिसतं ते..” झेंडे शांतपणे म्हणाले..
“च्..आता तुम्हालाही कळलं म्हटल्यावर सरांना कळलंच असेल!!” अनु घाबरून म्हणाली..
“ नाही..त्यांना नाही कळणार..” झेंडे म्हणाले..
“ ह्याला काय अर्थ आहे?!! तुम्हाला कळलं!! मग त्यांना का नाही कळणार??” अनुने विचारलं…
“आपले सर बाकी सगळ्यात खूप हुशार आहेत.. छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा लगेच ध्यानात येते त्यांच्या!! पण feelings च्या बाबतीत मात्र त्यांना काडीचीही अक्कल नाही!! Specially मुलींच्या feelings बद्दल त्यांना काहीच कळत नाही..”
“च्.. उलट मला तर वाटंत होतं की त्यांना माझ्या मनातलं,मी न सांगता कळावं!!” अनु चुकचुकत म्हणली..
“ वर्षभरापूर्वी सरांच्या हाताखाली एक इंटर्न होती..2 महिने होती..तिलाही सर आवडत होते..आणि हे अख्या स्टाफला माहिती होतं..पण त्यांना शेवटपर्यंत कळलंच नाही!! तू सांगत नाहीस तिथपर्यंत त्यांना काही कळणार नाही..बोल लागली पन्नास रुपयांची पैज??” झेंडेंनी हात पुढे करून विचारलं…
अनु कसंबसं हसली आणि झेंडेना टाळी देऊन पुढे चालू लागली..

“ काय म्हणालात तुम्ही?? ती खुनी ‘अनघा भावे’ आणि तो ‘कुलकर्णी वकील’ एकत्र होते??” अप्पासाहेबांनी आश्चर्याने विचारलं…
“ होय साहेब!! कालच रात्री मी त्या दोघांना एकत्र पाहिलं!!!” अप्पासाहेबांचा सेक्रेटरी त्यांना माहिती देत होता..
“ पण मला तर अशी माहिती मिळाली होती की ते दोघं जवळजवळ 8-10 महिने एकमेकांच्या संपर्कात नाहीयेत!!” अप्पासाहेबांनी विचारलं..
“ होय साहेब..मलाही असंच वाटलं होतं..पण काल जेव्हा त्या दोघांना एकत्र बघितलं तेव्हा ते खूपच सहजपणे बोलत होते एकमेकांशी…” सेक्रेटरी म्हणाला..अप्पासाहेब गंभीर झाले..
“ साला वकील!!! त्याच्याकडे लक्ष ठेवायलाच हवं..” अप्पासाहेब मनातल्या मनात म्हणाले..
इकडे अभिजित अप्पासाहेबांच्या कार्यालयासमोर उभा होता..काय बोलायचं याची पुन्हा एकदा उजळणी करून तो आत शिरला…आत गेल्यावर त्याने appointment फिक्स केली आणि सोफ्यावर बसून आत जायची वाट पाहू लागला..तोच अप्पासाहेबांच्या केबिनमधून त्यांचा सेक्रेटरी बाहेर पडला..त्याने अभिजीतकडे पाहिलं आणि त्याने सेक्रेटरीला सांगून अभिजीतला लगेचंच आत पाठवून द्यायला सांगितलं आणि तो अभिजीतकडे लक्षही न देता तिथून आपल्या कामाला निघून गेला…
अभिजित knock करून केबिनमध्ये गेला..अप्पासाहेबांनी नजरेनेच त्याला बसायची खूण केली..अभिजित आणि अप्पासाहेब दोघही समोरासमोर सोफ्यावर बसले..
“खरं तर मीच तुम्हाला फोन करून बोलावून घेणार होतो…पण तुम्हीच आलात पहिल्यांदा आलात माझ्याकडे..” अप्पासाहेबांनी बोलायला सुरुवात केली..
“ मी सरळ मुद्यावरंच येतो..काल रात्री काही कारणामुळे मला ‘मिस. अनघा भावे’ यांच्या ऑफिसला जावं लागलं..” अभिजित म्हणाला..
“ हम्म..मग??” अप्पासाहेबांनी उद्धटपणे विचारलं..
“ तेव्हा मला तिच्या ऑफिससमोर एक कार दिसली..” पोलीस स्टेशनहून निघून जेव्हा अभिजितने अनुला तिच्या ऑफिसला सोडलं तेव्हाच त्याने ती कार नोटीस केलेली..
“ सुरवातीला मला वाटलं की ती कार फक्त पार्क केलीय…पण मी पुन्हा जेव्हा तिथून गेलो तेव्हाही ती कार तिथेच होती..त्यामुळे त्याची नंबर प्लेट मी बघितली आणि मला कळलं की ती कार तुमची होती!! ती सरकारी गाडी आहे सर!! तिचा अशा कामांसाठी वापर करता तुम्ही??” अभिजीतने अप्पसाहेबांना डिवचलं..
“त्या नालायक मुलीने जीव घेतलाय माझ्या मुलाचा!! तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर आहे माझी!!” अप्पासाहेब दरडावून म्हणाले..
“पण फॅक्ट ही आहे सर,की हे ईललीगल आहे!!” अभिजित हसून म्हणाला..
“ तू मला ब्लॅकमेल करतोयस???” अप्पासाहेबांनी दात ओठ खात अभिजीतला विचारलं..
“ नाही!! अजिबात नाही सर…पण सर,जर तुमच्या कारला डॅशबोर्ड कॅमेरा असेल तर मला काल रात्रीचं फुटेज पहायचं होतं…” अभिजितने क्लिअर केलं..
“ तुला ते कशासाठी हवंय??”अप्पासाहेबांनी विचारलं..
“ त्यात काही क्लू मिळण्याची शक्यता आहे..” अभिजित म्हणाला..
“ पण माझ्या गाडीत तसला कॅमेरा नाहीये..” अप्पासाहेब म्हणाले..
“ मला वाटलं होतं तुम्ही एवढे मोठे राजकारणी!! तुमच्या गाडीत असेल कॅमेरा..पण जाऊदे..तुम्ही मला तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!!!” एवढं बोलून अभिजित उठून जाऊ लागला..तोच अप्पासाहेब म्हणाले,
“ नक्की काय शोधतोयस तू??” अभिजित थांबला..
“ ती भावे म्हणते,की ती खुनी नाहीये!! मग तू काय खऱ्या खुनीच्या मागे आहेस का??” अप्पासाहेबांनी न राहवून विचारलं..
“ हो..” अभिजित ठामपणे म्हणाला…
“ तू खुनीला स्वतः पाहिलंयस?? मग त्या मुलीच्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवलास तू??” अप्पासाहेब ओरडले..
“ मी तिच्यावर विश्वास ठेवून हे करत नाहीये!! पण अशा काही घटना घडल्यात की माझी खात्री होत चाललीय की अनघा निर्दोष आहे..” अभिजितने उत्तर दिलं..
“आणि जर तुझा अंदाज चुकला, आणि ती मुलगीच खुनी निघाली तर?!!” अप्पासाहेबांनी तुच्छतेने विचारलं..
“ तर माझ्या हातांनी मी गुन्हेगाराला जाऊ दिलं हे guilt कायम राहील माझ्या मनात…” अभिजीत शांतपणे म्हणाला.. “ आणि जर तुमचा अंदाज चुकला तर??” अभिजीतने उलट प्रश्न विचारला..
“ ती पोरगी तशीही सुटलीच आहे यातून!!! फ्री बर्ड आहे ती आता!!” अप्पासाहेब कुत्सितपणे म्हणाले..
“ फ्री बर्ड?!!” अभिजित कसंनुसं हसला..त्याला काल रात्रीचं अनुचं बोलणं आठवलं..
“ मला सामान्य माणसाचं आयुष्य जगायचं होतं..पण तेही नीट जगता येत नाहीये…माझ्या ऑफिसची कंडिशन ही अशी!! बँक बॅलन्सही संपत चाललाय..पैशांसाठी दुसरा जॉब शोधतेय, पण लायक असूनही कुणी जॉब देत नाही.. कारण लोकांच्या नजरेत मी अजूनही खुनीच आहे!!”
“ मलाही असंच वाटलं होतं!! पण तसं नाहीये…अजूनही ती यातून पूर्णपणे सुटली नाहीये…ती जर निर्दोष सिद्ध झाली तर तिला जो काही मनस्ताप झाला त्याचा सगळं दोष आपल्या दोघांचा असेल…कारण मी तिच्यावर शुभमच्या खुनाचा आरोप केला आणि तुम्ही बनावट हत्यार तयार करून तिला यात अडकवण्याचा प्रयत्न केला!!!” अभिजित ठामपणे म्हणाला… अप्पासाहेबांनी रागाने हाताच्या मुठी आवळून सोफ्यावर आपटल्या आणि ते ताडकन उठून अभिजीतसमोर आले…
“ जर ती दोषी निघाली, तर तिच्यासोबत तुलाही तुझ्या कर्माची फळं भोगावी लागतील!!ध्यानात ठेव!!” अप्पासाहेबांनी अभिजीतला उघड उघड धमकी दिली…अप्पासाहेब रागाने थरथरत होते…त्यांच्याकडे एकवार पाहून काहीही न बोलता अभिजित तिथून बाहेर पडला…

संध्याकाळी ऑफिसची सगळी कामं आटपून अभिजित घरी जायला निघाला...ड्राईव्ह करता करता अभिजित विचार करत होता…
“गेले काही महिने जेव्हा अनघाशी काहीच संबंध राहिला नव्हता तेव्हा मला शांत आणि सुरक्षित वाटंत होतं.. कालचा,आजचा आणि उद्याचा असे सगळेच दिवस सारखे जात होते… कुणीही माझ्या आयुष्यात डोकावत नव्हतं आणि मीही कुणाच्या अध्यात मध्यात नव्हतो..पण अनघा पुन्हा भेटल्यावर आयुष्य पुन्हा विस्कळीत झालंय…काल एका चोराला धोपटलं…त्यानंतर खरा खुनी समोर येऊन गेला.. घरात मला मिळणारी स्वतःची space माझी राहिली नाही… सगळंच बदललंय!!!” अभिजीतने पार्किंगमध्ये गाडी लावली आणि तो घराकडे निघाला…गेटसमोरच अनघा स्वतःच उरलेलं सामान घेऊन उभी होती…आणि मधून मधून अभिजित आत आहे का हे पाहण्यासाठी उड्या मारत होती..तिला पाहून अभिजित हसला..
“ कालपासून घडलेल्या सगळया घटना dangerous आणि थकवणाऱ्या असल्या, तरी कालपासून अनघा सोबत असताना गेलेला दिवस अजिबात कंटाळवाणा नव्हता!!” अभिजितने मनातल्या मनात कबूल केलं…

“ सर नक्कीच असं म्हणाले होते की तू फॉरेन्सिकचा रिपोर्ट येईपर्यंत इथे राहू शकते!!” अनघा स्वतःशीच म्हणाली…
“ नाही!! मी नाही असं विचारू शकत त्यांना!! मीच लोचट वाटेन…” अनु गेटसमोरच उभी राहून स्वतःशी बडबडत होती…
“ पण आता ही स्वाभिमान बाळगत बसायची वेळ नाही!! नाहीतर रस्त्यावर रहावं लागेल!! मी कसंही करून convince करेन सरांना…”
“ खरं तर आज मी ऑफिसमध्येच राहणार होते,पण मी एकवेळ विजेशिवाय राहू शकते पण पाण्याशिवाय नाही!!” अनु बोलण्याची प्रॅक्टिस करत म्हणाली..
“ हो का???” अभिजीतने मागून येऊन तिच्या कानाशी तोंड नेऊन विचारलं..अचानक मागून कानाशी आवाज ऐकल्याने अनु दचकली..आणि कोण आहे??!! असं किंचाळत जोरात मागे वळली…पण वळताना तिच्या हाय हिल्समुळे तिचा पाय मुरगळला…
“ काय हो सर!! घाबरवलंत ना मला!!” अनु वैतागुन म्हणाली…तिचा पाय चांगलाच दुखत होता..ती लंगडी घालतच कशीबशी उभी होती..
“ पायाला लागलं का तुला?? सो सॉरी!!! मी गंमत करत होतो तुझी!!” अभिजित guilty होऊन म्हणाला..
“ काय करत होतात??” अनुने अविश्वासाने विचारलं..
“ गंमत!!!” अभिजित हिरमुसून म्हणाला…

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

छान चाललिये कथा! खूप सार्या घटना घडत असल्यामुळे पुढचे भाग पट्पट येउ द्यात, म्हणजे लिन्क तुटणार नाही.

छान चाललिये कथा! खूप सार्या घटना घडत असल्यामुळे पुढचे भाग पट्पट येउ द्यात, म्हणजे लिन्क तुटणार नाही. >>+१

मस्तच!!

आता जरा पुढे सरकायला हवी कथा

अथेना
रागिणी
नविना
मन्या
महाश्वेता
कोमल
आसा
अॅ मी
सर्वांना खूप खूप धन्यवाद!!! Happy