नितीन गडकरी आणि वैभव मांगले

Submitted by किरणुद्दीन on 27 April, 2019 - 22:16

हा धागा इतर कुठल्या ग्रुपमधे योग्य वाटेना म्हणून शेवटी इथे दिला आहे. जर प्रशासनाला अयोग्य वाटले तर योग्य त्या ग्रुप मधे हलवावा ही विनंती

दोन दिवसात वैभव मांगले आणि नितीन गडकरी यांना भोवळ आल्याच्या बातम्या होत्या. गडकरींना हा त्रास दुस-यांदा झाला आहे.
इतर कारणेही असतील. पण सध्या उन्हाळा तीव्र आहे. कलाकार आणि राजकारणी यांना भर उन्हाचेही फिरावे लागते. त्यातल्या त्यात निवडणुका असतील तर राजकारण्यांच्या बाबतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार.

त्यांनी काम केली की नाहीत, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्याची विचारधारा काय आहे हे सर्व अलाहिदा. मात्र ती माणसंच आहेत. त्यातच मंत्री वगैरेंना एसी ची सवय असेल तर अचानक एव्हढ्या तीव्र उन्हात, जिथे सामान्य माणसंही बाहेर पडायला धजावत यांना, यांना तसे करून चालत नाही.

या निवडणुकीत मोदींसहीत अनेक नेत्यांच्या सकाळच्या, दुपारच्या सभांना उन्हाचा फटका बसला. एका सभेचं टायमिंग दुपारी होतं. मी त्या पक्षाच्या प्रवक्त्याला विचारलं, " लोकांना एव्हढ्या उन्हात बसवायचं प्लानिंग कसं काय करता तुम्ही ?" तर त्याचं उत्तर होतं , " मग प्रचार कसा पूर्ण होणार ? आम्ही स्वतः या उन्हात दिवसभर आहोत" या नेत्याने सकाळी दहाची वेळ देऊन सायंकाळी चार वाजता सभा घेतली. सकाळी मैदान पूर्ण भरलेलं होतं. आत जायला जागा नव्हतॉ सायंकाळी चारपर्यंत ज्यांना खुर्च्या मिळालेल्या तेव्हढेच लोक शिल्लक राहीले. या उन्हात उभे राहणे शक्य आहे का ?

निवडणूक आयोगाने पुन्हा अशा सीझन मधे निवडणूक ठेवू नये. जानेवारी ते मार्च हा सीझन बेस्ट आहे. पण मग शाळा मिळत नाहीत. पावसाच्या वेळेत काही भागात मतदानकेंद्रापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. दिवाळी नंतर डिसेंबर अखेरपर्यंत निवडणुका घेणं शक्य होईल. तसेच २०१४ पासून सात टप्प्यात निवडणुका घेण्याची जी पद्धत चालू केलीय तिचाही फेरविचार व्हावा.

नेत्यांनीही काळजी घ्यावी. जान है तो जहान है. अशा कारणासाठी जिवावर बेतणे परवडणारे नाही. उन्हात जाणे टाळता येत नसेल तर जवळ लिंबू मीठ ठेवावे. एखादा रूमाल ओला करून मानेवर ठेवावा. टोपी आणि गॉगल मस्ट. बरे दिसणार नाही असा विचार करणे जिवावर बेतणारे ठरते. अनेकांना दिवसभर गरगरतेय. उष्म्याची लाट सुद्धा आहे.

सर्वांनीच काळजी घेतली पाहीजे.
पुण्यात जर ४२.६ तापमान असेल तर विदर्भात काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.

मायबोलीकरांनी अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी याची उजळणी केली तर सर्वांना फायदा होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मा. अ‍ॅडमिन / वेबमास्टर,
इथल्या काही जणांना आपण समजावले तर लवकर समजेल. कृपया लक्ष घालावे ही विनंती.

आमच्या शाळेत एक मुलगा होता त्याला कोण काय बोललं की लगेच बाईंकडे तक्रार करायचा, आज त्याची आठवण आली.

दुसरे काही येत नाही
हेटाळणी करण्या शिवाय
बाकी लोकांनी हेटाळणी चालू केली की myboli विसरून जाल

लेख्क महाशय, इनामदारांचि कमेंट विशयाला धरुन आहे. त्यांनि कमेंटच्या पहिल्या वाक्यातच तुमचा हेतु अक्नॉलेज केला. ते पाहुन त्यांच्या हेतु विशयि तुम्हाला पहिल्याच क्षणि संशय घेण्याचि गरज न्हवति. तुम्हि केलि तर विशयाला अनुसरुन साधक बाधक चर्चा पण इतरांनि केल तर खुस्पट अस करुन कस चालेल?

आता तुम्हि माझि अक्कल/मनोव्रुत्ती/हेतु वगैरे काढालच. ते सोपय पण ग्रेसफुल नहि.

मलाही उन्हाळ्याचा आणि नितीन गडकरींच्या भोवळीचा काही संबंध असेल असं वाटत नाही. कारण एकतर ते मधुमेहाचे रुग्ण आहेत.
मागे एकदा असंच राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहताना त्यांना भोवळ आलेली, आणि काहीतरी गोड खायला दिल्यावर ते शुद्धीवर आले. "वेळी अवेळी भोवळ आल्यास शुद्धीवर येण्यासाठी माझ्या जवळ एखादं चॉकलेट अथवा शुगर कँडी मी नेहमी बाळगून असतो " असं त्यांच्या स्वतःच्या मुलाखतीत म्हटलेलं आठवतंय.

दुसरं, त्यांच्या कामाचा व्याप मोठा बराच मोठा आहे, आणि तो दुसऱ्यावर सहजासहजी सोपवणे शक्य नाही. शेवटी त्यांच्या पातळीवर विचार करणारी आणि फटाफट निर्णय घेणारी किती माणसं भेटतील ? इतक्या वरच्या मॅनेजमेंट लेव्हलवर टॅलेंटची मारामार नेहमीच असते. सभा, मिटींगा, रॅली ह्या गोष्टी त्यांना पाहिजे त्या तयारीच्या हव्या असतील, तर त्यांना ते स्वतःच करावं लागत असेल, दुसरा पर्याय नाही.

उन्हाळा हा एकच असा ऋतू आहे, जेव्हा भारतातल्या सगळ्या राज्यातलं दळणवळण सुरळीत चालतं.

हिवाळ्यात ऑक्टोबर नोव्हेंबर पासूनच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड सारख्या समुद्रसपाटीपासून वर असलेल्या राज्यात बर्फवृष्टी सुरु होते, आणि वाहतुक करताना बऱ्याच अडचणी येतात.
दुसरं म्हणजे, याच दरम्यान निम्म्या पेक्षा जास्त भारतात रब्बी हंगाम सुरु झालेला असतो. नव्या पेरण्यांच्या धामधुमीत विलेक्शनच्या उस्तरवाऱ्या करायला कुणाला उसंत आहे, तेही भारतासारख्या देशात जिथे निम्मी लोकं अजूनपण शेतीवर गुजराण करतात ?

निवडणुकीसाठी उन्हाळा त्यातल्यात्यात बरा, शेतीची काम जवळजवळ संपलेली असतात. शाळेत सुट्ट्यांचा माहोल असतो, आणि सगळे रस्ते वाहतुकीला खुले असतात.

अरेरे काय ही भाषा, वाईट वाटलं वाचून. >> बाण लागला वाटतं Happy

नितीन गडकरींचा उल्लेख आहे तिथेच इतरही कारणे असतील असे लिहीले आहे. मात्र ते गैरसोयीचे असल्याने आणि धागा भरक्टवायचाच या इराद्याने पेटून ठेवणीतले ड्युआयडी घेऊन आल्याने वेमा /अ‍ॅडमिन यांना विनंती केली. जर इथे उन्हाळ्याच्या त्रासावर चर्चा झाली तर कुणाला काय त्रास होणार होता हे समज्ले नाही. अर्थात कचराकुंडी मेंबर्सकडून फारशा अपेक्षा नाहीत. त्यामुळे लगे रहो. सर्व जण स्पर्धेचे विजेते होणार आहात

अतरंगी, पोस्ट आवडली
उन्हाळ्यात बाहेर काम करणाऱ्यांसाठी घ्यावयाची काळजी असा साधारण मुद्दा आहे ना लेखाचा?

किल्ली, अगदी बरोबर

मधुमेहींनीही उन्हाळ्यात काळजी काय घ्यायची हे सुद्धा आले तर चालेल. कारण इन्शुलीनवर वाढत्या तापमानाचा परिणाम होतो. त्यामुळे ते थंड जागेत ठेवावे. शक्यतो उन्हात बाहेर पडू नये असे सल्ले वर्तमानपत्रात येत आहेत.

अर्थात कचराकुंडी मेंबर्सकडून फारशा अपेक्षा नाहीत.>>>> अरेरे काय ही भाषा. वाईट वाटलं. महात्मा गांधीजी बोलून गेले समोरचा एक मारेल तर तुम्ही दुसरा गाल पुढे करा, वेमाकडे तक्रार नका करू.जेणेकरून तुमच्यावर द्वेष करणाऱ्या व्यक्तीला तुमच्याबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि हा देश स्वतंत्र होईल.

इनामदार माझ्या पेक्षा सज्जन आयडी आहेत. मी स्पष्ट लिहिणारा आहे. तुम्ही दुसऱ्यांचे धागे भरकटायला लावता का? नाही ना? मग?

Pages