डॅनियल अंकलचा प्लम केक

Submitted by रमा. on 28 April, 2019 - 06:32

अंकलचा प्लम केक
अव्हनमध्ये होतो बेक
टाइम सेट केला तरी
हर मिनिट अंकलचा चेक

सारखा सांगतो येणाऱ्यांना
Do try, do try
माझ्या ग्रॅनीची स्पेशल रेसिपी
कशी काय, कशी काय?

असं कधीच झालं नाही
केक कधीच फसला नाही
तसं व्हायला नको म्हणून
अंकल कधीच बसला नाही

पहिला पीस काढून तो
आधी स्वतः करतो टेस्ट
मग टाळी वाजवून म्हणतो
डॅनियल यू आर द बेस्ट

- रमा

Group content visibility: 
Public - accessible to all site users