नमस्कार मायबोलीकर हो,
मायबोलीवर लेखन करायला लागल्यापासून दिलदार मनाच्या सदस्यांनी मला जो उदंड रसिकाश्रय दिला त्यातून मिळालेल्या स्फुर्तीतून माझ्या निवडक कथा व निवडक गझलांचा असे दोन संग्रह लवकरच प्रकाशित होत आहेत.
कथाकारी - यात मायबोलीवरच लिहिलेल्या काही काल्पनिक तर काही सत्य घटनांशी निगडीत अशा कथा असून मायबोलीकरांनी त्या आवडल्याची पावती दिल्यामुळेच त्या घेतलेल्या आहेत.
बेफिकिरी (२) - तब्बल दहा वर्षांनी प्रकाशित होत असलेला हा माझा दुसरा गझलसंग्रह! यात गझल परिचय या मायबोलीकरांनी गौरवलेल्या लेखाचे विस्तृतीकरण करून व अनेक बदल करून तो लेख समाविष्ट करण्यात आलेला आहे. तो लेख नवोदित गझलकारांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असा आहे. प्रकाशन समारंभ पार पडल्यानंतर मायबोलीवरील मूळ लेख मी संपादीत करून नवा लेख पोस्ट करेनच! तसेच या संग्रहात निवडक गझलाही आहेत.
अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर, मंगळवार दिनांक ७ मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळात हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. तपशीलवार पत्रिका सोबत जोडत आहेच.
उदार मायबोलीकरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती आहे.
लेखनक्षेत्रात मी जो काही आहे तो मायबोलीमुळेच आहे व त्याची नम्र जाणीव ठेवून मी कथाकारी या संग्रहाचे मनोगत पूर्णपणे मायबोलीलाच समर्पित केलेले आहे. तेही येथे देत आहे.
=====
कथाकारी या पुस्तकाचे मनोगतः
मायबोली.कॉम या आंतरजालीय संकेतस्थळावर मी लिहायला
लागल्यापासून तेथील वाचकांनी
मला आजवर, गेल्या दहा वर्षांत
उदंड रसिकाश्रय दिला. इतका
रसिकाश्रय मिळाला की
माझ्यातील लेखक जणू याच
स्थळामुळे निर्माण झाला असे
म्हणता येईल. या स्थळाचे
सर्वेसर्वा श्री अजय
गल्लेवाले व प्रशासक समीर
सरवटे यांचे मी मनापासून आभार
मानतो.
या स्थळावर मी कथा,
कादंबर्या, ललित, सामाजिक
लेख, गझल, कविता, विनोदी लेखन
अशा अनेक प्रकारचे लेखन केले व
हे लेखन करताना, इतरांचे लेखन
वाचताना, प्रतिक्रिया
वाचताना मला माझ्या लेखनातील
वैगुण्ये, कमतरता, चांगल्या
बाबी यांची अधिक जाण आली.
यातील बहुतेक सर्व
कादंबर्या व कथा अलीकडच्या
काळात अचानक व्हॉट्स अॅप
समुहांवर व्हायरल झाल्या आणि
मला महाराष्ट्रातून तसेच
परदेशातूनही चाहत्यांचे
संदेश येऊ लागले. मायबोलीवर
असलेले हे लेखन अशा प्रकारे
व्हायरल होण्याचे मला एकीकडे
वाईट वाटले तर दुसरीकडे
अंगावर मूठभर मांसही चढले.
अलीकडच्या काळात मी निवडलेली
जी वाट आहे तिने मला मायबोलीवर
लेखन करण्याइतका पुरेसा वेळ
दिला नाही. मात्र माझ्या
गेल्या दहा वर्षांच्या लेखन
कारकीर्दीला या संकेतस्थळाचा
एक भरभक्कम आधार लाभलेला आहे व
मी त्या स्थळाचा आजन्म ऋणी
राहीन. मायबोलीमुळे निर्माण
झालेल्या मोठ्या चाहत्या
वर्गाचा व मायबोलीबाहेरील
चाहत्यांचाही मी आजन्म ऋणी
राहीन.
त्याच स्थळावरील काही निवडक
कथांचा एक संग्रह असावा या
उद्देशाने हा कथासंग्रह
आपल्या हाती सोपवत आहे.
आशा आहे की आपल्याला या कथा
आवडतील व वेगळ्या वाटतील.
आपला अभिप्राय अवश्य
कळवावात.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
Congratulations sir..
Congratulations sir..
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !
मायबोली संबंधीचे मनोगत ही आवडले .
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.. !
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.. !!!!
मनोगत आवडले.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा...
अभिनंदन आणि शुभेच्छा...
खूप खूप अभिनंदन
खूप खूप अभिनंदन
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
कार्यक्रमाला येणे जमले नाही तरी पुस्तक नक्की विकत घेणार आणि वाचणार.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन बेफी..
अभिनंदन बेफी..
अभिनंदन !!
अभिनंदन !!
खूप खूप अभिनंदन!
खूप खूप अभिनंदन!
खायला असणार आहे का तिकडे की
खायला असणार आहे का तिकडे की घरुन जेवण करून यायचं? घसा ओला करायला पाणी तरी ठेवा हं. शेरोशायरी ऐकून एकच प्याल्याची आठवण यायची.(चंमतग)
अभिनंदन बेफिकीरजी
अभिनंदन बेफ़िकीरजी
Hardik Abhinandan Ani
Hardik Abhinandan Ani shubhechha.
बेफिजी, पुस्तक प्रकाशन
बेफिजी, पुस्तक प्रकाशन समारंभासाठी मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरीता खुप शुभेच्छा!
बे फी, कथासंग्रह कुठे मिळेल?
बे फी, कथासंग्रह कुठे मिळेल?
बुकगंगा वर शोधला पण मिळाला नाही
सुखी
आज पाहिला हा धागा.
आज पाहिला हा धागा.
पुन्हा असेल समारंभ तेव्हां येईन (माझा ओरिजिनल आयडी येईल). ड्रेसकोड पाळू. पण असा ड्रेस तुम्ही पुरवणार का ?
गझल परीचय काय आहे ? गझल कशी लिहावी असे काहीसे होते तेच का हे ? मग त्याचे वेगळे पुस्तक काढा की. त्यात गझला नकोत. असे माझे मत.
कळवा त्या वेळी. पण वेळेत कळवा.
बेफिकीरजी...मनःपूर्वक अभिनंदन
बेफिकीरजी...मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा.
मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक
मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा! अशा अनेक तुझ्या कादंबर्या व कथासंग्रह प्रसिद्ध होवोत!
वाह! पुन्हा एकदा अभिनंदन आणि
वाह! पुन्हा एकदा अभिनंदन आणि पु.ले शु.
अजून अनेक साहित्य आपल्या नावाने प्रसिध्द होवो...
अभिनंदन ! शुभेच्छा !
अभिनंदन ! शुभेच्छा !
Pages