मॅरेज Mystique ! ( भाग १५ )

Submitted by र. दि. रा. on 17 May, 2019 - 23:45

भाग १४ चा धागा : https://www.maayboli.com/node/69979

भाग १५ :

अशीच एक सकाळ उजाडते.केदार सगळे आवरून नाष्ट्यासाठी हॉलमध्ये येतो.तर तिथे एकच धामधुम उडालेली असते . नेहमीची बैठक व्यवस्था बदलून सभा असावी अशी मांडणी केलेली असते.सिहासन वाटावे अशी एक खुर्ची टेम्पोतून उतरवत असतात. सर्व नोकरांना नवा युनिफॉर्म दिला होता. कामवाल्या स्त्रीयानीही एकाच रंगाच्या नेसल्या होत्या .किचन मध्ये एक शेफ काहीतरी तळत होता. केदारने शिवरामला विचारले...
“आज कसली सभा आहे?’

“सभा नाहीय.सिलीचुंगचे युवराज येणार आहेत.”

“कुठे आहे सिलीचुंग?”

“म्यानमारजवळ सिलीचुंग नावाचा देश आहे. तिथले युवराज येणार आहेत.”

“ते इथे कशाला येतायत.”

“अहो,सिलीचुंगचे भुवाल अण्णासाहेबांचे मित्र आहेत . युवराज मुंबईत आलेत म्हणून अण्णासाहेबांनी त्यांना चहाला बोलावले आहे.”

केदार रेवतीच्या रूमवर गेला. दार नॉक करून तो आत गेला. रेवती सजून धजून तयार होत होती . त्याने विचारले...

“आज कोणी येणार आहे का?”

”हो,प्रिन्स नहुष येणार आहेत”

“ते कशाला येताहेत.?”

“ते आपले फॅमिली फ्रेंड आहेत.”

“ते येणार असे मला कुणी बोलले सुद्धा नाही .”

“रात्री तुम्ही लवकर रुममध्ये गेलात.आम्ही हॉलमध्ये बसूनच सगळी अरेंजमेंट करत होतो.”

“बर ! मी कुठे थांबू.”

“म्हणजे काय तुम्ही कार्यक्रमाला यायचे आहे ”

“कपडे हेच असू देत का ?”

“अहो सुट घाला ना”

केदार वैतागतो पण नाईलाजाने कपडे बदलायला रुममध्ये जातो .केदारची चरफड सुरु होते... “.कुठला कोण टिनपाट राजकुमार येणार तर आम्हाला का वेठीला धरताय?”

------------------------------------------------------------------------------

गेटवर बिगुल वाजला. युवराज आल्याची सूचना मिळाली.सगळे पोर्चमध्ये जमले.युवराजची लिमोझिन पोर्चमध्ये थांबली.युवराज तिकडच्या राजेशाही ड्रेसमध्ये खूप रुबाबदार दिसत होते. तिथे फुट दीड फुट उंचीचा एक नक्षीदार पितळी stand होता .सगळ्यांनी मिळून त्या stand वर खोचलेल्या मेणबत्या पेटवल्या.एक बारगीर मेणबत्याचा stand घेऊन पुढे चालू लागला . त्याच्यामागून युवराज धीम्या चालीने निघाले. ही मिरवणूक लुटुपुटूच्या stage वर आल्यावर युवराज ‘दक्ष’ मध्ये उभे राहिले. सर्वजण त्यांच्या समोर उभे राहिले . सर्वांनी गुढघ्यावर हात ठेवून व कमरेत वाकून ‘कुजकुरा’ केला. युवराज सिहासनावर बसले. त्यांनी “स्वास्ति” असे म्हणून सगळ्यांना बसायला परवानगी दिली.अण्णासाहेब स्वागतपर भाषणासाठी उभे राहिले.

”I have great pleasure to welcome your Highness prince of silichung yuvraj Nahush Vighnhar. It is our good luck that prince is here for some time inspite of busy schedule . Now I request your highness to address the meeting. "

युवराजांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.

” Friends , you might been knowing that Government of Shilichung have extremely good relations with India. The people of Shilichung have retained Monarchy system for their governance . There is nothing wrong in adopting any system of ruling as long as it is working in the interest of people. The Bhuwal of Shilichung have provided good infrastructure ,facilities for education , almost free health cover and many other provisions. By and large citizens of Shilichung are living peaceful and happy life . But recently some notorious youngsters have raised agitation for establishing so called democracy .Actually people of Shilichung are not in favour of democratic governance. When many democratic countries are undergoing chaos , Shilichung are wise enough to retain their peace and prosperity through present Status . I therefore request all of you to discourage this foolish agitation .I am thankful to Mr. Annasaheb for inviting me here.”

युवराजांनी छोटेखानी भाषण संपविले.भाषण चालू असताना युवराजांची आणि त्याची नजरा नजर झाली. युवराज त्याच्या कडे रागारागाने पाहत होते. अण्णासाहेब ,युवराज व पार्टनर असे तिघेजण छोट्या लिफ्टने अण्णासाहेबांच्या ऑफिसमध्य गेले . तेथे युवराजांना प्रोजेक्टची माहिती दिली.सर्व हिशेब दाखविला.युवराजांनी सर्व बारकाईने पहिले. साहेबांच्या चोख कारभारावर युवराज खुष झाले.नंतर हे तिघे आणि दोघी बहिणी अशी खाशा पंगत डायनिंग टेबलावर सुरु झाली. बाकी मंडळीना हॉलमध्ये डिशेस भरून दिल्या . केदारला सर्व खाद्यपदार्थ सपक वाटले. सगळा कार्यक्रमच सपक वाटला. हाय टी झाल्यावर पुन्हा मेणबत्या ,कुजकुरा बिगुल वगैरे सोपस्कार झाले. युवराजाचे प्रयाण झाले.केदार वैतागला होता पण अण्णासाहेब खूष होते.आपण फार मोठा पराक्रम केल्या सारखे रुबाबात वावरत होते. कोणालाही न विचारता केदार सरळ रूम मध्ये निघून गेला.आणि थकून झोपला . बाकी सगळेजमून कार्यक्रम कसा छान झाला यांवर चर्चा करण्यात रमले .

-----------------------------------------------------------------------------

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला त्याला जाग आली .कारण नसताना त्याची चिडचिड व्हायला लागली. केदारला समजेना की त्याला इतका राग का आलाय ? कारण कुठला कोण तो युवराज, येईना का बापडा? त्याचे स्वागत कसे करायचे हा कर्णिकांचा प्रश्न होता. त्या बद्दल स्व:तची चरफड करून घेण्याची केदारला काही आवश्यकता नव्हती .केदारने स्व:तची समजूत घातली की आपल्याला आधी संगीतले नाही, म्हणून आपला अपमान झालाय,या भावनेने आपण वैतागलो गेलोय. आणखी एक गोष्ट त्याला खटकली ती म्हणजे युवराज त्याच्या कडे रागारागाने पहात होते. पुन्हा त्याने स्व:तची समजूत घातली . युवराजांशी त्याची कोणी ओळखही करून दिली नाही . तर ते त्याचा राग कशाला करतील ? आपल्याला भास झाला असेल ? चहासाठी तो खाली उतरला.नेहमीप्रमाणे हॉलमध्ये कोणीही नव्हते .एक मंदबुद्धी नोकर रोहिदास तेवढा होता केदारने विचारले...

“शिवराम कुठे आहे रे”.

“शिवराम घरी गेला”.

“एवढ्या लवकर ?”

“सकाळी लवकर आला होता ना .“

“मला आता चहा कोण देणार ?”

“घ्या आता तुमचा तुमीच करून”

“दादा ,मला पण एक कप चहा मिळेल ?”

“देतो”

चहा झाल्यावर केदार बागेत आला.नाथाभाऊ वाटच पाहत होता.नाथाभाऊनी लगेचच सुरुवात केली.

“आज युवराज का आले होते कळले का?”

“का?”

“अण्णासाहेबांचा सगळा धंदा युवराजांच्या पैशावर चालला आहे..युवराज त्याचा पैसा सिंगापूरला पाठवतात तिथून तो पैसा अण्णासाहेबाना मिळतो”

“असे का म्हणे”

“कारण त्याच्या राज्यात बंडाळी माजली आहे.जर बंडखोरांनी भुवालांची सत्ता उलथवून टाकली तर राजघराणे पळून मुंबईत येणार.म्हणून त्यांच्या साठी इथे थारा निर्माण करायचे कारस्थान सुरु आहे.”

केदारसमोर सर्व चित्र स्पष्ट झाले.जर त्यांच्या राज्यात बंडाळी माजली तर युवराजांना सुखरूप पलायन करता यावे म्हणून आपल्याला युवराजांचे कपडे घालून राजवाड्यात ठेवले जाईल . आणि बंडखोर आपल्याला युवराज समजून आपला खात्मा करतील .केदार अनामिक भीती आणि राग अश्या संमिश्र भावनेने ग्रासून गेला.त्याच्या डोक्यात तिडीक गेली. डोक्यातली तिडीक शमवण्यासाठी त्याने कलमे उचलून फेकायला सुरुवात केली. नाथाभाऊनी त्याला शांत करायचा प्रयत्न केला

“.केदारसाहेब शांत व्हा .अचानक काय झाले? "
त्यांचा दंगा ऐकून घरातला नोकर धावत आला. त्याला केदारच्या नाकपुडीत रक्ताचा थेंब दिसला . त्या दोघांनी आधार देवून केदारला घरात नेले.
नाथाभाऊ म्हणाले...

”उन्हाने साहेबांचा गुणा फुटला”
नोकराने कांदा फोडून हुंगायला दिला.गार पाणी दिले.केदारला बर वाटायला लागल्यावर दोघे बागेत आले.

नोकर म्हणाला...
“केदारसाहेब इतके का चिडले?”

“एकाएकी त्यांचे काय बिनसले कोण जाणे ? “

“मला वाटल दिदी आणि युवराजांच्या लग्नाबद्दल तुम्ही बोलला का काय ?”.

नाथाभाऊ एकदम चिडले ते म्हणाले

“अरे बाबा, ते लग्नाचे आता बोम्बलय ना . मग मी तो विषय कशाला काढीन?”

“पण का हो नाथाभाऊ का मोडले म्हणे त्यांचे लग्न?”

“अरे वहिनीसाहेब म्हणाल्या तिथे बंडाळी माजली आहे .तर आपली मुलगी अश्या ठिकाणी कशाला द्यायची. म्हणून रद्द झाले”.

“शेवंताबाई काय तर वेगळच बोलत होती ?”

“आयला, ती बया तर लई चाबरी हाय काय म्हणत होती ?”

“ती म्हणती दिदींना महाराणी सायबांनी पार कापड काढून परखली.पण राणीची लक्षण दिदीच्या अंगावर नाहीत”.

“अर,येड्या असल कुठे बोलू नको. तो शिवराम तुला तुडवेल बघ” .

त्या नोकराने “तोबा तोबा” केला तो म्हणाला .

“नाथा भाऊ माफी करा .पुन्हा नाही बोलणार.”

-------------------------------------------------------

शर्मिष्ठा रेवतीच्या खोलीत प्रवेश करीत म्हणाली...

“येऊ का दिदी?”

“ये ना विचारतेस काय ? सहजच आलीस ना?”

“अगदी सहज नाही. थोडे बोलायचे आहे”.

“मग बोल ना”

“मी जीजू बद्दल बोलणार आहे”.

”आईचे आणि माझे परवाच बोलणे झाले.ती म्हणाली म्हणून मी काल पंधरा लाखाचा डीडी मीनाक्षीला पाठवलाय.तिच्याशी फोनवर बोलले.तीही चांगले बोलली.अजून काही करायचे आहे का?”

”आई म्हणाली जीजू राहतात ती रूम योग्य नाही”.

“ते स्व:त होऊन तिथे रहायला गेले . हॉलला लागून जी गार्डन फेसिंग खोली आहे.त्यांना तिथे राहायला सांगूया’
शर्मिष्ठा काही बोलली नाही. रेवती म्हणाली “ती रूम पण चालणार नाही का त्यांना? मग कुठे राहू देत?”

“तुझ्या रूम मध्ये”

“काय?अग मला किती अक्वर्ड होईल?”

“तुला अक्वर्ड होण्याचे काही कारण नाही.माझ्या क्लासमधील तीन मुली आणि दोन मुल एक flat भाड्याने घेऊन एकत्र रहात आहेत .त्यांना काही प्रोब्लेम नाही.”

“पण माझी केस वेगळी आहे ना?”

“तरीही तू दुखावली जाशील असे काहीही जीजू करणार नाहीत.”

“बघते”

“ए दिदी ,तू जीजूचा उल्लेख ‘हे ,यांना’ असा करतेस ते परंपरा जपण्यासाठी ना. “‘

“शमे, आता बास ह”
शर्मिष्ठा हसत हसत पळून जाते

त्या दिवशी दुपारी शिवराम आणि रोहिदास दोघे मिळून एक सिंगल बेड जिन्यावरून नेत असतात.त्याच वेळी केदार जिना उतरत असतो.केदार विचारतो...

“कुठे नेताय हे बेड ?’”

“दिदीच्या खोलीत “

“कशाला ?”

“काय म्हाईत”

-------------------------------------------------------------------------------

केदार रूममध्ये बसलेला होता . अनपेक्षितपणे तिथे रेवती येते . तो तिचे स्वागत करतो...

“रेवा तू? ये”

ती आत येते...
“या रूम मध्ये राहतोस तू ? किती एका बाजूला आहे ही खोली. आणि काही व्ह्यू पण नाही? तू या खोलीत का राहायला आलास?”

“रघूने माझी bag या खोलीत ठेवली म्हणून”.

“रघु पण मूर्खच आहे. तू माझ्या रुममध्ये राहायला ये.”.

”काय?”

“आता चल.बँग भर आणि माझ्या रुममध्ये ये”

एवढे बोलून रेवती गेलीसुद्धा . तो बॅंग भरून रेवतीच्या रुम मध्ये गेला. गीताने त्याच्या हातातून बँग घेतली आणि रेवतीच्या बेड पासून थोड्या अंतरावरील दुसऱ्या बेडवर ठेवली .

रेवती म्हणाली...

“तुझे बेड मुद्दामच खिडकीजवळ लावलय.तुला छान गार्डन व्ह्यू मिळेल.”

”हो खरच इतके छान वाटतंय “

“समझनेवालेको इशारा काफी होता है”.
तो मनात म्हणाला.

-------------------------------------------------------------------------------------

केदारला वाटले आपण रेवतीच्या रूममध्ये राहायला आलोय म्हणजे आपले सगळे प्रश्न सुटले. पण तसे काहीच झाले नाही.त्याचे फक्त दोन प्रश्न सुटले. एक म्हणजे त्याला सकाळचा चहा गीता रूममध्ये आणून देऊ लागली.आणि रेवतीच्या रुममध्ये फोनचे एक्षटेनशन असल्याने तो मीनाक्षीला केंव्हाही फोन करू शकत असे . मात्र बाकीच्या गोष्टी पूर्वीसारख्याच राहिल्या. रेवती सिनेमाच्या क्षेत्रात असल्याने समोरच्याशी अन्तर ठेऊन कसे राहायचे याची कला तिला चांगली अवगत होती.

-----------------------------------------------------------------------------------------

एकदा रेवती अंघोळीला गेली असताना केदारने मीनाक्षीला फोन लावला...

“हल्लो .गडबडीत आहेस का?”

“नाही आता माझी द्दुपारी एकची शिफ्ट असल्याने सकाळी एवढी गडबड उडत नाही.”

“पण रात्री नऊ पर्यंत अश्विन एकटा राहतो का?”

“शाळा सुटली की तो रमाकांत भाऊजींच्या घरी जातो.दुकानातून येताना मी त्याला घेऊन घरी येते.”

“माझ्यामुळेच तुमची फरफट होतेय”

“असे काही नाही .आता आमचे छान रुटीन बसले आहे.? अहो तुम्हाला माहित आहे ना रेवतीने मला पंधरा लाखाचा डीडी पाठवलाय”

“काय सांगतेस? मला बोलली नाही . आणि तुला तिचे पैसे नको होते ना?”.

”अहो मी पैसे घेणार नव्हते .पण ती म्हणाली...

"अश्विनच्या शिक्षणासाठी पाठवलेत."

आणि म्हणाली...

"सावत्र असला तरी अश्विन तिचा मुलगाच आहे, त्याची सर्व जबाबदारी तिने घेतली आहे”.

“बापरे ,म्हणजे तुम्ही फोनवर बोलता?”

“हो ती अधून मधून फोन करते”

”मला एकावर एक शॉक बसायला लागलेत”

रेवती बाथरूममधून बाहेर आली. केदार तिच्या समीप गेला तिच्या दंडावर हात ठेवून तो सद्गदित होऊन म्हणाला...

“रेवा,मी तुझा शतश: ऋणी आहे . माझी मोठी चिंता दूर झाली.”

त्याचे हात दूर करत रुक्ष आवजात ती म्हणाली...

“एवढे काही नाही .मी माझे कर्तव्य केले . खरे तर उशीर झाला”

तसा हा प्रसंग अगदी हृद्यस्पर्शी होता, पण रेवतीने शांतपणे त्याच्यावर बोळा फिरवला.

--------------------------------------------------------------------------------------

( क्रमश: )

Group content visibility: 
Use group defaults

केदार ला मारू नका हां.
मला आता जाम भिती वाटायला लागलिय.
जाऊदे ते लग्न बिगन. सुरक्षित घरी आला म्हणजे झालं.

सगळे भाग वाचतेय.
संपल्यावरच प्रतिसाद देणार होते पण आज अगदीच विचारावसं वाट्लं .. केदार सारखे लोक असतात का?
एवढे दिवस कुणी असं रहातं का? तेही स्व्तः च्या बायको मुलांना सोडून..!
तो का विचारु शकत नाही..की नेमकं काय चाललयं? का लग्न करायला लावलं? केस केली की नांदवत नाही.. आणि तो आता स्वतः आलाय तर नवर्याचा अधिकारही देत नाहीये त्याला..असं कोण सहन करेल? तेही थोडे दिवस नाही तर काही महिने झालेत त्याला तिकडे येऊन..कुणीही सोक्ष मोक्ष लावला असता. केदार काहीच बोलत नाही ,कुणाला काही विचारत नाही..हे मुळीच पटत नाही.

बी एस , अगदी अगदी
त्याने आल्याबरोबर रेवती ला जाब विचारायला हवा होता. काहीच नाही तर गेला बाजार, रेवती वरच केस करायला हवी होती की संसारसुख नाही. अन या कारणावरून घटस्फोट हवा अन पोटगी सुद्धा. मागू शकतो तो की त्याच्याकडे काम नाही अन रेवती कमावती आहे.
पण तो नुसता पडून आहे तिथे , म्हणूनच तर मी गेल्या भागात विचारले होते की अशी कणाहीन माणसे असतात का?

Bs and vb++
Na patanyasarakhe kathanak so far.

असतात की अशी माणसे.. पापभीरु म्हणजे भित्री म्हणा हव तर.. आधी विचार न करता लग्न केले अन आता फसला.. काहीही करण्याची, अ‍ॅक्शन घेण्याची हिंमत नसलेली, दुसर्याच्या कला ने चालणारी, घाबरट माणसे प्रत्यक्ष ही दिस्तात की.. अर्थात सिनेमात, कादंबरीत थोडे अधिक दाखवतात्/रंगवतात. असो.