चौकीदार
आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.
इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्यात लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"
सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"
एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"
त्यानंतर होणार्या चोर्यांवर आणि पडणार्या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्या-मार्या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.
उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.
आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!
असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!
राहुल गान्धी आपल्या आजी व आई
राहुल गान्धी आपल्या आजी व आई प्रमणे करतो आहे. या दोघीनी पण दोन जागावर निवडणुकी लढवल्या आहेत. अशा धोरणामुळे निवडणुकीचा खर्च वाढतो कारण दोन्हीकडे निवडून आल्यावर एक जागा सोडावी लागेल व तिथे परत निवडणुक घ्यावी लागेल.
मोदी ने हेच केलं, त्याबद्दल
मोदी ने हेच केलं, त्याबद्दल दिगोची काय म्हणता?
संघाचे संस्थापक हेडगेवार
संघाचे संस्थापक हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा
<< राहुल गान्धी आपल्या आजी व
<< राहुल गान्धी आपल्या आजी व आई प्रमणे करतो आहे. या दोघीनी पण दोन जागावर निवडणुकी लढवल्या आहेत. अशा धोरणामुळे निवडणुकीचा खर्च वाढतो कारण दोन्हीकडे निवडून आल्यावर एक जागा सोडावी लागेल व तिथे परत निवडणुक घ्यावी लागेल. >>
-------- २०१४ मधे मोदी यांनी बडोदा (गुजरात) आणि वाराणशी (उ. प्र.) या दोन मतदार संघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी जिंकल्यामुळे त्यांना एका जागेवरचा राजिनामा द्यावा लागला. त्यांनी बडोदा मतदारसंघाची जागा सोडली. पुढे नव्याने पोट निवडणूका झाल्या...
<< सहा दिवसात एक डिग्री >.
<< सहा दिवसात एक डिग्री >.
------- मानव संसाधन विकास मंत्री या खात्याच्या कॅबिनेट मंत्री होत्या. उच्च शिक्षण विभाग हा या मांत्रालयाचाच भाग आहे.
चार- दोन दिवसाच्या सेमीनाराला हजेरी लावणे आणि त्या विद्यापीठाची डिग्री असणे यात खुप मोठा फरक आहे... निवडणूकीच्या उमेदवारी अर्जावर अशी धादांत खोटी माहिती का देतात ? किंवा त्यांना असा काही फरक आहे हे माहित नसेल तर या अत्यंत महत्वाच्या खात्याच्या कॅबिनेट मंत्री पदाचा कारभार कसा करत असाव्यात.
मला वाटतयं की बहुतेक
मला वाटतयं की बहुतेक अडवाणींनी पण दोन जागांवरुन निवडणूक लढवली होती. एक गांधीनगर, दुसरी लक्षात नाही.
वायनाडकरांना डावे हरवणार
वायनाडकरांना डावे हरवणार म्हणतायत
वाईट पेटलंय राव
शादी बेगानेकी आउर इधर बेगाने
शादी बेगानेकी आउर इधर बेगाने कपडे फाडकु नाचने लगे
विठुपा,
विठुपा,
तुमच्या फर्जीकल स्ट्राईक मधील मजा संपलीय
आता सगळ्याच पक्षांनी
आता सगळ्याच पक्षांनी एकमेकांना पायात पाय घालुन पाडले तर निवडुन कोण येणार?
काँग्रेस..!
काँग्रेस..!
दोन जागेवरून निवडणुकीला उभे
दोन जागेवरून निवडणुकीला उभे राहणे कायदेशीर आहे .
काय करणार कायद्याचं राज्य आहे आपल्याकडे
नोटा बंदी मुळे काय ,कसं ,आणि
नोटा बंदी मुळे काय ,कसं ,आणि कुणाचं नुकसान झाले
सविस्तर पोस्ट टाका कोण्ही तरी
https://twitter.com
https://twitter.com/akashbanerjee/status/1112621730219073536
हमने कभी भी यह नहीं कहा की रॉबर्ट वाड्रा को जेल में डालेंगे| हमने कहा कि भ्रष्टाचारियों को जेल में डालेंगे
चौकीदार अमित शहा
राजेश१८८, सरकारने कृषी
राजेश१८८, सरकारने कृषी खात्याचा अहवाल मागे घेतला / बदलला, एन एस एस ओ चा बेकारी संबंधीचा अहवाल मागे घेतला .
समझनेवाले को इशारा काफी है|
नोटाबंदीच्या पहिल्या वर्षश्राद्धाला मोदींनी जाहिरातींचा पाऊस पाडला होता. निवडणूक प्रचारात त्याबद्दल बोलताहेत का ते? बोलत असतील तर काय? बोलत नसतील तर का नाही?
नोटा बंदी मुळे काय ,कसं ,आणि
नोटा बंदी मुळे काय ,कसं ,आणि कुणाचं नुकसान झाले
सविस्तर पोस्ट टाका कोण्ही तरी
कोणाचंच नुकसान झालं नाही, बिचारी १००० ची नोट हकनाक गेली आणि तिची २००० ची सवत मस्त मजा करतेय.
पहिली पाच वर्ष
पहिली पाच वर्ष भ्रष्टाचाऱ्यांना जेलच्या दारापर्यंत आणले, आत टाकण्यासाठी पुढची पाच वर्ष द्या - पंतप्रधान
विकास ते देशप्रेम व्हाया
विकास ते देशप्रेम व्हाया जुमलेबाजी - नमोचा प्रवास
हिंदुत्वावर आले हो.
हिंदुत्वावर आले हो.
नवल नाही. समस्त चौकीदारांना
नवल नाही. समस्त चौकीदारांना चु बनवायला असं करावंच . लागेल
ऊज्वला हलकट योजना.
ऊज्वला हलकट योजना.
नवीन कनेक्शन देतानाचा खर्च ३२०० रुपये असतो.
त्यातील पहिल्या सिलींडर मधील गॅसची किंमत रुपये ७००/-.(खरेतर ५०० फक्त.पण जाऊ देत.)
३२००-७००=२५००.
यात सरकार काय देतय तर शेगडी व सिलींडर.सिलींडर काही माणसाच्या उपयोगाचा नाही.तो रिप्लेस होत राहतो.शेगडी हजार बिजार रुपयांना विकतात म्हणजे तिची काॅस्ट आॅफ प्राॅडक्शन चार पाच शे रुपयेच असणार खच्चून.म्हणजे यांना दोन हजार तर मिळणारच आहेत तसेही.बर समजा सिलींडरची प्राॅडक्शन काॅस्ट पाचशे म्हणजे डोक्यावरुन पाणी.तरी दिड हजार ऊरलेच.
या बत्तीसशे पैकी सोळाशे सरकार फुकट देणार ते इथे मॅच झाले.
आता ऊरलेल्या सोळाशेच्या आॅईल कंपन्या लोन देणार,इंटरेस्ट फ्री.ते दर सिलींडरच्या वेळेच्या दोनशेच्या सबसीडीतून कापून घेणार.म्हणजे आठ महिन्यात.म्हणजे मिळतयं काय गरिबाला.
हिशेब केला तर.
बेचाळीस रुपये.
(ते सुद्धा मुबलक गॅस उपलब्ध असताना व पेट्रोल प्राईसेस कमी असताना)
मोदी लईच उदार बाबा!
(गणितात चूक दाखवल्यास मान्य केली जाईल)
सो,ऊज्वला हलकट योजना!
https://youtu.be/2VkTYeDEmEM
https://youtu.be/2VkTYeDEmEM
मोदी सिरीयल ?
Namo TV Channel
Namo TV Channel
https://indianexpress.com/article/what-is/what-is-namo-tv-where-to-watch...
काल चौकीदाराचं वर्धा येतील
काल चौकीदाराचं वर्धा येतील (अर्ध्या मैदानासमोर) सभेत केलेलं भाषण वाचलं या भाषणात राहुल, पवार (ज्यांच बोट का काय पकडुन राजकारणात आल्याचा फेकुदावा केला जातो), हिंदु दहशत्वाद, जगातील हिंदुंची नाचक्की (म्हणजे नक्की काय?), सैन्याचा पराक्र्म, इस्त्रोचं अभिनंदन... सगळं सगळं होतं. पण विकासाचा मुद्दा कुठे दिसला नाही.
कोणत्या राजकीय पक्षा च्या
कोणत्या राजकीय पक्षा च्या भाषणात विकासा चा मुद्दा आहे .कोणाल वाटत आहे जात धोक्यात आहे , कोणला वाटत आहे धर्म धोक्यात आहे , कोणाल वाटत आहे देश आणी घटना धोक्यात आहे .आणी प्रचाराचे हेच मुद्दे आहेत विकास कोणला नको आहे आणी विकास मत सुधा मिळवून देत नाही हेच आपल्या लोकशाही दुर्भाग्य आहे
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2261400217458229&id=16930774...
हेमा मालिनी यांचा सुमारे चार
हेमा मालिनी यांचा सुमारे चार वर्षांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. त्यात त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली होती. चेहरा तर तेव्हापासून कायमचाच खराब झाला.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/hema-malini-blames-fa...
तसेही वयाच्या सत्तरीत झालेल्या अपघातातून पूर्णतः रिकव्हर होणे दुरापास्तच. या अपघातानंतर त्यांना रस्त्यावरुन प्रवास करणे किती त्रासदायक होत असेल याची कल्पनाही करवत नाही.
असे असतानाही त्या आपल्या कार्यकर्त्यांना रस्तेप्रवासातील सोयी / गैरसोयीबद्दल काही सूचना करीत असल्याचा खासगी व्हिडीओ इथे डकविणे म्हणजे संवेदनहीनतेचे लक्षण आहे.
१
<< सैन्याचा पराक्र्म,
<< सैन्याचा पराक्र्म, इस्त्रोचं अभिनंदन... सगळं सगळं होतं. पण विकासाचा मुद्दा कुठे दिसला नाही. >.
------- खोट्या आकडेवारीच्या सहाय्याने दाखवलेला विकास हा भकास दिसायला लागतो.
अडचणीत येणारी आकडेवारी लपवली जाते किंवा जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी काहीतरी "स्फोटक" घटना घडवल्या जातात. बेरोजगारी चा महाज्वलंत प्रश्न आहे, गेल्या चाळीस वर्षातली सर्वात वाईट परिस्थिती आहे असे आकडेवारी सांगते.
कुठल्याही रोपोर्ट कार्ड मधे नोटबंदीच्या यशाला स्थान मिळाले नाही आहे. किती काळा पैसा परत आला/ मिळवला... ? epic failure.
निवडणूक आचारसंहितेला धाब्यावर बसवून ISRO-DRDO च्या यशस्वी मोहिमांचा पक्षिय स्वार्थासाठी वापर करणे. जनतेला आभासी सुरक्षितता नको आहे. हवी आहे रोजगारी, नोकरी, आरोग्य, शांतता, सौहार्दता... आणि कायद्याचे राज्य.
<<तसेही वयाच्या सत्तरीत
<<तसेही वयाच्या सत्तरीत झालेल्या अपघातातून पूर्णतः रिकव्हर होणे दुरापास्तच. या अपघातानंतर त्यांना रस्त्यावरुन प्रवास करणे किती त्रासदायक होत असेल याची कल्पनाही करवत नाही. >>
------ सहमत... पण कशाला जिवाची फरफट करायची?
आजारी असाल तर विश्रांती घ्या कशाला जनतेवर उपकाराचे ओझे बनता ? काही कारणाने तुम्हाला स्वत: ची सेवा करताना मर्यादा आहेत, तर तुम्ही जनतेची सेवा कशी करणार?
<<असे असतानाही त्या आपल्या कार्यकर्त्यांना रस्तेप्रवासातील सोयी / गैरसोयीबद्दल काही सूचना करीत असल्याचा खासगी व्हिडीओ इथे डकविणे म्हणजे संवेदनहीनतेचे लक्षण आहे. >>
------- खासगी कसा काय ?
काय एक-एक नमुने असतात
काय एक-एक नमुने असतात
https://www.indiatoday.in/elections/lok-sabha-2019/story/sambit-patra-ch...
Pages