बिग बँग थेअरी - द सिरीयल

Submitted by aschig on 12 March, 2012 - 19:56

बिग बँग थेअरी वर येथे चर्चा झाली आहे का? असल्यास सांगा - तिथे उडी मारेन.

आत्ता हे आठवायचे कारण म्हणजे सध्या स्टिफन हॉकींग कॅलटेकला आहेत (त्यांचा वार्षीक दौरा) आणि ते चक्क ५ एप्रीलच्या बिग बँग थेअरीच्या प्रकरणात अवतरणार आहेत.

http://www.cbs.com/shows/big_bang_theory/photos/62583/behind-the-scenes/...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> तुम्हाला असे वाटते का ?

अजून तरी तसं वाटलं नाहीये ..

सीबीएस् डॉट कॉम वर वर सीझन ६ चे एपिसोड्स आहेत का? बघते ..

सीबीएस् डॉट कॉम वर वर सीझन ६ चे एपिसोड्स आहेत

माझी आवडती सिरीअल. अशी लोक दिसतात शेल्ड्न सारखी. पेनी सारखी. त्यामुळे पटते.

देशात सध्या कुठल्या चॅनेलवर आणि कितवा सीझन चालू आहे?
पाचव्यातले काही भाग पाह्यले. पण आता कुठेच दिसत नाहीये.

>> तुम्हाला असे वाटते का ?

मला तसे नाही वाटत. मात्र शेल्डन ला बघुन Star-Trek Voyager मधल्या Seven of Nine ची आठवण येते. शेल्डन च कॅरॅक्टर त्या पासुन प्रेरीत झाल्यासारखे वाटते. Full knowledge; zero socialization.

धन्यवाद पराग. आता सर्व पेअर अप झाले म्हणजे हाउ आय मेट युअर मदर च्या अंगाने जाणार सिरीअल असे वाटले म्हणून बंद केली असे. राज गे आहे का? असं वाटलं

पहिले दोन भाग दाखवले सीझनची सुरुवात म्हणून. आधीच्या ३-४ सीझन्सची मजा नाही. आता जे काय दाखवलं ते ४-६ मित्रमंडळी असलेल्या इतर विनोदी सिरियल्ससारखं वाटलं.

एक भाग पाहिला त्यात हॉवर्डच्या वडिलांबद्दल इमोशनल पार्ट दाखवला. कशाला उगाच कारुण्याची झालर वगैरे लावतात.

हो Happy अणि त्यावरून हावर्ड आणि एमीचं बाँडिंग हा सगळ्यात अनलाइकली प्रकार Happy
त्यावरून आठवलं, हावर्ड एम आय टि, एमी हार्वर्ड, लेनर्ड प्रिन्सटन, पण शेल्डन कुठला ? कधी रेफेअर्न्स आलाय का पूर्वी ??

ह्यातही क्लिअर नाहीये

>>Sheldon entered college at the age of eleven,[14][15] and at age fourteen, he graduated from college summa cum laude. From then, he worked on his doctorate, was a visiting professor at the University of Heidelberg in Germany and was the youngest person at the time to receive the Stephenson Award.[1]
He received his Ph.D. degree at sixteen years old, and is now a theoretical physicist doing research at Caltech.>>

शेवटचा भाग पाहिला का? हॉवर्ड ने बर्नाडेट साठी लिहिलेल गाण मस्त होत. शेल्डन आणि एमी च पुढे काय होतय ह्याची पण उत्सुकता लागलिये. Writers ना खुप विचार करायला लागणारे कारण काहीतरी एकदम awesome दाखवायला लागणारे.

सॅड न्यूज ! Sad Mrs. Wolowitz सही कॅरेक्टर आहे! फक्त आवाज वापरून कॅरेक्टर उभं केलं होतं ते.

वाईट बातमी. कसला गोड चेहरा आणि गोड हसू. कॅरोल अ‍ॅन सुसी ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सदैव शांती लाभो हीच ईशचरणी प्रार्थना.

मी म्हटलं बी ला गोड चेहरा आणि गोड हसू कधी आणि कुठे दिसलं?!
>>Mrs. Wolowitz सही कॅरेक्टर आहे! फक्त आवाज वापरून कॅरेक्टर उभं केलं होतं ते.>> तेच ना. मिस होईल तिचा आवाज.

ओ वाईट बातमी
Mrs. Wolowitz सही कॅरेक्टर आहे! फक्त आवाज वापरून कॅरेक्टर उभं केलं होतं ते.>> +१ मी बरेच एपिसोड तिला पडद्यावर बघायची वाट पाहात होते. मला नेहमी वाटायच मी तिचा पार्ट मिस केला. फक्त आवाजाची कॉन्सेप्ट माहीत नव्हती. नंतर लक्श्यात आल फक्त आवाजच आहे कॅरक्टरचा..

व्हेरी सॅड!

फक्त एकदा हावर्डला खिडकीतून घरात खेचताना मिसेस वॉलोविट्झचे हात दिसतात. Happy एरवी निव्वळ आवाजानं धमाल आणणारं कॅरेक्टर उत्तम वठवलंय.

फक्त एकदा हावर्डला खिडकीतून घरात खेचताना मिसेस वॉलोविट्झचे हात दिसतात. स्मित एरवी निव्वळ आवाजानं धमाल आणणारं कॅरेक्टर उत्तम वठवलंय. >> हॉवर्ड नसताना राज overnight तिथे राहतो त्यात किचनमधे एक जाडजुड बाई जाताना दाखवली आहे, चेहरा दिसत नाही फक्त गुलाबी रोब दिसतो.
तो खेचून काढलेला आवाज लक्षात राहील नेहमीच.

RIP Carol...

Wolowitz परिवारात येऊन Bernadette पण छान ओरडायला शिकली, but no one could beat Carol

Pages