कलंक चित्रपट

Submitted by चीकू on 18 April, 2019 - 13:06

काल कलंक बघितला. बडा घर पोकळ वासा असा आहे चित्रपट. भव्य दिव्य सेट, झगमगीत कपडेपट, नाचगाणी पण कुठेही मनाला भिडत नाही. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सुंदर दिसण्याची दक्षता घेतली आहे. अगदी भन्सालीच्या वरताण दिवे, झुंबरं, पाण्याचे कालवे आहेत. पण चित्रपट पाहून झाल्यावर आठवणीत राहील असं काहीच नाहीये. चित्रपटाची कथा देत नाही पण एव्हाना सगळ्यांना ती माहीत झाली असेल.

अलिया भटचे प्रथम दर्शनच त्या १९४० काळाशी विसंगत आहे. त्यावेळी कोणी राजस्थानी तरूणी highlighted/ conditioned केस एकदम मोकळे सोडून, revealing घागरा चोळी घालून गल्ल्यागल्ल्यांतून गाणी म्हणत उनाडेल हे पटत नाही. कियारा अडवाणी आणि कृती सनोनचे आयटेम साँग तर अगदी खुपते त्या काळात Sad

जिथे ही कथा घडते ते हुस्नाबाद शहर तर विनोदीच आहे, मोठ्या मोठ्या हवेल्या, राजस्थानी गल्ल्या, घाट, व्हेनिसला लाजवतील असे gondola आणि कालवे, नद्या, बर्फाच्छादित पर्वत, खोल दर्‍या सगळं एका ठिकाणी! मै प्रेम की दीवानी हू मधल्या सुंदरनगरची आठवण आली, तिथेही समुद्र, पर्वत, हिमवर्षाव सगळं एकाच शहरात होतं Happy आणि ते बुलफायटिंग महान विनोदी आहे. तो सगळा प्रकार एका कड्याच्या टोकावर घडतो,बाजूला खोल दरी, बुलने धडक दिली की माणूस जाऊन सरळ दरीतच पडतो, मधे काही कुंपण, संरक्षक कठडे वगैरे प्रकारच नाही Happy

संजय दत्त कायम अवघडलेला वाटतो. वरुण आणि आलिया एरवी आवडतात पण या चित्रपटात नाही फारसे भावले. माधुरीचे नृत्य सुंदर आहे आणि दिसलेय छान पण बाकी भूमिकेला काही विशेष कंगोरे नाहीत. आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी चक्क आवडले. सहायक भूमिकेमधे कुणाल खेमू छाप सोडतो.

तुमचेही या चित्रपटाविषयीचे मत प्रतिसादात जरूर लिहा. चित्रपटात एक वाक्य आहे 'गाना अच्छा है लेकिन नमक कम है'. चित्रपटाविषयीही असेच म्हणावेसे वाटते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनाक्षी सिन्हाला कॅन्सर. डॉक्तरांनी ती जगणार नाही हे सांगणे. कुणाचं काय तर कुणाचं काय हिचं आपलं नव-याला मूल हवं म्हणून दुसरी कुणीतरी ही जिवंत असतानाच मिळावी म्हणून तगमग. कसली धीराची बाई ती. इथं बायका मी मेले तरी भूत होऊन बघायला येईल अशी धमकी देतात नव-याला. तिला आलिया भट्ट सापडते. ती म्हणते लग्न केलं तर येईन. ही जरा व्यवहारी वाटते. तर सोनाक्षीचा नवरा विबासंच्या बाबतीत अत्यंत खेडवळ, बुरसटलेल्या विचारांचा आणि महान आदर्शवादी निघतो. हा ठोंब्या म्हणतो बायकोचा दर्जा तर देऊ शकेन पण प्रेम नाही देऊ शकणार. एक तर हा टोकाचा आदर्शवादी असला पाहीजे नाहीतर अत्यंत प्रॅक्टीकल. मरणा-या बायकोला नाराजही नाही करायचे आणि दुस-या बायकोच्या अपेक्षाही वाढवून नाही ठेवायच्या.

ही असली पात्रं आमच्या मराठी लेखकांना का सुचत नाहीत ?

Submitted by किरणुद्दीन on 19 April, 2019 - 19:41

-> मराठी चित्रपट - झाकोळ - डॉ. श्रीराम लागमातोंडकर, सरला येवलेकर व उर्मिला मातोंडकर

-> हिंदी चित्रपट - वुई आर फॅमिली - अर्जून रामपाल, करीना कपूर.

अर्थात थोडा बदल आहे. यात मूल ऑलरेडी आहे. त्याला सावत्र आईचा जाच नको म्हणून आपल्या बहिणीलाच आपली सवत बनवायची तयारी असा प्लॉट आहे.

वारिस नावाचा तर अजून एक सिनेमा वेगळाच अँगल देतो. नवरा आपल्याला मूल होण्याआधीच मारला गेला आणि सासरा आधीच विधूर त्यामुळे घराण्याला वारस हवा म्हणून म्हातार्‍या सासर्‍याचं आपल्या धाकट्या बहिणीशी लग्न लावून देणारी नायिका त्यात आहे. पुढे बहिणीला सासर्‍यापासून मूल होतं तेव्हा त्या मुलाला स्वतःचा भाचा, दीर असं संबोधतानाच पुन्हा आप तो हमारे वो है असंही नायिका जेव्हा म्हणते तेव्हा मला त्याचा अर्थच कळला नाही किंवा खरं तर कळत असलेला अर्थ वळला नाही.

मला श्रीदेवीची उणिव भासली. पूर्वी तिलाच घेतले होते. पण ती एकाएकी गेली मग तिच्या ऐवजी माधुरीला घेतले. पन माधुरी अभिनयात कमीचं आहे Happy

Cancer ने आजारी बाई नवऱ्यासाठी दुसरी बायको शोधते ही स्टोरच असेल तर मराठीत रेखा (कामत) यांची दुहेरी भूमिका असलेलग चित्रपट अशाच कथेवर होता. नखव ग्रुहदेवता.
सांग धावत्या जळा - हे गाणं होतं त्यात.

मृणाल कुलकर्णी आणि सचिन खेडेकरचा आहे असा चित्रपट, महा रटाळ. ती दुसरी बायको सुलेखा तळवलकर आहे.

काल बघितला , कसा वाटला तेच कळले नाही

पण आलिया, वरून, आदित्य अन टायटल सॉंग आवडले मला , बाकी दुसरे काहीच नाही

थोडक्यात स्टोरी म्हणजे एक लाहोरच्या जवळ हुस्नाबाद नावाचं गाव, जिथे पर्वत, हिमाच्छादित कडे, दर्‍या, नद्या, घाट, कालवे, ब्रिटिशकालीन हवेल्या, राजस्थानी गल्ल्या एकत्र सुखाने नांदतात. तर तिथे संजय दत्त बडी असामी, न्युजपेपरचा मालक. त्याचा मुलगा आदित्य आणि सून सोनाक्षी. हे तिघेच महालासारख्या हवेलीत राहातात. साधारण दोन डझन लोक बसतील अशा जेवणाच्या टेबलावर संजय दत्त एका टोकाला, आदित्य दुसर्‍या टोकाला तर सोनाक्षी मधोमध असे बसून जेवतात. तर ती मरणपंथाला लागलेली. मरण्यापूर्वी नवर्‍याला सुख लाभावं म्हणून ती आलियाला त्याची भावी पत्नी म्हणून घरी राहायला यायचं आमंत्रण देते. त्यानिमित्ताने त्यांची ओळख होईल एवढं लांब जेवायचं टेबल आहे तर एक अजून आरामात बसू शकेल आणि आपण गेल्यावर ते लग्न करतील असा तिचा बेत. पण आलिया practical असल्याने मी त्या घरची सून म्हणूनच येईअ, नाहीतर तू गेल्यावर तो मला घराबाहेरही काढेल मग मला कोणाचाच आधार राहाणार नाही असे निक्षून सांगते. मग त्यांचे लग्न होते पण आदित्य तिला मी तुझा आदर करीन पण तुला प्रेम नाही देऊ शकणार वगैरे सांगतो. मग आलियासमोर आता आपण करायचे काय असा प्रश्न पडतो. ती त्या हवेलीत भयानक bore होते पण मग कधीतरी तिच्या कानावर गाण्याचे आलाप पडतात. ते असतात गावातल्या हिरा मंडी या बदनाम एरियातील माधुरी म्हणजे बहार बेगम या तवायफचे. आलिया सरळ तिच्याकडे गाणं शिकायला जाते, तिथे सगळ्या गावात कोणी दुसरा गायन शिकवणारा गुरु नसतोच. त्या हिरामंडीत लोहारांच्या वस्तीत वरूण धवन हा अनाथ तरूण राहात असतो. मग तो आणि आलिया प्रेमात पडतात. मग बरीच गाणी नाच होतात. मग मधेच सोनाक्षी मरते, मरणाच्या वेळीही मेकअप, केशभूषा, वेशभूषा एकदम लग्नाला निघाल्यासारखी असते. मग आदित्यला आलिया आवडायला लागते. पुन्हा गाणी, नाच होतात. मग संजय दत्त आणि माधुरीचे संबंध असतात आणि वरुण त्यांची प्यार कि निशानी असतो, पण मग संजय दत्त माधुरीला सोडून देतो आणि माधुरीही वरुणला दूर ढकलते. त्यामुळे वरूण सूडाने पेटलेला असतो आणि आलियाकरवी संजय दत्तच्या खानदानाची बदनामी करणार असतो, हे already प्रेक्षकांनी guess केलेले रहस्य उघड होते. पण आलियाचे सच्चे प्रेम बघून त्याचे मन बदलते. या सगळ्यातच हिंदू मुस्लीम दंगे सुरु होतात, फाळणी होते, संजय दत्त भारतात निघून जातो. आदित्यलाही खरा प्रकार कळतो मग तो आलियाला जी ले अपनी जिंदगी म्हणतो. मग वरुणही तिला जी ले अपनी जिंदगी म्हणतो. आलियाचा नक्की निर्णय होत नाही, ते भारतात जायला ट्रेनमधे चढतात तेव्हा ती दोघांचाही हात धरते. पण मग वरूणला त्याचा एक दोस्त कम दुश्मन मारतो आणि आलिया आणि आदित्य भारतात येतात. संजय आणि माधुरीचं काय होतं कळत नाही. मधेच वरुण आणि सोनाक्षीची भुते येतात आणि रोमान्स करतात त्यामुळे आदित्य आणि आलियाही जिवंत असतात की मरतात ते कळत नाही. एकूण चित्रपटातल्या बर्‍याच गोष्टी कळत नाहीत. आपण हा चित्रपट तीन तास कसा सहन केला तेही कळत नाही Sad

Lol चीकू

चीकू धन्यवाद, संपूर्ण कथानक दिल्याबद्दल.
आता कोण कोण कलंकित होणार , त्यांनी हात वर करा लवकर.!

( मी सिनेमा पाहिला नाही. ट्रेलवरवरूनच लिहीले होते, कुणीतरी कथा लिहीलच म्हणून ) Wink

Pages