चौकीदार

Submitted by DJ. on 19 March, 2019 - 05:38

चौकीदार

आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.

इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्‍यात लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्‍या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"

सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"

एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्‍या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्‍या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"

त्यानंतर होणार्‍या चोर्‍यांवर आणि पडणार्‍या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्‍या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्‍या-मार्‍या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्‍या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्‍या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्‍या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्‍या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.

उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.

आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्‍यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!

असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

प्राप्तिकर विभागाने ऐन निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात जे छापे टाकले त्यावर निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने या कारवाईची दखल घेत प्राप्तीकर विभागाची चांगलीच कानउघाडणी केली. तुम्हाला जर छापा टाकायचा असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना याची पूर्वसूचना द्या, अशा शब्दात आयोगाने अधिकाऱ्यांना सांगितले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या काळात हे छापे टाकले जात आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर आयोगाने या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. निवडणुकीच्या काळात कुठेही छापा टाकायचा असेल तर त्याआधी निवडणूक आयोगाला याची पूर्वसूचना देणे गरजेचे आहे, असे आयोगाने म्हटले आहे. मध्य प्रदेशात जी छापेमारी करण्यात आली त्यासंबंधीची सूचना प्राप्तीकर विभागाने निवडणूक आयोगाला दिली नव्हती. देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे आयोगाला छाप्यासंबंधी माहिती असणे गरजेचे आहे, असेही आयोगाने म्हटले आहे.

'निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राप्तिकर खात्याचे सुरू असलेले छापे राजकीयदृष्ट्या निष्पक्ष असतील आणि गैरप्रकार रोखण्यासाठी छापे सुरूच ठेवले जातील,' अशी ग्वाही महसूल सचिव, तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने निवडणूक आयोगाला दिली आहे.

@ नथुराम नसलेले गोडसे आणि इथल्या तमाम काँगी भाटांनी डोळे उघडे ठेऊन खालचा लेखाचा भाग वाचला तर अर्थ आहे

पाच वर्षे बहूमताचे सरकार चालवुनही मित्रपक्षांना गुण्यागोविंदाने निवडणूक काळात जवळ घेण्यातली भाजपाची चपळाई दुर्लक्षित करता येणार नाही. उलट मागल्या वेळी सपाटून मार खाल्लेल्या व अनेक राज्यात असलेली सत्ता गमावलेल्या कॉग्रेसला मित्रपक्षांनाही जवळ राखता आलेले नाही, हा फ़रक नजरेत भरणारा आहे. निवडणूकीपुर्वी म्हणजे सत्ता दुर असताना कॉग्रेस मित्रपक्षांना सोबत घेऊ शकत नाही, तर निकालानंतर अशा रागावलेल्या मित्रांना घेऊन कॉग्रेस वा राहुल सरकार कसे चालवणार आहे? ही सामान्य जनतेच्या मनातली शंका आहे. उद्या निकालानंतर मित्र होऊ शकणारे आजच एकमेकांना शिव्याशाप देत लोकांसमोर आलेले आहेत. मोदीना हटवल्यावर एकत्रित सरकार चालवण्याची आश्वासने देत आहेत. हा केवढा विरोधाभास आहे? लढाईत एकत्र येण्याची इच्छा नसलेले लढाई संपल्यावरची लुट समजूतीने आपापसात वाटून घेऊ म्हणतात ना? लुटमारीपुर्वीच दरोडेखोरांमध्ये हाणामार्‍या होत असतील, तर त्यांचे भवितव्य काय असू शकते? ज्यांच्यात एकवाक्यता नाही, असे लोक चांगले खंबीर सरकार चालवू शकत नाहीत, अशीच प्रतिमा यातून तयार होते. उलट मोदी व भाजपा यांनी एकमुखी नेतृत्व आणि एकदिलाने लढाई, अशी प्रतिमा मोदींनी उभी केलेली नाही काय? कारण त्यांना निवडणूक व बहूमत जिंकायचे आहे आणि ते एका प्रभावी प्रतिमेतून शक्य असल्याची जाणिव त्यामागे आहे. आजकाल लोकांना स्थीर सरकार व एकपक्षीय खंबीर सरकारचा अर्थ उमजलेला आहे. त्यावर मात करण्यासाठी तरी विरोधकांनी आघाड्या व जागावाटपात समजूतदारपणा दिसेल याची काळजी घ्यायला हवी होती. अधिक जागा मागण्यापेक्षा वाट्याला येतील त्यातील अधिक जागा जिंकण्याला प्राध्यान्य द्यायला हवे होते. आपापली संघटनात्मक शक्ती वाढवून बूथ पातळीवर भाजपाशी दोन हात करायला सज्ज व्हायला हवे होते. त्याचा कुठे मागमूस दिसतो काय? प्रतिक व प्रतिमा यात मोदी मतदानापुर्वीच जिंकलेले दिसतात ना?
-भाऊ तोरसेकर

Proud

काँग्रेसने पकडून ठेवलेल्या मसूदला सोडून दिलेले लोक आता इतरांना दरोडेखोर म्हणू लागले आहेत.

वाजपेयींच्या 5 व मोदीच्या 5 वर्षात एकही दरोडेखोर पकडता आला नाही

वाजपेयींच्या 5 व मोदीच्या 5 वर्षात एकही दरोडेखोर पकडता आला नाही
नवीन Submitted by BLACKCAT on 10 April, 2019 - 12:08
<<

पंतप्रधान श्री मोदींच्या काळात हिरव्या दहशतवाद्यांना पकडत नाहीत तर त्यांना थेट गोळी घाऊन कुत्र्याच्या मौतीने ठार करतात. जेणेकरुन मसूद अझहरला ज्या प्रसंगात सोडावे लागले तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून.

ज्यांना आज जवळ केले त्यांना खड्या सारखे बाजू सारण्याचे कामही ते तितक्याच तत्परतेने केले जाईल .भाऊचे चाटून बूडातून शेंबूड गळायला लागला तरी चाटणे थांबणार नाही .

Proud
पंतप्रधान श्री मोदींच्या काळात हिरव्या दहशतवाद्यांना पकडत नाहीत तर त्यांना थेट गोळी घाऊन कुत्र्याच्या मौतीने ठार करतात.

तो उल्लेख राजकीय ठगाबद्दल आहे, त्यातले किती पकडले ?

आणि मसूदला का नाही गोळी घातली मग ? डोवाल पिशव्या भरून पैसे घेऊन गेला होता ना ?

अपेक्षे प्रमाणे प्रतिसादातील तोरसेकरांच्या मुद्द्यांचा प्रतिवाद ना करता शिव्या शाप देणे सुरु झाले.
बोलायला मुद्देच नाही तर !

माहित नव्हते डोवालांना लहानपणापासून ओळखता ते.
काळ्या मांजरीच्या रूपात त्यांच्या घरी जाऊन घाण करण्याचा आनंद वेगळाच असेल ना ?

ही भाऊची लघुस्वरुपातील शंका आहे

भाऊचे लेख तुम्हालाच लखुलाभ होवो, इथे त्या घाणीला साफ केले जाणार नाही.

किती उद्दात विचारधारेचे प्रदर्शन !!

या असल्या महान विचारांमुळेच कॉग्रेस आजच्या एका पक्षाच्या कमाल दर्जाला स्पर्श करत आहे.

अरे पीपिंग टॉम्या किती विकृत आवडी तुझ्या, शोभतोस बिजेपीचा कार्यकर्ता. असंही चाळीस पैशात काय काय करणार?

अरे पीपिंग टॉम्या किती विकृत आवडी तुझ्या, शोभतोस बिजेपीचा कार्यकर्ता. असंही चाळीस पैशात काय काय करणार?
नवीन Submitted by मार्मिक गोडसे on 10 April, 2019 - 16:25
<<

अरे विकृत गोडश्या खालील प्रतिसाद तूच लिहिलायस ना ?
--
सभागृहात अश्लील चित्रफिती बघणारे हेच खरे तुमचे आदर्श .
Submitted by मार्मिक गोडसे on 10 April, 2019 - 16:02

--
आता तुला आरसा दाखवला तर झोंबायचे कारण काय ?
आणि तुझ्या तोंडाचे गटार घेऊन तिकडे मिसळपाववर जा, की हाकलला तुला तिथुनही.

लैच वाईट स्तिथी आहे चापलुसी गॅंग ची , पार खालची पातळी गाठलीय, ह्यांना जनता बरोबर जागा दाखवणार आहे ..काहींना तर आधीच न्यायालयाने बाहेर बसवले आहे बाकीचं उरलेले २३ तारखे नंतर गायब होतील.. ह्यांना किती वेळा च्यालेंज केला कि एक तरी पप्पू च काम दाखवा पण एकही दाखवलं नाही आता पर्यंत , ह्यांना फक्त चxx यची माहित आहे , गुलामगिरी तुन मुक्त नाही झालेली हि गॅंग ..

न्यायालय से याद आया. राफेल चे केस दाखल करुन घेतली म्हणे कोर्टाने... मजबूत मारली जाणार आहे भाजपची आता....

१९९० नंतर कुठल्याच पक्षापाशी देशव्यापी संघटनेचे जाळे उरलेले नव्हते आणि कॉग्रेसपाशी निदान संघटनेचा ढाचा शिल्लक होता. दुसरीकडे रा. स्व, संघाच्या सोबतीने भाजपाकडेही देशव्यापी संघटनात्मक सांगाडा सज्ज झालेला होता. त्याचा वापर करण्याची कुशलता मोदी व त्यांच्या नव्या पिढीतल्या सवंगड्यांपाशी होती. त्याचा प्रभाव कॉग्रेस व अन्य पक्षांना ओळखता आला नाही, की राजकीय विश्लेषक म्हणून मिरवणर्‍यांनाही समजून घेता आला नाही. निवडणूक ही उमेदवार व पक्ष लढत असले, तरी त्यातले सर्वात भेदक शस्त्र सामान्य मतदाराच्या हाती असते. त्याने ते कुठल्या व कशा पद्धतीने वापरले, त्यानुसार निकाल लागत असतात. त्या सामान्य मतदाराच्या मनात ज्या प्रतिमा उभ्या रहातात किंवा उभ्या केल्या जातात, त्यानुसार मत नावाचे शस्त्र वापरले जात असते. म्हणूनच ही प्रतिमांची लढाई असते. जी प्रतिमा भावते तिच्या बाजूने मतदार लढायला मैदानात उतरत असतो आणि त्याला लढायला प्रवृत्त करणारी संघटनात्मक शिस्तबद्ध फ़ौज निर्णायक ठरत असते. एका बाजूला मोदी अशी प्रभावशाली प्रतिमा उंचावण्यासाठी राबत राहिले आणि दुसर्‍या बाजूला अमित शहा किंवा तत्सम संघटक लढवय्यांनी गल्लीबोळात व गावखेड्यात मतदाराला घराबाहेर काढून मतदानकेंद्राच्या रणांगणात आणायची कामगिरी पार पाडलेली होती. त्याच्या उलट विरोधक मात्र रणवाद्ये वाजवूनच युद्ध जिंकण्याच्या शैलीत गुरफ़टून राहिले होते आणि त्यांचे कायकर्ते वा लढवय्या मतदार विखुरलेला वा निष्काळजी घरी बसलेला होता. अशी ती २०१४ ची विषम लढाई होती. एका बाजूला नरेंद्र मोदींची प्रभावी होत गेलेली प्रतिमा आणि दुसर्‍या बाजूला कुठलीही नजरेतही न भरणारी अन्य प्रतिमा, अशा लढाईला विषमच म्हणावे लागेल ना? त्यामुळे आठ लोकसभांच्या नंतर एका पक्षाला थेट बहूमत मिळण्याचा चमत्कार घडला होता. तो चमत्कार नव्हता तर बदलत्या कार्यशैली व काळाचा परिणाम होता.

-भाऊ तोरसेकर

Shashank सध्या जेट एअर वेज वाचवण्यासाठी कोण एका बँके तर्फे भारतीय जनेतेचे 1500 कोटी टाकून ती बँक मालकी हक्क विकत घेत आहे आणि जनेताचा पैसा धोक्यात घालत आहे अश्या बातम्या आहेत, जी खासगी विमान कंपनी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर अनेक महिने देत नाही अशी ही जेट एअरवेज , आणि आज तर यांचे विमान अमस्टर्दं दम मधे जप्त झालं अश्या कंपनीवर जनेतचा पैसा उधळला जातो आहे, कोणी काही बोलत नाही.... हे सर्व मित्र नरेश गोयल याला मदत करण्या साठीच ना , काही उत्तर आहे, या जेट चे पेट्रोल इंडियन ऑईल ने पैसे न दिल्या मुले बंद केले तर अचानक काय केलं किंवा घडले ते माहीत नाही पण IOC ला पैसे न मिळताच पेट्रोल उधारीवर परत सुरू केले, अश्या बातम्या आहेत तुला मला जनेतला आता भारतात सध्या आच्छे दिन असल्यामुळे पेट्रोल उधारी वर मिळते का ते सांगा, एकीकडे तर चौकीदार उधळपट्टी होते असे सांगत एअर इंडिया बंद करण्याच्या मागे आहेत अश्या बातम्या येत आहेत, आणि जियो ने तर यांची छबी. पानभर जाहिरातीसाठी वापरली होती त्या नंतर MTNL BSNL बंद पडण्याची बातम्या सध्या पेपर मधे दिसू लागल्या असे हे विरोधाभास आहेत आज अनेक नोकरदार मध्यम वर्गिय जे टॅक्स निमूटपणे देतात त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न. अश्या प्रकारे होतो आहे कुठे गेले 2 कोटी नवीन जॉब्स आता तर नवीन जाहीरनाम्यात मधून पण अदृष्य झाले, म्हणूनच मग विरोधी पक्ष चौकीदारा वर टीका करतात राफेल बद्दल माहिती मागतात आणि भक्त त्यांचेवर तुटून पडतात , मी काही चौकीदार विरोधक अथवा समर्थक नाही पण एक सामान्य मतदार म्हणून या चौकीदारी वर भरवसा करावा का ..... ते मात्र शक्य असल्यास सांगा .... जमत नसेल तर सोडून द्या ....

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.loksatt...

एक सामान्य मतदार म्हणून या चौकीदारी वर भरवसा करावा का- तुम्हाला माहित नसेल पण जेट एअर वेज च्या घडामोडीवर सरकारचे बारीक लक्ष आहे , जी अवस्था काँग्रेस च्या काळात किंगफिशर एअर लाईन ची झाली ती ना होऊ देण्यासाठी सरकारने लक्ष घातले आहे , नरेश गोयल ला पायउतार होऊन बँकांनी ताबा घेतलं आहे , बँकांनी त्या नंतर जवळपास १००० कोटी ची मदत केली आहे . जेट एअर वेज तोट्यात जाण्याचं कारण :-
Purchases of wide-body aircraft 13 years ago and ambitions for the international market may have set Jet on its current course, industry insiders say.
मुळात आपल्या इथे कमी अंतरासाठी सुद्धा मोठी विमान वापरली जातात , बऱ्याच वेळेला ती फुल्ल कॅपॅसिटी नसतात , त्यामुळे त्यांना भरमसाठ सुठ द्यावा लागती , दुसरी कडे कमी अंतरावर एअरपोर्ट डेव्हलप झाले नाही आहेत .. ७० वर्षात भारत फक्त १०१ विमानतळ आहे जी सध्या वापरात आहे त्यामध्ये सुद्धा अशी अनेक असतील कि जिथे दिवसातून १ किंव्हा २ विमाने येतात ..आजोबांच्या काळापासून हे चालू आहे . मोदी नि निदान उडान योजने द्वारे हे चित्र बदलायचे प्रयत्न केलेत म्हणून तर विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढलीय .
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/india-fastes...

Pages