चूक ........१

Submitted by सागर J. on 21 March, 2019 - 04:05

शहर बरेच मागे पडले होते पण तो व्यक्ती अजूनही पळत होता . त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या , धाप लागत होती पण पोलिस त्याच्या मागावर होते ,त्याचामुळे तो पुढे जातंच राहिला .जवळच्या शेतामध्ये त्याला एक झोपडि दिसली कुणीच नव्ह्ते आजूबाजूला ,त्याने झोपडित काही वेळ लपायचे ठरवले . झोपडिमधे एक पलंग , चूल व शेतीचे काही सामान होते .अचानक तो रडू लागला .कालपासूनचा घटनाक्रम त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला.......

संतोष नाव त्याचे ,सगळे लोक त्याला सन्तु म्हणत .एका मोठ्या बंगल्यावर घरगडी म्हणून कामाला होता . मालकीण बाई ची एक मोठी कंपनी होती .बंगल्यावर ती आणि तिचा मुलगा असे दोघेच जण राहत असत .घरी नोकर चाकर होते , सन्तु हा त्यातील एक . पण सन्तु हा प्रामाणिक होता , म्याडम बद्धल त्याला खूप आदर होता .
नोकरीमध्ये रूळला होता तो . एके दिवशी एक नवीन माणूस त्याच्या मॅडम च्या बंगल्यावर आला. दिवसेंदिवस त्याचे येणे वाढू लागले . तो माणूस संतू ला विचित्र वाटू लागला . मॅडम त्या माणसाच्या प्रेमात पडत आहेत हे त्याला जाणवले . पण तो साला नीच माणूस मॅडम च्या प्रॉपर्टी च्या मागे आहे हे संतूने बरोबर ओळखले होते .एके दिवशी त्याने मॅडम ला आपला विचार बोलून दाखवला व त्या माणसापासून दूर राहायला सांगितले . पण शांत स्वभावाच्या मॅडम संतू वरच चिडल्या, त्याची लायकी काढली मॅडमनि. दुखी मनाने तो जेंव्हा घरी आला आणि त्याने विचार केला कि आपण मॅडम च्या चांगला साठी बोललो असूनपण आपल्याला शिव्या भेटल्या , लायकी काढली आपली , साला खऱ्याची दुनियाच नाही . आता आपण लक्ष द्याचे नाही काही का होईना मॅडम चे . पण आपल्या अपमानाचा बदल नक्की घ्याचा .

दुसऱ्या दिवशी त्याचे काम संपून तो घरी जायला निघत असताना त्याला काही पैसे मॅडम च्या बेड खाली पडलेलं दिसले . पैसे पाहून नव्हे तर अपमानाचा बदल घ्याचा हेतूने त्याच्या मनात कली शिरला त्याने गुपचूप ते पैसे उचलले व तेथून पळाला. पण त्याचे मन त्याला स्वस्त बसू देईना . चोर तर नक्कीच नव्हता तो , मॅडम नि आपल्याला बोल जरी लावले असतील पण आपल्या अडी अडचणीला मॅडम मदत करतात हे तो जाणून होता . आपल्या अपंग मुलीला शाळेत दाखल करण्यासाठी मॅडम ने केलेली मदत त्याला अजून आठवत होती. काही का असेना आपले चुकले उद्या आपण मॅडम ला पैसे वापस देऊन त्यांची माफी मागू असे त्याने ठरवले .

सकाळी तो जेंव्हा बंगल्यावर गेला तेंव्हा तो माणूस पण बंगल्यावरच होता . पण संतूला मॅडम कुठेच दिसल्या नाहीत , दुसरे नोकर पण कुणीच अजून आले नव्हते.पण तो माणूस संतू ला बघून थोडा गडबडला होता . नेमका साफ सफाई करताना संतूच्या खिशातून नोटांचे बंडल खाली पडले . नेमके ते बंडलं त्या माणसाने पाहिले. त्या माणसाने त्याला पोलिसात द्यायची धमकी दिली , तेंव्हा संतूने रडत रडत आपली चूक झाली असे सांगून माफी मागितली. आपण मॅडम समोर सगळे कबूल करू असे हि तो म्हणाला. त्या माणसाने मॅडम बाहेरगावी गेल्याचे संतूला सांगितले . तो माणूस म्हणाला मी पोलिसांना पण फोन केला आहे .ते येतच आहेत, तू आपला गुन्हा कबूल कर मी तुझी शिक्षा कमी करायचा प्रयत्न करतो . संतूच्या कानावर काहीहि पडत नव्हते . तो गुपचूप खाली मान घालून बसून होता.

काही वेळाने पोलीस आले . त्यांनी आत जाऊन काहीतरी तपासणी केली . पण संतू जवळ येऊन त्याला विचारू लागण्याच्या आधीच संतू म्हणाला कि साहेब माझ्या हातून हे सर्व रागाच्या भरात झाले आहे . मी माझा गुन्हा मान्य करतो पण मला सध्या अजून काही विचारू नका . त्या पोलिसाने संतू च्या दोन मुस्काटात ठेऊन दिल्या , पण पोलीस तर मारणारच म्हणून संतूने मार खाऊन घेतला. संतूला घेऊन ते पोलीस बाहेर निघाले . पोलीस गाडी सोबत अबुलन्स बघून संतू ला आश्चर्य वाटले , तो मॅडम चा प्रियकर हि का रडत होता हे संतूला कळत नव्हते . संतू आणि पोलीस गाडी मध्ये बसले . संतू आपल्याच विचारात बसला होता , त्याला अचानकच आपली अपंग मुलगी आठवली . आपल्याला जर जेल झाली तर तिला कोण पाहणार असे त्याला प्रश्न पडला . काहीही करून पोलिसांपासून सुटका करून घेणे जरुरी आहे असे त्याने ठरवले . एका मोकाच्या क्षणी त्याला ती संधी मिळाली . पोलिसांच्या समोरच रस्तावर एक भीषण अपघात झाला होता. खूप लोक जमा होते त्या घटनास्थळी . पोलिसही लगेच पळत गेले . संतू एकटाच आहे हेय त्यांच्या लक्षातही आले नाही .
त्याचा फायदा घेऊन संतू जे पळाला ते ....ती झोपडी येई पर्यंत थांबलाच नाही .................................................................

क्रमश ...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users