कलंक चित्रपट

Submitted by चीकू on 18 April, 2019 - 13:06

काल कलंक बघितला. बडा घर पोकळ वासा असा आहे चित्रपट. भव्य दिव्य सेट, झगमगीत कपडेपट, नाचगाणी पण कुठेही मनाला भिडत नाही. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सुंदर दिसण्याची दक्षता घेतली आहे. अगदी भन्सालीच्या वरताण दिवे, झुंबरं, पाण्याचे कालवे आहेत. पण चित्रपट पाहून झाल्यावर आठवणीत राहील असं काहीच नाहीये. चित्रपटाची कथा देत नाही पण एव्हाना सगळ्यांना ती माहीत झाली असेल.

अलिया भटचे प्रथम दर्शनच त्या १९४० काळाशी विसंगत आहे. त्यावेळी कोणी राजस्थानी तरूणी highlighted/ conditioned केस एकदम मोकळे सोडून, revealing घागरा चोळी घालून गल्ल्यागल्ल्यांतून गाणी म्हणत उनाडेल हे पटत नाही. कियारा अडवाणी आणि कृती सनोनचे आयटेम साँग तर अगदी खुपते त्या काळात Sad

जिथे ही कथा घडते ते हुस्नाबाद शहर तर विनोदीच आहे, मोठ्या मोठ्या हवेल्या, राजस्थानी गल्ल्या, घाट, व्हेनिसला लाजवतील असे gondola आणि कालवे, नद्या, बर्फाच्छादित पर्वत, खोल दर्‍या सगळं एका ठिकाणी! मै प्रेम की दीवानी हू मधल्या सुंदरनगरची आठवण आली, तिथेही समुद्र, पर्वत, हिमवर्षाव सगळं एकाच शहरात होतं Happy आणि ते बुलफायटिंग महान विनोदी आहे. तो सगळा प्रकार एका कड्याच्या टोकावर घडतो,बाजूला खोल दरी, बुलने धडक दिली की माणूस जाऊन सरळ दरीतच पडतो, मधे काही कुंपण, संरक्षक कठडे वगैरे प्रकारच नाही Happy

संजय दत्त कायम अवघडलेला वाटतो. वरुण आणि आलिया एरवी आवडतात पण या चित्रपटात नाही फारसे भावले. माधुरीचे नृत्य सुंदर आहे आणि दिसलेय छान पण बाकी भूमिकेला काही विशेष कंगोरे नाहीत. आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी चक्क आवडले. सहायक भूमिकेमधे कुणाल खेमू छाप सोडतो.

तुमचेही या चित्रपटाविषयीचे मत प्रतिसादात जरूर लिहा. चित्रपटात एक वाक्य आहे 'गाना अच्छा है लेकिन नमक कम है'. चित्रपटाविषयीही असेच म्हणावेसे वाटते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय..
हीच अपेक्षा होती 'कलंक' कडून

मै प्रेम की दीवानी हू मधल्या सुंदरनगरची आठवण आली, तिथेही समुद्र, पर्वत, हिमवर्षाव सगळं एकाच शहरात होतं>> very true

कलंकचा ट्रेलरच आवडला नव्हता...चित्रपट बघणार नाहीच. चित्रपटात दोनच गोष्टी चांगल्या आहेत, १. सोनाक्षी सिन्हा २. कियरा अडवाणी!

'आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी चक्क आवडले. '
मला पण आवडले....बाकी कलर आणि झगमगाट दिसतो नुकताच.....आलीया अन् माधुरी चा रोल तर चांगल दिसण्यापुरताच मर्यादित आहे असं वाटतं.

सोनाक्षीचे लुक्स, संवाद आणि पेहराव त्या काळाशी सुसंगत आहे. तिचा आणि आदित्यचा underplaying अभिनय छाप पाडून जातो. आदित्यला त्या क्रुती सनोनच्या गाण्यात उगाचच नाचायला लावले आहे ते त्याच्या स्वभावाशी पूर्णपणे विसंगत आहे Sad त्या गाण्याची काहीही जरूर नव्हती. उगीचच मुळात कंटाळवाण्या चित्रपटाची लांबी अजून वाढवली आहे.

बाकी भन्सालीला कितीही नावं ठेवली तरी त्याच्या चित्रपटातील झगमगाटामागे त्या characters मधे एक minimum convincingness असतो. कलंकमधे फक्त झगमगाटच आहे. शेवट तर अगदीच विनोदी आहे.

सिनेमाच्या नावातच इशारा दिलेला असताना कोण बघायला जाईल ?

पण विवाह बाह्य संबंध, समलिंगी संबंध या करण जौहरच्या अत्यंत आवडत्या विषयांपैकी एकावर त्याने सिनेमा बनवलेला आहे. म्हणजे त्याच्या दृष्टीने मन लावूनच बनवलेला असणार.

सोनाक्षी सिन्हाला कॅन्सर. डॉक्तरांनी ती जगणार नाही हे सांगणे. कुणाचं काय तर कुणाचं काय हिचं आपलं नव-याला मूल हवं म्हणून दुसरी कुणीतरी ही जिवंत असतानाच मिळावी म्हणून तगमग. कसली धीराची बाई ती. इथं बायका मी मेले तरी भूत होऊन बघायला येईल अशी धमकी देतात नव-याला. तिला आलिया भट्ट सापडते. ती म्हणते लग्न केलं तर येईन. ही जरा व्यवहारी वाटते. तर सोनाक्षीचा नवरा विबासंच्या बाबतीत अत्यंत खेडवळ, बुरसटलेल्या विचारांचा आणि महान आदर्शवादी निघतो. हा ठोंब्या म्हणतो बायकोचा दर्जा तर देऊ शकेन पण प्रेम नाही देऊ शकणार. एक तर हा टोकाचा आदर्शवादी असला पाहीजे नाहीतर अत्यंत प्रॅक्टीकल. मरणा-या बायकोला नाराजही नाही करायचे आणि दुस-या बायकोच्या अपेक्षाही वाढवून नाही ठेवायच्या.

ही असली पात्रं आमच्या मराठी लेखकांना का सुचत नाहीत ?

बरं आता लग्न होतं. अधिकृत विबासं आणि एव्हरीनाईट स्टॅण्ड सुरू होतं. पण अर्थातच व्यवहारी स्त्री पुरूष ते ही त्याळात असल्याने फक्त कर्तव्यपूर्ती एव्हढेच त्यांचे उद्दीष्ट असते. प्रेम नसते त्यात. इथे दिग्दर्शक कळवळतो. पण रात्री अकरानंतर निळ्या साईट्स पाहून सरावलेला प्रेक्षक काही कळवळत नाही.

मग आलियाला प्रेमाची भूक सतावते. ती भरून काढायला वरूण धवन येतो. आता अनधिकृत विबासं सुरू होतं.
कित्ती गुंता हा. खरं तर या सिनेमाचे भाग २, ३ असे यायला हवेत एव्हढं जबरदस्त पोटेन्शियल आहे कथेत.

विबासं सर्वत्र आहे. जगाच्या कुठल्या तरी कोप-यात करण जोहर आहे. त्याच्यामुळे ते पडद्यावर येतंय. भारतीय समाजाचे टॅब्यू आणि एटसेटरा वगैरे वगैरे च्या पार्श्वभूमीवर ही एक पुरोगामी आणि क्रांतीकारी कलाकृती आहे. हे बंड आहे. एक आंदोलन आहे. याची चळवळ होऊ द्या. त्या चळवळीत झोकून द्या. प्रत्येकाचे एक तरी विबासं झालेच पाहीजे. तरच या देशावरचा कलंक धुवून निघेल.

संत करणस्टाईन जोहर

प्रत्येकाचे एकतरी विबासं झालेच पाहीजे.तरच या देशावरचा कलंक धुवून निघेल.

संत करणस्टाईन जोहर>>> Biggrin

प्रत्येकाचे एकतरी विबासं झालेच पाहीजे.तरच या देशावरचा कलंक धुवून निघेल.

संत करणस्टाईन जोहर>>> Lol

माधुरी आणि संजय दत्तचे काय रोल्स आहेत?>>>त्यांचेही एकमेकांशी विबासं दाखवलेत काय?? Lol

प्रत्येकाचे एक तरी विबासं झालेच पाहीजे. तरच या देशावरचा कलंक धुवून निघेल.

संत करणस्टाईन जोहर >> Lol

Lol
कोण कोणाला जी ले अपनी जिंदगी म्हणते?
सोना-आदित्य आलियाला म्हणत असावेत. ती वरुण कडे जात असेल. असा माझा अम्दाज.
मग ह्या सगळ्यात माधुरी काकु आणि संजू अंकल काय करतात?

माधुरी आणि संजय दत्तचे काय रोल्स आहेत?>>>त्यांचेही एकमेकांशी विबासं दाखवलेत काय?? Lol>>>
विआसं दाखवलेत Happy विवाहा आधीचे संबंध Wink

शेवटी सगळे Ddlj खेळतात.. Lol>>
तो ट्रेनचा अशक्य विनोदी शॉट आहे..विशेषतः आलिया उठो, चलो, भागो चिरक्या आवाजात ओरडते ते Happy

सगळेच सगळ्यांना जी ले अपनी जिंदगी म्हणतात. पण काही जणांची भुते होतात आणि मग जिवंत राहिलेले आणि भुते झालेले सगळे एकत्र सुखाने नांदतात. विबासं बरोबर जीबासं (जीवनबाह्य संबंध) हा एक नवीन पायंडा या चित्रपटाने पाडला आहे Happy

फाळणीच्या इतिहासाची पण ऐसीतैसी केली आहे करण जौहर ने >>>> ग्रो अप ! करण जोहरचा आणि इतिहासाचा काय संबंध ? सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून तो फाळणीच्या वेळी अकबर बादशहा आणि सम्राट अशोक यांचं भावनिक आवाहन सुद्धा दाखवू शकतो..

किरण Lol
भलताच वैतागलात वाटत हा शिनुमा पाहून

सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून तो फाळणीच्या वेळी अकबर बादशहा आणि सम्राट अशोक यांचं भावनिक आवाहन सुद्धा दाखवू शकतो..>>>> Lol
एवढी चिड्चिड Lol

मी पहिल्याचं दिवशी पाहिला हा चित्रपट. कुणाल खेमूचा रोल शेवटी शेवटी कळला. सुरवातीला तर तो काय करत आहे हेचं कळत नव्हते. सोनाक्षी आणि आदीत्या ह्यांचे रोल मनापासून आवडले. दोघेही किती शांत वावरतात सिनेमात. मस्त वाटतात असे हलकेफुलके अभिनय बघताना. माधुरी दिक्षित खूप सुरकुतलेली वाटली. गाण्यात भाव नाही तिथे नाचणारी व्यक्ती काय नाचेल. सरोज खान होती कोरोग्राफर. नाच छान होता पण मागे प्लेबॅक संगीत वाईट्ट होते. ट्रेलर मधे सर्व लाल रंगाच्या कपड्यात दाखवले पण प्रत्याक्षात कुणीचं लाल रंगाचे कपडे घातले नव्हते सिनेमात. फक्त मुवी पोस्टर साठी ते लाल कपडे होते.

ज़फ़र उठो भागो....ज़फ़र उठो.......(एवढचं होता ५ मिनीटे) अत्यंत फ़ालतू सीन शेवटचा.
सोनाक्षी आदित्य मस्तच.संजू बाबा बोर...,माधुरी खूप रटाळ.

Pages