जाहिरनामा पाळणे बंधनकारक असावे का.!?

Submitted by ashokkabade67@g... on 9 April, 2019 - 12:17

निवडणूक आलि म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेते आरोपांची बरसात आणि आपल्या जाहिरनाम्यातुन जनतेसाठी आश्वासनांची खैरात करीत असतात आणि जनताही हे राजकीय पक्ष आणि नेते आपला दिलेला शब्द आणि आश्वासन पाळतील या खोटयाआशेने यांना मतदान करते आणि आश्वासन देणारे हेच नेते वोतो ईलेक्षण जुमला था। अस बेशरमपणे सांगुन जनतेच्या तोंडाला पान पुसतात गतं निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने भरमसाठ आश्वासने दिली काँग्रेस सत्तेवर आलिच नाही त्यामुळे आश्वासन पाळण्याची वेळच त्यांच्यावर आली नाही आणि भाजपने दिलेले कुठलेच आश्वासनपाळले नाही मग या पक्षांंनी जनतेची फसवणुक केली म्हणूण यांच्यावर दावा का दाखल करु नये.,पण कायदयाने तसे करता येणार नाही. सदैव हे नेते आणि राजकीय पक्ष जनतेची फसवणूक करतच रहाणार आहेत यासाठी प्रत्येक पक्षावंर कायदयाने आश्वासन पाळण्याचे बंधन असायलाच हवे।आपल्याला काय वाटते.?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विषय - जाहीरनामा पाळणे बंधन कारक असावे का असावे का माहित नाही पण ते पूर्ण करण्याची अक्कल सगळ्यांकडे नसते हि खरी वस्तुस्तिथी आहे , नाही तर काही लोक भारत हा गरिबी पार कमी झाली असा बोंबालयाला लागले नसते . ह्यांना गरिबीची माहितीच नाही आहे बहुतेक ..खर बोलायला ह्यांना लाज वाटते बहुतेक.. भारत मध्ये गरिबीची व्याख्या हि दिवसाला ३२ रु. रघूराजन नुसार आणि २९ रु तेंडुलकर नुसार जो कमावतो त्याला गरीब म्हणतात पण हि व्याख्याच मुळात मिनिमम म्हणजे सगळ्यात तळातल्या लोकांची आहे जी लोक ह्याच्या खाली आहेत ती कुपोषित राहतात कारण त्यांना मानवी निर्देशांकानुसार जी आवश्यक १८०० कॅलोरिज पाहिजेत ती मिळत नाहीत ..आणि जर स्वातंत्र्याच्या ७० वर्ष नंतर सुद्धा जर देशाची २३% म्हणजे जवळपास ३० कोटी लोक जर अशी असतील तर हि शरमेची बाब आहे. दुसरीकडे दिवसाला ३$ म्हणजे २०० रु पेक्षा कमी कमावणाऱ्या लोकांची संख्या ६०% च्या जवळपास आहे ह्यांना जर कोणी श्रीमंत म्हणत असतील तर त्यांनी गुलामगिरी अजून सोडली नाही आहे , आणि आता हि न्याय योजना हि निव्वळ धूळफेक आहे , चापलुसी मंडळींनी निदान एक मार्ग सध्या असलेल्या ३.६ लाख कोटी सबसिडी व्यतिरिक्त अजून ३.६ लाख कोटी कुठलेही टॅक्स , इंटरेस्ट ना वाढवता महागाई ना भडकवता , वर्ल्ड बँक मधून कर्ज ना घेता , सध्या चालू असलेल्या पायाभूत सुविधांना उभारण्याचे काम बंद ना करता कसे उभे करणार ते सांगून दाखवा ?

या देशाला हुकुमशहा ची गरज आहे. ज्यांचे स्वत:चे पोट भरणे मुश्किल आहे त्यांनी एकच पोर जनावं. निष्पाप मुलांचे आयुष्य भरडले जाते. इथं कोणीच माईचा लाल स्वत: उपाशी राहून दुसऱ्या चे पोट भरणार नाही. अपवाद असतील. लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय केले नाही तर काही उपयोग नाही. पैसा हा भांडवलदारांच्या घशात जातो कारण कायद्याने संरक्षण आहे.

मार्मिक आधी तुमचा बोला कि दुसर्यांचा कशाला बघताय , कधी तरी उत्तर द्यायला शिका, प्रश्न विचारण सोप आहे

काँग्रेसने देशासाठी काहीच केले नसते तर यांचे आजोबालोक्स अन्नधान्याच्या अभावाने उपाशी पोटीच मेले असते मग ह्या भामट्यांच्या जन्माची कथा निर्माण झाली नसती. Rofl

राजेश. किमान फोटोशॉप मधला दिखावटी विकास तरी नाही माथी मारला ना तुमच्या? घंटागाडी येते म्हणे तुमच्या गावात... ! प्रत्यक्ष येते की केवळ व्हाटसप वर मेसेज फॉरवर्ड होतो 'गाडी येऊन गेली' म्हणून

पैसे कसे उभारणार ह्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर ,
शेतीमालाला दीडपट हमीभाव प्रत्यक्षात दिला तर शक्य आहे. हे दिले ,ह्यात काय चुकले?

इतर देशांत कॉंग्रेस नव्हती तरी म्हशी गाभ राहून पाडी, टोणगे जनतच राहिल्या. भारतात केरळ, बंगालमध्ये कॉंग्रेस होती का? तशी केंद्रात होती. कॉंग्रेस गवत खाऊन म्हशी टोणग्यांची संख्या वाढली बरं.

शेतीमालाला दीडपट हमीभाव प्रत्यक्षात दिला तर शक्य आहे. हे दिले ,ह्यात काय चुकले- तुमच्या कडून सरळ उत्तराची अपेक्षाच ठेवणे मूर्खपणा आहे .. हेला अजून आजोबांच्याच दुनियेत आहे ...

निलेश भावा एकदा बीपीएलचा सर्व्हे करण्यासाठी खेडेगावात काही दिवस जा. कागदावर बीपीएल खाली राहण्यासाठी काय काय खोटेपणा चालतो तो उघड्या डोळ्यांनी पहा. मग किती देशप्रेमी राहता ते बघा. वीजचोरी किती आहे हे ही बघा. कालच ओशोचा व्हिडिओ बघितला. तुम्ही नक्कीच बघा. गाडी विकून गरिबांना मदत करा सांगणाराची अशी तासली आहे का बस.

तात्पर्य काय? तर माणसाने रोज काही ना काही लिहावे पण ते आपल्या स्वानंदा साठी. सोशल मिडियावरच्या ‘लाईक्स आणि ’कॉमेंट्स’ साठी नाही. काय म्हणता?

शशिराम तुमच्या म्हणणंय नुसार गरिबी नाही आहे, नाही तर जे काही आकडे आहे ते खोटे आहेत मग न्याय योजना काय ५ वर्षाचा कसूर भरून काढण्यासाठी बनवली आहे का ?

तुम्ही खरोखरच जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला कळेल ५० टक्के पेक्षा जास्त खोटारडे लोक बीपीएल यादीत आहेत. व हे लोक खऱ्या गरजूंना सुविधा मिळू देत नाही. बीपीएल यादी एक ते तीस अशा काहीतरी मुद्द्यांवर आधारीत असते.
वर लोकसंख्या विषयक माझे विचार मांडलेच आहेत.

कागदावर बीपीएल खाली राहण्यासाठी काय काय खोटेपणा चालतो तो उघड्या डोळ्यांनी पहा. मग किती देशप्रेमी राहता ते बघा. वीजचोरी किती आहे हे

अपवाद म्हणून तुमचे म्हणणे योग्य असेल पण देशात गरिबी नाही असे सुचवत असाल ते 200% चुकीच आहे

शाशिराम अगदी बरोबर आहे तुमचे.. बिपील खाली राहायला मरमर करतात लोक. हा देश म्हणजे भुक्कड ढोंगी लोकांचा जमाव आहे. ज्याचे खायचे त्याच्याच ताटाला भोक पाडणारे लोक इथे असतात...

हरित क्रांती चा बिनतोड मुद्दा काढल्यावर लगेच ' जुने नको जुने नको' सुरु झालं.. Happy हे नेहरू आजोबाच्या काळात सदैव पर्यटन करतात ते चालते मात्र. दांभिक भामटे...

आजही देशात सर्वोत्तम कॉलेजेस हि सरकारी कॉलेजेस आहेत. गेल्या पाच वर्षात एक तरी आयआयटी सुरु केले का? कोन्ग्रेस ने किती केलीत? त्यातून किती हजार सुपीक मेंदू असलेली स्वार्थी पब्लिक देशाबाहेर आपली वैयक्तिक करिअर करायला पळाली?

आमची पीजी डिग्री इंदिरा गांधी नेशनल ओपन युनिव्हर्सिटीची आहे, आम्ही तसे अभिमानाने सांगतो , त्याच्या जीवावर आमचे प्रमोशन झाले.
आमच्या पेशन्टना आम्ही संजय गांधी पेन्शन मिळवून देण्यास प्रयत्न करतो.

खाजप्यानी एखादी गोडसे युनिव्हर्सिटी किंवा हेडगेवार विद्यापीठ काढून त्यातून आम्हाला अजून एक एम डी डिग्री अन प्रमोशन द्यावे , आमच्या पेशन्टसाठी एखादी सावरकर पेन्शन योजना आणावी.

एका ट्रेनिंगला पर्वा दिल्लीला गेलो, विमानाचे बुकिंग केले तर विमानतळाचे नाव इंदिरा गांधी एअरपोर्ट.

खाजपयांनी एखादे वाजपेयी विमानतळ किंवा मुखर्जी एअरपोर्ट काढून आम्हास इमानात बसवून फिरवावे. आम्ही त्यांचेही मुक्तकंठाने गुणगान गाऊ.

गेल्या महिन्यात नेहरू प्लेनोटेरियम पाहिले, आता शाळा परीक्षा झाली की कमला नेहरू पार्क अन आज्जीचा बूट बघायला जायचे आहे.

खाजप्याचे नथुराम तारांगण अन गुरुजी गार्डन कुणी पाहिले आहे का ?

कधी राजावाडी हॉस्पिटलला गेलो तर गोळवलकर गुरुजी नावाचा एक बारीकसा रोड भेटतो, पण गम्मत म्हणजे हा फाटा ज्या मोठ्या रस्त्यातून काटकोनातून फुटतो, त्याचे नाव महात्मा गांधी रोड आहे! ( घाटकोपर पूर्व)
Proud

थँक यु नेहरू , मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधला भाजप शिवसेनेच्या काळात आणि ह्यांनी नाव दिले यशवंतराव ..असाच आहे सगळं ..उपकार झालेत खूप भारतावर सगळी नाव नेहरू गांधी द्यानेस्टी वर ठेवून. २०१४ नंतर भाजप सरकारच्या काळात IIM नागपूर, अमृतसर, बोधगया , सिरमौर , विशाखापट्टणम, संभलपूर, जम्मू बनवलेत , IIT पलक्कड , तिरुपती, धनबाद, भिलाई, गोवा , जम्मू, धारवाड , AIIMS नागपूर, गोरखपूर,मंगलगिरी चालू झालेत, ११ AIIMS चा काम प्रगती प्रथांवर आहे ..दुसरी कडे ग्रामीण भागातल्या मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलबद्ध होण्यासाठी अटल तिकरींग लॅब नावाची STEM लॅब ५००० गावामंध्ये बनवली आहे ज्याची किंमत प्रत्येकी १० लाख रु आहे आणि पुढील ५ वर्षाचे खर्च १० लाख आहे ज्या द्वारे मुलांना ग्रामीण भागातच जागतिक दर्जाची फॅब लॅब उपलब्ध होईल. काँग्रेस च्या लोकांना विचार कि भारतात एकूण फॅब लॅब किती आहेत, बघू किती आहेत ते सांगतात नेहरू च्या कृपे बद्दल.

जाहिरनामा पाळणे बंधनकारक असावे का.!? >>> नाही.

जाहीरनामा वाचून कुणी मत देतो किंवा विचार बदलतो असं खरंच वाटतं का कुणाला?

एकूण फॅब लॅब किती आहेत, बघू किती आहेत ते सांगतात नेहरू च्या कृपे बद्दल.

Proud

उद्या नेहरूंच्या काळात देशात 0 मोबाईल होते व मोदींच्या काळात 50 कोटी मोबाईल आहेत, ह्याचाही चार्ट लावाल.

मेरा भूत सबसे मजबूत.
The program began as a collaboration between the Grassroots Invention Group and the Center for Bits and Atoms at the Media Lab in the Massachusetts Institute of Technology with a grant from the National Science Foundation (Washington, D.C.) in 2001.[5]

Vigyan Ashram in India was the first fab lab to be set up outside MIT. It is established in 2002 and received capital equipment by NSF-USA and IITK

जगात पहिली फ़ेब लॅब 2001 ला आली , अन भारतात पहिली आली 2002.

अटलबिहारींचे अभिनंदन

उद्या नेहरूंच्या काळात देशात 0 मोबाईल होते व मोदींच्या काळात 50 कोटी मोबाईल आहेत, ह्याचाही चार्ट लावाल. >>>

समस्त गांधींचाटू लोकांच्या हातात सत्ता होती तेव्हा सगळीकडे त्यांनी नेहेरु व गांधी आडनावाच्या लोकांचं नाव दिलं. त्याचा एव्हढा अतिरेक झालाय कि आता त्या आडनावाला काहीच किंमत उरलेली नाही (अर्थात गांधींचाटू लोकांसाठी या नावाची अजूनही सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे)

तुम्ही नथुराम विद्यापीठ , वाजपेयी विमानतळ , गोडसे सायन्स सेंटर , मुखर्जी पतपेढी , हेडगेवार हॉस्पिटल इ इ इ इ बांधावे.

नेहरूंच्या भुताने अडवले आहे का ?

मागील 25 वर्षात जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार होते त्या त्या वेळी राज्यातील विजेची लोडशेडींगचं त्रास खूपच वाढलेला दिसतो.
हा माझा अनुभव आहे.

तुम्ही नथुराम विद्यापीठ , वाजपेयी विमानतळ , गोडसे सायन्स सेंटर , मुखर्जी पतपेढी , हेडगेवार हॉस्पिटल इ इ इ इ बांधावे. >> हे बांधण्यापेक्षा मंदीर बांधण्याची हवा सोडणे हे यांच्या जास्त फायद्याचे आहे ना

मागील 25 वर्षात जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार होते त्या त्या वेळी राज्यातील विजेची लोडशेडींगचं त्रास खूपच वाढलेला दिसतो.
हा माझा अनुभव आहे.>> खोटं बोलू रेटून बोलू भक्त.

गुपचूप लाईट बिल वाढवले गेलेत गेल्या चार पाच वर्षात. तिप्पट महाग झालेले आहे. Mseb ने थकीत बिले, एरिया नुसार वेगवेगळे विभाग केले होते लोडशेडींगसाठी. आता नियमित वीज बिलाचा भरणा करणाऱ्या विभागांत सुध्दा लोडशेडींग होते आणि तेही गुपचूप.

1999 ते 2014 ह्या काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी सत्तेच्या काळात 6 ते 8 तासाचे भारनियमन असायचे फक्त निवडणुका तोंडावर आल्या की भारनियमन रद्द करीत असत ही कोणीही व्यक्ती सांगेल.
RTI मार्फत तुम्ही माहिती घेऊ शकता फक्त पुणे मुंबई आणि midc भागात भारनियमन नसायचे

भारनियमन दोन प्रकारचे असतं , रहिवासी आणि कृषी. रहिवासी भारनियमन कमी केले,परंतू कृषी भारनियमन अजूनही ग्रामीण भागात बारा बारा तासाचे असते, तेही दिवसभर, शेताला पाणी रात्री द्यावे लागते त्यामुळे बिबळ्याच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांचे प्राण गेले आहेत. आपण रहिवासी भारनियमन कमी झाल्याचे वेब साईट वर बघून खुष होतो.

@विठ्ठल ,@भरत.,@आ.रा.रा.,@हेला ,@मार्मिक गोडसे,@उदय

इथल्या प्रत्येक "अभिजनांची" सामान्यांकडून हाड हाड होणाऱ्या कुत्र्यासारखी अवस्था होऊ नये म्हणून हा व्हिडिओ एकदा कृपया बघा.
तुमची बुद्धी एका घराण्याच्या पायी वाहून तिची अवस्था क्षुद्राहून क्षुद्र करून घेण्यापेक्षा हा व्हिडिओ बघून कृपया एकदा पुनर्विचार करा ही कळकळची विनंती !!

अभिजन बदमाशांची टोळी
https://www.youtube.com/watch?v=qGFtWANILPk

तुम्ही नथुराम विद्यापीठ , वाजपेयी विमानतळ , गोडसे सायन्स सेंटर , मुखर्जी पतपेढी , हेडगेवार हॉस्पिटल इ इ इ इ बांधावे. >> हे बांधण्यापेक्षा मंदीर बांधण्याची हवा सोडणे हे यांच्या जास्त फायद्याचे आहे ना। >>>

Blackcat व विठ्ठल भाऊ, मोदी सरकारमध्ये चाटु लोक नसल्यामुळे तसे काही होत नाही.

अर्थातच blackcat ना जेव्हढी वेगवेगळी नावे सुचली तशी विविध नावे गांधीचाटुना काँग्रेस सत्तेत असताना सुचत नाहीत हे या देशाचं दुर्दैव.

काँग्रेसने 100 गोष्टीना गांधी नेहरू नावे दिली म्हणून बॉम्बलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नावाच्या 200 गोष्टी करून दाखवा.

मोदी सरकारमध्ये चाटु लोक नसल्यामुळे तसे काही होत नाही. > मंदीर बांधायचा वादा केलाय की मोदीने.. वचनपत्रात..

जाहीरनामा पाळणे हे बंधनकारक असावे, जो तो पाळणार नाही त्याच्या पाठीवर शहामृग बांधून मुंबई ते गोवा असा प्रवास पायी करायला लावायचा. ही शिक्षा लवकरात लवकर अमलात आणावी यासाठी मी आजपासून उपोषणाला बसणार आहे.

Pages