असे जरासे

Submitted by रोहितकुलकर्णी on 11 June, 2019 - 00:35

भलते काही सुचून जावे असे जरासे
न रडता गलबलून यावे असे जरासे

सुट्टा पतंग, आभाळाशी भिडत राहतो
तुटताना चौफेर उडावे असें जरासे

झाड सावली देते नंतर गळून पडते
अबोलतेने दुःख गिळावे असे जरासे

आयुष्याची पाटी पुसतो खोडून कितीदा
शून्यालाही शून्य कळावे असे जरासे

चिता संपली आग परंतु तशीच ओली
धगधगणारे सरपण व्हावे असे जरासे

Group content visibility: 
Public - accessible to all site users