मॅरेज Mystique ! ( भाग १४ )

Submitted by र. दि. रा. on 16 May, 2019 - 23:11

मागील भाग १३ : https://www.maayboli.com/node/69963

भाग १४ :

केदार असेच उपेक्षित जीवन कंठत होता. तो इथे येऊन आठ दिवस झाले असतील . एके दिवशी तो हॉलमध्ये बसलेला असताना लॉन्ड्रीचा माणूस कपडे न्यायला आला. रोहिदासने [लूज स्क्रूवाला नोकर ] इस्त्रीचे कपडे मोजून दिले . केदार म्हणाला...

“जरा थांब माझे पण कपडे आहेत.”

केदार वर जाऊन स्व:तचे कपडे घेऊन आला . इस्त्रीवाल्याने रोहिदासला विचारले...

“ पाहुण्याचे कपडे घ्यायला सांगितलेत का रे ?”

रोहिदास गांगरून गेला .इतका गहन प्रश्न त्याला कोणी कधी विचारला नव्हता. इस्त्रीवाला म्हणला...

“तुम्ही अण्णासाहेबाना विचारून ठेवा.मी पुढच्या वेळेला नेतो”

”एवढ्या क्षुल्लक गोष्टीत काय विचारायचे.? तू कपडे नेणार की नाही ते सांग.”

“आधी विचारलेले बरे असते हो.नंतर कीटकीट नको.”

“तुला माझे कपडे न्यायचे नसले ना तर सगळेच ठेव.मी घरी इस्त्री करतो.”

त्यांची वादावादी ऐकून रोहिदास आत पळाला आणि शिवरामला घेऊन आला. शिवरामने सगळे ऐकून मग निर्णय दिला...

“हा घे ना .“

केदारला तो अपमान जिव्हारी लागला. म्हणजे माझी लायकी या शिवराम पेक्षा खालची आहे ?त्याच्या डोक्याची शीर उडायला लागली. रागाच्या भरात त्याने जवळचे वर्तमानपत्र टराटर फाडले. डोक्यातून येणारी कळ डोके हाताने दाबून सहन केली. जवळ मोलकरीण होती ती म्हणाली...

”दादा त्याच्याकडे नका लक्ष देवू. त्याचा स्क्रू ढिला आहे”

केदार उठून रुममध्ये आला . शांत पडून राहिला. मन मोकळे करायलाही कोणी नव्हते.

--------------------------------------------------------------

सायंकाळची वेळ होती.मिनाक्षी शिवणटिपण करीत बसली होती.रमाकांत आला. दारातूनच म्हणाला...

“येवू का वाहिनी ?”

“अहो या ना.बरेच दिवसांनी आलात.”

“यायचं अस रोज ठरवतोय.पण जमतच नाही”

“आणि काय विशेष?”

“केदारचा फोन येतो का?कसे चाललय त्याचे”.

”फोन झाला चार पाच वेळा . ते तिथे खूष नाहीत”

“ते लोक त्याला त्रास देतात का?”

“त्रास असा काही नाही.पण त्यांच्याशी फारसे कोणी बोलत नाही.चहा नाश्ता मागून घ्यावा लागतो.जेवण टेबलावर झाकून ठेवलेले असते. स्व:त वाढून घ्यावे लागते.त्यांना अगदी उपऱ्या सारखे वाटते.”

“अवघड झाले की.बाहेर फिरायला तरी परवानगी आहे का नाही ? का नजरकैदेत ठेवलाय?”

“हे अजून कुठे बाहेर गेलेले नाहीत. जाणार तरी कुठे ? मुंबईची काही माहिती नाही , कोणी ओळखीचे नाही.”

“वाहिनी,काय प्रकार असेल हा. केदार म्हणायचा हे काही तरी कट कारस्थान आहे . खरच तसे काही असेल?

“मी पण खूप विचार केला?पण काही कळत नाही?”

विषय बदलत रमाकांत म्हणाला...

“वाहिनी एक गोष्ट विचारायची होती.”

“अहो बोला की.त्यासाठी एवढी प्रस्तावना कशाला?”

“शास्त्रीरोडवर एक दागिन्याचे दुकान आहे बघा . त्याचा मालक माझ्या ओळखीचा आहे. तो विचारात होता की तुम्ही दुकानात काम कराल का?”

”काय काम करावे लागेल?”

“काम म्हणजे काउंटर सांभाळायचा.”

“सोबत इतरही बायका असतील ना?”

“एका वेळी तीन चार जणी असतात.”

“मी तयार आहे.मला ही नोकरी मिळाली तर आमच्या महिन्याच्या खर्चाची सोय झाली”.

-----------------------------------------------------------------------------

गेल्या पंधरा दिवसात केदारची अण्णासाहेबांशी दोनदा आणि रेवतीशी तीनदा भेट झाली . रेवतीचे त्याच्याशी बोलणे औपचारिक होते. मुंबईत ट्राफिकचा फार त्रास असतो. हल्ली छानशी थंडी पडत नाही वगैरे. अण्णासाहेबांनी त्याची तोंडदेखली चौकशी केली आणि काही लागल तर शिवरामला सांगा तो देइल असे सांगितले.केदारला काही inconvenience आहे याची त्यांना जाणीवच नव्हती.त्यामुळे त्यांनी काही सुधारणा करण्याचा प्रश्नच नव्हता. एकदा केदारने रेवतीला भेटायचेच असे ठरविले. चहा झाल्यावर तो हॉलमध्ये बसून राहिला. दहाच्या सुमारास रेवती तयार होऊन आली. केदारला पाहून माफक हसत त्याच्या समोर बसली. केदार म्हणाला...

“किती दिवसांनी भेटतोय आपण.”

“सोमवारी तर बोललो की आपण”

“ते काय, तू गाडीत बसता बसता चार शब्द बोललो. ते काही बोलल्यासारखे वाटलेच नाही”

“काही बोलायचे आहे का?”

“म्हणजे एखाद्या विषयवर बोलायचे असे नाही.सहज गप्पागोष्टी केल्या म्हणजे बरे वाटते.”

“ह”

“हे लोक म्हणाले तू नऊ वाजता जातेस .म्हणून मी नऊ वाजता येऊन थांबत असतो. तरीही तुझी भेट होतच नव्हती”

“आमचे ऑफिस टाइम असे न कधी सातला बोलावतात तरी कधी बारा नंतर माझे काम असते.”

“पण तू लवकर गेलीस तरी परत यायला तुला उशीरच होतो.”

“डबल शिफ उशीर होतो..”

“पण तू फार वेळ बाहेर बाहेर असतेस “

“सध्या तीन शूट एकदम सुरु आहेत.एरवी मी इतकी बिझी नसते”

केदारला जाणवले की ती परक्या माणसाशी बोलावे तसे बोलते आहे .

रेवती म्हणाली...
‘”मी निघू का? तसा थोडा उशीरच झालाय.”

“हो .ट्राफिक लागला तर उशीर व्हायचा. बाय”

ती गेल्यावर केदार म्हणाला मी तुझा नवरा असण्यापेक्षा तुझा फॅन असतो तर बरे झाले असते . आठवड्यातून एकदा तू माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या असत्यास .

---------------------------------------------------------------------

केदारला कर्णिकाचे येऊन तीन आठवडे झाले.तो आपला पेइंग गेस्ट सारखा राहत अण्णासाहेब आणि रेवती फूल बिझी होते . त्यांना कोणासाठी वेळ नव्हता . शर्मिष्ठाचे जगच निराळे होते .तिचे कॉलेज, क्लासेस गायनाची प्रक्टिस यात तिचा वेळ जायचा . वहिनीसाहेब दिवसभर काय करतात हे केदारला कधीच कळले नाही.स्वयंपाक करण्यासाठी शांताबाई असूनही त्या बराच वेळ किचनमध्येच असत.बराच वेळ देव घरात असत.दुपारी वामकुक्षीसाठी पाहिल्या मजल्यावर त्याच्या खोलीत जात.पण हॉलमध्ये क्वचितच येत. आल्यातरी केदारशी काहीही बोलत नसत. जेवणाच्या टेबलावर अण्णासाहेबांची अधून मधून भेट होई.त्यावेळी सुद्धा अण्णासाहेब जुजबी बोलत. उदाहरणार्थ...

“तुम्हाला आमच्याकडचा स्वयंपाक आवडतो ना? तुमची आवड निवड शांताबाईना सांगत जा”

अर्थात जेवणात न आवड्यासारखे काही नसे. शांताबाई फार पौष्टिक आणि रुचकर स्वयंपाक करीत.त्यामुळे तो भरपूर जेवत असे. शिवाय मधल्या वेळी किंवा सकाळी चहाचे वेळी केदारने शिवरामकडे काही खायला मागितले की तो डीश भरून पोहे ,सामोसे ,शिरा, थालीपीठ असले काही तरी चमचमीत खाद्य आणून ठेवत असे.त्यामुळे केदारचा आहार खूप वाढला. एकीकडे कंटाळवाणे रिकामपण,आपल्याल परकेपणाची वागणूक मिळते म्हणून वाटणारी खंत,आणि जास्तीचे खाणे याचा परिणाम असा झाला की केदारला अपचनाचा त्रास होवू लागला . असिडीटीचा त्रास होऊ लागला.भरीस भर म्हणजे त्याचे मानसिक स्वास्थ्यही बिघडले.तो सतत विचार करत असे की रेवतीने आपल्याशी लग्न का केले., कोर्ट केस का केली.आणि आपल्याला , इथे यायला का लावले.त्याला मनोमन अशी धास्ती वाटायला लागली की या मागे काहीतरी कारस्थान आहे.आणि त्यामुळे आपण मोठ्या संकटात सापडणार आहोत.अश्या मनस्थितीमुळे तो उदास , चिंताक्रांत बसलेला असे.
एका घटनेमुळे या समजुतीला दुजोरा मिळाला. एकदा तो अगदी सहज शिवरामला म्हणाला...

“आधी अण्णासाहेब छोटे बिल्डर होते, आता एकदम डेबिल्डरझालेत. भानगड कायआहे "

शिवराम तडकलाच...

“केदार साहेब ,तुम्ही मला असले काही विचारात जाऊ नका .तुम्हाला काही पाहिजे असेल तर सांगा.बाकी पंचायती कशाला पाहिजेत ? तुम्ही नाथा माळीला काहीबाही विचारत असता .अण्णासाहेबांना ते आवडत नाही.”

केदारची खात्रीच झाली दालमे कुछ काला है !

--------------------------------------------------------------------------------------

एका सायंकाळी तो असा बसला असताना शर्मिष्ठा आली. त्याचा भकास अवतार पाहून ती आवाक झाली.त्याच्या जवळ बसत ती म्हणाली...

“जीजू तुम्ही इतके थकलेले का वाटताय .तुमची तब्येत तरी ठीक आहे ना”

“हो. माझी तब्येत चांगली आहे.”

“जीजू तुम्ही कुठे बाहेर जाता की नाही ?. फिरायला किंवा पार्कमध्ये वगैरे.”

“नाही,कुठेच नाही .”

“मग? तुम्ही चोवीस तास स्व:तला घरात कोंडून घेतलत तर वैताग येणारच ना “

“मी कुठे जाणार? मला मुंबईची काही माहिती नाही .माझ्या ओळखीचेही कोणी नाही ?”.

“इथे मेन रोडवर ‘किताबमिनार’ नावाची लायब्ररी आहे.आपण ती सुरु करूया. पुस्तक बदलण्याच्या कारणाने तुमचे फिरणे होईल आणि लायब्ररीत तुम्हाला मित्रही भेटतील”

“अरे,खरंच की साधी सोपी आणि मस्त आयडिया आहे. मी उद्या सकाळी पहिले काम हे करतो”

“उद्या नाही .आपण आत्ताच जायचे . चला मी तुम्हाला लायब्ररी दाखवते”.

”तू कशाला तुझा वेळ घालवतेस .मी एकटा जाईन”

“मी तुम्हाला घेऊन जाणार.तेही आत्ताच.”

शर्मिष्ठा केदारला घेऊन लायब्ररीत आली. केदारने ७०० रुपये भरून मेंबरशिप घेतल .जयवंत दळवीची अधांतर ही कादंबरी घेतली.
बाहेर आल्यावर शर्मिष्ठा म्हणाली...

“जीजू,एस्पिडीपी खाऊया ? केदारला त्याचा अर्थ कळला नाही.पण शर्मिष्ठा म्हणते म्हणजे छानच असणार.तो म्हणाला...
”चल खाऊया”

दोघांनी तो दहीपुरीचा प्रकार खाल्ला . नंतर शर्मिष्ठा मैत्रिणीकडे गेली .
केदार रमत गमत घरी आला.एक छोटीशी गोष्ट पण केदारचा मूड बनला . –

----------------------------------------------------------------------------

केदार कर्णिकांच्या घरी रहायला येऊन महिना झाला .हळू हळू तो या घराला सरावत होता. जी परिस्थिती आहे ती स्वीकारून त्यातच आनंद मानायचा असे तो मनाला समजावत होता.आता तो फिरायला बंगल्याबाहेर पडत होता.लायब्ररीत त्याला शिंत्रे नावाचे गृहस्थ भेटले.ते वयाने साठीचे होते तरीही ते केदारचे मित्र झाले होते.मनातल्या गोष्टी तो त्यांचेशी बोलत होता .ते ही त्याला सल्ला मसलत देत होते.
अशीच सकाळची वेळ होती.तो अंघोळ करून खाली आला .त्याला वाटले बाहेर जाण्यापूर्वी देवघरात जाऊन देवाला नमस्कार करावा. आईसाहेबांशी काही संवाद होतो का ते पाहावे. तो देवघरात गेला.सुनंदाबाई स्तोत्र म्हणत होत्या.तो दिसताच त्या म्हणाल्या...

“तुम्हाला काही हवय का?शिवरामला सांगा तो देईल “

“आईसाहेब मला काही नको आहे.मी फक्त देवाला नमस्कार करायला आलोय.”

त्या मागे सरकल्या ,जणू काही त्याला नमस्कार करायला जागा कमी पडत होती.देव्हाऱ्याकडे हाताने निर्देश करीत त्या म्हणाल्या “ह !”.

देवाला नमस्कार करून तो म्हणाला...

“आईसाहेब, माझे काही चुकतंय का/? माझ्याशी कुणीच का बोलत नाही.”

“मला त्यातले काही माहित नाही . तुमची अडचण यांना सांगा.”

त्यानी स्तोत्र पुटपुटायला सुरुवात केली आणि विषय संपल्याचे सूचित केले..

केदार बाहेर आला.सोफ्यावर बसून पेपर वाचायचा प्रयत्न करू लागला. पण त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले.आईसाहेब असे विसंगत का बोलत होत्या?मला त्यातले काही माहित नाही. .या विधानाचा अर्थ काय?त्यातले म्हणजे कशातले ?याचा अर्थ रेवतीचे व आपले लग्न कोर्ट केस आणि आपले इथे येणे यात काहीतरी काळेबेरे आहे?आणि ते फक्त अण्णासाहेबाना माहित आहे. आईसाहेबाना काहीच माहित नाही.केदारच्या डोक्यात उलट सुलट विचारांनी गर्दी केली. तो संतापला.त्याच्या डोक्यात तिडीक उठली. त्याने हातातले वर्तमानपत्र टराटरा फाडले डोक्यात येणारी कळ सहन व्हावी म्हणून डोके दाबून धरले. थोड्यावेळाने त्याच्या नाकपुडीत रक्ताचा थेंब जमा झाला.शिवराम पुढे आला.त्याला आधार देऊन बेसिनवर घेवून गेला .केदारने तोंड धुतले. शिवरामने त्याला थंड दूध प्यायला दिले तो म्हणाला “शांताबाई स्वयंपाकात हिरवी मिरची जादा वापरतात.मी कमी करायलासांगतो”

------------------------------------------------------------------------ .
दुपारचा दीड वाजण्याचा सुमार .केदार जेवण करून हात धूत होता तेवढ्यात फोनची रिंग वाजली.केदारने फोन घेतला “हॅलो, कर्णिक बंगला”.

रेवतीला अपेक्षित होते की शिवराम फोन उचलेल. वेगळा आवाज ऐकून ती गोंधळली . ती म्हणाली “आपण कोण बोलताय?”

“रेवती ना ? बोल . मी केदार बोलतोय “

“अच्छा ,तुम्ही फोन घेतलाय का? शांताबाइना एक निरोप द्यायचाय.आजचे शुटींग कॅन्सल झालय.मी जेवायला घरी येतेय , एवढे सांगा “
“ओके .ये . मी शांताबाईना सांगतो.”

फोन ठेऊन केदारने हाक मारली...

“शांताबाई ,अहो शांताबाई “

हाकेला उत्तर मिळले नाही.केदार किचनमध्ये जाऊन पाहतो ,तर शांताबाई दिसत नाहीत .
त्याने गेटवर फोन लावला...

“ शांताबाई गेल्या काय?”

वॉचमन - “आज शांताबाई आल्या नाहीत.”

केदार फोन ठेवतो.इतक्यात त्याला रोहिदास दिसला केदारने विचारले...

“आज शांताबाई आल्या नाहीत का?”

“नाही आल्या “

“मग स्वयंपाक कोणी केला”.

”तुमचे जेवण गीताबाईनी बनवले. वाहिनी साहेबांनी त्यांच्यापुरते बनवले.”

“अरे देवा ”

केदारने कट्ट्यावर ,फ्रीजमध्ये शोधले . जेवण काहीही शिल्लक नव्हते. त्याने स्वयंपाक करायचा निर्णय घेतला. फ्रीजमध्ये भाज्या निवडून चिरून ठेवलेल्या सापडल्या. कणिक सुद्धा मळून ठेवलेली होती. केदारने पालक पनीर ,चपाती ,आणि भात असा मेनू निश्चित केला.केदार नोकरीच्या सुरुवातीच्या काळात एकटा रहात होता.त्यावेळी तो घरी स्वयंपाक करीत असे .तेवढ्या अनुभवाच्या बळावर त्याने भाताचा कुकर लावला. चपात्या चांगल्या गोलाकार व्हाव्यात म्हणून लाटलेल्या पोळीवर अल्युमिनियम डब्याचे झाकण दाबून कात्रण काढून टाकणे ,भाजी चवदार व्हावी म्हणून तेल आणि मसाला सढळ हाताने वापरणे, अश्या ट्रिक्स त्याने वापरल्या .पण एका गोष्टीचे त्यालाच नवल वाटले कारण भातही अगदी मोकळा झाला होता.सगळा स्वयंपाक झाल्यावर त्याने टेबलावर व्यवस्थित मांडून ठेवला .तो मनात म्हणाला ये आता केंव्हाही . थोड्याच वेळात रेवती आली. जेवता जेवता ती गप्पाही मारत होती.आज तिचा मूड छान होता. केदारने विचारले...

“शुटींग का कॅन्सल झाले?” ‘

“आज एका डान्सचे शुटींग होते.रिहर्सल व्यवस्थित झाली.पण शुटींग सुरु झाले आणि सिंक्रोनायझेशन होईचना. श्रीकांत सर चिडले .ते म्हणाले नीट प्रक्टिस झाल्याशिवाय मी शुटींग करणार नाही.पुन्हा अर्धा पाऊणतास प्रक्टिस केली.शुटींग सुरु झाल्यावर पुन्हा कोणीतरी चुकली. असे तीनदा झाले. मग श्रीकांत सर म्हणाले आज काही मूड दिसत नाही.उद्या तरी नीट करा.”

रेवती चवीने जेवत होती.गप्पा मारत होती. ती म्हणाली...

“किती दिवसांनी जेवायला घरी आहे. रोज पंजाबी जेऊन कंटाळा आला होता. हे साधे जेवण पण किती छान झालय. एवढ्यात शर्मिष्ठा आली रेवती म्हणाली...

“ये जेवायला,”

“जेवणारच आहे.आज डब्यात फक्त सॅन्डविचेस होती. ती पोरींनी टी ब्रेकमध्येच संपवली.”
रेवती आणि शर्मिष्ठाचे गप्पा मारत जेवण सुरु झाले. शर्मिष्ठा अचानक म्हणाली...

“जीजू आज स्वयंपाक तुम्ही केलाय?”.

केदार “अरे बापरे ,तू कसे ओळखलेस.?’”

शर्मिष्ठा...

“तुम्ही तीन पुरावे मागे ठेवलेत. त्यावरून मी ओळखले”
केदारच्या ओठात हसू मावेना तो म्हणाला...

“सांग तरी म्हणजे पुढच्या वेळेस काळजी घेईन “

शर्मिष्ठा...
“तुमच्या पोळ्या पूर्ण गोल आहेत. शांताबाईच्या त्रिकोणी असतात .पालक पनीर बनवायला हॉटेल किंग मसाला ‘मुक्त’ हाताने वापरला आहे. आणि तिसरा पॉइंट. रोजच्या भाताला शांताबाई दिल्ली राइस वापरात नाहीत.”

हसू आवरत केदार म्हणाला...

“तुझे निरीक्षण अतिशय सुक्ष्म आहे”

रेवतीला संकोच वाटला ती म्हणाली...

“तुम्ही कशाला करत बसलात. मी ऑमलेट वगैरे काहीतरी खाल्ले असते.”
थोडा वेळ वातावरण हळवे झाले.

शर्मिष्ठा म्हणाली...
“बघ दिदी तुला किती प्रेम करणारा नवरा मिळालाय. त्या प्रेमात विरघळून जा ”
रेवती म्हणाली -“मी प्रयत्न करतेय ना?’”

------------------------------------------------------------------------------

रेवती जिना उतरून हॉलमध्ये येते .हॉलमध्ये कोणी नसते. ती देवघरात जाते देवाला नमस्कार करते. आई तिला जवळ बसवून घेतात....

”खूपच धावपळ चालली आहे तुझी.”

“हो ना.तीन शुटींग चालू आहेत.”

“आणि यांचे चार प्रोजेक्ट चालू आहेत. झोपायला घरी येताय हेच उपकार आहेत.”

“आता पुन्हा इतके काम एकदम घेणार नाही. एका वेळी एकाच हे सूत्र पळणार”.

“हे गृहस्थ इथे किती दिवस राहणार आहेत?”.

“काय माहित किती दिवस राहतात ?” एवढे बोलून रेवती थांबली. नंतर म्हणाली...

“पण माझा नवरा म्हटल्यावर ते इथेच राहणार की.आणि ते परत गेले ना तरी ती मिनाक्षी त्यांना घरात घेईल की नाही कुणास ठाऊक?”

“एवढे सगळे समजतंय तर त्यांना अडगळीच्या खोलीत का ठेवलय ?काहीतरी चांगली व्यवस्था करा. करिअर पैसा अडका हे सगळे महत्वाचे आहेच. पण माणुसकी सोडून काही करू नका.”

“करायला गेलो काय आणि झाले काय?”

“खोट्याच्या कपाळी गोटा म्हणतात ना तशी तुमची गत झाली आहे .”

“आई तू असे म्हणायला लागलीस तर मला कोणाचा आधार आहे.?” ‘

“मी तुझी आई आहे. तुझ्या पाठीशी उभे राहणे माझे कर्तव्य आहे. पण माणुसकी सोडून वागू नको ”

“ ह !”

“त्या मायलेकारांचे तिकडे व्यवस्थित आहे ना ?. मुलाचे शिक्षण सुरळीत सुरु आहे ना?”

“असेल बहुतेक.पण मला नक्की माहित नाही”.

”तू चौकशी करायला नकोस? तो तुझा सावत्र मुलगा आहे.”

एवढ्यात शांताबाई येतात म्हणतात...
“अरे वा.दीदींना आज सुटी आहे वाटत.”

“अहो नाही .निघतेच आहे मी.उशीरच झालाय.”

रेवती जाते. शांताबाई वाहिनीसाहेबाना विचातात...
“आज काय स्वयंपाक करायचा आहे ?”

-----------------------------------------------------------------------------------------

नेहमी प्रमाणे केदार लायब्ररीत गेला. टेबलावर पडलेल्या पुस्तकामधून त्याने एक पुस्तक निवडले.लायब्ररीयन म्हणाली...

“हे पुस्तक शिंत्रेकाकानी घेतलय”.

शिंत्रे...
“घेऊ दे त्यांना.मी दुसरे बघतोय?”

केदार आणि शिन्त्रे आपापली पुस्तके घेऊन बाहेर पडले . शिंत्रे म्हणाले...
“चला मामा काणेकडे साबुदाणा खिचडी छान मिळते “.

“नको काका”

“अहो परक्या माणसासारखे नको नको काय म्हणता, मी बोलावतोय ना. मग यायचे”

केदार आणि शिंत्रे मामाकाणे हॉटेलात आले. शिंत्रे म्हणाले...
“रानडे तुम्ही नेहमी काळजीत दिसता घरी काही प्रॉब्लेम आहे का?”

“ प्रॉब्लेम म्हणजे मी स्व:तच एक प्रॉब्लेम झालोय. रेवतीचे आणि माझे लग्न कसे झाले त्याबद्दल मी तुम्हाला मागे सांगितले होते. खरे म्हणजे लग्नाचे वेळी त्यांनी रेवतीला पिडा आहे वगैरे कारण सांगितले होते. ते काही पटण्यासारखे नाही . पण तेही असुदे. हे लग्न गुप्त ठेवायचे ठरले होते. तर स्व:तच कोर्टात जाऊन जगभर डांगोरा पिटला. तिसरा मुद्दा. आता मला जाणवतेय की माझे इथे येणे कर्णिक मंडळीना आवडलेले नाही. मग मला येऊ नका असे त्यांनी स्पष्ट का नाही सांगितले. या सगळ्याचा अर्थ असा आहे की कोणत्या तरी कारणासाठी ते मला सांभाळत आहेत. उदाहरणार्थ अण्णाची आर्थिक उलाढाल गेल्या सहा महिन्यात प्रचंड वाढली आहे .बरेच गैर व्यवहार आहेत. जर एखादे प्रकरण उघडकीस आले तर ते मला पुढे करणार. या एका विचाराने मी सतत चिंताग्रस्त असतो.”

“तुम्ही अण्णासाहेबंच्या बिसनेसमध्ये पार्टनर आहात का ? “

“ नाही ”

“काही कागदपत्रावर तुमच्या सह्या घेतात का ?”

“नाही “

‘‘मग तुम्हाला ते कसे अडकवणार?”

“समजा त्यांचे एखादे प्रकरण उजेडात आले, तर ते म्हणणार हे सगळे आमच्या जावयाचे कारस्थान आहे. लोकांचे लक्ष माझ्याकडे डायव्हर्ट होणार. मला अटक होणार. यांना प्रकरण मिटवायला किवा पळून जायला अवधी मिळणार. नंतर मला पुराव्याअभावी सोडून देतील ही. पण समजात मी बदनाम झालेला असणार.”

“एवढे करण्यापेक्षा सरळ अण्णासाहेबाना विचारा ना. म्हणावे मला का डांबून ठेवलाय तेवढे सांगा.”

“असे अण्णासाहेबांनाच तोंडावर विचारायचे?”

“तुमच्या या अवस्थेला ते जबाबदार आहेत. नसती भीड काय कामाची ? तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. स्पष्ट विचारा”

केदार विचारात पडला हे आपल्याला निभेल का?

---------------------------------------------------------

( क्रमश: )

पुढील भाग १५ चा धागा...
https://www.maayboli.com/node/69988

Group content visibility: 
Use group defaults

कसलं सॉलिड आहे.
केदार ने चिडचिड कमी करायला हवी.नाकात रक्त वगैरे वाचून पुढे त्याला बीपी असणार आहे असं वाटलं.

छान लिहिलंय.
जस्ट डोन्ट किल केदार. (विनंती!)
बायका पोरं आहेत मागे, गेला तर वाईट वाटेल.

त्याने तिथे आल्या नंतर लगेच जाब विचारण की अस का वागत आहात ..का केस केलि हे विचारण जास्त संयुक्तिक नसतं का वाटलं ? किंवा नेहेले पे देहेला अस काहीतरी वागयला पाहिजे होत

केदार एकटा जेवतोय. नाकातून रक्त वगैरे म्हणजे त्याला स्लो पोयजनिंग पण करत असतील.
इतकं असून त्याच्या मनात मुख्य इच्छा रेवती शी जास्त बोलायला मिळावं, सहवास मिळावा ही आहे हे वाचून उगीच 'मेन विल बी मेन' वाटून गेलं.जरा नॉर्मल माणसाने या सर्व अन्याय, मनस्तापाबद्दल,नोकरी गेल्याबद्दल त्या सुंदरीचे आणि बापाचे दात पाडले असते.

जरा नॉर्मल माणसाने या सर्व अन्याय, मनस्तापाबद्दल,नोकरी गेल्याबद्दल त्या सुंदरीचे आणि बापाचे दात पाडले असते.>>>>>>>
Rofl

केदारने मुंबईला आल्यावर रेवतीच्याच रुममधे रहायला हवे होते Happy जावई ना तो !

>>>> अगदी हाच विचार पहिल्यांदा डोक्यात आला.
कथा पुढे सरकतच नाही अस मला तरी वाटतय

जरा नॉर्मल माणसाने या सर्व अन्याय, मनस्तापाबद्दल,नोकरी गेल्याबद्दल त्या सुंदरीचे आणि बापाचे दात पाडले असते. >>>> दात नसते पाडले पण असे कणाहीन वागला नसता हे नक्की. ईतकी लज्ज्जास्पद वागणुक कोणी कशी सहन करु शकतो?

केदारने मुंबईला आल्यावर रेवतीच्याच रुममधे रहायला हवे होते Happy जावई ना तो ! >>> + ११११ पण तो ईतका मेंढळट दाखविलाय त्यावरुन तर त्याच्यात तेव्हढी हिंमत असेल असे वाटत नाही.

पण तरी पुढे काय होइल अशी उस्तुकता लागली आहे

कूलदीप पवार एक नंबर.. जावयाची जात .. असच त्यांचे दात त्यांच्या घशात घालायला पाहिजे होते.. एक अजून चित्रपट होता..राजा गोसावी आणि रंजना चा..ती पण अडचणीला पोलिसांसमोर माझा नवरा म्हणुन सान्गते.."ही कशान धुन्दी आली" गाणवला

मस्त चाललीये कथा.. Happy
हडसून खडसून विचारायला पाहिजे केदारने ह्या सगळयंना.. एक चूक केली आहे त्याने तिची फळे भोगतोय बापडा..

केदारने कोर्टात सांगायला हवं होतं की तो तिला नांदवायला तयार आहे पण पिक्चरमध्ये काम वगैरे सोडावं लागेल. मग कळलं असतं.
बाकी कथा फार पुढे सरकत नाहीये. तुम्ही भाग रोज टाकताय हे बरंय.

प्रत्येक भाग वाचतेय व पुढच्या भागाची प्रतीक्ष करतेय पण अजून काहीही स्पष्ट झालेले दिसत नाही.

केदार इथे येऊन राहिलाय, मीनाक्षी तिकडे आरामात आहे, इकडेही सगळे आरामात. नक्की कोणाचा काय प्लॅन आहे स्पष्ट कधी होणार?