रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे अव्हेंजर्स
Submitted by DJ. on 4 April, 2019 - 15:49

कायव काय DJ., बंदूक काशीच्या हातात होयी, माईच्या नाय. काशीच सगळ्यांका गोळयो घालीन, गोळयो घालीन म्हणात असता!

रिपिट एपिसोड असतो का?
Submitted by kiranghadi on 5 April, 2019 - 03:19 >> नाही... जे काय बघायचं ते फक्त आणि फक्त सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजताच..! नो रिपिट टेलीकास्ट..!!

झी५ वर कधीही पाहु शकता पण असं उठसुठ कधिहि पहाण्यात रोज रात्री न चुकता १०.३० ला पहाण्यातली मज्जा नाय..! Uhoh

आजकाल कोण्ही उठत आणि स्वतःला लेखक समजायला लागतात त्या मुळे अतिशय सुमार दर्जाच्या मालिका लोकांच्या माथी मारल्या जात आहेत

सरिताने हा आठवडा गाजवला. नको तिथे भोचकपणा करुन दत्ताला नोकरीला लावा म्हणुन पाटणकराला साकडं घातलं. घरी आल्यावर पण आण्णाला उलट बोलली. मग दत्ताने दिली तिच्या थोतरीत ठेऊन. त्यामुळे आण्णाच्या मनात दत्ताविषयी अभिमान वाटला का तर - दत्ताने पायातली व्हाण पायातच ठेऊक व्हयी. Proud
नंतर वच्छी आणि तिच्या सुनेने सरिताचे कान भरायचे काम चोखपणे पार पाडले. त्यामुळे सरिता जाम बिथरली. घरात सर्वांशी वादावादी केली माई सोडुन. मग माईला तिच्या वागण्याचे आश्चर्य वाटले. तिने नेहमीप्रमाणे गळ घालुन दत्ताला सरितावरुन नारळ उतरावयाला सांगितले. कालच्या भागात रात्री सरिता घरामागुन कोण शुक-शुक करतंय हे बघायला गेली. एक काळी बाहुली घेऊन (वच्छी नायतर तिची सून असावी) कोणीतरी झाडामागे उभं आहे. ते पाहुन सरिता किंकाळली.. आता आज पुढे काय होतंय त्याची उत्सुकता लागली आहे Proud

हाय बाफ वाचून व शेवंता चा नाच बघून मी पण बघायला सुरू केले आहे. सध्या एपिसोड ४५ परेन्त पाहिले आहे. कामे छानच आहेत सर्वांची.

हो तर.. सगळ्यांचीच कामे छान असात. पण त्या आण्णा नाईकाक तोंडात रवलेलो तंबाखु थुंकायचो अन दारु पिवुन झिंगाल्यालो अ‍ॅक्टींग काय जमुची नाय.

हो तर.. सगळ्यांचीच कामे छान असात. पण त्या आण्णा नाईकाक तोंडात रवलेलो तंबाखु थुंकायचो अन दारु पिवुन झिंगाल्यालो अ‍ॅक्टींग काय जमुची नाय.>>>>>> पण ते दारू खडे ताक पितत ना...

कालच्या भागात सरिताने पुन्हा एकदा षटकार ठोकुन नाईकांच्या घरात आणि माईच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले. तिला 'शुक-शुक' आवाज कुठुन येतो याचा साक्ष-मोक्ष लावायचा होता तेव्हा ती परसातल्या दारातुन मागे गेली. अंधारात एक काळी बाहुली घेतलेली व्यक्ती (काल म्हटल्याप्रंआणे वच्छीची सून - शोभाच होती) तिला दिसली. शोभाने ती काळी बाहुली आण्णाच्या खोलीत ठेवायला सांगितली नाहीतर सरिताचं बिंग (ते विषारी मटण, वच्छीच्या घरी जाणं-येणं वगैरे) सर्वांसमोर फोडेन असा दम दिला. आधी सरिता घाबरलेली दिसली पण दुसर्‍याच क्षणाला अंतरीक उर्जेने एक सणसणीत चपराक शोभेच्या गालफाडावर बसली. सरिताने शोभाला स्पष्ट नकार देत पुन्हा तिच्या घरावर आणि घरातील माणासांवर वाईट नजर ठेऊ नको असे दरडावले.

आजच्या भागात सरिता वच्छीच्या घरी जाऊन दम भरणार असं काहीसं दाखवलं.. बघु काय होतंय ते..!

आधी सरिता घाबरलेली दिसली पण दुसर्‍याच क्षणाला अंतरीक उर्जेने एक सणसणीत चपराक शोभेच्या गालफाडावर बसली>>>
मस्त जमला होता तो संपूर्ण प्रसंग !!

माझा नेमका तोच भाग चूकला. Sad काल जाम मजा आली. सरीताने शोभा व वच्छीला चांगले सुनावले ते ही अण्णांची बाजू घेऊन वगैरे. पण वच्छीने तिला थोडे ब्लॅकमेल केल्यावर तिची ततपप झाली. इकडे हा काशी त्या अण्णा कडे स्वतःची काशी घालायला गेला तर दत्ता त्याला मारणार होता पण माईंनी त्याला थांबवुन पांडुला सांगीतले की काशीला नेऊन घाल.

मग हे दोघे सखाराम-तुकाराम करत निघाले. आधी काशीने पांडुला लाकडी बंदूक दाखवुन घाबरवले तर पांडुने मग ठो ठो अवाज काढुन काशीला घाबरवले. पांडुने त्यात काशीला शेवंताची माहिती देऊन काशीवर अगणित उपकार केले. मग काशी ताडी प्यायला गेल्यावर तिथे रघु गुरुजी होते, त्यांनी काशीला दिक्षा दिली. पण चोंगट्योने ती माहिती वच्छीला सांगुन तिला पण उपकृत केले.

वच्छी तिथे काशीला शोधायला आली, आणी ती रघु गुरुजीला ओरडली. तर उलट नशेत असलेला काशीच तिला ए वच्छी करुन ओरडला. आता आज वच्छी , काशीला बदडणार आहे आईला नावाने हाक का मारली म्हणून. आणी काशीला तसेच का सोडले म्हणून अण्णा झिंगाट डान्स करणार हत.

वच्छी खूप डेरिंगबाज आहे परिस्थितीने गांजलेली असल्याने कायम वैतागलेली असते.
काल तिने बाटली हातात घेऊन रघुक ज्यापद्धतीने घाबरवले.... मस्तच थोडे अति म्हणजे ती बाटली फोडून समोर धरली असती तर अजून मजा आली असती. ....

रश्मी..वैनी.. थँक यु वेरी मच. काल माका टी.वी. बघुक नाय मिळाला. तु लिहिलेला वाचुन सगळा भाग डोळ्यासमोर येतला..! Bw

Pages