नितीन गडकरी आणि वैभव मांगले

Submitted by किरणुद्दीन on 27 April, 2019 - 22:16

हा धागा इतर कुठल्या ग्रुपमधे योग्य वाटेना म्हणून शेवटी इथे दिला आहे. जर प्रशासनाला अयोग्य वाटले तर योग्य त्या ग्रुप मधे हलवावा ही विनंती

दोन दिवसात वैभव मांगले आणि नितीन गडकरी यांना भोवळ आल्याच्या बातम्या होत्या. गडकरींना हा त्रास दुस-यांदा झाला आहे.
इतर कारणेही असतील. पण सध्या उन्हाळा तीव्र आहे. कलाकार आणि राजकारणी यांना भर उन्हाचेही फिरावे लागते. त्यातल्या त्यात निवडणुका असतील तर राजकारण्यांच्या बाबतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार.

त्यांनी काम केली की नाहीत, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्याची विचारधारा काय आहे हे सर्व अलाहिदा. मात्र ती माणसंच आहेत. त्यातच मंत्री वगैरेंना एसी ची सवय असेल तर अचानक एव्हढ्या तीव्र उन्हात, जिथे सामान्य माणसंही बाहेर पडायला धजावत यांना, यांना तसे करून चालत नाही.

या निवडणुकीत मोदींसहीत अनेक नेत्यांच्या सकाळच्या, दुपारच्या सभांना उन्हाचा फटका बसला. एका सभेचं टायमिंग दुपारी होतं. मी त्या पक्षाच्या प्रवक्त्याला विचारलं, " लोकांना एव्हढ्या उन्हात बसवायचं प्लानिंग कसं काय करता तुम्ही ?" तर त्याचं उत्तर होतं , " मग प्रचार कसा पूर्ण होणार ? आम्ही स्वतः या उन्हात दिवसभर आहोत" या नेत्याने सकाळी दहाची वेळ देऊन सायंकाळी चार वाजता सभा घेतली. सकाळी मैदान पूर्ण भरलेलं होतं. आत जायला जागा नव्हतॉ सायंकाळी चारपर्यंत ज्यांना खुर्च्या मिळालेल्या तेव्हढेच लोक शिल्लक राहीले. या उन्हात उभे राहणे शक्य आहे का ?

निवडणूक आयोगाने पुन्हा अशा सीझन मधे निवडणूक ठेवू नये. जानेवारी ते मार्च हा सीझन बेस्ट आहे. पण मग शाळा मिळत नाहीत. पावसाच्या वेळेत काही भागात मतदानकेंद्रापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. दिवाळी नंतर डिसेंबर अखेरपर्यंत निवडणुका घेणं शक्य होईल. तसेच २०१४ पासून सात टप्प्यात निवडणुका घेण्याची जी पद्धत चालू केलीय तिचाही फेरविचार व्हावा.

नेत्यांनीही काळजी घ्यावी. जान है तो जहान है. अशा कारणासाठी जिवावर बेतणे परवडणारे नाही. उन्हात जाणे टाळता येत नसेल तर जवळ लिंबू मीठ ठेवावे. एखादा रूमाल ओला करून मानेवर ठेवावा. टोपी आणि गॉगल मस्ट. बरे दिसणार नाही असा विचार करणे जिवावर बेतणारे ठरते. अनेकांना दिवसभर गरगरतेय. उष्म्याची लाट सुद्धा आहे.

सर्वांनीच काळजी घेतली पाहीजे.
पुण्यात जर ४२.६ तापमान असेल तर विदर्भात काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.

मायबोलीकरांनी अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी याची उजळणी केली तर सर्वांना फायदा होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विदर्भात काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.>> फार भयंकर उन्हाळा आहे इथे आताच. आणि अजून मे बाकी आहे.

दिवाळी नंतर डिसेंबर अखेरपर्यंत निवडणुका घेणं शक्य होईल. तसेच २०१४ पासून सात टप्प्यात निवडणुका घेण्याची जी पद्धत चालू केलीय तिचाही फेरविचार व्हावा.>>>>>
+ १११

प्रत्येकाला पुढ जायचय...कसही करून..हि rat race भयंकर.....जीवन क्षणभंगूर आहे....पण.हे कळून वळत नाही....100वर्षा पूर्वीचे लोकप्रीय नायक आहेत कुणाच्या लक्षात.?...हे माणसाच जगण अनैसर्गीक....प्राणी आपले कुठलेच आवेग दाबून ठेवत नाही हे अनैसर्गीक जगणच मोठी समस्या....मुळात जिवन कशासाठी या हेतूतच गल्लत झालीय....अनावश्यक वस्तूचा हव्यास....शेवटी.ईच्छारुपी भाड्याला भोक असते हेच विसरतोय....ईच्छेचा अंत कधीही होणार नाही....मी माझ्यापुरत ठरवून टाकलय...शनीवार सकाळी tracking कींवा bird photography.... दुपारचा माफक वीस्कि पीत वाचन झाडाखाली...किंवा जुनी रफी.कींवा मदन मोहनचि गाणी एकणे.....रवीवार.आराम करणे यात फारसा मी बदल करत.नाही...अर्थात छोट्या गावात असल्यामुळे ईथे जगण ही संथ आहे म्हणा....

प्रत्येकाला पुढ जायचय...कसही करून..हि rat race भयंकर.....जीवन क्षणभंगूर आहे....पण.हे कळून वळत नाही....100वर्षा पूर्वीचे लोकप्रीय नायक आहेत कुणाच्या लक्षात.?...हे माणसाच जगण अनैसर्गीक....प्राणी आपले कुठलेच आवेग दाबून ठेवत नाही हे अनैसर्गीक जगणच मोठी समस्या>>>>>+1

खरं आहे.प्रचार बिचार सगळं जीव वाचल्यावर.
आमदार वांजळे 40ज मध्ये हृदय विकाराने गेले.मांगलेना उन्हाने चक्कर आली.सिरीयस काही नाही.पण तरी बातमी वाचून भीती वाटलीच.
ओक्युपेशनल हझार्ड म्हणतात तसे या लोकांना सारखे फिरावे लागते.मुक्कामाच्या ठिकाणी खाणं पिणं राहण्याची व्यवस्था नेहमी चांगली असेलच असं नाही.मसालेदार जेवण,रात्रीचे प्रवास,झोपेची वाट यामुळे शरीर लवकर बोलायला लागतं.
हेच ड्रायव्हर लोकांचे पण.रात्री लांबचा पल्ला प्रवास करताना त्यांना दिवसा क्वालिटी विश्रांती मिळेलच असं कोणी बघत नाही.पैसे कमवायला, नाती निभावायला,कुटुंबाच्या आग्रहामुळे दिवसा पण अवांतर कामात दगदग होते.
भारतात प्रत्येक माणसाने स्वतःला प्रायोरिटी वर ठेवणं गरजेचं आहे.विश्रांतीची गरज असताना अमुक लग्न, तमुक इव्हेंट,तमका नातेवाईक, देवदर्शन यापेक्षा तब्येत आधी महत्वाची.ज्याने स्वतःचा ऑक्सिजन मास्क नीट लावला नाही तो दुसऱ्याला मास्क लावायला मदत करायला गेला तर स्वतः आणि दुसरा दोघांचेही जीव वाचवू शकणार नाही.

लेखामागील आपल्या भावना चांगल्या आहेत व हेतू चांगला आहे. त्यांचा अवमान करण्यासाठी लिहित नाही. पण गडकरी, मांगले यांची भोवळ आणि उन्हाळा/निवडणूक या सर्वांचा बादरायण संबंध जोडलागेला आहे. धाग्यातून जो संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे (निवडणूक आयोगाने पुन्हा अशा सीझन मधे निवडणूक ठेवू नये) त्याचा आणि मांगले यांच्या भोवळीचा काय संबंध कळला नाही. मग मांगलेच का? तसे पहिले तर देशात कित्येक हजार/लाख लोकांना दररोज भोवळ येत असेल.

मागच्या वेळी गडकरींना ऐन डिसेंबरमध्ये भोवळ आली होती. त्यामुळे त्यांच्या भोवळ येण्यामागचे कारण उन्हाळा नसून वेगळे काही असू शकते. वृत्तपत्रातून आणि माध्यमांतून सर्वच गोष्टी प्रसिद्ध केल्या जात नाहीत.

इनामदार +१.
सामान्य आणि अतिसामान्य लोक कडाक्याच्या उन्हाळ्यातही त्यांच्या पोटासाठी बाहेर पडतच असतात.
दुसरं , यानिमित्ताने ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाच्या र्हासाचा विचार होऊन , लोक त्याबद्दल सजग व क्रुतिशील झाले, राज्यकर्त्यांना प्रव्न विचारू लागले , तर बरं.

ज्यांना पूर्णवेळ सावलीत राहणे शक्य नाही किंवा उन्हाळ्यात खूप काम करावे लागते त्यांनी हिट इंडेक्स याबद्दल माहिती करून घ्यायला हवी. relative humidity आणि ambient temp यावरून हिट इंडेक्सचा तक्ता बनवला जातो. गुगल केल्यास मिळेल.

उन्हाळ्यात जर स्वास्थ्य राखायचे असेल तर काही नियम कसोशीने पाळावे लागतात.

आमच्या कंपनी कडून उन्हाळ्यात दर तासाला मोबाईल वर हिट इंडेक्स, त्या हिट इंडेक्सला किती वेळाने किती पाणी प्यावे, किती मिनिट काम केले की किती मिनिट रेस्ट घ्यावी याचे अपडेट येत असतात. जशी जशी हिट इंडेक्स वाढत जाईल तसे शाररिक श्रम असणारी आणि/किंवा उन्हात करायची कामे बंद करावी लागतात. 54 च्या वर हिट इंडेक्स गेल्यावर पूर्ण काम बंद करून ऑफिस मध्ये बसावे लागते.

उन्हाळ्यात ऑफिस मध्ये कॅफिन असलेले पदार्थ मिळत नाहीत. चहा कॉफी शीतपेये पूर्ण बंद.

शिवाय ज्यांचे जॉब्स स्ट्रेसफुल कॅटेगरी मध्ये येतात, ज्यांचे कामाचे तास 10 पेक्षा जास्त होतात त्यांना या वर्षी पासून उन्हाळ्यात दर 12 ते 15 दिवसातून एकदा मेडिकल ( रक्तदाब, शुगर, युरिन, शरीराचे तापमान) सक्तीची केली आहे.

याबद्दल आपल्याकडे माहिती आणि जागरूकता आढळत नाही. जमल्यास कंपनी चा हिट इंडेक्स, रेस्ट शेड्युल चा चार्ट इकडे अपडेट करतो. गूगल वर पण सापडेल बहुतेक.

इनामदार यांचा प्रतिसाद हा विरोधासाठी विरोध आहे. त्यांना शुभेच्छा ! या अशा मानसिकेतेचे काही करू शकत नाही. विषय अगदी स्पष्टतेने मांडलेला आहे. अलिकडची घटना आहे आणि हायलाईट झालेली आहे इतकं साधं लॉजिक आहे त्यामागे. आता हेच दोघे का, अन्य लोक काही नाही तर याला एक उत्तर आहे.

+१ यांनी अन्य एका भरकटलेल्या धाग्यावर इतरांना जे सांगितले आहे तेच इथे सांगतो. अन्य अनेक सामान्य लोकांसाठी तुम्ही धागा काढा, बंदी नाही.

"अन्य अनेक सामान्य लोकांसाठी तुम्ही धागा काढा, बंदी नाही."

=> अच्छा म्हणजे गडकरींना भोवळ आली (डिसेंबरमध्ये असो वा एप्रिलमध्ये) ती "उन्हामुळेच आली हो" असे बिंबवण्यासाठीच हा धागा आहे तर. बाकीच्या सामान्य लोकांच्या भोवळ येण्याशी त्याची तुलना नको किंवा कोणतेही तर्कसंगत विधान धागालेखकाला नको आहे. गोपीनाथ मुंडे यांचे 'कार अपघातात' दु:खद निधन झाले तेंव्हा "सीट बेल्ट न लावल्यामुळेच मुंडे यांचे निधन झाले" अशा आशयाचे मेसेज त्या दिवशी सोशल मिडीयावर फिरत होते त्याची आपली सहज आठवण झाली. असो. चालू द्या चालू द्या उदात्त कार्य.

या सगळ्याला प्रामुख्याने चंद्राबाबू नायडूच जबाबदार आहेत आणि काही प्रमाणात अटल बिहारी वाजपेयी देखील.

निवडणुका आणि प्रचार सभा फक्त यासाठीच लोक घराच्या बाहेर उन्हात पडतात का ?
ज्यांचे पोट च कष्टाच्या कामावर आहे त्यांच्या कडे पर्याय आहे का?
सभेला जाणे हा स्वतःचा निर्णय असतो जबरदस्ती नसते .
आणि भोवळ येण्याची खूप कारण असतात

ज्यांना खुसपटं काढायची आहेत त्यांच्यासाठी शेवटचा खुलासा.

जर सामान्य लोकांच्या बाजूने लिहीले असते तर याच लोकांनी गडकरी आणि मांगलेंचं काय असा टाहो फोडला असता. जर आपल्याला या धाग्याचा उद्देश समजला असता तर हे असे भरकटीकरण टळले असते. पण ती सवय लागल्याने खुसपटं शोधत वाचण्याच्या नादात एकतर आशय डोक्यात शिरत नसावा किंवा सर्व इनपुट डिव्हाईसेस बंद झालेले असावेत.

कुठल्याही कारणाने का असेना लोक बाहेर पडताहेत आणि त्यांना उन्हाचा त्रास होतोय हे सांगण्यासाठी करंट घटनांचा आधार घेतला हा खुलासा केल्यानंतरही आता १८८ इकडेही हावरटाप्रमाणे प्रतिसाद द्यायला आलेले आहेत.

या धाग्याचा आणि निवडणुकांचा काही संबंध आहे असे ज्यांना वाटतेय त्यांनी रेल्वे फाटकाशेजारच्या दवाखान्यात तपासण्या करून घेतलेल्या ब-या .

एकतर सरळ उन्हाचे होणारे परिणाम .
तापमान का वाढत आहे अशा नावांनी धागा काढता आला असता गडकरी किंवा manglench नाव कशाला .
फक्त आपणच चाणाक्ष आहे हा गैरसमज काढून टाका

मांगले यांच्या डोक्यावर केस नसल्याने त्यांना जास्त ऊन लागून भोवळ आली असेल, त्यांनी भर दुपारी बाहेर पडताना पांढरी टोपी घालावी. तसेच माननीय श्री नितीनजी गडकरिजि यांचं वय झालंय त्यामुळे त्यांना महाबळेश्वरलासुद्धा भर हिवाळ्यात भोवळ येऊ शकते असं मला वाटतंय, जय हिंद जय महाराष्ट्र.

उन्हाळा/दगदग/स्ट्रेस/रुटीन/अपरात्री प्रवास.हे सर्वांनाच लागू.परवा माणूस दुपारी 2 च्या कमी ट्रॅफिक मध्ये फ्लायओव्हर च्या कडेला पट्टे रंगवत होता.लेबर लॉ चांगले हवेत.हेच उन्हात उभं राहून आईस्क्रीम/शहाळी विकणाऱ्या लोकांचं.

महाबळेश्वर महाराष्ट्रात असून त्या शहराविषयी बिलकुल माहिती नाही .
तिथे थंडी असते तिला गुलाबी थंडी म्हणतात तापमान कमी असेल तरी ती बाधत नाही सर्दी वैगेरे होत नाही.
जसे स्विझरलँड मध्ये बर्फ पडतो तरी ती थंडी बाधत नाही

पण उन्हाळ्यात निवडणूक होणे हे अपरिहार्य आहे कारण सध्यातरी लोकसभेचा काळच तेंव्हा संपतो.
नवीन Submitted by लसावि on 28 April, 2019 - 17:04

त्याकरिताच नायडू आणि वाजपेयींना जबाबदार धरलंय. ९९ साली लोकसभेची निवडणूक कधी झाली होती ते आठवा. त्या लोकसभेने कार्यकाळ पूर्ण केला असता तर २००४ सालीही निवडणूका हिवाळ्यातच झाल्या असत्या पण चंद्राबाबूंनी फारच आग्रह धरला की लोकसभा लवकर विसर्जित करुन सहा महिने आधीच निवडणूका घ्याव्यात कारण त्यांच्या मते देशभरात रा लो आ चे वारे वाहत होते, वाजपेयी या आग्रहाला बळी पडले आणि भर उन्हाळ्यात लोकसभेच्या निवडणूका लागल्या.

भाजपची सत्ता तर गेलीच वर पुन्हा प्रत्येक लोकसभेची निवडणूक ही भर उन्हाळ्यात येत राहते. खरे तर हिवाळ्यात निवडणूक घेतली तर भाजपला जास्त फायदेशीर राहील कारण या पक्षाचा पारंपरिक मतदार हा एसीत बसणारा उन्हातान्हात घाम न गाळणारा असा असल्याने उन्हाळ्यात कितपत बाहेर पडेल ही शंकाच आहे. पुण्यातही आता यामुळेच मतदानाची टक्केवारी घसरली.

महाबळेश्वर बघितला नाय नी बाता मारायच्या स्वित्झर्लंडच्या, हे म्हणजे असं झालं दुकान फुटण्याचा आणि बेत बादशहाचा.

Filmy
धागा राजकारणाशी संबंधित
नाही
उन्हातान्हात जो त्रास होतोय त्याचा आहे

लक्षात नाही आला ह्यात राजकारण आहे

Filmy
धागा राजकारणाशी संबंधित
नाही
उन्हातान्हात जो त्रास होतोय त्याचा आहे

ही माझी पोस्ट चुकीची होती
क्षांस्व

श्रद्धा , कुमार - विदर्भात तर काय झालं असेल लोकांचं समजत नाही.
( या धाग्यावर तुम्ही सर्वच जण कुठेही गोंधळला नाहजण, विषय लगेचच ध्यानात आला याबद्दल खरंच आभार )

Pages