Submitted by माउ on 16 April, 2019 - 09:21
फिके चांदणे धूसर वाटा रात वेगळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे
चंद्र ठिबकतो पाण्यावरती स्वप्न जागते काठी
जुळवित बसतो वेडा कोणी नि:शब्दाच्या गाठी
पणती होउन आस तेवते मंद देवळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..
कोरत येते देहावरती आठवणींच्या रेषा
रात्र पोचते डोळ्यांमधुनी स्पर्शफुलांच्या देशा
तिथे ओठ ओठांवर जुळती मिठी मोकळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..
जाणवते ना श्वासांनाही भास कुठेसा होतो
झ-यासारखा वाहत वारा तुझ्यापासुनी येतो
नकोस छेडू श्वासांना तू लाज कोवळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..
तळे पाहते रातकणांना टिपून घेते सारे
आकाशावर तलम परांनी रेखुन देते तारे
ता -यांना धूसर मेघाची ओढ आगळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..
-रसिका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कोणती ओळ कोट करु? सगळी कविताच
कोणती ओळ कोट करु? सगळी कविताच निव्वळ अप्रतिम आहे.
सु...रे...ख...!
फार सुंदर. आवडलीच.
जबरदस्त. खूप प्रसिद्ध कवीनं
जबरदस्त. खूप प्रसिद्ध कवीनं केली असावी असे वाटले इतकी सुंदर उतरलीय. सरस्वती प्रसन्न आहे हो तुमच्यावर.
नव्या मनुतील नव्या दमाचा शूर
नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे.
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे.
हे आठवले
नव्या मनुतील नव्या दमाचा शूर
नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे.
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे.
हे आठवले
वाह क्या बात हैं , एकदम
वाह क्या बात हैं , एकदम जबरदस्त , अप्रतिम,
खूप खूप आभार सर्वांचे!!!
खूप खूप आभार सर्वांचे!!!
हहायनेस्स...लोभ असावा
नक्कीच माउ. पु.ले.शु.
नक्कीच माउ. पु.ले.शु.
शब्द कमी पडताहेत व्यक्त
शब्द कमी पडताहेत व्यक्त व्हायला...पण एक नक्की आजच्या दिवसाची सुरवात एका अप्रतिम कवितेने झाली.
अहाहा !! सर्वोच्च !!
अहाहा !! सर्वोच्च !!
ओहोहो, अप्रतिम
ओहोहो, अप्रतिम
चंद्र ठिबकतो पाण्यावरती
चंद्र ठिबकतो पाण्यावरती स्वप्न जागते काठी>> निव्वळ अप्रतिम
जबरी ! खूपच आवडली
खूप खूप धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद!
सुंदरच!
सुंदरच!
मस्त. कवितेची जी लय आहे (
मस्त. कवितेची जी लय आहे ( गेयता/ rhythm?) ती सुद्धा खूप म्हणजे खूप आवडली.
अप्रतिम !
अप्रतिम !
खूप खूप आभार!
खूप खूप आभार!
लवंगलता व्रुत्ताची अंगभूत लय खूप सुंदर आहे...
आहा! खूपच सुंदर, अप्रतिम
आहा! खूपच सुंदर, अप्रतिम,पुन्हा पुन्हा वाचली.माउ अप्रतिम काव्य वाचायला मिळाले
खूप धन्यवाद रोहिणी!
खूप धन्यवाद रोहिणी!
खूपच सुंदर, तरल कविता आहे
खूपच सुंदर, तरल कविता आहे
आहाहा, काय सुंदर
आहाहा, काय सुंदर
अहाहा! सुरेख
अहाहा! सुरेख
खूप धन्यवाद!
खूप धन्यवाद!
अप्रतिम कविता..
अप्रतिम कविता..
सुंदर.. लयबद्ध आणि कल्पनारम्य
सुंदर.. लयबद्ध आणि कल्पनारम्य!
निव्वळ अप्रतिम कविता!!
निव्वळ अप्रतिम कविता!!
खूप खूप आभार!
खूप खूप आभार!
खूपच छान, तरल कविता आहे
खूपच छान, तरल कविता आहे
चंद्र ठिबकतो... खूप आवडलं.
चंद्र ठिबकतो... खूप आवडलं. गुलजारी वाटलं!
कोमल परांनी समजलं नाही. परांनी म्हणजे?
कम्माल लिहिलंय...
कम्माल लिहिलंय...
एकेक ओळ वेडावून टाकणारी...
कोमल परांनी समजलं नाही.
कोमल परांनी समजलं नाही. परांनी म्हणजे?>
तळे चंदेरी रातकण टिपून घेते आणि पाण्याच्या परांनी (पिसांनी) आकाशावर तारे रेखते..असे काहीसे...
प्रेरणा: Van Gogh- the starry nights
Pages