बिग बँग थेअरी - द सिरीयल

Submitted by aschig on 12 March, 2012 - 19:56

बिग बँग थेअरी वर येथे चर्चा झाली आहे का? असल्यास सांगा - तिथे उडी मारेन.

आत्ता हे आठवायचे कारण म्हणजे सध्या स्टिफन हॉकींग कॅलटेकला आहेत (त्यांचा वार्षीक दौरा) आणि ते चक्क ५ एप्रीलच्या बिग बँग थेअरीच्या प्रकरणात अवतरणार आहेत.

http://www.cbs.com/shows/big_bang_theory/photos/62583/behind-the-scenes/...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉवर्डच्या लग्नातही मिसेस वॉलोविट्झ दिसतात.
आणि ते हात राजला ओढतात. हॉवर्ड नसताना राज रात्री त्याच्या घरी राहतो तेव्हा.

हॉवर्डच्या लग्नातही मिसेस वॉलोविट्झ दिसतात.>> नाही दिसत. त्या लांब बसलेल्या असतात. त्यावेळचे हावर्ड आणि त्यांचे संवाद भारी आहेत.

बर्नाडेट पहिल्यांदाच त्यांची कॉपी मारते तो प्रसंग सही होता (हॉस्पिटलमधला)

नाही दिसत. त्या लांब बसलेल्या असतात. त्यावेळचे हावर्ड आणि त्यांचे संवाद भारी आहेत. >>>>> अनुमोदन नंदिनी.. नाही दिसत त्या लग्नात... एका कुठल्यातरी फोटोमध्ये बहुतेक आहेत पण चेहेरा नाहीच दिसत.. पक्त कोणतरी आहे इतकच समजतं..

हो हो. खिडकीतून राजला आत खेचतानाच लिहायचं होतं चुकून हावर्ड झालं. त्याच एपिसोडमध्ये त्यांना किचनमधून इकडेतिकडे जाताना दाखवलं आहे.

लग्नात त्या दिसतात! एरिअल शॉटमध्ये आहेत. कुठे लिंक मिळाली तर देते.

>>
मृ.. ते जे काय आहे त्याला 'दिसणं' म्हणणार का? ती लाल रंगाची गारबेज बॅग म्हणून पण खपेल.. फिदीफिदी>> हो, खरंच.

Lol 'चंद्रावरचे खड्डे किंवा अफूची चोरटी आयात करणारी टोळी' आठवली.

'तिचं तिथे असणं निव्वळ आवाजावरून सूचित न करता काही क्षणांपुरतं का होईना, तिला दाखवलं आहे' म्हंटलं तर फोलपटं काढतात. Proud

शेवटचा सीझन पाहिला का कुणी?
मी ४-५ एपि. पाहिले असतील.
काल फिनाले झाली. २ भागांचा स्वीट एंड झाला सीरीज चा. सगळ्या कॅरेक्टर्स ना त्यांच्या त्यांच्या परीने हाय नोट वर नेऊन सोडले आहे. बाकी डीटेल्स नाही लिहीत.
एकूण १२ पैकी सगळेच सीझन तेवढेच ग्रेट होते असे नाही पण तरी ही सीरीज भरपूर एंजॉय केली.

मी आजच पाहिले शेवटचे दोन एपिसोड. सिरीज एकदम संपल्याने थोडा धक्काच बसला. दोन-तीन वर्षांपासून मजा नव्हती येत पूर्वीसारखी पण कॉलेजपासून पाहत असल्याने भावनिक जवळीक होती त्या सिरीज बरोबर. शेवटच्या भागात एकदाची त्यांची लिफ्ट सुरु होते पुन्हा .. बझींगा Happy
हि सिरीज संपली आता गॉट पण संपेल ..
somehow with these things coming to an end, kind of reminding me about end of my youthful days Sad

सुरुवातीचे एपिसोड खूप आवडत असे पण नंतर सोडून दिलं .खूपच बोअर झाला शो. शेल्डन खूप आवडतो पण बाकीचे लोक केवळ शेल्डनचे सहकलाकार म्हणूनच आवडत होते. मला त्यांच्या individual tracks मध्ये रस नव्हता.
याउलट फ्रेंड्स मध्ये सुरुवातीपासून सहा जण equal फोकसमध्ये होते आणि आवडत होते.

मला आवडला फायनल एपिसोड.
शेल्डन चं थँक्स स्पीच मध्ये लेनार्ड चा उल्लेख सर्वात शेवटी करणं जरा अँटी क्लायमॅक्स वाटला.
पण चांगला शेवट.

Penny Never Wanted Kids on The Big Bang Theory, So Why Did She Wind Up Pregnant? >>> मध्यम वर्गीय मानसिकता हो दुसरं काय !!

ते मला माहीत नाही. पण तुमची पोस्ट दिसल्यावर काहीतरी मध्यमवर्गीय मानसिकतेचाच प्रॉब्लेम असणार असं असझ्युम करून टाकून दिली आपली पोस्ट Proud

Pages