Submitted by माउ on 16 April, 2019 - 09:21
फिके चांदणे धूसर वाटा रात वेगळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे
चंद्र ठिबकतो पाण्यावरती स्वप्न जागते काठी
जुळवित बसतो वेडा कोणी नि:शब्दाच्या गाठी
पणती होउन आस तेवते मंद देवळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..
कोरत येते देहावरती आठवणींच्या रेषा
रात्र पोचते डोळ्यांमधुनी स्पर्शफुलांच्या देशा
तिथे ओठ ओठांवर जुळती मिठी मोकळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..
जाणवते ना श्वासांनाही भास कुठेसा होतो
झ-यासारखा वाहत वारा तुझ्यापासुनी येतो
नकोस छेडू श्वासांना तू लाज कोवळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..
तळे पाहते रातकणांना टिपून घेते सारे
आकाशावर तलम परांनी रेखुन देते तारे
ता -यांना धूसर मेघाची ओढ आगळी आहे
कुठे फुलाच्या देठावरती सुटी पाकळी आहे..
-रसिका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आह! Beautiful... _//\\_
आह! Beautiful... _//\\_
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
अतिशय सुंदर! प्रत्येक
अतिशय सुंदर! प्रत्येक कडव्याची तिसरी ओळ जिंकलेली आहे!
मला ही कविता जास्त भावली, तिच्या वनहरिणी भगिनीपेक्षा. ही जास्त सहज सुंदर वाटते.
खूप धन्यवाद चिन्नु, सामी,
खूप धन्यवाद चिन्नु, सामी, शंतनू!
शंतनू, ही आधी लिहिली होती,
शंतनू, ही आधी लिहिली होती, म्हणून कदाचित सहज झाली असावी
अप्रतिम...
अप्रतिम...
काय लिहु प्रतिसाद शब्दच नाहित माझ्याकडे !
शब्दरचना सुन्दर आहे.
शब्द रचना फारच छान आहे
शब्द रचना फारच छान आहे सांगण्यास कदाचित शब्द कमी पडतील
आज परत वाचली.
आज परत वाचली.
ओह, खूप खूप आभार!!!
ओह, खूप खूप आभार!!!

Pages